वंशवृक्ष!

Submitted by उमेश कोठीकर on 21 July, 2009 - 10:27

एका निवांत दुपारी,
सहज बसलेलो ; आयुष्याच्या संध्याकाळी,
अंगणात; बघत बागेतील फुलांकडे,
आणि.. माझ्या घराच्या सुखदु:खाचा साक्षीदार असलेल्या,
समोरच्या वृक्षाकडे..वडीलधार्‍या!
किती पिढ्यांचा, आयुष्यांचा साक्षीदार असेल तो?
न्याहाळू लागलो त्याला; नेहेमीसारखाच..पण नव्याने!
त्याचे ते भव्य खोड
विस्तारत गेलेले..मायेने, दर पिढीआड,
ते शेकडो हात फांद्यांचे, थोपवून धरीत,
अरिष्टसूचक वारे; आमच्या घराकडचे! आणि सडा घालीत,
शुभ्र फुलांचा अंगणात..हिरव्यागार हातांनी,
आणि सावली देत, कधीपासून..
आमच्या आयुष्यासकट घराला, शीतलतेची वाट जोडत!

अचानक, त्याच्या गर्द, डेरेदार आकारातून..
उन्मळून पडले...एक वाळके पान, नाते संपवीत..त्याच्याशी,
हलके हलके मुळांकडे धाव घेत खाली,
विसावले; माझ्या अंगावर. बघितले निरखून तर..
देठाची नाळ तुटलेली, आयुष्य संपलेले पानाचे,
आणि..माझी नजर शोधतेय त्या तुटक्या नाळेला,
ती जागा...फांदीवरची, रिक्त झालेली
आणि..... थरारून गेलो मी, त्या तुटलेल्या जागेवर घडत असलेला जन्माविष्कार बघून!
त्या फांदीच्या तुटलेल्या देठाच्या जागी..
उमलून येत होता; एका नव्या हिरव्या पानाचा हिरवा जीव,
आकार घेऊन फुटू पाहात... इवले इवले हात पसरून!

आणि नेमके तेंव्हाच...
माझी गर्भार सून, पूर्ण दिवस भरलेली...आलेली दारातून बाहेर,
पाहात माझ्याकडे मायेने, हसत.. माझा वंशवृक्ष वागवित, वाढवित
मी बघत.. अतीव प्रेमाने त्या बाळसेदार आकाराकडे,
आणि.. मायेने हळूच उचलून घेत, त्या वृद्ध, निरासक्त, निष्प्राण पानाला,
बघत माझेच प्रतिबिंब, त्या पानात आणि.... त्या बाळसेदार गर्भाकारात!
समजून घेत्..जगत,
शब्दशः वंशवृक्ष या उक्तीचा अर्थ,
समजून, उमजून, घेत अनुभव साक्षात्काराचा...जन्माचा, मृत्यूचा,असण्याचा, नसण्याचा,
अश्रूंनी भिजवत, त्या पानाला, माझ्या अव्याहत भविष्याला!
आता ....परत एकदा लागलीय ओढ, अनिवार
आईच्या त्या रेशमी, उबदार, आश्वस्त गर्भात,
एक नवीन ईवला जीव होऊन...
नव्याने जन्म घेण्याची,
या हिरव्या जगात... परत येण्यासाठी!!

गुलमोहर: 

उमेश, बर्‍याचदिवसांनी. आहेस कुठे इतके दिवस लेखणी हलली.

लेखनाची ताकद आणि पकड जबरदस्त. खरचं, काय जबरदस्त लिहीलयं.

शुभेच्छा
देवनिनाद

एकाच या जन्मी जणू फिरूनी नवे जन्मेन मी...
या गाण्याची आठवण झाली.
छान कविता.
प्राजु
http://praaju.blogspot.com/

त्या फायलींच्या ढिगार्‍यात बरी सापडते रे तुला कविता !!!
.........................................................................................................................
आयुष्याच्या पाऊलवाटी, सुख दु:खांचे कवडसे
कधी काहीली तनमन झेली, कधी धारांचे व़ळसे

जबरदस्त ! काय लिहिलंय तुम्ही !

धन्यवाद देव, चेतना, प्राजु, सुमतीजी, क्रान्ति, कौतुक. खुप दिवसांनी लिहिलय.
..............................................................................
हलकी 'घ्या', जड 'घ्या'
दिव्याखाली 'घ्या', अंधारात 'घ्या'
'घ्या', 'घेऊ' नका
तुमचा प्रश्न आहे!

उमेश्....खुप सुंदर! Happy

!~!~!~!~!~!~!~!~!~!~!~!~!~!~!~!~!~!~
उत्तर कसे बरोबर येणार? अरे गणितच तुझे कच्चे !
बेरीज करायला गेलास, आणि राखुन ठेवलेस हातचे?
!~!~!~!~!~!~!~!~!~!~!~!~!~!~!~!~!~!~

भल्या गृहस्था, हे असंच लिहीण्यासाठी दडी मरुन बसला असशील तर गैरहजेरी माफ तुला Happy . बादवे हल्की असो वा जड 'घेण्या'साठी भेटायला हवेच नाही का ? चिअर्स.

फारच छान रे मित्रा...
---------------------------
सतिश चौधरी
-----------------------------------------
पाण्यात जसे बिंब माझे मलाच दिसते...
सगळच तसं असावं असं मला वाटते.......>>>>>

उमेश खुपच छान !!!!!!!!!!!!

****************************************
सर्व मंगलमांगल्ये शिवे सर्वाथ साधके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते

कविता आवडली , उमेश!

चला गडी पुन्हा एकदा मोकळा झाला कामाच्या रगाड्यातुन !
येवु देत बाहेर अजुन अशा जादुई चिजा तुझ्या पोतडीतुन ! Happy

***********************************
मज पिसे लागलेले सुखांचे
गे हलकेच धुके ओसरते आहे!

धन्यवाद विशाल, प्रकाश, सतीश, नूतन, अमित, नयना. कोणाचे भले झाले काम करून तर माझे होईल विशाल?
..............................................................................
हलकी 'घ्या', जड 'घ्या'
दिव्याखाली 'घ्या', अंधारात 'घ्या'
'घ्या', 'घेऊ' नका
तुमचा प्रश्न आहे!

सो, उमेशजी ईज बॅक Happy

छान!

*******************
सुमेधा पुनकर Happy
*******************

truly अप्रतिम ......................! दुसरा काही शब्द्च नाही या कवितेसाठी

उमेश दा, मस्तच ! मनातल ओठात आणि मग मा बो वर अस लिहलय!!!!!!
सुरेख !
Happy
---------
रुसुन रुसुन रहायच नसतं, हसुन हसुन हसायच असतं

महेश, वैशाली, सुमेधा धन्यवाद.
..............................................................................
मोठा झाला दादा, मोठी झाली ताई
मोठा झाला 'बाळ' तुझा, ये ना बघायला आई!

अभिनंदन. मी आत्त्ताच वाचली. छान आहे.
शब्दशः वंशवृक्ष या उक्तीचा अर्थ,
समजून, उमजून, घेत अनुभव साक्षात्काराचा...जन्माचा, मृत्यूचा,असण्याचा, नसण्याचा,
अश्रूंनी भिजवत, त्या पानाला, माझ्या अव्याहत भविष्याला!
आवडले.

त्या फांदीच्या तुटलेल्या देठाच्या जागी..
उमलून येत होता; एका नव्या हिरव्या पानाचा हिरवा जीव,
आकार घेऊन फुटू पाहात... इवले इवले हात पसरून!

मस्त कविता

जबरदस्त. ब्राव्हो, उमेश. यापूर्वी नजरेतून कशी सुटली होती याचे आश्चर्य आणि वैषम्य वाटते.

Pages