प्रेमळ प्रयत्न

आकाशीचा काळा त्या दिवशी रडत होता...
अश्रुभरल्या नयनांनी खुप काही बोलत होता.
मला प्रश्न पडला एवढं कसलं मोठं दु:ख,
की धाडधाड कोसळावं?
कितीही नको वाटलं,
तरी पुन्हा दर्यातच जाऊन मिसळावं..
दु:खी तर ती सुद्धा होती,
पण दु:खाने दुभंगली तरी रडली मुळीच नव्हती.
आज त्या दोघांनी कसा अजब संसार थाटला होता..
तिच्या आसवांचा महापूर त्याच्याच डोळ्यात दाटला होता.
खरं तर तिची दु:खं धुऊन टाकायचा त्याचा तो प्रेमळ प्रयत्न होता..
आकाशीचा काळा त्या निळाईचं रत्न होता.
.........मानसी

Submit to kanokani.com

छान स्मित
पावसाचं नाविन्यपुर्ण वर्णन.... स्मित

वा .. छान ... वेगळा अंदाज भावला

मनातील भावना शब्द रुपात वाचायला मिळाली.
खुप छान.

खुप छान , सुन्दर

खुप छान

आकाशीचा काळा त्या निळाईचं रत्न होता.

मस्त

सुंदर

चांगल्याला चांगलं म्हणावं; वाईटाला सुधारून पहावं
कुणी ऐको वा न ऐको; कांहीही करो; आपण मात्र अलिप्त रहावं

खूपच मस्त!

क्रान्ति
मुक्त तरीही बंधनात मी
फुलाफुलाच्या स्पंदनात मी
http://www.agnisakha.blogspot.com/

छान ! कविता आवडली.

छान आहे.

सुंदर ! फारच आवडली !

आवडली स्मित

-------------------------------------------------------------------------
जो संपतो तो सहवास, आणि ज्या निरंतर रहातात त्या आठवणी

हे...सर्वांना प्रतिसादाबद्दल मनापासून धन्यवाद!!
....मानसी

खूप छान.
मुकुंद कर्णिक