दिवाळी अंक - २०२३

Submitted by भरत. on 31 October, 2023 - 02:30

यंदाचे दिवाळी अंक प्रकाशित होऊ लागलेत. कुठे काय वाचण्यासारखं वाटतंय , वाचल्यावर कसं वाटलं याची नोंद करूया.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद करेक्ट स्प्रि ट मध्ये घेतल्याबद्दल. कव्हर वर जे बहुतेक सरस्वतीचे चित्र आहे त्यात बरेच क्लूज आहेत. हि ची बोटे काळी पडलेली आहेत. पानाचीच ज्वेलरी आहे सुकलेली, जो सतारव/ तंबोरा वाजवत आहे त्यावरही पाने उगवली आहेत व तीच तिच्या केसात आहेत. साधारण मेड्युसा टाइप लुक येत आहे. डोक्याची काही तरी गडबड आहे. कवटी एलिअन सारखी लांबलचक असून मध्येच दुभंगलेली आहे. डोळ्यावर स्वेलिन्ग आहे. हसू नाही चेहर्‍या वर. सणासुदीला पण हिने लाल काठाची सुती साडी कशी बशी गुंडाळली आहे. डिप्रेस्ड देवता.

आय मीन इशू प्लानिन्ग ची मीटिन्ग अस्ते तेव्हा तुम्ही सेंट्रल थीम ठरवता तेव्हाच ह्या बाबी डिस्कस होउन क्लीअर व्हाव्यात. ( जीवनातले छोटे सुखाचे क्षण/ आनंदाची पखरण/ प्रेमाची शाश्वती ह्या काही थीम्स ) शिवाय सणासुदीचा पारंपारिक मराठी माहौल आहेच. यु कॅन ऑलवेज डिप इन्टु दॅट. असो. लेट्स मुव ऑन टु हंस.

हंस मध्ये: कव्हर व र खिडकीतून( गवाक्षातून!!!) बाहेर बघणार्‍या बाय कांचे चित्र आहे. व एक स्टार ऑफ डेविड चे चित्र भिंतीवर आहे. व दोन भोके!! पण मोस्ट एक्स्पेन्सिव रिअल इस्टेट पक्षी कवरचा मध्य तो रिकामाच आहे. सँड स्टोन कलरचा. तिथेच ते सेंटर अलाइन्ड लिहिता आले असते ७७७ वर्शाची वैभव शाली परंपरा हे खाली उजव्या कोपर्‍यात टाकले आहे.

सगळा वाचून संपला नाही. खूपच वाचायला आहे. प्रवासी बाहुलीच्या पत्रांची कथा छान आहे. ललित लेखांमध्ये वळघण व कळण्याची भाकरी वाचले. वळघण छान लेख आहे. बट यु फील ब्या ड फॉर द पुअर फिश. पण उपाशी माणसे तरी काय करणार. नेहमीचाच संघ र्श. लेख चांगला आहे.

कळण्याची भाकरी ह्यात ल्हिण्या सारखे एक पान आहे पन अडीच पान तेच तेच लिहून भाकरी फुलवली आहे. बेसिकली आईच्या हातची चुलीवरची भाकरी. त्यावर ठेचा व कैरीचे लोणचे. हे लेखकाचे कंफ र्ट फूड. हे सार. चांगला लिहिला आहे. मी देशावरची असल्याने आमचे प्रेम ज्वारीच्या भाकरीवर. व आता बाजरीच्या तीळ लावलेल्या भाकरीचे दिवस जवळच आहेत. वर व्हाइट लोणी.

सुहास बहुल कर ह्यांचा कलाविचार भागातील किंचित पावलेले आणि न पावलेले हा लेख फारच माहिती पूर्ण व छान आहे. कलाकारांची परिस्थिती दर्शवते. नक्की जरुर वाचा. माझा अंक तुम्हाला हवा असल्यास विपू करा. मी स्व खर्चाने पाठवून देइन. विथ लव्ह.

१४७ ते १६९ पानांमध्ये कविता आहेत. ह्यातल्या थोड्या वाचून झाल्यात. एक माउची पिल्ले का उंदराची पिल्ले ह्यावर आहे ती पहिले वाचली.
फार क्युट आहे. पुण्याचे प्रकाशन, शुद्ध मराठी ह्या आपल्या किक्स वर हंस नक्की डिलिव्हर करतो. अधे मध्ये खूप रेखा चित्रे आहेत. ४०० रु. व ३१२ पानांचा अंक आहे. अवास्तव जाहिराती नाहीत. लाइक सम थिन्ग वी नो.

मागे विको टर्मरीक ची जाहिरात आहे. तेच हलदी चंदन. पण आमची पोरे कोरिअन कस्मेटिक्स व स्किन केअर फॉलो करतात. काय करावे. २४ क्यारट सौंदर्य गोरी पान घार्‍या डोळ्याची मुलगी. केस सीजी. तर तरीत काळी सावळी लांब केसाची मराठी मुलगी स्किन केअर करत नाहीका विको वाल्यांनो. प्लीज इट इज २०२३!!!

चार एक वर्षापूर्वी माहेर मेनका यांचे दिवाळी अंक इथे मायबोलीवर कौतुक वाचून घेतलेले .
बदल्यात पातळ कागद , बेसुमार जाहिराती , त्यात लपलेले कंटेंट असा ऐवज मिळाला .
तेव्हापासून कानाला खडा .

अश्विनीमामी , अतिशय योग्य लिहिले आहे तुम्ही .

अमांनी वर्णन केलेले माहेरचे मुखपृष्ठ maher1.jpg मुखपृष्ठावरसुद्धा जाहिराती.
बुकगंगा वरच्या प्रिव्ह्युत नेमके संपादकीय नाही. मुंमग्रंसं मध्ये माहेर , मेनका यांच्या सर्वाधिक प्रती असत. यंदाचे कोष्टक पाहिले नाही. पण अक्षरच्या प्रती दिसल्यावर बरे वाटले. मुक्त शब्दवाले डिस्काउंट देत नाहीत म्हणून तो आमच्या गावातलाच अंक असूनही यांच्याकडे नसतो.
माहेरमध्ये यंदा बरीच वेगळी नावे दिसताहेत. सगळ्यात वाचनीय मजकूर जाहिराती असावा.
अमा, कुळू आणि कुळी ही कथा राजीव तांबेंची आहे. ते अधिकतर लहान मुलांसाठी लिहितात. - <एक कोळी व कोळीणीला माराय ची( स्पायडर!) एक सपोजड विनोदी कथा आहे. > ही तीच का?

काही डिजीटल दिवाळी अन्क ही चान्गले आहेत.
त्यातील एक ऐसी अक्शरे. ह्यावेळी त्यान्ची सन्कल्पना "आफ्रिका खन्ड" आहे.
लेख माहितीपूर्ण आहेत.
https://aisiakshare.com/diwali23_tracker

त्यतील M-Pesa हा एक माझा लेख.

दृष्टी श्रुती हाही एक ए-बुक स्वरूपातील दिवाळी अंक चांगला आहे. मी ह्या वर्षीचे लेख नाही वाचले. पण गेल्या वर्षी चा मंगला गोडबोलेंचा लेख फारच आवडला होता.

त्याची oL लिंक मिळाली नाही. पण माझ्याकडे PDF आहेत.

लोकप्रभा, लोकसत्ता, पुण्यनगरी असे तीन दिवाळी अंक घेतलेत.. अजून वाचून झाले नाहीत .

पुण्यनगरी लहानसा अंक आहे पण लेख छान आहेत.. सुरवातीलाच इस्रायल- पॅलेस्टाइन आणि रशिया- युक्रेन युद्धाचा आढावा घेतलेले लेख आहेत. लोकसत्ताची अनुक्रमाणिका पाहिली.. लेख चांगले असावेत असं वाटतेयं.. वाचेन हळूहळू..!

वाचनालयात दरवर्षी वर्गणी काढून जवळजवळ सगळेच दिवाळी अंक मागवले जात पण वाचक वाचायला नेलेले अंक स्वतःकडेच ठेवून देत मग दोन वर्षापासून वाचनालयाने अंक मागवणे बंद केले.. Book stall वर खरेदी करायला गेले तर Book stall वरचे भाऊ म्हणाले, आम्ही सगळेच आणि जास्त दिवाळी अंक मागवत नाही .. लोकं खरेदीच करत नाही... मग उरलेले अंक आमच्या गळ्यात पडतात.. आम्हांला नसता भुर्दंड पडतो.. हल्ली लोकांची वाचनाची आवड कमी झालंय हे खरं.. !

माझ्या लहानपणी मुंबईवरून दिवाळीच्या सुट्टीत गावी येणारा मामा अगदी चांदोबा पासून ते पोलिस टाइम्स असे बहुतेक सगळेच दिवाळी अंक आणायचा. कितीतरी वर्ष मी ते दिवाळी अंक सांभाळून ठेवले होते.. मामाकडे गेले की, अजून मी माळ्यावर जाऊन झडती घेते.. अंक कुठे असतील तर सापडतील.. माझ्यासाठी मोठा खजिनाच तो ..!

*महाराष्ट्र मंडळ 'म्युनिच'* (जर्मनी) यांच्या २०२३ च्या ' *पालवी* ' या ई- दिवाळी अंकात माझे 'क्रीडा-शब्दकोडे' समाविष्ट झाले आहे.

अंकासाठी लिंक :-
https://mmmunich.com/diwaliAnka/2023/#p=1

Palavee_2023_v1_COVER page.jpgPalavee_2023_v1_ANUK.jpgPalavee_2023_v1_page-0004-CROSS-P1.jpg

. तर ११२ पानावर मृ णा लिनि चितळे ह्यांचा एक संजीव मंगरऊळ कर नावाचा डॉक्टर मित्र क्यान्सरने ६७ वर्शी गेला>>>>> अमा आपुले मरण हा संजीव मंगरुळकरांचाच लेख जरुर वाचा.

नवलमध्ये मायबोलीकर आशीष महाबळ यांची कथा आहे. आजच्या लोकसत्तेत दिवाळी अंकांचे स्वागत या सदरात वाचलं.

धनंजयचं मुखपृष्ठ भारी आहे. मी कथाप्रधान अंक वाचत नाही, त्यामुळे आत काय आहे ते पाहिलं नाही.

तर्मंडळी. आज परत नवलचा अंक नेला डॉ च्या अपॉइन ट मेंटला. तर ह्याबद्दल आधी लिहिलेच आहे थोडे बहुत. एक लोह नगरी/ कला नगरी अशी छान शी फँ टसी कथा आहे. लेखकाची शैली खूप गोड आहे. दुसृया एका कथेत एक सरकारी अधिकारी मरणाच्या आधीच्या शेवटच्या घ टिका मोजत आहे त्यावर कथा आहे. ही मला आवडली . आमचे अहो वारले तेव्हा त्यांनी त्यांच्या दिवंगत काकांना जोरात हाक मारली होती त्या घटनेने मला फार विचित्र वाटत असे म्हणजे माझे किंवा मुलीचे नाव का नाही घेतले असे वाटायचे त्या बाब तचे लेखकाचे एक्स्प्लनेशन छान आहे. एक प्रकारचे व्हॅलिडेशन मिळाले व बरेच वाटले . नवल अंक चांगला आहे.

आज घरी आल्यावर थोडी बहुत आवरा आवर केली व सर्व अंक एकत्र जोडुन ठेवले आहेत वाचायला. मौज चा अंक उत्साहाने घे त्ला ह्याचे १०१ वे वर्श व एकदम हाय क्वालिटी आहे लेखन व चित्र . कव्हर वगैरे. पुढील सर्व माझी वैयक्तिक मते आहेत.

कव्हरचे चित्रः एकदम कॅट्स वॉमिट प्रकारचे आहे. चित्रकार इज नो पिकासो पण ह्याने आत अंकात दोन पानी ह्या चित्राबद्दल लेख लिहिला आहे. कसे अस्वस्थ वाटते अमूर्त आकार डोक्यात फिर त असतात वगैरे. ह्याच लेव्हलचे बराच वेळ व हे चित्र लंडन मध्ये प्रायवेट कलेक्षन मध्ये आहे.
एडिटोरिअल मध्ये एडिटर ताई लिहिते. रंगांबद्दल, आकारांबद्द्ल एक चित्रकार ह्या नात्याने( मग दुसरे कसले नाते असेल?) त्यांनी व्यक्त केलेले चिंतन त्यातले तीव्र संवेदन ( ये क्या है) वाचकांची कला - जा णीव विस्तारित करणारे आहे. ....... मी सिंधी पापड खाल्ला.

जाहिराती कमी आहेत. निर्मला पाटील कोण आहेत त्यांच्या आत्मकथनाची भरपूर ठिकाणी जाहिरात आहे. सर्व अंकातील भाषा जाणीव पूर्वक हायर हायर लेव्हलची आहे. म्हणजे पुस्तकांची जाहिरात सुद्धा अशी पुस्तकाचे नाव सर्जन समीक्षा!! पड द्या वरचे विश्वभा न!!

जे काय अंक वाचले ते वाचून माझी एक धारणा झालेली आहे. हे सर्व साहित्य ज्यांचे सर्व परफेक्ट चालले आहे अश्या कुटुंबांसाठी जनरेट केलेले आहे. कारण एकाकी, रोगी व्यक्तींना ज्या उबदार पणाची नैसर्गिक गरज असते ते फारसे कुठेच भेटत नाही आहे. जेव्हा सर्व मस्त चालले आहे तेव्हा असे भेदक मृत्यू वाले लेख वाचायला छान वाटत असावे. बट सिरीअसली ड्युरिन्ग दिवाली?! २६५ पानाच्या अंकात जे हॅपी लेख आहेत. ते अगदी शेवटी टाकुन दिले आहेत. आनंद भाटेंवरचा छान लेख एकदम लास्ट टू पेजेस. मिसच होउन जाईल पन मी शोधुन ठेवला आता डिटॅल वारी वाचणार आहे.

महेश एलकुंचवार ह्यांची प्रचंड मोठी निरोप ही कथा/ ललित लेख आहे. हा म्हणजे मृत्युवरच आहे. व सापाचे विचित्र चित्र आहे. सापाचीच चित्रे खूप आहेत. लेखकांनी विदेशी लेखक व फिलॉसॉफर्स ची असलेली सर्व जाण ओतली आहे. मग हिटलर जर्मनी ज्यु हे पुरण आहे. ( लेख डेटेड झाला कारण आत्ता घडीला गाझा पट्टीतली बाळे मरत आहेत व लोक फार त्रासात आहेत. ह्यांचे सफरिन्ग व मृत्यु ह्या बद्दल मा. लेखकांना काय वाटत असेल एक पुस्ती जोडायला हवी होती. पण लेख जुलैत तयार होतात. घडो घडी पावलो पावली मरायचाच उपदेश आहे. हा चाळला निव्वळ . आत्महत्त्यांचे पण अनेक उल्लेख आहेत. हा लेख ल्युसिफर ला उद्देशून लिहिला आहे व शेवटी निवेदक मरतो( एकदाचा) पान ७ ते पान २९ !!! साप मरण आत्महत्या!!

वंदना ह्यांचा स्वातंत्र्य पूर्व गायिकांवर लेख आहे. हा माहितीपूर्ण आहे. वाचायला ठेवला आहे.

दोन दिवस देवास मध्ये हा कुलकर्णी ह्यांचा लेख छान आहे. वाचनीय. आपले सर्वांचे लाडके गायक. ह्याच्या नंतर आनंद भाटे वरचा लेख हवा होता खरेतर. पण त्यांना पार जागा दाखवून दिलेली आहे. शुद्ध पुणेरी पणा.

आता धूल नागीण एक परत सर्प कथा व सापाचे चित्र. मला सापांची फार भीती वाट्ते त्यामुळे स्किप स्किप.

आता अस्वस्थ भ्रमंतीची कहाणी. जपानी कवी ची जीवन कथा. पहिल्याच पानात कवीच्या आईने आत्महत्या केलेली आहे. व पुढे तो बेवडा होतो. त्यात मस्त कविता करतो हे आहेच . हा ही एकाकी मरतो. पण वाचनीय आहे जीवन कथा. बरोबर साके असु द्या साने.

एक गोव्यातील मंदिराची कथा.

आता श्रीकंत बोजेवार ह्यांची प्रतिबिंबाची अनंत कोंडी. कथेची सुरवात मध्ये च्युतिआ/ झ्याटभर असे शब्द वापरून लेखक एकदम टॉइन्ग सुरुवात करतो. स्त्री पुरुष लफडी, बाप्यांच्या चड्ड्या असा सेन्स रेबल माल आहे. एक कंचुकी नावाची बाई अजून च वाइट शिव्या देते.
पुढे मेन पात्र कमो ड वर बसून वैश्विक विचार करते. आय गिव्ह अप गाइज. धिस इ ज नॉट अ‍ॅडींग एनी व्हॅलु टु माय इटिल विटिल लाइफ.!!!
एल ओ एल. असे काय ल्हि तात अजून पण.

पुढे चालू. मौजा ही मौजा. रामदास भटकळ ह्यांचा दामोदर धर्मानंद कोसंबींना आठवताना. हा वाचायला बाजूस ठेवला आहे. वीकांताला मासिकातले सर्व लेख वाचून काढ्णार. मध्येच मौज आपल्याच जाहिराती करते. सत्य कथातील कवितांचे दोन खंड आहेत. सानिया ह्यांची
निरंतर वाटेवर ही कांद बरी नवी दिसते. तीन मैत्रीणींच्या गुंता गुंतीच्या आयुष्यांनी , जीवनाच्या अविरत अस्या प्रवासा साठी मांडलेला आत्मभा नाचा जागर आहे ( ऐक्कत नाहीत मौज) पण हे तर मोहोब्बते सिनेबा बद्दलही म्हणता येइल.

खुद्द संपादिका ताईंनी इंद्र धनु श्य नावाची लेस्बिअन लव्ह स्टोरी ल्हिली आहे. ती आता आहे. ह्यात एकी चा रिजॉर्ट आहे. व दुसरी कायकी मॉडेल आहे तिची. हिला स्वतः च्या शरीरातली आवरतने अनुभवुन आई व्हायचे आहे माझ्या अस्तित्वातून मी मलाच उजवणे!

स्त्रीच्या देहाचे निर्मिक देह पण. वेदना अनुभव बाईचा सन्मान. ही एका प्रेम विहीन हेट्रो नॉर्‍मेटिव्ह लग्नात अडकलेली आहे व त्या बाप्याला आता स्ट्रोक झालेला आहे. बेकार रिलेशन शिप . पॅरालिसिस मुळे हे औपचारिक पण एका अंटरातही परावर्तित होत गेले आहे!!( गॉड) दोघींचे आधी संबंध होते व कथेच्या शेवटी ते परत प्रस्था पित होतात. चित्राच्या मानाने कथेतील वर्णने जास्त हॉट काकोडकर स्टाइल आहेत. एक दोन आत्महत्या , एल जी बीटी क्यु वर्णन चळव ळ, न्याय हे मुद्दे. व शेवटी संबंधांचे वर्णन. वेल समवन इज हॅपी. एडिटर ची कथा असल्याने एकदम सेंट्रली लोकेटेड आहे अंकात.

आता अगम्य कविता १२-१५ पाने. ह्या मन लावोन वाचायला हव्या.

आता बाळ फोंडके ह्यांची पाचवे बिस्किट कथा आहे. सॉरी लेख आहे करप्शन वर. मध्यमवर्गियांचा लाडका विषय.

आता परत साप साप इपरीत नावाची नवनाथ गोरे ह्यांची कथा आहे. खेडयातली भा शा. चव बदल म्हणून बरी. नो स्नेक्स प्लीज. इंडिआना जोन्स मोड.

अबाउट एली ह्या सिनेमाबद्दल नंदु मुलमुले ह्यांचा मलमली लेख आहे. वीकेंड री ड .
नीती मेहंदळे ह्यांचा चक्र संप्रदायांच्या गाथा. वॉट्सॅप क्राउडला आवडेल असा छान लेख. पण वाचीन मी. वीकेंड रीड.

कि रण येले ह्यांची सिगरेट ओढणारी मुलगी कथा: एकदम बोल्ड आहे. शेवटाला एक बाई आत्महत्या करते. शॉट्स प्लीज.

आता सुहास भास्कर जोशी ह्यांचा कॅमिल नावाच्या शिल्पी वर लेख आहे. भ्रमाच्या भोवर्‍या त बुडालेली प्रति भावंत
ही फारच सॅ ड जीवन कथा आहे. इट विल पुट यु इन डिप्रेशन नक्की नक्की.

सुरुवात बघा. संध्याकाळची कातरवेळ, आभा ळात काळे कर डे ढग. असुन नसल्या सारखा उजेड सुन्न वाताव रण विचित्र शांतता आसमंतात. मुरत चाललेली थंडी सर्व आले आहे. धारपांची कथा आहे कि काय असे वाट्ते पण रोदँच्या गर्ल्फ्रेंडची जीवन कथा आहे.
क्वाइट डिप्रे सिंग दीज वर्णनाज व हर ऑबसेशन/ मेंटल डिसीज जर्नी. यु फील फॉर हर. पण यु कॅन विकी इट. मायनस द डिप्रेसिन्ग मराठी.

डोके ठिकाणावर ठेवायला मी पुण्य प्रसुन बाजपेयी चा व्हिडीओ लावला आहे.

अक्षर धारा दिवाळी अंकाची जाहिरात. नीना कुळकर्णी नथ घालुन!!! येइच फोटो कव्हर पे डालना था!!

इतिहास सत्यता, संशोधन, वर्त्मान अशी लेख मालि का आहे. वीकेंड रीड. माहिती पूर्ण आहे नक्की.

सुहास बहुलकर ह्यांचा शिवचरीत्र चित्रांकन धुरंधरांच्या कुंचल्यातुन असा चांगला लेख आहे व चित्रांचे प्रिंट पण आहेत. शिवचरित्रातील विषय आहेत. म्हणजे महाराज तानाजी, पंत प्रतिनि धी, शाहि स्ते खानाची बोटे, आग्र्याला आगमन, राज्या भिषेक. प्रिंट छान आहेत. मी ती कापुन पुठ्ठावर चिकटवून कोलाज बनव णार आहे. आधी लगीन कोंडाण्याचे मग रायबाचे ह्या प्रसंगाचे चित्र आहे. त्यात सर्व फार गोड दिसतात. जिजाउ मा व शिव राय छत्रपती पण. त्यांना नुसते बघुन पण मोटिव्हेशन मिळते. राज्या भिषेकाचे चित्र दोन पाने मिळून आहे. हे पुलाउट करता आले असते सिंगल पेपर वर प्रिंट करुन.

आता अंतीम भागात अरे ला कारे नावाचा एक चांगला लेख, रंग प्रत्यय, विल्यम हेन्री स्लीमन ची ओळख. कानळ राई नावाची कोकण पार्श्वभूमीची कथा आहे. परत निर्मला पाटील आत्मकथन जाहिरात. मग एकदम चे गव्हेरा वर लेख. !!! व एंडिन्ग ला आनंद भाटें वर लेख.
संपला अंक.

डॉ. नी या पोस्टी पाहिल्या तर अंक काढून घेतील आणि स्वतः च वाचत बसतील आत.

अंकांची सर्जरी छान होत आहे. म्हणजे तसा एक वेगळा धागाच वर्षभर हसवत ठेवेल. (मरणाच्या कथा असूनही. बाकी कुणी जात आहे म्हणून जागा रिकाम्या होतात आणि आठवणींचा खजिना वाढतो पुढच्या अंकासाठी.)
--------------
यावर्षी दिवाळी अंकांची वर्गणी मी भरली नाही. कारण इतर खूप डिजिटल वाचन बाकी आहे. स्पीड बराच आहे पण अमिताब घोष साहेब फारच रंगवून पुस्तके लिहितात व्यक्तीवैशिष्ट्ये (idiosyncrasies) आणि सत्यता धरून मोठी पुस्तके(१७).

दिवाळीतल्या चकल्या संपणे ही फार वाईट गोष्ट झाली. दिवाळी संपून आठ दिवस झाले तरी फटाके का वाजताहेत सकाळी यांचा उलगडा झाला. उत्तर प्रदेशीय वस्तीत १८ ते २१ छठ पुजा साजरी होत होती. सर्वे सुखीन: संतू का काय म्हणतात ना.

या वर्षी आमच्याकडे मोती साबण आणला नव्हता. गोटी साबणांवर भागवले. उकाडा फारच वाढत असल्याने बाथरुमात फॅन लावला आहे. उलटा एक्झॉस्ट. गारवा महत्त्वाचा. वास सुगंध नाही.

एकंदरीतच दिवाळी अंक फारसे छान नाहीत यंदा.. पुनवा ची आजीव सभासद आहे मी तर तिथे दिवाळी अंकाची मेंबरशिप घेते दर वर्षी. नवल हंस असे वाचुन झालेत. चंद्रकांत अन धनंजय साठी नंबर लाऊन ठेवलाय

महाराष्ट्र मंडळ वाचनालयातून मौज आणि दीपावली असे दोन अंक आणलेत. दीपावली वाचायला सुरुवात केली आहे.
गणेश मतकरींची कथा मस्त आहे. शेवटचा धक्का आवडला. पण त्याही नंतरचा शेवट जरा वेगळा चालला असता असं वाटलं. पण एकंदरीत मस्त कथा आहे.
मिलिंद बोकिलांची कथा पॉर्न फिल्मबद्दल आहे. शेवट तसा अपेक्षित आहे.
असीम चाफळकरांची विज्ञानकथा ठीक आहे. मला अशा प्रकारच्या विज्ञानकथा आवडत नाहीत हेही आहे. ज्यांना आवडतात त्यांना आवडेल बहुतेक.
किरण क्षीरसागरांची विनोदी कथा भन्नाट आहे. मला मायबोलीवरच्या जव्हेरगंज यांच्या शैलीची आठवण झाली! ते हल्ली दिसत नाहीत इकडे.
अंबरीश मिश्र यांचा जे.आर.डीं.च्या पत्रांबद्दलचा लेख छान आहे.
बाकी अजून व्हायचं आहे वाचून. पण एकंदरीत अंक आवडलाय!

'कोकण मीडिया' या रत्नागिरी येथून प्रकाशित होणाऱ्या दिवाळी अंकात माझे 'कोकणा'वरील शब्दकोडे समाविष्ट झाले आहे.

अंकासाठी संपर्क :
श्री प्रमोद कोनकर,
kokanmedia@kokanmedia.in
9422382621
KM FRONT PAGE.jpgKM ANUKRAM-mark.jpgKM CROSS.jpg

महाड येथून प्रकाशित होणाऱ्या शब्दसंवाद दिवाळी अंकात क्रिकेटपटू 'खंडू रांगणेकर' यांच्यावरील 'अष्टपैलू' हा माझा लेख व भारतरत्न, लाडका क्रिकेटपटू 'सचिन तेंडुलकर' यांच्यावरील "शब्दकोडे" प्रसिद्ध झाले आहे .
SS-ANUK-MARK.pngSS-SACHIN-CROSS-MARK.pngSS-KHANDU-P1-MARK.png

ऐसी अक्षरे मधली नीलची कथा 'बॉम्ब देम' ही कथा वाचली. भन्नाट कल्पना, चमकदार वाक्यं.
कथेचा दुवा -
https://aisiakshare.com/node/8886

तुम्हाला आवडल्यास मला दुवा द्यायला विसरू नका Lol

<< त्यतील " टिम्बक टू " वरील लेख ही छान आहे.
https://aisiakshare.com/node/8878
नवीन Submitted by छन्दिफन्दि >>
हायला !! मलासुद्धा हे काल्पनिक शहर वाटलं होतं.
उत्तम माहितीपूर्ण लेख आहे

Pages