स्पिरिट ऑफ फ्रायडे!!!

Submitted by अश्विनीमामी on 5 February, 2024 - 05:48

काम थोडे कमी असले की मी कधी कधी आरामात आवरून जिवाचे मुलुं ड - पाच रस्ताच खरेतर - करुन हपिसात अवतार घेत असते. नडलेल्यांचे फोन कमी येतात. सुकून हा मुंबईत कधीही न मिळणारा पदार्थ १०० ग्राम चाखा यला मिळतो. तर परवाच्या
शुक्रवारी एक गम्मत घडली. मी अशीच घरातुन निघून पाच रस्त्यात मेडिकल शॉप मध्ये धडपडत आले. तिथे ही गर्दी म्हातार्‍यांचीच. मग नेहमीचा शिरस्ता असा की दवा घ्यायची. मग रस्ता क्रॉस करुन कीर्ति महल मध्ये जायचे. निवांत उपमा ,वडा नाहीतर ऑनिअन उत्तपम खायचे व आटो करुन हपीसात जायचे.

औषधे घेउन, उपमा खाउन मी बाहेर पडले. आता आटो करायची. हा वेस्ट साइडने स्टेशनला जाणारा मेन रस्ता आहे त्यामुळे आटो मिळणे अंमळ अवघड आहे. इकडे तिकडे थोडे चालत जावे लागते. पण समोर एक थांबलेली आटो दिसली. रोड क्रॉस करुन गेले तर आटोवाला बसतो त्या शिटेवर एक बारके खार्‍या दाण्यांचे पाकीट दिसले. असेल काही च्याउ म्याउ म्हणून त्याला आतैं क्या विचारले.

आटो वाला महत्वाचे काम करत होता पक्षी. समोर एक बारीक खबदाड सारखे पण फुल्ली स्टॉक्ड वाइन शॉप आहे. हे मला तेव्हाच लक्षात आले. मला बसायला सांगून त्याने त्या दुकानातून एक क्लि अर लिक्विड, पक्षी जिन/ व्हॉडका टाइप काहीतरी घेतले. तुमचा काही कार्यक्रम आसेल तर मी दुसर्‍या आटोने जाईन म्हणून मी उठलेच पण नै नै चलो म्हणून तो निघालाच.

इतकेच नव्हे तर त्याने तो पव्वा आपली पाण्याची प्लास्टिकची बाटली असते, ती ही छोटी दहा रुपयाची. त्यात ओतला व सारखे करुन झाकण लावले. व रिक्षा चालवता चालवता आधी त्या शेंगदाण्याचा बकाणा भरला. व एक मोठा घोट रिचवला !! हे फुल ट्राफिक मध्ये ४० स्पीडला!!

टर्न घेइपरेन्त माझी तंतरलेली होती. अरे देवा. आय डोंट सपोर्ट ड्रंक ड्रायविंग अ‍ॅट ऑल. झिरो टॉलरन्स. पण उतरता ही येइना.
नशीबाने पुढच्या टर्नला मोठा सिग्नल लागला. मी भर्रकन त्याच्या अंगावर पैसे टाकले व उतरुन घेतले. मला इथेच एक काम आहे सांगून.
तसे ते होते ही. मग ही दारुडी- बेवडी रिक्षा आली तशीच सिग्नल मध्ये भुर्र कन निघून गेली. बाटली अर्धी पेक्षा जास्त खाली करुन. पुढे काय झाले कोण जाणे. मी फुटपाथ वर उतरुन एक मोठा श्वास घेतला व कामाच्या दुकानात गेले. खुर्ची वर बसून दम खाल्ला व दुकानदाराला ही मज्जा सांगितली. पुढचे काम करुन दुसरी रिक्षा घेउन डेस्क वर आले. पण तरी मन धडधडत होते. साठ वर्शातला बेवड्या आटो चा हा पहिलाच अनुभव व शेवटचा ही. मुंबईत काही ही केव्हाही घडू शकते हे परत एकदा जाणवले!!!

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

रोचक अनुभव!
त्यावर हा खोचक प्रतिसाद,
मागे मायबोलीवरच कोणीतरी कुठेतरी लिहिलेले की लिमिटमध्ये प्यायले की गाडी चालवायला काही प्रॉब्लेम होत नाही... त्याची आठवण झाली.
खरेही असेल हे. मी पित नसल्याने मला कल्पना नाही.

बाई दवे,
मुंबईत नसतात ऑटो Happy

बापरे
बरं झालं बाहेर पडलात.
मागे एकदा एका ओला ऑटो वाल्याने भरवेगात येणाऱ्या शिवनेरी समोरून धाडसी ओव्हरटेक करून मला स्वर्गाच्या जवळजवळ दाराचे दर्शन घडवले.त्यावेळी घाई होती त्यामुळे जीव मुठीत धरून प्रवास पूर्ण केला आणि 1 स्टार रिव्ह्यू दिला.साहेब पेलेले होते की नाही माहीत नाही.

दिवसा उजेडी पव्वा? जय हो ! “स्पिरिट” ची कोटी Lol

मुंबई आणि पुणे दोन्हीकडे दारू, गुटखा आणि विडीकाडीचे व्यसन असलेले रिक्षा-ओला-ऊबर चालक बरेच भेटतात, रात्री उशिरा तर हमखास. दाणदाण म्यूझिक आणि कृत्रिम सुगंधामागे लपण्याची नाकाम कोशिश.

He he

यमदूतच म्हणायचे असे बेजबाबदा ड्रायवर्स. बरं झालं चटकन उतरलात. आपण लोकांना बदलू शकत नाही पण प्रसंगावधान राखून, आपली काळजी घेउच शकतो. स्मार्ट & क्विक डिसिजन.

बरं झालं अमा, त्याने कुठे धडकवण्याच्या आत उतरलात.
मला वाटले नविन कॉकटेल बद्दल लिहिलं की काय.

मला चेन्नईला भेटला होता असा आटोवाला. रात्री बाराचा सुमार. स्वतःच मोठ्याने गाणे म्हणत, भयंकरच कट मारत होता, मी ओरडत होतो त्याच्यावर पण थांबवत नव्हता. मग अचानक दोन्ही बाजूला झाडी (कुठल्या पार्क मधुन रस्ता होता) असणारा रस्ता लागला तिथे त्याने करकचुन ब्रेक मारून थांबवली आणि उतरून लगेच पळाला रिलिव्ह करायला.
मी बॅग घेऊन उतरलो. तो परत आला त्याला वीसची नोट दिली म्हटलं तू निघ. तो मागे लागला तोडक्या मोडक्या हिंदीत बसा घेऊन जातो करत, बॅग घ्यायला लागला. त्याला मग दम दिला. जाणारी वाहने गमंत पहात जात होती.
एक टू व्हीलर वाला कुतूहलाने स्लो करून बघत जात होता, त्याला पुढे रिक्षा मिळेल तिथ पर्यन्त लिफ्ट मागितली. आणि त्या भल्या माणसाने सोडले स्टँडवर.

बसल्यावर ड्रायव्हर पिऊन आहे हे लक्षात आहे असे अजून काहीवेळा घडले, पण विशेष सांगण्यासारखे काही घडले नाही. योग्य ठिकाणी थांबवून बदलली रिक्ष/ टॅक्सी.

थरारक अनुभव!
>>>आय डोंट सपोर्ट ड्रंक ड्रायविंग अ‍ॅट ऑल.>>>
me too... Happy

पण २९ डिसेंबर २०२३ ला काही 'कलमुह्या' ट्राफीक पोलिसांनी साक्षात मलाच ह्या अपराधा साठी दोषी धरुन निर्दयीपणे भा.द.वि. १८५ अनुसार कारवाई करत दुसऱ्या दिवशी कोर्टात हजर व्हायला सांगीतले! सुधारीत नियमांनुसार फक्त १०,०००/- (अक्षरी रुपये दहा हजार मात्र) इतका दंड मा. न्यायालयाने ठोठावला!

स्वगतः - अन्य वेळी हजार - दोन हजार तोंडावर फेकल्यावर सोडुन देणाऱ्या ट्राफीक पोलिसांनी आपले कर्तव्य पार पाडत (२५ डिसेंबर ते १ जानेवारी) ह्या वाहतुक सुरक्षा सप्ताहा दरम्यानची कारवाई ३६५ दिवस अशीच चालु ठेवल्यास असे प्रसंग निदान रिक्षा/टॅक्सी प्रवाशांच्या वाट्याला तरी येणार नाहीत!
जनहितार्थ जारी..
जय हिंद! जय महाराष्ट्!

>>>तुम्ही ड्रंक ड्रायव्हिंग करत होता?>>>
तत्वतः त्यावेळी नाही, पण आदल्या रात्री उशीरा पर्यंत केलेले मद्यपान कायद्याच्या कचाट्यात सापडण्याच्या दृष्टीने पुरेसे होते म्हणे!

हा एकदम सर्वमान्य नियम आहे की 20 डिसेंबर ते 1 जानेवारी ट्रॅफिक पोलिसांपासून एकदम जपून राहायचं.त्यांना खूप इझी टारगेट्स मिळतात, आणि ते खूप जास्त डोळ्यात तेल घालून बघतात. Happy

>>>आणि ते खूप जास्त डोळ्यात तेल घालून बघतात.>>>
ह्म्म्म! पण सकाळी ९ - ९:१५ वाजता ते डोळ्यात तेल घालून बघत असतील ही कल्पना नव्हती Happy

बादवे, त्या निमित्ताने समजलेली एक गोष्ट, राँग साईड ड्रायव्हिंग साठी देखील जागेवर चलान वगैरे न मिळता थेट कोर्टात हजर व्हावे लागते आणि त्यासाठीही १०,०००/- रुपये दंड आहे!

दारू च्या बाटलीला टेक्निकली काही लाईट सेन्सर नाही की ती फक्त रात्रीच उघडेल आणि रात्रीच प्यायली जाईल असं जग समजेल Happy

रात्री उशीरा पर्यंत केलेले मद्यपान कायद्याच्या कचाट्यात सापडण्याच्या दृष्टीने पुरेसे होते >> Lol म्हणजेच डीयुआय होते.
ड्रंकन ड्रायव्हिंग म्हणजे कायद्याच्या मर्यादेपेक्षा जास्त अल्कोहोल रक्तात/ श्वासात सापडणे. तुम्ही किती कॅरी करू शकता आणि किती नाही हे कायदे बदले पर्यंत गौण आहे.
आणि हा किस्सा ड्रंकन ड्रायव्हिंग धाग्यावर मोठेपणाने सांगणे हे आणखी विनोदी आहे. अर्थात माबोवर डीयुआय पोस्ट चालतात, न्हवे धावतात! Biggrin

>>>दारू च्या बाटलीला टेक्निकली काही लाईट सेन्सर नाही की ती फक्त रात्रीच उघडेल आणि रात्रीच प्यायली जाईल असं जग समजेल>>>
खरं आहे, पण 'फुंक नळीत' काही यथायोग्य बदल करुन परिस्थिती थोडी आटोक्यात आणता येइल असे वाटते Happy Happy Happy

अमितव Proud
डियुआय पोस्टीच धावतात. बाकी फार तर ब्रिस्क वॉक करतात.

>>>आणि हा किस्सा ड्रंकन ड्रायव्हिंग धाग्यावर मोठेपणाने सांगणे हे आणखी विनोदी आहे>>>
ह्यात मोठेपणा काय आहे? उलट सुधारीत नियमांची कल्पना येउन अन्य सदस्यांचे होउ शकणारे नुकसान थांबवणे/कमी करणे हा हेतु आहे Happy

बापरे स्पिरीट ऑफ फ्रायडे फार महागात पडता पडता वाचलात अमा Sad
मधेच उतरून गेलात हे योग्यच केलेत.

मुंबईत नसतात ऑटो >>> होना, हेलीकॉप्टर्स असतात मुंंबै मदे

टॅक्सी असतात Happy

स्कूलबसेसच्या सोळा ड्रायव्हर्सना यासाठी पकडलं.
>>>>>
बापरे हे डेंजर आहे.
बेगलोर काही छोटे शहर नाही..

बापरे
वाईट अनुभव.
अत्यंत बेजबाबदार ऑटोवाला.

ऋन्मेष, छोटं शहर नसण्याचा काय संबंध ते कळलं नाही. स्कूलबसच्या ड्रायव्हरने दारू पिऊन बस चालवणं कुठेच acceptable नाही.

ऑटोवाले जसे प्रामाणिक व साधे आहेत तसेच काही गुन्हेगारी वृत्तीचे व नशा करणारे सुद्धा आहेत. पूर्वी अनेकदा अनुभव घेतलाय. पण आता ओला उबेर आल्यापासून हे सगळे अनुभव जवळपास बंद झालेत कारण त्यात ऑटोवाले रजिस्टर्ड असतात. त्यांची आयडेंटिटी पत्ता सर्वकाही त्या कंपनीकडे असते. रेटिंग असते. उबेर ने तर प्रवास सुरु असताना इमर्जन्सीचे सुद्धा बटन ऍप मध्ये दिलेले आहे.
मी तर आजकाल रँडम रिक्षा पकडणे सोडूनच दिले आहे. (फार क्वचित, ओला/उबेर आलीच नाही तरच)
मला वाटते सर्वांनीच विशेषतः मुलींनी व स्त्रियांनी नेहमीच प्रि-बुक्ड रिक्षाच घ्यावी.

वावे,
acceptable असण्या नसण्या बद्दल नव्हते ते. तर अश्या घटना घडण्याच्या शक्यतेबद्दल होते.
कारण मोठे शहर आणि मोठ्या शाळांतील पालक जागरूक असतात, तसेच वाहतुकीचे नियम सुद्धा जास्त पाळावे लागतात..

अगदी ताजी घटना म्हणून आठवले की मुलांची शाळेची पिकनिक गेली होती. संध्याकाळी बस परतीच्या प्रवासाला निघाल्यापासून शाळेत पोहोचेपर्यंत दीड तासात क्लासच्या व्हॉटसअप ग्रूपवर चार-पाचशे मेसेज पडले होते. काही जण तर बस शहरात आल्यावर तिला फॉलो करत होते आणि एका वळणावर ड्रायव्हरने फार वेगात गाडी नेली म्हणून एकाने तक्रार सुद्धा केली. अश्या पालकांना जर ड्रायव्हर दारू पिऊन आहे हे कळले असते तर..

एक यंत्रणा असते ज्यात camera असतो.
ती driver behavour detect करत असते सतत.
(Tk data cloud वर upload होतो मग आमच्यासारखे लोक त्याचं analysis करतात )
ड्राइव्हरला झोप आली का, दारू प्यायला आहे का वगैरे. Speed limit, collision warning.
ती यंत्रणा शाळेच्या बस मध्ये असायला हवी.
अगदी futuristic नाहीये. भारतात, पुण्यात, आहे.
अनुभवली आहे.
कंपनी च्या प्रत्येक वाहनाला आहे आमच्याकडे.

आशू, मुंबई ही सायन माहीम पर्यंत आहे. तिथे टेक्सी चालते. रिक्षाना परवानगी नाही.
त्यापुढे बांद्रा, अंधेरी, कुर्ला वगैरे मुंबई उपनगर झाले. तिथे रिक्षा चालते. मी सध्या वाशीला राहतो तिला नवी मुंबई म्हटले जाते. इथेही रिक्षा चालते, टॅक्सी बिलकुल नाही.

बई ही सायन माहीम पर्यंत आहे. तिथे टेक्सी चालते. रिक्षाना परवानगी नाही.>> माहित आहे. पण मुंबईत रीक्षा नाहित असं म्हणणं बरोबर नाहीये.

Pages