गरजच नाही वाटली

Submitted by abhishruti on 8 November, 2023 - 07:19

किती वेड होतं माझं प्रेम
तुझ्याच अवतीभवती बागडायचं
तुझ्या प्रतिसादाची गरजच नाही वाटली

किती भोळं होतं माझं मन
तू नुसता बरोबर असलास तरी खूष असायचं
तुझं मन जाणून घ्यायची गरजच नाही वाटली

किती बेधुंद होती माझी नजर
तू समोर नसलास तरी तुझीच छबी दिसायची
तुला काय दिसलं हे विचारायची गरजच नाही वाटली

किती निरागस होतं जीवन
तुझ्या-माझ्या शिवाय कसला विचारच नव्हता
चिंता, संघर्ष या शब्दांची गरजच नाही वाटली

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users