सा रे ग म प मराठी : पुढचे पर्व

Submitted by Adm on 29 July, 2009 - 19:23

महाराष्ट्राचा आजचा आवाज नंतर झी मराठी ने सा रे ग म प चं पुढचं पर्व जाहिर केलयं. हे पर्व नवोदित गायकांसाठी असणार आहे. परवाच ह्याची निवडचाचणी मुंबई ला पार पडली. ह्या पर्वाचे बाकीचे डिटेल्स जजेस वगैरे (बहूतेक) अजून जाहिर झालेले नाहियेते. ( Black and white कार्यक्रमाच्या काही भागांमधे गायलेली गायिका स्वरदा गोडबोले हीची ह्या पर्वासाठी निवड झाली आहे).

हे पान ह्या पर्वातल्या गाण्यांविषयी गप्पा मारण्यासाठी.....

http://www.youtube.com/view_play_list?p=96710707C1C304CA ह्या लिंकवर सगळी गाणी पहायला मिळतील..

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

संपदा,
मोनाचे चाहते तिचे गाणे चांगले आहे म्हणुन आहेत असा तुमचा गैरसमज झाला की काय? Happy
गाणे हा बोनस आहे तिच्यासाठी.
असो. आता मी ही चर्चा थांबवतो. (नाहीतर माझ्यावर पोस्ट्स चा मारा सुरु होईल Happy )

पोस्टसचा मारा. >> Lol
कालचा भाग मॅच मूळे निट लक्ष देउन पाहिला नाही, पण लक्ष देण्यासारखे काही नव्हते त्यात.

मंगळ्वार च्या भागात ठाण्याची केतकी भावे 'बेस्ट परफॉर्मर' ठरली. तिची दोन्ही गाणी - 'गगन सदन' व 'जा जा जा रे नको बोलु जा ना' खूप चान्गली झाली. सिन्धुदुर्ग च्या प्रसन्न तेन्डुलकर ने ' निजरुप दाखवा हो ' व 'कशी तुज समजाऊ ' दोन्हि गाणी छान गायली. केतकी व प्रसन्न उपान्त्यपुर्व साठी निवडले गेले आहेत.
उरलेल्यात -
सायली आचार्य (नागपुर) - ' कानडा वो विठ्ठ्लु ' (ध) व 'कोकिळा गा (ध) - नॉक आउट फेरीसाठी निवड.
अभिषेक पटवर्धन(सान्गली) - 'प्रिया आज माझी नसे साथ द्याया(प) व ' या नव नवल नयनोत्सवा ' (ध) - नॉक आउट फेरीसाठी निवड. - हा तयारीचा वाटतो.
आकान्क्षा नगरकर- देशमुख(नागपुर) - 'स्वप्नात साजणा येशील का' (ध) व 'धुन्दुर मुन्दुर पाऊस आला' (ध) - नॉक आउट फेरीसाठी निवड.
शर्वरी जाधव(कोल्हापुर) - ' मल्मली तारुण्य माझे '(प) व 'मला आणा कोल्हापुरी साज '(ध)- नॉक आउट फेरीसाठी निवड. - ' मल्मली तारुण्य माझे ' हे गाणे तिला पेलले नाही. 'मला आणा कोल्हापुरी साज' - चान्गले गायली.
नॉक आउट फेरी सोमवारी आहे.

वरच्या निकालात शर्वरी जाधव आणि नगरकर यांच्या निकालामुळे मला जरा आश्चर्य वाटले.
नगरकर खुप तयारीची आहे आणि चांगली म्हटली तीने. आणि शर्वरी जाधव चा आवाज खुप छान आहे आणि मलमली तारुण्य माझे तिने छान म्हटले होते..विशेषत: सुरुवातीची तान चांगली आली होती. ते एवढे वाईट आहे असे का म्हटले मला कळले नाही.

सायली आचार्य कच्ची वाटली पण या दोघीनी नॉकाऔट मधे नीट केले पाहिजे. अभिषेक पटवर्धन ठीक ठीकच वाटला.

>>>>मलमली तारुण्य माझे तिने छान म्हटले होते..विशेषत: सुरुवातीची तान चांगली आली होती
अगदी अगदी मनस्मी.

कौस्तुभ,

तुम्ही लिहिलेले वाचले. माझ्यासाठी तरी पंडीतजींचे अनेक्डोट्स आणि त्यांच्या गाण्याबद्दलच्या चर्चा हे ते पर्व पाहण्याचे मुख्य कारण होते. मी हे भाग ऑनलाईन पाहिले त्याच्यात गाणी फॉरवर्ड करुन फक्त पंडीतजींच्या कॉमेंट्स ऐकल्या. मंगेशकर कुटुंब हे कंपुबाजीच्या पलिकडे केव्हाच पोहोचले आहे. (त्याना त्याची गरज आहे असे मला वाटत नाही). पंडीतजींच्या वयाचा आणि प्रकृतीचा विचार करता परत आपल्याला या आठवणी ऐकायचे भाग्य मिळेल असे वाटत नाही. असो. हा धागा हायजॅक करायचा नाही म्हणुन चर्चा पुढे तुमच्या विपुत करुया. Happy

आणि हो..चाबुक, फाडुन टाकलेस, फेकुन दिलेस या प्रतिक्रिया आता परत आल्या आहेत सो काळजी नसावी Happy

कौस्तूभ आणि मनस्मी, "महाराष्ट्राचा आजचा आवज" साठी वेगळा बाफ आहे. ही चर्चा त्यावर करा.. कृपया.. नाहितर इथे परत मंगेशकर आणि वाडकर ह्यांचे परिक्षण ह्या विषयावरून वाद सुरु होतील.

आडम
"असो. हा धागा हायजॅक करायचा नाही म्हणुन चर्चा पुढे तुमच्या विपुत करुया. "
हे वाचले का?

त्या अवधूत गुप्तेला खरेच गाण्यातल काहि कळत की नाही देवच जाणे... काहिच्या कहिच्या बोलतो तो...
सलील चान्गले परिक्षण करतो पण आता त्यालाही अवधुत चा वाण नाही पण गूण लागलाय...परवा त्याने गळ्यात काय घातले काय माहीत..माझा मुलगा म्हणतो आई ते बघ काकानी मन्गळसुत्र घातलेय गळ्यात..:)

मागच्या दोन भागात एकूण २३ गाणी झाली. सोमवारी पद्मजा फेणाणी मान्यवर परिक्शक होत्या.
स्वाती पिम्पळकर ,
सारन्ग पाडळकर,
केतन पटवर्धन ,
पूर्वजा पाध्ये ,
गितिका मान्जरेकर ,
म्रुण्मयी तिरोडकर (ही स्टॅन्ड बाय होती) ,
स्वरदा गोखले,
अभिशेक पटवर्धन,
श्रद्धा कुलकर्णी,
अश्विनी देशपान्डे,
आरोहि म्हात्रे ,
सागर जाधव
या सर्वान्ची गाणी झाली.यापैकी सागर जाधव, अश्विनी देशपान्डे, म्रुण्मयी तिरोडकर आणि स्वरदा गोखले उपान्त्य पूर्व फेरी साठी निवडण्यात आले. अजून चार जणान्ची निवड झाली परन्तु त्यान्ना त्या दिवशी उपान्त्य पूर्व फेरी मधे सामिल न करता दुसर्या दिवशी गरज पडल्यास समिल करण्यात येणार आहे. त्यान्ची नावे प्रसिद्ध केली नाहित.(परन्तु तसे झाले नाही).
दुसर्या दिवशी देवकी पन्डित मान्यवर परिक्शक होत्या.
अनुश्का चड्ढा,
प्रियान्का बर्वे,
समिक्शा भोबे,
मोनिका देशमुख,
सायली आचार्य ,
स्वाती नकिल(ही स्टॅन्ड बाय होती) ,
सन्हिता चान्दोरकर ,
प्राची ओक,
आकान्क्शा नगरकर,
शर्वरी जाधव,
ओमकार कुश्ते(हा स्टॅन्ड बाय होता) या सर्वान्ची गाणी झाली.
यापैकी समिक्शा भोबे, आकान्क्शा नगरकर, ओमकार कुश्ते, सन्हिता चान्दोरकर हे सर्व उपान्त्य पूर्व फेरी साठी निवडण्यात आले.

देवकी पंडित चं परिक्षण चांगलं होतं !! ह्यावेळी पटले बरेच मुद्दे !
काही काही जणांची गाणी अगदीच सुमार झाली मात्र...

मंगळवारच्या भागातलं (बहूतेक) आकांक्षा नगरकरचं जिवलगा, ओमकार कुश्ते चं हिरवा निसर्ग तसचं स्वाती नकिल आणि समिक्ष भोबे ह्यांची गाणी मस्त झाली एकदम ! सन्हिता चान्दोरकर ठिकठिकच गायली होती.. पण गेली पुढच्या फेरीत.. पाहिल्या दिवशी अश्विनी देशपांडे, सागर जाधव सुंदर गायले आणि स्वरदाचं खरा तो प्रेमा अप्रतिम झालं.. एकदम खणखणीत आणि तिच्या नेहमीच्या स्टाईलपेक्षा एकदम वेगळं!!! पद्मजा फेणाणी कधीकधी फारच शुगर कोटेड बोलतात.. अवधूर ऑलमोस्ट सगळ्यांना घाबरू नको घाबरू नको च सांगत होता...

दोन्ही भाग आवडले... पण स्टँडबाय म्हणुन असणारे जवळ-जवळ सगळेच पुढ्च्या फेरीत गेले आहेत.. आणि गायले पण छान.. मग ते स्टँडबाय का म्हणुन होते ? Uhoh

आले का व्हिडी॑ओ ह्या आठवड्याचे? मील्काल पाहिल तर नव्हते ! मला वाटलं की झी ने परत नाटकं सुरु केली काय ते अपलोड करण्याबद्दल..

होय अडम ... उशिराने केलेत पण दोन्ही दिवसांचे भाग अतिशय छान झालेत..
अभिलाषा चे शूरा मी वंदिले, अपूर्वा गज्जला चे का रे दुरावा मस्त झाली गाणी..

हो दसर्‍याचा भाग तर उत्तम झाला. सगळ्याचे गाणे सुंदर झाले. अगदी दसर्‍याची मेजवानी होती तो एपीसोड. त्यात परत शेवटी उर्मिला चा 'केतकी विडा' तर क्ल्लास!!!!!!
अभिलाषा, अपुर्वा पण छान च!. मला केतकी भावे चे 'आता कशाला उद्याची वाट' पण आवडले...

<शेवटी उर्मिला चा 'केतकी विडा' तर क्ल्लास!!!!!!>
आहा काय सुंदरच गायलि आहे ते गाण. केवळ अप्रतिम.
हे मला कुठे डाउनलोड करता येइल?

मनस्मि, आज मोना कामतचे " अंगणी माझ्या मनाच्या " ऐका . Happy
बायदवे , आज सावनी शेंडे असणार आहे , कार्यक्रमात रंगत येईल अशी अपेक्षा ठेवायला हरकत नाही . Happy

नक्की किती स्पर्धक आहेत?

बादवे प्रियांका बर्वेचं गाणं ऐकलं का? कशी वाटली ती? ती स्वतः संगीत पण देते.

नीधप, प्रियांका बर्वे बाहेर गेली स्पर्धेच्या... आवज चांगला वाटला, पण गाताना खुप घाबरत होती त्यामुळे गाण्यावर परिणाम झाला. आता टोटल २४ जण आहेत बहूतेक

मनस्मि, आज मोना कामतचे " अंगणी माझ्या मनाच्या " ऐका .
-------------------------------------------------
हो तर! Happy झलकमधे पाहिले..ठीकठाक वाटले. पण तिच्यापेक्षा चांगले गाणारे असतील तर तिचे आव्हान संपलेच. गेल्या वेळेला अवधुत ने तिला काठावर पास केले होते म्हणुन आणखी भिती!
(हे म्हणजे भारत साधारणतः क्रिकेट स्पर्धेत असतो तेव्हा भारताचे स्पर्धेतील आव्हान दुसर्‍याच दोन संघांच्या मॅच च्या आउटकम वर आधारीत असते असे काहीसे Happy )

प्रियांकाची गाण्याची समज खरंतर खूप चांगली आहे पण झल्लूगिरी भरपूर आहे. फारसे कष्ट न घेता उत्तम गाता येतंय ना त्यामुळे सगळंच कॅज्युअली घेते ही कन्या. ही मालती पांडे-बर्वे होत्या ना त्यांची नात, संगीता बर्वे म्हणून कवियित्री आहेत त्यांची मुलगी. मालतीबाईंची गाणी फार सुंदर म्हणते. वय वर्ष ८-९ ची असल्यापासून.

Pages