माझी वाट..

Submitted by SharmilaR on 19 March, 2024 - 01:24


माझी वाट..

तशा रेषा असतात
साध्या सरळ सोप्या
सहज चालून जाता येईल
त्यांच्यावरून
अशा आडव्या..

मीही मजेत चालत असते
त्यांना तसच गृहीत धरून.

कुणीतरी छेद देतं
उगाच..
रेषा होतात उभ्या..

मग सुरू होते ..
‘नन्ही चिटी..’ म्हणत
व्यवस्थेला आव्हान देत
माझी उभी चढण..

हसत.. वाकुल्या दाखवत
उभे असतात
वाटच नाहीशी करणारे
अन् रेषा बदलणारे..

लढत राहते मी
कधी जगाशी.. कधी माझ्याशीच ..
गडद अंधारे पर्यंत.

चमकते वीज तटकन
त्या काळोखात..?
नव्हे माझ्याच मनात..
माझी नव्हतीच ही वाट..

निरभ्र दिसू लागतं
कुठलीही वाट नसलेलं
मोकळं कुरणं
जिथे दिसते माझी मलाच
रेषे शिवाय ची
बागडणारी मी..
मुक्त मी..
******

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

खूपच पोचली!
>>>>>>चमकते वीज तटकन त्या काळोखात..?
नव्हे माझ्याच मनात..माझी नव्हतीच ही वाट..
येस्स्स! असेच होते.

वाह सुंदर!!

'मग सुरू होते ..
‘नन्ही चिटी..’ म्हणत
व्यवस्थेला आव्हान देत
माझी उभी चढण..'
हे आवडले!!