प्रगतशील भारत स्वप्न सत्य होऊ दे

Submitted by SuhasPhanse on 14 June, 2009 - 03:48

प्रगतशील भारत स्वप्न सत्य होऊ दे

प्रगतशील भारत स्वप्न सत्य होऊ दे

प्रगतशील भारत स्वप्न सत्य होऊ दे ॥धृ॥

युवकांच्या शक्तीतुनी, सृजनांचा युक्तीतुनी ।
जिद्दीच्या वृत्तीतुनी, ध्येय गाठू दे ॥१॥

अनुशासन रक्तातुनी, हिम्मत बलदंडातुनी ।
चैतन्या श्वासातुनी, सतत वाहू दे ॥२॥

सामाजिक भान आणि, बंधुभाव मनी रुजवुनी ।
सत्त्याची कास धरुनी, स्थैर्य येऊ दे ॥३॥
तुकडोजी महाराजांच्या 'मंगलमय नाम तुझे सतत गाऊ दे' या भजनाच्या चालीवर हे राष्ट्रिय भजन म्हणता येईल.
नुसते वाचू नका, भजन गा; वाटलं तर प्रथम मनामध्ये व मग सर्वांसमोर. १५ ऑगस्ट जवळ येत आहे.

गुलमोहर: 

सुहास, प्रगतशील वाचताना लय चुकतेय, तिथे प्रगतीशील केलं तर...
बाकी छान Happy

***********************************
"ARISE ! AWAKE ! STOP NOT TILL THE GOAL IS REACHED !"
(Swamy Vivekanand)

कविता सुंदर आहेच.
मला असं वाटतं "स्वप्न 'प्रगत भारत' हे सत्य होऊ दे" असा पर्याय लयीच्या दृष्टीनेही जास्त ठीक होईल. भारत प्रगतीशील तर आहेच. तो प्रगत झालेला बघायला मिळणे हे स्वप्न असू शकते.
मुकुंद कर्णिक
मुकुंदगान:- http://mukundgaan.blogspot.com
भगवद्गीता:- http://marathi-bhagavadgita.blogspot.com