जोडीदार (भाग १)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 24 June, 2009 - 05:21

सुप्रिया, एक मध्यम वर्गिय कुटुंबातील एकुलती एक मुलगी. चांगले संस्कार असल्यामुळे लाडाचे दुष्परीणाम हिच्या गुणांवर आदळले नव्हते. स्वभावाने शांत, वर्णाने सावळी पण सुबक. आई घरी लहान मुलांच्या शिकवण्या घ्यायची आणि वडील एका नामांकीत कंपनीत सुपरवायझर म्हणून कामाला होते. त्यांनी सुप्रियाला संस्कार, लाडाबरोबर भरपुर मायाही दिली होती.

सुप्रिया ग्रॅज्युवेट झाली. कॉलेज मध्ये असताना फक्त कॉलेजचे लेक्चर अटेंड करायचे आणि सरळ घरचा रस्ता गाठायचा हेच तिचे कॉलेज विश्व त्यामुळे तिच्या स्वभावानुसार तिच्या मोजक्याच अभ्यासू मैत्रीणी होत्या. कॉलेजच्या ग्रुप मध्ये नसल्याने मुलांशीही केवळ अभ्यासापुरतीच ओळख होती.

सुप्रिया ग्रॅज्युएट झाली आणि तिच्या वडीलांनी तिला त्यांच्याच कंपनीत एक्झीक्युटीव ची नोकरी मिळवून दिली.

सुप्रिया नोकरीला लागताच तिच्यासाठी लग्नासाठीच्या स्थळांची गर्दी वाढू लागली. तिच्या सरळ, शांत स्वभाव ओळखत असल्याने तिच्याच कंपनीतील काही कुटुंबानीही तिला मागणी घातली होती. पण सुप्रियाच्या वडीलांना काही जणांची माहीती होती तर कुणाची वर्तणूक सुप्रियाला आवडत नव्हती म्हणून तिने नकार दिला.

एक दिवस सतिशच स्थळ सुप्रियाला सांगुन आल. सतिश स्वभावाने बोलका, सुस्वभावी, लाघवी होता. दिसायला सुप्रियाला अनुरुप म्हणजे सावळा व सुंदर. सतिशचे आई वडील गावी शेती करत असत. सतिशला शेतीची आवड नव्हती व मुंबईत मामाकडे शिक्षणानिमित्त राहील्याने त्याला मुंबईशी जवळीक निर्माण झाली होती. म्हणुन त्याने आपल्या एका मित्राच्या सहाय्याने एक ट्रॅव्हल एजंसी काढली. त्याचा व्यवसायात चांगला जम बसला होता. त्यासाठी तो भरपुर परिश्रमही करत होता. वेळोवेळी त्याला टुरवरही जायला लागत होत. त्याने आता स्वतःचा प्लॅटही घेतला होता. त्यात तो एकटाच राहत असे. फ्लॅट मामाच्या बाजूलाच असल्यामुळे मामी कामवालीच्या सहाय्याने फ्लॅटची देखभाल करत असे. त्याच्या स्वभावामुळे व वेळोवेळी मामा-मामीला मदत करत असल्याने मामा मामी सतिशवर खुष होती.

सतिशच्या लागवी स्वभावाला सुप्रिया आकर्षली व तिने सतिशच्या स्थळाला मान्यता दिली. आई वडीलांची एकुलती एक मुलगी असल्याने सुप्रियाच्या वडीलांनी आत्तापर्यंत जमवलेल्या पुंजीतुन सुप्रियासाठी बरेचसे दागिने व संसार उपयोगी वस्तू घेतल्या. सतिशला सोन्याची अंगठी, चेन घेतली. सुप्रियाच्या वडीलांनी लग्नातही वराकडील सर्व मंडळिंचा मानपान करुन आपल्या मुलीची साश्रु नयनांनी पाठवणी केली.

सुप्रियाची लक्ष्मीची पावले सतिशच्या घरात पडली. सतिशच्या आईवडीलांची सतिशच्या एकटेपणाची काळजी मिटली. त्या दोघांनी व मामा मामिंनी सुप्रिया व सतिशला भावी आयुष्या साठी भरभरुन आशिर्वाद दिले. अशा प्रकारे सुप्रिया व सतिशचे वैवाहीक जीवन चालू झाले.

क्रमश....

गुलमोहर: 

लवकर पुढचा भाग टाक. एव्हढा लहान का टाकला?
-----------------------------------------------------------
विठुचा गजर, हरिनामाचा झेंडा रोविला....
-----------------------------------------------------------

सुरवात तर चांगली झालीय, आता पुढचे लवकर टाक ग पटापटा

*****&&&*****
Excellence is not for someone else to notice but for your own satisfaction and efficiency...

जागु छान आहे सुरुवात , लवकर पुढचे भाग टाक

****************************************
वक्रतुंड महाकाय सुर्यकोटि समप्रभ|| निर्विघ्नं कुरूमेदेव सर्वकार्येषुसर्वदा ||||

जागू, कित्ती छोटा भाग. लिही पाहू भराभर पुढचं, मग प्रतिक्रिया देईन.. Happy

जागु लवकर टाक पुढचं.
---------------------------------------------------------------------------
ख्वाब रंगी है, इस जहां के, देख ले देख ले तु सजा के,
अपने सायेसे तु निकल के, देख ले देख ले तु बदल के,
रंगोंके है मेले, खुशीयेंके है रेले,
धडकन पे पेहेरा क्युं है क्यु......

शुभान्गी
सुरवात चान्गली झाली आता पुढे काय? लवकर लिही.

सुरवात मस्तच जागु, लवकर लवकर टाक पुढचे भाग.

एवढी छोटेशी सुरुवात? नीदान थोडीशी उत्कंठा वाटेल असा क्रमशः असता तर छान झाल असत. तरी ठीक आहे सुरुवात्....पुढे बघु काय होत ते.....

जागु जागी हो गं.....

*****&&&*****
Excellence is not for someone else to notice but for your own satisfaction and efficiency...

जागू...अगं अजुन थोडं लिहायचं ना ह्या भागात...एनीवेज...लवकर टाक पुढचा भाग, वाट बघते .

*******************
सुमेधा पुनकर Happy
*******************

पुढच्या भागाची प्रतीक्षा आहे........

नमस्कार्. सुप्रभात.....

लवकर क्रमश....पुर्ण करा......

मी खुप खुप आपला आभारी आहे.

मस्त ना Happy
असं पटापटा झालं की बरं वाटतं Happy
शिक्षण झालं, नोकरी मिळाली, लग्न झालं, चांगला नवरा मिळाला...... आणखी काय हवं??

जागु, आता प्लिज त्यातल्या कुणाला मारु बिरु नकोस........ सुखाने संसार करायला सांग त्यांना...... आणि माझेही आशीर्वाद आहेतच Happy

जागु ,
कथेची सुरुवात छान आहे.
फक्त एक ..
स्वभावाने शांत, वर्णाने सावळी पण सुबक. >>> नक्की माहीती नाही पण बहुतेक मुलीला सुबक म्हणत नाहीत. फक्त मुर्तिला सुबक म्हणतात.:दिवा:
I may be wrong.