पाऊसधारा

आभाळातून खाली आल्या नक्षत्रांच्या धारा
पानाआडून कोण छेडितो सातारीच्या या तारा

निळसर हिरवे डोंगर दिसती धूक्यात गाती वाटा
अजुन काही गूज सांगतो पायामधला काटा
ओले ओले आभाळ झाले कानी गुंजतो वारा
पानाआडून कोण छेडितो सातारीच्या या तारा

रिन्गण धरती थेंब टपोरे झिम्मड नाचे पाणी
ओठावरती फुलून आली जुनी रेशमी गाणी
एकटाच मी कसा वेचू ग वाटेवरल्या गारा
पानाआडून कोण छेडितो सातारीच्या या तारा

पाऊसधारा अशा येऊनी छळून जाती दूर
आठवणींचा झरा केशरी गातो हळवे सूर
आरसपानी कुठे मनीचा हरवून गेला पारा
पानाआडून कोण छेडितो सातारीच्या या तारा

Submit to kanokani.com

पावसात भिजावं आणि हे काव्य गुण्गुणावं असं वाटलं

देवनिनाद

सर्वांग सुंदर पाऊसगाणे!!
खूप आनंद देवून गेले. आमच्याकडे पाऊस दडी मारून बसलाय!!

पानाआडून कोण छेडितो सातारीच्या या तारा
छान ओळी.
..सुसंगती सदा घडो, सुजनवाक्य कानी पडो..

धन्यवाद...

नक्षीदार कवीता !
-हरीश

सुंदर

पाऊसधारा अशा येऊनी छळून जाती दूर
आठवणींचा झरा केशरी गातो हळवे सूर
आरसपानी कुठे मनीचा हरवून गेला पारा
पानाआडून कोण छेडितो सातारीच्या या तारा

जबरी

छान

*****
गणेश भुते
*********************
इंद्रधनुच्या रंगांमध्ये दंगणारी निरिक्षा दे
आभाळही भाळेल अशी नक्षत्रांची कक्षा दे
*********************

मस्त भावगीत.

क्रान्ति
मुक्त तरीही बंधनात मी
फुलाफुलाच्या स्पंदनात मी
http://www.agnisakha.blogspot.com/

धन्यवाद....

सुंदर! पावसात उभे राहील्यासारखे वाटते.

-हरीश