मी कोण?

Submitted by sanika11 on 6 July, 2009 - 04:35

माझ्या अस्तित्वाचा प्रश्न मी वाहतो आहे;
मी कोण? मीच मला शोधून पाहतो आहे.

हा खेळ ऊगम-अस्तातील सत्याचा;
मी कोण? गर्दीच्या प्रवाही मी न्हाहतो आहे

शोध हा अक्षांस-रेखांशांच्या छेदबिंदूचा;
मी कोण? कोणत्या कणावर मी राह्तो आहे

श्वासाश्वासात गुंतलेल्या अनाम ओढींचा;
मी कोण? दाह नसानसात मी साहतो आहे

अथांग, विराट विश्वरूपी युगंधराचा;
मी कोण? ठसा त्याचा देही मी चाहतो आहे.

गुलमोहर: 

सानिका ... खुप छान. पण मी कोण? हे वाचताना रिपिट वाटतं .... सूरुवातीनंतर शेवटला आलं असतं काव्य अजून चांगलं झालं असतं - पण जे मांडलंय ते छान आहे

देवनिनाद

सुंदर आहे पण थोडी अशी तर नाही ना ?
.... चु भु द्या घ्या ....
मी कोण मी कोण
मी पणाची मरिमाय
देखा हिची अशी तर्‍हा
सोता-सोतालेच खाय
( बहिणाबाई )

जमलं

चांगल्याला चांगलं म्हणावं; वाईटाला सुधारून पहावं
कुणी ऐको वा न ऐको; कांहीही करो; आपण मात्र अलिप्त रहावं

who am I? a big question!
आवडली.
..सुसंगती सदा घडो, सुजनवाक्य कानी पडो..