गोमू माहेरला जाते ....

Submitted by सामो on 20 March, 2024 - 14:55

-----------पूर्वप्रकाशित------------------------------
बनी - शश ए शश. ऐक ना. इकडे बघ ना जरा.

<शश चं लक्ष नाही. आतापर्यंत संसारात बायकोचा आवाज कानाआड करून तंद्री लावण्यात तो तरबेज झाला आहे.>
.
बनी - श SSSSSश अरे मी तुझ्याशी बोलतेय.
.
शश <दचकुन> - बोल ना ऐकतोय मी. जरा असाच विचार करत होतो. पण त्याचं काही विशेष काही नाही तू बोलत रहा.
.
बनी - उम्म्म आम्हाला माहिते स्वारीच्या मनात काय विचार चाललाय तो. कल्पनेतही माझा विरह सहन होत नाही ना राजा? मग माहेरी जाणं स्थगितच करू का गडे?
.
शश <आता खरच फारच दचकुन> - आँ नको नको अगं जाउन ये तू. आणि हे बघ सावकाशीन ये. मी स्वार्थी वाटलो का तुला की माझ्या सुखासाठी माहेरी जायला तुला बंदी घालीन? आणि मंजुळा आहेत ना आपल्या स्वयंपाकॆण बाई हां त्या करून घालतील मला. हाकानाका.
.
बनी - <उगाचच तिरसटुन> हूं त्या मंजुळेला मेलीला मी १५ दिवसाची भरपगारी रजा दिलीये. तुला तुझाच बघावं लागेल बघ. हातानीच रांधावं लागेल.
.
शश <मनातल्या मनात अरेरेरे!! घातला का बिब्बा! पण उघडपणे > अगं त्यात काय लग्नापूर्वी नाही मी हातानेच रांधायचो. तू आलीस अन लाडावून ठेवलास बघ. रोज सम्मोर गरमागरम .....
.
बनी- <लाजून लाल होत> इश्श्य!!! चावट कुठला. अशा गोड बोलण्यानं पाय निघेल का माझा?
.
शश - <डोळे मिचकावत> आँ मी काय ब्वॉ चावटपणा केला? पण रांधेन मी.
.
बनी - <नजरेतून कौतुक ओसंडून वहात) कसा गं समजुतदार आहे माझा प्रिया. पण एक मुळी आमचं ऐकायचं हां त्या नानु भावजी बरोबर उंडारायला मुळ्ळी मुळ्ळी जायचं नाही.संध्याकाळी आल्यावरती पीत सुटायचं नाही. तब्येत जपायची. gallary ta फार वेळ उभं राहून येणारी जाणारी 'हिरवळ' बघात बसायचं नाही. अरबट चरबट चरत सुटायचं नाही. ऐकशील ना सख्या?
.
शश - अगं म्हणजे काय? नानू ना हां तो तर कामानिमित्त बदलापूर ला गेलाय अन पिण्याचं म्हणशील तर माझा कधी तोल सुटतो का?
.
बनी - <हाताने आरती ओवाळत> तोल सुटतो का म्हणे , पहिल्या ग्लासानंतर काय काय झालं तुला लक्षात राहील तर ना. ते एक असोच. मी बघ अश्शी गेले अन अश्शी आले.
.
शश - अगं निघ तू राणी ऊशीर होतोय तुला.

<शश ची बनी वेळ खात खात शेवटी निघून गेल्यावर शश फक्त लेझीम घेउन नाचायचा बाकी रहातो. लग्गेच नानू ला फोन लावतो . >
.
शश - अरे नान्या या शनिवारी मॅटिनी टाकू लेका. नंतर जोरकस पार्टी हां एकदम ओली पार्टी - नो सोडा काय. अन मग रात्री एखाद्या बारमध्येच "मंगळागौर" जागवायची. आणि मग रविवारी दुपारी ....अरे त्यापेक्षा या वीकेंडला गोवाट्रीप करु यात का? काय ती बीचवरची गर्दी ..... हाय!! नान्या नान्या तुला सांगतो ....
.
नानू - अरे हो हो हो. झालं काय? असा चेकाळलायस का ?
.
शश - नान्या नान्या मी १५ दिवस गावाला सोडलेला वळू आहे. माझी गरीब गाय -क्वचित शिंग ही उगारता येतात बरका तिला, ते एक असोच हां तर गाय गेलीये माहेराला.

<शीळ घालत> गोमू माहेराला जाते हो नाखवा , तिच्या घोवाला फेणी ही पाजावा ... आजादी वरचा हा "पुलाव खयाली' यांचा शेर ऐक. बरं का इर्शाद है ... "जश्न-ए-आझादी-ए बर्क-ए-तूर-ए-सफीना ..."

<इतक्यात सुटकेस घेउन बनी परत येते. शश तीन ताड उडतोच आणि फोन ठेऊनच देतो >
.
शश - अगं तू गेली होतीस ना?
.
बनी - नाही रे शशु मी नाही जाउ शकत तुला सोडून . असं करते आईलाच बोलावून घेते. मी काही ऐकणार नाही तुझं. चेहरा बघ लब्बॉडाचा कसा पडलाय. तू नको गुन्हेगार वाटून घेउ हा निर्णय मीच घेतलाय. मी इथेच रहाणार, आणि दिवसरात्र तुझी सेवा करणार. हस पाहू आता.

<तिकडे नानू ने केलेला फोन वाजत रहातो. शश डोक्याला हात लाउन मटकन पलंगावर बसतो अन बनी त्याचं डोकं चेपू लागते.>

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Lol
खुसखुशीत लिहिलय.

गोमू माहेरी गेली की ३-४ दिवस ठीक वाटतं पण पंधरा दिवस कठीणच तस.

हाहा. छान लिहिलंय. बनी आणि शश - हे ससेसंबंध नावात छान आणलेत.

मला इतकी वर्षं वाटायचं की गोमू माहेरला जाते असेल तर कोकण हे तिच्या घोवाला का दाखवायचं? म्हणजे ते एकत्र चाललेत, किंवा तो पोहोचवायला चाललाय हे लक्षातच यायचं नाही. मला वाटायचं की गोमू माहेरला गेल्यावर हा घो उंडारायला मोकळा. मग काय करा, तर ह्याला कोकण दाखवा. - ह्या वरच्या गोष्टीत आहे तसेच.

छान!
हल्ली फक्त नवराच कशाला..
गोमू पण वाटच पहाट असते तिचा घो केव्हा ऑफिस ट्रीप वर नाहीतर मित्रांबरोबर चार दिवस उंडारायला जाईल ह्याची. तिचे पण प्लॅन्स तयार असतात.