गणिताचा गुरुमंत्र
मारु नका हो गुरुजी छडी ती हातावर माझ्या |
प्रयत्न करूनही नाही गेले गणित डोकिया माझ्या ||धृ||
भिण्यासारखे गणितामध्ये कठिण काय आहे? |
अंकांचा हा खेळ समजण्या अगदी सोपा आहे ||
वर्गामध्ये लक्ष देई जो घरी पर्वचा म्हणे |
गणित आहे कठिण जेवढे खाणे लाह्या फुटाणे ||१||
छडीमुळे का तुमच्या जाई गणित सरळ डोके |
सवय छडीची वाईट आहे डोके करते खोके ||
भ्रमरासम असलेले मन ते इकडे तिकडे फिरते |
छडी लावते शिस्त मनाला योग्य दिशेने नेते ||२||
वर्गामध्ये दक्ष राहुनी समजा गणिती कावे |
रोज उजळणी करुनी त्यांना बांधुन ठेवा दावे ||
संगितक्रिडादी क्षेत्रामधी रियाझची जी महती |
गणिताभ्यासाला करण्याची दुसरी नाही रिती ||३||
मित्र समजुनी गणिताला राहउ नका गाफिल |
शत्रु समजुनी हरवुन त्याला विजय करा हाशिल ||
मेहेनत करुनी हरवून त्याला करा मांडलिक |
संकट समयी धावुन येइल गणित पांडुरंग ||४||
हे गीत शाळेत जाणाऱ्या मुलांच्या मनातून गणिताबद्दलची भिति घालवण्याचा प्रयत्न करते. हे गीत शाळेच्या गॅदरिंगमध्ये साभिनय सादर करता येईल.



हे यु ट्युब वर का नाही टाकलं ? असेल तर लिंक प्लीज .
--------------------------------------------
रखरखीत हा रस्ता प्रवास करण्याचा,
शेवट त्याचा मिळेल तोवर बोलू काही...
हो हे ऐकायाला जास्त आवडेल.
अनुमोदन आहे ...