फसवणूक

Submitted by kamol on 22 June, 2009 - 06:56

आभाळ अगदी कोरं करकरीत
तू पाठवलेले ढग रिते होवून
उलटून गेले असतील
बरेच दिवस.
पुढयातल्या कागदासारखं
मनावरही उमटत नाहीत
तुझ्या पावसाची अक्षरं.

दाही दिशांना नजरेचे
घोडे फेकून पहावं
३६० अंशांत
एखादाही चुकार ढग
नाहीच.
निळा कॅनव्हासही
ओकाबोका.

विहिरीत उतरावं
खोल खोल
तर सगळे सांदी कोपरे
व्हॅक्युम सकरने
शोषलेले.

आता खणायचीही भीती वाटते
न जाणो तिथलंही पाणी
अंतर्धान पावलेलं असेल?

बारोमास दुष्काळ की काय ?

असं स्वत:ला विचारतानाच
ओल्या मातीचा गंध मनात
आणि मी
सचैल स्नात…

स्वत:लाच किती फसवावं माणसानं?

गुलमोहर: 

आर्ततेन वाट पाहाताय पावसाची
त्याची खेळी नाही एक दिवसाची
तो तर सर्वानाच भाळतोय
अन जिथं नको तिथं पाळतोय.

वा !
..सुसंगती सदा घडो, सुजनवाक्य कानी पडो..

मनावरही उमटत नाहीत
तुझ्या पावसाची अक्षरं.>>>

असं स्वत:ला विचारतानाच
ओल्या मातीचा गंध मनात
आणि मी
सचैल स्नात…

स्वत:लाच किती फसवावं माणसानं? >>>>>

मस्त !! कविता आवडली.

छान आहे कविता.

विहिरीत उतरावं
खोल खोल
तर सगळे सांदी कोपरे
व्हॅक्युम सकरने
शोषलेले

मस्त कल्पना
विक्रांत

just great...................!!!!
Hats off

आता खणायचीही भीती वाटते
न जाणो तिथलंही पाणी
अंतर्धान पावलेलं असेल?

छान रे दादा. अभिनंदन !! Happy

My website : www.layakari.com
तुम्ही तुमच्या सुचना आणि प्रतिसाद, तिथेही, मायबोली प्रमाणे; मराठी किंवा इंग्रजीत; नोंदवू शकता. कलावंताला तुमची पाठराखण हवीय. या, मी तुमची वाट पहातोय. Happy