कॉपोरेट मीटिंगसाठी पुण्यात जागा शोधत आहे

Submitted by चैतन्य रासकर on 8 February, 2024 - 01:51

कंपनीच्या मीटिंग, गेट टुगेदरसाठी कमाल ३०० भारतीय व परदेशी लोकांसाठी पुण्यात एक जागा शोधत आहे. ही मीटिंग, गेट टुगेदर ऑक्टोबर २०२४ महिन्यात होणार आहे.

हे गेट टुगेदर तीन दिवस असेल, त्या जागी राहण्याची सोय असेल तर उत्तम किंवा त्या जागी शेजारी असणाऱ्या हॉटेल्स मध्ये राहायची व्यवस्था झाली तर बेस्ट होईल.

जर तुम्हाला अशा जागा माहित असतील तर कृपया कळवावे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पुणे जे डब्य्लु मॅरिअट. रूम स व फूड कॉन्फरन्स सर्व पॅकेज मिळेल. सेना पती बापट रोड. मस्त सर्विस आहे.

कॉर्पोरेट आहे ना?
बजेट पण आहे का? चांदणी चौकात नीला सत्यनारायण यांचे Ambrosia रिसॉर्ट आहे.
कॉन्फरन्स हॉल, ओपन ऑडिटोरियम, खेळ, थीम पार्क, ट्रेन रेस्तरां. स्विमिंग पूल अशा खूप सोयी उपलब्ध आहेत. २० वर्षापूर्वी गेलो होतो. आताचे माहिती नाही.
https://www.tripadvisor.in/Hotel_Review-g297654-d1151420-Reviews-Ambrosi...

बालाजी मंदिर सातारा रोडवर पण यांचेच दुसरे रिसॉर्ट आहे. ते पाहिलेले नाही.

मॅरिओट विचारलं, पण खूप महाग आहे..>> कंपनीचे बजेट किती आहे. एकूण कार्यक्रमाचे त्यावर ठरवता येइल नाहीतर मंगल कार्यालय टाइप हॉल घेउन करता येइल.

CG Management Development Training Center @Mulshi

मुळशी रोडवर फार सुंदर लोकेशन आहे. मोठमोठी Auditoriums, ग्रुप divide करायचे असतील तर conference rooms, राहायची सोय आणि corporate training Ctr असल्यामुळे professional set up आहे. माझ्या कंपनीची L&D ची trainings व्हायची तेव्हाचा caterer पण मस्त होता. फारच छान food असायचं. गेले काही वर्षात कल्पना नाही. Rooms चे patios direct दरीवर आहेत. खाली पूर्ण हिरवागार view आहे. गुगलवर सगळे फोटोज् दिसतील.

३०० लोक्स म्हणजे १५० रूम्स ची सोय कमीत कमी हवी. त्यात काही फार मोठ्या डेसिग्नेशन चे व मानाचे पाव्हणे, सिंगल लेडीज ह्यांना स्वतंत्र रूम्स द्यायला लागतील. सर्वच शेअर करतील असे नाही.

एअरपोर्ट जवळ ठेवा. फ्लाइट ने येणारे लोक सहज येतील. लॉजिस्टिक सोपे जाईन. बाहेर न्यायचेच असेल तर ५ ६ वोल्वो करून नेऊ शकता एखादा दिवस. पुण्यात सध्या ट्राफिक अशक्य आहे. आणि तिथे भरपूर हॉटेल आहेत. इतक्या रूम सहज मिळतील. रॅडिसन, हॉलिडे इन आणि कोरेगाव पार्कात बरीच छोटी मोठी हॉटेल आहेत. ओ स्वस्त आहे पण क्वालिटी बकवास आहे. बजेट जास्त असेल तर तिथे वेस्टीन आहे.

हिंजवडीत हवे असेल तर लेमन ट्री आणि रॅडीसन ओके आहेत.
बजेट अगदीच टाईट असेल तर वाकड चं जिंजर

वाकड हिंजवडी फ्लायओव्हर ला टिपटॉप हॉटेल आहे, त्याचेही रेटस बघा.
राहायची सोय नाही, पण जगताप डेअरी ला कोपा विला आहे ते छोटा मीटिंग हॉल दिवसभर देतात, 20000 खाण्याचं बिल करावं लागतं.पण तो लहान पडेल तुमच्या संख्येने.

मध्यवर्ती जागेत सेंच्युरीयन हॉटेल चांगले आहे, 3100 की काहीतरी रूम रेंट आहे.बजेट सांगितले तर अजून चांगले पर्याय मिळतील.

Corporate events साठी वेगळी packages असतात आणि customize करून देतात. त्याप्रमाणे negotiations करायची