आबा, रोजचं व्हराड्यातील पाळण्यावर झोके घेत. आज संध्याकाळी बागेत जायची वेळ झाली तरी झोपाळ्यावर. डोळे झाकून, मंद झोके घेतचं होते. न राहून मी विचारलं.
आबा, कसल्या विचारात आहात? बागेत जायचं न?
आबा, भानावर येत.
हो रे! बाळा, पण आज मन होत नाही आहे बागेत जायला.
मी आश्चर्य चकीत झालो.
का? आज अचानक दांडी फिरायला जायची. अहो! रोज भेटणारे मित्र काय म्हणतील?
आबा हसतचं. अरे, तेच तर झाल आहे. सोबतीला कुणी नसेल तर फिरायला कंठाळा येतो. कुराडे त्याच्या मुलाकडे गेला आहे. मग माझ्या बरोबर कोण फिरणार? म्हणून इच्छा होत नाही आहे.
आबा हे माणसातलेच. कधी एकटे राहायला त्यांना आवडतचं नसे. मुग्धा आत्या'ला एस.टी. स्टँडवर आणायचं झाल तरी ते मला किंवा आक्काला घेऊनचं जात. आजही तोच बेत असावा? मला कळालचं ते. तस आज कॉलेजही नव्हतं. नविन अॅडमिशनस् चालू होती. क्लास होत नव्हते, त्यामुळे कॉलेजला गेलो नव्हतो.
अहो, मग काय झाल? मला बोलवायचं न? तसा आज मी मोकळाचं आहे.
आबा, का रे? मोकळाच का? कॉलेज नाही का तुझ?
आहे ना. पण मी दांडी मारली.
आबा, वैतागत अण्या ....! हलकटा, कॉलेज चुकवू लागलास का? थांब तुझ्या पप्पाला सांगतोच.
आबांना शाळेपासून धुर राहीलेल आजीबात आवडत नसे. त्यांचा पारा लगेच चडायचा. पण माझ्या बाबतीत अस कधी झाल नव्हतं. मी कधी शाळा चुकवतचं नसे.
आबा, वैतागू नका हो! कॉलेज आहे पण क्लास नाही चालू झालेत अजुन. म्हणून गेलो नाही. उद्यापासून जाणारचं. तुम्हाला आज फिरायला सोबती नाही ना? चला हव तर मी येतो.
नको, काही एक गरज नाही. जा कदमांचा मुलगा रिकामाच असेल. त्याच्याबरोबर क्रिकेट खेळ जा. आम्ही म्हातारी माणस, तुम्हा तरूणांबरोबर फिरायला शक्ती नको का?
मला कळालचं आबांना काय म्हणायच ते.
हूं ..... मला वाटलचं होत. चला मला ही बागेत जाऊन खुप दीवस झाले.
आबांचा चेहरा हसमुख झाला.
माझी काठी आणतोस का? मग.
मी लगेच आबांच्या खोलीत जाऊन त्यांची काठी आनणार..... तो पर्यंत माई.
बाळा, आता कुठे चाललेत ते?
माई! अग बागेत जात नाहीत का ? आबा रोज.
हो, पण आज जाणार नव्हते न?
जाणार! कोणी सांगितल तुला हे. आबातर चाललेत बागेत!
काय करतात? देव जाणे, मला तर बोलले होते. मन होत नाही म्हणून. आता लगेच निघाले?
माई, आता तुझ वाजपं बंद कर गं. मी आणि आबा चाललोय बागेमध्ये. शिवाय येताना भेलसुध्दा खावून येणार.
माई माझ्याकडे आश्चर्याने बघत. अग बाई! आज कुठून देव पावला .....
आनंदा .....
अग मी जातो. आबा वैतागतील.
हो जा सांभाळून या. माई हे वाक्य मला बाहेर जातानां नेहमी उद्दगारायच्यांच.
हो गं ......
(माई स्वयंपाक घरात शिरते न शिरते...)
माई ......!
काय रे ? आता काय राहीलं मागे?
तुला भेल आणू का?
नको बाबा, त्यापेक्षा मी मुग्धाकडून भडगं आणेन.
हो तुला तर चालत नाही ना......
आतोस का? आता ....
चला आबां,
अरे! कीती उशीर
अहो माईला भेल हवी का? विचारायला गेलो होतो.
भेल? आबांनी नजर रोखतचं विचराल.
हो! आपण मला भेल द्याल ना? म्हणून तर आलो मी. आणि माईला सोडून कस खाणार? म्हणून माईला सुध्दा विचारल.
माझ्याकडून भेल खायला तुझा पॉकेट मनी संपतो का रे? बेट्या.
आबा? मला पॉकेट मनी मिळतात? तुम्हाला कस ...
हो .... हो मला सर्व माहीत आहे. कॉलेज मध्ये कीती मित्र-मैत्रीणी आहेत तिथपासून ते तुमचे कुठे-कुठे अड्डे आहेत तिथ पर्यंत.
काहीतरीच काय? आबा, आम्हीतर कॉलेज आणि घरच ....
हो मला माहीत आहे सर्व. फिरा रे बेट्याहो, तुमचे दीवस आहेत. एकदा संसार लागला की. मौजमजा संपली.
मला तर ह्या बोलण्याचं आश्चर्यच वाटलं. वाटत होत आबांना आमच्याबद्दल काही माहीतच नाही. पण घडल ते उलटचं. तस आम्ही कोठे वाईट मार्गी फिरत नव्हतो, पण आबांची येवढी पाळत?
आबा, तुम्ही कॉलेज मध्ये होता तेव्हा अस फिरायचा?
चेहर्यावर हास्य आणत. नाही बेटा, फिरायची इच्छा खुप असायची. त्यावेळी गरीबी सुध्दा तेवढीच होती. मॅट्रीक झाल्यावर डी.एड. केल. सार मन अभ्यासात गुंतल. मग कुठल फिरन आणि कुठल काय.
तस आबा आणि माईनं खुप मेहनतीने आपल घर, आपला संसार बसविला होता. माई एका शिक्षकाची पत्नी असूनही मजूरी करायची. हे अधिच राम काकांच्या आईने मला सांगितल होत. त्यावेळची परीस्थितीही तशी होतीचं आबा एक-दोन मैल चालत येऊन शाळा शिकवायचे. आबांचे आर्दश विद्यार्थी आजही भेटायला येतात. कधी आबा कामानिमित्त बाहेर गेलेले असले. की अश्या आठवणी सांगतात.
आनंदा ......... अरे कुठे हरवलास?
आबा कडक होते, पण त्यांचा स्वभाव माझ्या स्वभावाशी खुप जुळायचा. ते माझे आजोबा जरी असले तरी आमच्यातं मैत्री सारख नात होत. आम्ही कधी-कधी भांडायचो. कधी माझी तर कधी आबांची शरणागती असायची. माई मात्र आमच्यात मिसळत नसे. तीचा स्वभाव कडक होता. त्यामुळे माईजवळ कामाव्यतिरीक्त दुसर्या उचापती शिजत नव्हत्या. आबांच मात्र तस नव्हत. त्यांच्या आठवणी रंगल्या की मग एक तास अन् दोन तास ..... वेळ कशी गेली समजायचंच नाही.
अं, हो चला कुठे काय? आहे ना तुमच्याबरोबर.
अरे! इतका वेळ कसल्या विचारात आहेस?
अं. नाही, विचारात कुठे आहे मी.
चल बाग आली आधी फिरू, मग तुला भेल देईन.
हो चला.
हे बघ आम्ही इथे रोज गप्पा मारत बसतो. कुराडे असला की विचारूचं नकोस.
कुराडे आबांचे बालपणापासूनचे मित्र. वय 'साठी' पार केल तरी त्यांची मैत्री आजून तशीच होती. कुराडे आजोबा, आबांना खुप मानत तेवढेच आबाही त्यांना मान देत. आबांच्या शेताचा खटला कुराडे आजोबांनीच चालवला होता. कधी अश्या गप्पा रंगल्या की आबा त्यांच्या मैत्रीचा उल्लेख स्वतःच्या जीवापलीकडे करत. तेंव्हा त्यांच्या चेहर्यावर भाव असायचे तसेच आता देखील.
आबा, तुम्ही फिरायला येताय की गप्पा मारायला?
अरे! मग फिरतो आम्ही. कुराडे बिचारा दमतो रे. मग मला नाही पाहावत.
हो, तेवढे फिरतात म्हणून बर आहे. नाहीतर कीती हाल झाले असते त्यांचे. अदीच जाड आहेत. त्यात बसून राहीले असते. तर मग .....
अरे तस नाही, आपल्याला वाटत बेटा. पण माणसाला स्वत:च शरीर अवघड नसत. त्याचा नियमित व्यायाम असतो. व्यायाम त्याची जडलेली सवय. अजून जाड झाला तरी त्याला काही फरक पडणार नाही.
ही बघ फुले. कीती सुंदर फुलली आहे ना?
आबां फुललेल्या फुलांच्या झाडात हरवून गेले. अबोली, मोगरा, सदाफुली अशी अनेक रंगी बेरंगी फुले फुललेली होती. त्यांचा सुवास इतत्र दरवळ होता. माझ ही मन प्रसन्न झाल. आणि तोंडातून शब्द बाहेर कधी पडले ते मलाचं समजल नाही.
हो!,
"कीती सुंदर रूप तिचं
सगळीकडे सुवास दरवळतोय,
वय सरत तीचं पण
दरवळण्यासाठी जीव धडपडतोय ॥"
आबा, उद्यापर्यंत कोमेजतिल ही फुल. पण कीती सुंदर सुवास दरवलतोय ना?
आबा माझ्याकडे पाहून हसतचं, कीती सुंदर शब्द कानी आले बाळा माझ्या. कस सुचल रे?
अस, काही नाही. बस सुचल ते बोललो.
तुझ्या कविता पण वाचल्यात रे. प्रयत्न छान आहेत. जगलो वाचलो तुझ्या प्रत्येक कामात सहभागी असेन मी.
आबा कौतुकाने मला सांगत होते. मी मात्र त्यांच्या नजरेत नजर घालून पाहतचं होतो. आबा तसे माझ्या प्रत्येक सुखा-दु:खात सहभागी झालेलेच होते. कधी आजारी पडलो तर डॉक्टरकडे नेण्यापासून ते समोर बसून औषध देण्यापर्यंत. म्हणूनच मला आई-बाबांना सोडून माई-आबांजवळ राहन शक्य झाल होत. हे माझे फक्त आजोबाचं नव्हे तर खुप काही होते, कधी उदास होऊन बसलोच तर आवरजुन चौकशी करत. त्यामुळे मला काही कमी आहे अस मला कधीच वाटल नाही,
आबा अस का बोलताय? तुम्हीच माझ्या सुखा-दु:खातले सोबती आहात ना? तुमचा अशिर्वाद आहे. मग दुसर काय हव मला.
हो बेटा मी नेहमीच तुझ्या पाठीशी असेन.
नमस्कार गुरूजी,
हो नमस्कार ....... झाल का फिरून.
हो शेवटची फेरी चालू आहे.
चालू द्या, चालू द्या.
हे एक भेटले की नेहमी नमस्कार करतात,
आबा समोरच्या माणसाला मान देताना. मला खुप काही शिकायला मिळायच. शिकायचोही, "परक्या माणसाला आदरानं वागवावं" ही शिकवण आबांनीच मला दीली होतो.
आम्ही गप्पा मारतच बसलो होतो. ते ही वेळेच भान विसरून. कीती वाजले आम्हाला कळालच नाही, अचानक घड्याळाकडे लक्ष गेल. तेंव्हा ९.०० वाजलेत हे समजल. गप्पा रंगल्या त्या रंगूनच गेल्या.
आबा, अहो ९.०० वाजले.
काय? अरे, आताशीच आलोय ना आपण?
हो, तो भास आहे. चला आता निघू नाहीतर आपल काय धड नाही.
मी जेवढा माईला घाबरायचो. आबा त्यापेक्षाही थोड जास्तच घाबरायचे. पण दाखवू द्यायचे नाहीत. भांडायचे पण लगेच बोलायचे, त्यामुळे ही जोडी मला बेस्ट वाटायची.
काही नाही बोलणार ती आपल्याला, जाऊ शिस्तात. आजून भेल खायची ना?
हो, पण आता तर वेळ खुप झालीय ना?
ठीक आहे, चल मग.
मला भेल आवडते हे आबांना माहीतचं होत. कधी-कधी ते माझ्यासाठी घेऊन यायचे सुध्दा. अस का बोलले समजलचं नाही, पण मी हट्ट धरलाच.
नाही, मला भेल हवी आहे.
नको बेटा परत कधीतरी येऊ. वेळ खुप झालीय ना? चल मग.
मी नाही. तुम्ही जा.
हसतचं, कुठे?
चल, तिथपर्यंत येतो तुझ्यासोबत, तिथून मी घरी जाईन, तु भेल खाऊन ये,
थोडासा नरवस झालो.
चला,
आम्ही भेलवाल्याजवळ आलो. तर भेळवाला माझ्यापेक्षा आबांच्या परीचयाचा निघाला. मला आणि आबांना पाहताच, तो उद्दगारला.
नमस्कार गुरूजी.
आज सुट्टी मारली की काया फिरायला? अस वाटत होत. खुप वेळान आला. दूसरे साहेब आल नाहीतं?
आबा हसतचं.
नमस्कार,
हे काय दुसरे साहेब.
भेलवाला आश्चर्याने. हे ?
हो, का? काय झाल? साहेब दीसत नाही का?
नाही तस नाही हे कॉलेजकुमार आहेत,आपले रोजचं साहेब दीसल नाहीत. म्हणून विचारल.
हे तर येतात आमच्याकडे.
हो,
मी त्यांच बोलण आश्चर्याने बघतच होतो.
तीन भेल द्या.
हे नातू आमचे.
आबा, कौतुकाने सांगत होते. भेलवाला तेवढ्याच कौतुकानं माझ्याकडे पाहात होता.
आबांना भेल आवडते हे मला आजवर माहीत नव्हत. ते ही माझ्यापेक्षा जास्त,
आबा, तुम्हाला भेल .....
हो, मग तुझी आवड, माझी होत नाही का?
तस नाही, कधी बोलला सुध्दा नाही तुम्ही.
माई, मुग्धा आत्याकडून भडगं कश्याला मागवते? ती काय एकटीसाठी का?
हो. मी आश्चर्याने विचारल.
आम्ही अंगणात आलो. घराचा दरवाजा बंद होता. आबांनी माझ्याकडे पाहील.बेल दीली. दार उघडले नाही,
परत एकदा द्या ना?
नको कामात असेल ती.
नाही,
थांबा मी देतो.
मी एकदा बेल दीली. आम्ही एकमेकांकडे पाहतचं उभे होतो. तेवढ्यात दरवाजा उघडला.
माई दरवाजातच, थोडावेळ शांत थांबता येत नाही? मी काय मोकळी बसली आहे का? काम असतात.
आबा फक्त हसले. शब्द मात्र बोलले नाहीत.
येवढा वेळ फिरायच का? मी घरात एकठीच असते. हे सुध्दा कळत नाही.
आबांनी आणलेली भेल पुढे केली. माई रागानेचं आमच्याकडे पाहात होती. आबा हसतच होते.
आणि मी ते पहातच उभा होतो ......
आनंद राजगोळे
(माझा कथा लिहिण्याचा पहीला प्रयन्त आहे, कृपया काही चुका असतिल तर मला मार्गदर्शन करावे.)


पहिलाच प्रयत्न छान जमला आहे.
पुढील वाट्चालीस शुभेच्छा.
पहिलाच प्रयत्न छान जमला आहे.
पुढील वाट्चालीस शुभेच्छा.
पहिलाच प्रयत्न छान जमला आहे.
पुढील वाट्चालीस शुभेच्छा.
गोड!!!!!!!!!!!!!
----------------------------------------------------------------------
"जन्मभर सेवा, तुझ्या पावलांची"
शुभान्गी
पहिलीच कथा छान जमली आहे.
शुभेच्छा पुढील लिखाणासाठी.
फार गोड कथा आहे. पहिला प्रयत्न असा तर क्या बात है!!! लवकर येऊ द्या दुसरा प्रयत्न
प्रयत्न छान आहेत.>> येउद्या आणखी...
न म स्का र ..
कथा जबरदस्त आहे ,मस्तच, मस्त. बोलन्यासारखे काहि नाही
उगाच काहीतरी बोलन्यात काही मजा अथ नाही (सुरेख)
मस्त, गोड, छान
वैभव, प्रसाद, शुभांगी, वर्षू, ड्रीमगर्ल, रामदास, सास ...........
आपण सर्वांनी माझी कथा येवढया मनापासून वाचलीत. आपल्या सर्वांचा मनपुर्वक अभारी आहे.
आपल्या सर्वांच्या शुभेच्छा अश्याच माझ्या पाठीशी राहू देत.
धन्यवाद !
मोजकेच प्रसंग पण फार छान शब्दांत मांडलेत. पहिलाच प्रयन्त छान जमलाय.
छान लिहिलेय.....अजून लिहा हो.....!
खुप छान.
छान आहे कथा. पहिला प्रयत्न छान जमलाय.
एक सुचना... माझ्या माहितीप्रमाणे अबोलीला वास नसतो. दुसर्या कुठल्या सुवासीक फुलाच नाव घातल तर बर होईल.
आपण सर्वांनी माझी कथा एवढ्या मनापासून वाचलीत. आपला मनपुर्वक आभारी आहे.
धन्यवाद!
ऑर्किड,
आपल्या सुचनेचे पालन मी केले आहे.
खुप छान, पहिल्याच प्रयत्नात खुप छान लिहिली आहे.
खुप चान्गला प्रयत्न आहे. नविन लिखाणास शुभेच्छा.
उदय, दीपीका .........
आपण माझी कथा येवढ्या मनापासून वाचलीत. मी आपला मनपुर्वक अभारी आहे.
धन्यवाद!