लहान मुलांच्या बर्थ डे पार्टीला तुम्ही कोणते खेळ खेळता?

Submitted by ऋन्मेऽऽष on 13 March, 2024 - 20:23

लहान मुलांच्या बर्थ डे पार्टीला तुम्ही कोणते खेळ खेळता?

सर्वांनी एकमेकांकडील गेम आणि आयड्या ईथे शेअर करूया आणि सर्व ज्युनिअर मायबोलीकरांची पार्टी रॉकिंग आणि त्यांचे आयुष्य आनंदी करूया!

ईथे मोठ्यांचे फॅमिली गेम्स आले तर ते सुद्धा चालतील. शेवटी अश्या पार्टीजना मोठ्यांनीही लहान बनूनच एंजॉय करायचे असते.

--------------

आमच्याकडे आजवर खेळले गेलेले खेळ.
(आमच्या सोसायटीत मुलांची कमी नसल्याने अगदी ऐन परीक्षेत वाढदिवस आला तरी २५-३० मुले सहज जमतात. त्यामुळे काहीही खेळले तरी दंगा हमखास असतो. उलट दंगा अति होऊ नये याची काळजी घेऊन खेळ निवडावे लागतात)

१) पासिंग द पार्सल - तोच आपला हम आपके है कौन माधुरीवाला. उशी पास करायची आणि ज्यावर राज्य येईल त्याला काहीतरी मनोरंजक आयटम सादर करायला लावायचे.

२) एक मिनिट गेम्स - यात बरेच काही खेळलो आहे. जसे की,
ग्लासवर ग्लास रचणे.
फुगे दोन काड्यांनी उचलून इथून तिथे नेणे,
बादलीत बॉल टाकणे,
जोडी बनवून कॅच कॅच खेळणे,
आठवेल तशी भर टाकतो.

३) रिंगमधून किंवा दोरी खालून बॉडी टच न करता पास होणे. (यात आमची पोरगी बारीक आणि लवचिक असल्याने बरेचदा जिंकायची. म्हणून घरच्या वढदिवसाला कधी खेळलो नाही)

४) रॅम्प वॉक - फॅशन शो - हौस असते लहान मुलामुलींना

५) स्टॅच्यू - नाचता नाचता नाचता म्युजिक थांबली की लगेच आपणही थांबायचे. ज्या खेळात नाच असतो तिथे मजा येतेच.

६) उड्या मारता मारता म्युजिक थांबताच खाली बसायचे. जो शेवटी बसेल तो बाद. अश्या खेळात जजगिरी फार करावी लागते त्यामुळे पुन्हा खेळायचा नाही हा अनुभव घेतला. तरी एक बरे मी विडिओ काढायचो त्यामुळे बरेच गोष्टी दूध का पाणी करता यायच्या.

७) म्युजिक लाऊन नाचायचे, किंवा सर्कल करून गोल गोल फिरायचे आणि जो नंबर पुकारला जाईल तितक्या मुलांचा आपसात ग्रूप बनवायचा. फार लफडे होतात पोरांचे. आपले खरे खोटे मित्र समजून जातात.

८) शिवाजी म्हणाला.. सायमन से.. जुनाच खेळ आहे पण आपल्या मनाने एक दोन उलट सुलट रुल टाकायचे आणि फास्ट खेळायचा..

९) Chinese Whispers - हा गेम खेळायला फारच धमाल आलेली. सगळ्यांनी रांगेत पाठमोरे उभे करायचे. पहिल्याला मग समोर बघायला लाऊन काहीतरी अ‍ॅक्शन करून दाखवायची. ती त्याने त्याच्या मागच्याला, मागच्याने त्याच्या मागच्याला ... असे एकेकाला पलटत ती अ‍ॅक्शन पुढे पास करत जायची. शेवटच्या मुलापर्यंत पोहोचेस्तोवर मूळ अ‍ॅक्शनचे बारा वाजलेले असतात. मुले फार एंजॉय करतात. पुर्ण वेळ हसणे चालूच राहते. याचा छान विडिओ सुद्धा काढायचा.

१०) एखाद्या वस्तूचे नाव घ्यायचे, जसे की दोन रुमाल, दहा रुपयाची नोट, लाल हेअर बॅण्ड... आणि ती वस्तू जो पहिला आणेल त्याला तिथल्या तिथे एक चॉकलेट

११) चित्र बघा शब्द ओळखा - हा खेळ आम्ही फॅमिलीसोबत खेळलो आहे. सध्या मुलगी आणि तिच्या मैत्रीणी मोठ्या झाल्याने यंदाच्या वाढदिवसाला खेळणार आहोत.
यावर ईथे धागा काढलेला. - https://www.maayboli.com/node/80918
सोसायटीतील मुलांचीच नावे, त्यांच्या मध्ये फेमस असलेले कॅरेक्टर, शब्द ठेवले तर त्यांना मजा येईल असे वाटतेय.

१२) एक मछली... पाणी मे गयी.. छप्पाक - अधिक माहितीसाठी रील बघा याच्या. सोसायटीमधील मुलांमध्ये सुद्धा ट्रेण्डिग असल्याने हा सुद्धा सध्या खेळायचा विचार आहे. याचा विडिओ सुद्धा मजेशीर बनेल, जो त्यांनाच बघायला आवडेल.

१३) Who knows Birthday boy/girl better - यात ज्याचा वाढदिवस आहे तो आपल्याबद्दल काही प्रश्न विचारणार.. जसे की माझा फेवरेट हिरो. कार्टून, रंग... वगैरे वगैरे... आणि जो कर्रेक्ट उत्तर देणार त्याला तिथल्या तिथे चॉकलेट. हा आम्ही फॅमिलीमध्ये खेळलो आहोत. मजा येते. यावेळी वाढदिवसाला हा खेळ खेळायचा विचार आहे.

१४) संगीत स्टेशन - माझ्या काही फारसा आवडीचा गेम नाही. पण साधा सोपा सहज आहे. मुलांना नाचायला आणि कोणाची चिट्टी येत कोण बाद झाला हे बघायला मजा येते.

१५) एक चटई असते. ज्यावर उलटे सुलटे हातापायाचे निशाण असतात. त्यावर त्यानुसार आपले हातपाय चिकटवत उड्या मरत इथून तिथे जायचे असते. मागच्या एका वाढदिवसाला ट्रेंडिंग असल्याने हे खेळलो होतो. आमची चटई असल्याने आमच्या घरच्या मुलांनीच पटापट उड्या मारल्या. म्हणून त्यांना बक्षीस दिले नाही.

चटचट आठवले, ज्यांचा स्वानुभव आहे ते पटपट लिहिले.. अजून ईतरांच्या बर्थ डे पार्टीत पाहिलेले आठवून प्रतिसादात भर टाकत जाईन.. जगभरात असे शेकडो खेळ खेळले जात असतील.. येऊ द्या Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छोटा हाथी बडा हाथी
छोटा हाथी ला हात मोठे करायचे दोन्ही म्हणजे मोठा ह्या अर्थी
आणि बडा हाथी ला छोटे.
जो चुकला तो बाद

पासिंग द पार्सल
आईचं पत्र हरवलं
गाढवाला शेपूट लावणे
तिन्ही गेम मुलांच्या संख्येनुसार बराच वेळ चालतात.

कालच एका बर्थडे पार्टीत एका कुटुंबाने बाहेरून ऑर्गनायझर मागवला होता. त्याने आया व मुलं यांना फनी मुव्हज देत डान्स करवला होता. त्यातही मजा आली.

डंब शराड.
माझ्या भाच्याला वाटायचे ते डंब शरद आहे. माझे नाव शरद आहे. त्याला वाटायचे तो माझा खेळ म्हणुन त्याला डंब शरद म्हणतात. काहीही असो पण लहान मुलांना किती पारख असते ना मोठ्यांची.

गाढवाका शेपुट लावणे कसे खेळतात?

आमच्याकडचे खेळ टाकले वर हेडर पोस्ट मध्ये Happy

आता मुलं एक मछली पानी मे गयी छप्पाक पण एंजॉय करतात >>>> हो, आम्ही सुद्धा खेळतो घरी. हा यंदा आहे लिस्टीत Happy

गाढवाला शेपुट लावणे कसे खेळतात?
>>>>
‘पिन द टेल’ गेम्स असं खरं नाव आहे. आमचं आपलं देशी नाव.

एक मोठं गाढवाचं चित्र भिंतीवर लावून शेपटीच्या आकाराचे स्टिकर्स/स्टिकी पेपर्स कापून मुलांना द्यायचे. डोळे बांधून ५-६ फुटावरून मुलाला चित्राकडे पाठवायचं आणि योग्य जागी शेपटी लावायला सांगायची. स्टिकर्स नसतील तर मार्कर्स वगैरेनी शेपटीचं चित्र काढायला सांगायचं. इतरांनी खर्या खोट्या इंस्ट्रक्शन्स द्यायच्या. घरच्यांसाठी फारच नो ब्रेनर व मुलांसाठी हिट गेम आहे.

याचे (थीम असल्यास) युनिकॉर्नला शिंग लावणे, ओलाफला नाक लावणे, सूर्यमालेत पृथ्वी लावणे अशी काय वाट्टेल ती वर्जन्स करता येतात.

गाढवाला शेपूट लावणे हा खेळ आमच्या शाळेत स्पर्धात खेळला जायचा. मला अजून विचार करून हसायला येते की धावणे, चमचागोटी, लंगडी, स्लो सायकलिंग, गोळाफेक वगैरे मैदानी आणि कॅरम बुद्धीबळ अश्या बैठ्या खेळांसोबत हा गाढवाला शेपूट लावायचा खेळ शाळेने का ठेवला असावा Happy
बर्थ डे माहौल मध्ये खेळायला मात्र छान आहे अश्या प्रकारचा खेळ..

मला तो आमच्या जुन्या चाळीतील पूजेला असणारा मटकाफोडीचा खेळ आवडायचा.. पण तो बर्थ डे ला खेळलो तर पोरे टीव्ही फोडून ठेवतील Happy

धनुडी, समजा चार लोकं खेळ खेळत आहेत तर तो खेळ असा खेळला जाईल -
पहिला माणूस - एक मछली
दुसरा माणूस - पानी मी गयी
तिसरा माणूस - छपाक
चौथा माणूस - दो मछली
पहिला माणूस - दो मछली
दुमा - पानी मे गयी
तीमा - पानी मे गयी
चौ मा - छपाक
पमा - छपाक

बेसिकली जितक्या मछली तितक्या वेळा एक वाक्य रिपीट करायचं. जो चुकेल तो हरला

ट्रेझर हंट. क्लू लपवून ठेवायचे आणि मुलांना शोधायला सांगून, शेवटच्या क्लू नंतर काहीतरी ट्रेझर ठेवायचे.

ट्रेझर हंट धमाल असते. आम्ही सुद्धा जवळपास दरवर्षी खेळतो.. पण बर्थडे पार्टीला आलेल्या मुलांसाठी नाही तर बर्थ डे नंतर किंवा आदल्या रात्री मुलीसोबत खेळतो. तिचा ज्या वयाचा बर्थडे असेल तेवढ्या गिफ्ट लपवतो. प्रत्येक गिफ्ट सोबत पुढच्या गिफ्टचा कल्यू..

यावर्षी बहुतेक नाही खेळणार.. कारण पोरगी जास्तच मोठी झाली. तिने सरळ बर्थ डे गिफ्टची लिस्टच आमच्या हातात दिली Happy

मछली पानी मे हे आमच्या टिकटॉकचा मध्यंतरी व्हायरल झालेला खेळ दिसतोय. मार्शमेलो गेम.
वन मार्शमेलो, चेक इट आउट. वू
टू मार्शमेलो. टू मार्शमेलो, चेक इट आऊट, चेक इट आऊट, वू वू
थ्री मार्शमेलो, थ्री मार्शमेलो, थ्री मार्शमेलो, चेक इट आऊट, चेक इट आऊट, चेक इट आऊट, वू, वू वू
Lol

हो रिया आमच्या ऑफिस मधलं यंग पब्लिक हे असं काही तरी खेळून हसत असतं.
बाकीचे खेळ छान आहेत आम्ही खेळायचो.

माझ्या भाच्याला वाटायचे ते डंब शरद आहे>>>> Lol मानव

अजून एक trending हिट गेम आठवला
बॉटल फ्लिप
हा खेळ म्हणजे एक हाताला चाळा आहे.. याचे व्यसन लागू शकते.

ते काहीतरी डोक्याला स्टिकी टेप लावून त्यावर प्रसिद्ध व्यक्तीचं नाव लिहायचं आणि ते ज्याच्या डोक्याला आहे, त्याने इतरांना हो की नाही ने उत्तरं येतील असे प्रश्न विचारायचे आणि आपल्या डोक्याला कोण आहे ते ओळखायचं. खेळाचे नाव माहीत नाही.

मृणाली
तुम्हालाही बी लेटेड जन्मदिन मुबारक..
आपण मागे सुद्धा हे सांगितले होते. आता मी सुद्धा आपला वाढदिवस कधी विसरणार नाही Happy

आमच्याकडे साधारण तीनचार खेळ खेळले गेले. दीड दोन तासात संपले.

1) who knows Pari (birthday girl) better..
यात बर्थडेला आलेला मुलांचे दोन ग्रुप करून लेकीन स्वतःबद्दल प्रश्न विचारले.

2) चित्र बघा शब्द ओळखा. हा खेळ सुद्धा दोन ग्रुप बनवून खेळलो. यावेळी बहुतांश प्रश्न मुलीनेच बनवले होते. तिलाच बनवायला सांगितले कारण तिच्या मित्रमंडळीना कितपत येईल हे तिलाच ठाउक. मी मात्र त्या मुलांना अंडरएस्टिमेट करून काही सोपे प्रश्न बनवून फसलो.

याचे प्रश्न म्हणजेच बनवलेली चित्रे माझ्या आधीच्या धाग्यावर नंतर टाकतो.
तोपर्यंत हा युट्युब व्हिडिओ बघू शकता. सर्व चित्रांचा एक व्हिडिओ बनवून यूट्यूब वर टाकला होता. जेणेकरून तो टीव्हीवर प्ले करता येईल.

https://youtube.com/watch?v=pAgLQv7ScLE&feature=shared

मुलांना मजा यावी म्हणून त्यात त्यांचे सध्याचे आवडीचे गाणे सुद्धा टाकले.

3) फ्लीप बॉटल
वाढदिवसाच्या आलेल्या मुलांना ज्या पाण्याच्या छोट्या बाटल्या दिल्या होत्या त्याच खेळायला वापरल्या. त्यामुळे आपला नंबर येईपर्यंत मुलांनी छान प्रॅक्टिस सुद्धा केली.

4) Birthday wishes
हा खेळ नाही. पण मागे मी स्लॅम बुकचा धागा काढला होता त्यावरून कल्पना सुचली.
तशाही आमच्या घराच्या भिंती रंगलेल्या असतात. त्यामुळे डेकोरेशन काय करायचं सुचत नाही. म्हणून एका भिंतीवरती भला मोठा पांढरा पेपर लावला. तो मुलींचे काही फोटो लावून सजवला. आणि त्यावर पार्टीला आलेल्या मुलांना बर्थडे विश आणि हवे ते लिहायला सांगितले. कोणी चांगले चांगले लिहिले तर कोणी चिडवाचिडवीचे. व्यक्ती तितक्या प्रकृती Happy

IMG_20240322_182515.jpg

आमच्याकडे सर्वाँना आवडली ही कल्पना. जरूर करा..

धन्यवाद मनिम्याऊ Happy
आता मुलाला देखील त्याच्या वाढदिवसाला हे हवे आहे.
पार्टीला आलेली मुले सुद्धा दोन गेम मध्ये वेळ मिळेल तसे, आठवेल तसे जाऊन जाऊन तिथे लिहीत होते. त्यांनाही मजा येत होती.

बर्थ डे मध्ये मला वाटते डेकोरेशन, केक, खाणेपिणे, रिटर्न गिफ्ट यापेक्षा जास्त महत्वाचे गेम्स आणि नाचगाणे असते. ते मुलांनी एन्जॉय केले तरच खरा पार्टीचा माहौल तयार होतो Happy

ते मुलांनी एन्जॉय केले तरच खरा पार्टीचा माहौल तयार होतो >>> अगदी. मजा केलेली दिसतेय. Happy
परीला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा. You go girl.. ! Happy

धमाल एकदम! त्या "बुधवार कदम"मागे काय श्टोरी आहे?

जांभळ्या अक्षरात 'Happiest birthday my cutest friend' हे जिने लिहिलं आहे, काय सुंदर अक्षर आहे!!

अस्मिता, सामो धन्यवाद Happy

हपा,

@ बुधवार कदम.. हे Wednesday Adams चे मराठी वर्जन आहे. पोरगी तशी दिसते म्हणून चिडवले जाते. गूगल करून मी फोटो शोधला तेव्हा हा सापडला..

IMG_20240324_032022.jpg

Happiest birthday my cutest friend ... हे सध्याच्या तिच्या बेस्ट फ्रेंडने लिहिलेले आहे. ती अक्षर ड्रॉइंग अभ्यास सगळ्यात हुशार आणि सिन्सीअर मुलगी आहे.

तसेच लेकीला स्टंट गर्ल, स्टंट मास्टर सुद्धा बोलतात. कारण तिच्यात तसा किडा आहे. तर याचवरून काही जण "सस्ती स्टंट वूमन" म्हणून चिडवतात. ते सुद्धा एकाने लिहिलेले आहे.

एकंदरीत काही गोष्टी मलाही नव्याने समजल्या.

मस्त आयडिया आहे वॉलची. बुधवार कदम Happy
Chha pari , monkey pari, सात्विक, कुणी JK म्हटले आहे. हीच तर मजा.

Pages