धुमकेतू

Submitted by प्रकाश काळेल on 28 July, 2009 - 07:40

सूर्याचे तळपणे नित्याचे, पोळवणे नित्याचे
चंद्राचे कलेकलेने निखरणेही नित्याचे
आणि.... नित्याचेच चांदण्याचे चमचमणे!
कशाकशात म्हणून नावीन्य उरले नसताना
अशात गुदमरलेल्या घन धूसर क्षितिजावर
त्याचं अनाहूत दिसणं, अव्यक्त ओढ जागवतं
देदीप्यमान पिसारा मनाला भुरळ पाडतो
वाटतं, "अरे! हेच ते... हेच ते! जे मी आजवर शोधले! "
मी बाहू पसरून त्याच्या स्वागतास सज्ज होतो..
तो मात्र त्याच्या 'कक्षेशी' अन 'गतीशी' पाईक!
आल्या वेगाने, माझ्या रानाचा एक लचका तोडून पसार होतो....
........ पुन्हा त्या अंधारात!
आणि मी?
बावरून, सावरून... पुन्हा सज्ज माझ्या सूर्याच्या स्वागतास!
"छे! छे! काहीच नाही झालं! "
__________________
प्रकाश

गुलमोहर: 

हेच ते! जे मी आजवर शोधले !
मनात होते पण ओठांवर येत नव्हते.
'' तुटलेल्या तार्‍या जवळ एकच
मागणं मागावं
माझ्या सर्व मित्रांनी
सदा हसत रहावं !''

मस्त

वार्‍याची बात !
वार्‍यावरची नाही !! ---
"छान! "

खूप छान.....उत्तम !!!!
यकीं है मुझको की कुछ भी हासील न होगा....फिर भी सजदे किये जाता हूं ....
तेरेलिये मेरी इतनी अकीद्त.... ईबादत नही तो और क्या है ??? !!!!!
गिरीश...

उत्तम Happy अगदीच वेगळं. मस्त.

My website : www.layakari.com
तुम्ही तुमच्या सुचना आणि प्रतिसाद, तिथेही, मायबोली प्रमाणे; मराठी किंवा इंग्रजीत; नोंदवू शकता. कलावंताला तुमची पाठराखण हवीय. या, मी तुमची वाट पहातोय. Happy

इथे लोक चंद्र, चांदण्यात गुंतलेले आणि भाई सरळ धुमकेतुच्या पाठी. उगवत जा अधुनमधून मित्रा.
.........................................................................................................................
आयुष्याच्या पाऊलवाटी, सुख दु:खांचे कवडसे
कधी काहीली तनमन झेली, कधी धारांचे व़ळसे

मस्तच रे !

माझ्या रानाचा एक लचका >>> म्हणजे काय?
***************
ॐ नमश्चण्डिकायै |

सर्वांचे प्रतिसादाबद्दल मनःपुर्वक धन्यवाद. Happy
आश्विनी , माझ्या रानाचा एक लचका >> इथे लचका म्हणजे तुकडा/घास आहे.
कवितेत 'रान' ही उपमा शिलासाठी योजली आहे.
______________________________________________
प्रकाश

इथे लचका म्हणजे तुकडा/घास आहे.>>.. हे माहित होतं.
कवितेत 'रान' ही उपमा शिलासाठी योजली आहे. >>.. ह्म्म्म्म. Happy धन्यवाद.

***************
ॐ नमश्चण्डिकायै |

प्रकाश छान!
पण का रे असं..यातुन मला एक उदासीन छाटा जाणवतेय

*************************
हा देह तुझा पण देहातिल तू कोण
हा देह तुझा पण देहाविण तू कोण

फारच छान.
सूर्य, चंद्र, चांदण्या नेहमीच्याच असल्या तरी आम्हां पामराना त्याच कवतुकच. पण प्रत्यक्ष प्रकाशाला त्यांत नाविन्य कां वाटावं !!
- भाऊ