प्रतिबिंब

Submitted by अभिषेक_ on 28 July, 2023 - 12:20

डोळ्यात तुझिया दिसले आज
माझेच प्रतिबिंब मला,
परी न दिसला भवती एकही
प्रेमाचा तरंग मला..

प्रतिबिंब ही कसे म्हणावे?
हे तर केवळ रेखाटन!
आकृत्यांची रटाळ जुळवण
नाही कुठली रंगकला..

रेघाही सोडून संहती
झाल्यात पुसट जराश्या,
तुझ्या रंगांनी कधी श्रीमंत
वाटे आज भणंग मला..

बरं हार मानुनी; खंबीर मनाची
घ्यावी थोडी सोबत तर;
तोही बापुडा, आठवांत तुझ्या,
दिसे आज दंग मला!

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हरचंद पालव धन्यवाद!

संहती हा तसा मला विज्ञानातून माहित झालेला शब्द आहे. एखाद्या गोष्टीचा दाटपणा किंवा तो एखाद्या ठिकाणी किती प्रमाणात एकवटला आहे हे मोजण्याचे प्रमाण म्हणजे संहती. इंग्रजीत ज्याला आपण ‘Concentration’ म्हणतो तेच हे.