विरोधी पक्षांचे कडबोळे भाजप ला पर्याय ठरू शकते का ?

Submitted by फुरोगामी on 17 July, 2023 - 09:10

२३ जून ला पाटण्यात भाजप विरोधी पक्षांनी बैठक बोलावली होती , त्या बैठकी ला काँग्रेस ,स पा , जे डी एस , टी एम सी ,राष्ट्रवादी , उ बा ठा शिवसेना आणि आप सहित छोट्या मोठया पक्षांचे प्रमुख नेते हजर होते .
२०२४ च्या लोकसभा निवडणुकीतील विरोधी पक्षांचा भावी पंतप्रधानपदाचा चेहरा गुलदस्त्यात ठेवून भाजप ला सत्तेतून खाली कसे खेचायचे यावर चर्चा झाली , तर आप च्या केजरीवाल ने मात्र अध्यादेश विरोधात बैठकीतील पक्षांनी निषेधाचा ठराव पास करावा अपेक्षा ठेवली होती .
पण दिल्लीच्या सत्तेतून केजरीवाल ने बाहेर काढल्याचा राग प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेस अजून विसरली नसल्यामुळे त्यांनी केजरीवाल ला इग्नोर केले त्यामुळे आप आणि काँग्रेस मधील कलगीतुरा अजून मिटलेला नसल्याचे दिसून आले .
त्या नंतर पश्चिम बंगाल मध्ये नेहमीप्रमाणे पंचायत समितीच्या निवडणूका हिंसग्रास्त वातावरणात पार पडल्या .
कोलकत्ता हायकोर्टाने बॅनर्जी सरकारला केंद्र सरकार कडून सी आर पी एफ च्या तुकड्या पुरेशा प्रमाणात बोलाऊन घेवून निवडणुका पार पाडायला सांगितल्या होत्या.
पण ममता ने हलगर्जीपणा दाखवल्या मुळे वेळेवर तुकड्या मतदान केंद्रात पोहोचल्या नाहीत .
परिणामी टी एम सी व्यतिरिक्त इतर पक्षांचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात बळी पडले , त्यामुळे ममता चा निषेध करण्यासाठी बंगाल काँग्रेसच्या सर्वात मोठ्या नेत्याला म्हणजे अधीरांजन चौधरी ला आंदोलन करावे लागले .
विरोधी पक्षांच्या एकजुटीला तडा जाऊ नये म्हणून पश्चिम बंगाल मधील या हिंसाचार युक्त निवडणुका बद्दल राष्ट्रीय काँग्रेसच्या महामहीम गांधी कुटुंबाने मौन राखणे पसंद केले हे विशेष .
अशा प्रकारच्या तडजोडी करून एकट्या भाजप विरोधात तब्बल २४ विरोधी पक्ष आज १७ जुलै ला बँगलोर मध्ये पुन्हा एकत्र येत आहेत , त्यातील ७ पक्षांचे प्रत्येकी एकच खासदार आहेत , तर चार पक्षांचा यापूर्वी एकही खासदार निवडून आलेला नाही.
एकंदरीत विरोधी पक्षांनी पुन्हा एकदा भाजप विरोधात वज्रमूठ उगारली आहे , यशस्वी होतील की नाही हे काळच सांगेल ......

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

< टी एम सी व्यतिरिक्त इतर पक्षांचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात बळी पडले >
Among those killed were seven workers of the ruling Trinamool Congress, two from the CPI(M), one each from the BJP and Congress, and one person with no political affiliations, - इंडियन एक्स्प्रेसची बातमी.

तृणमूल खासदार डेरेक ओब्रायन यांनी भाजप नेता सुवेंदु अधिकारीच्या वक्तव्याची क्लिप ट्वीट केली आहे. - घटनेचं ३५५ कलम लागू करावं लागेल असं वातावरण निर्माण करावं लागेल.

भाजपने २०१४ प्रमाणे लहान मोठ्या पक्षांची मोट बांधायला सुरुवात केली आहे. महाराष्ट्रात शिवसेना शिंदे आणि राकॉ - अजित पवार शी युती केली आहे. नितीशकुमार विरोधात वापरून ज्याचा पक्ष फोडला आणि त्याला झुरळासारखं उचलून फेकलं होतं त्या चिराग पासवानशी बोलणी सुरू केली.
उत्तर प्रदेशात ओम प्रकाश राजभर यांचा पक्ष पुन्हा एन डी ए मध्ये आला आहे. डॉन मुख्तार अन्सारीचा मुलगा या पक्षाचा आमदार आहे.

वाजपेयींनी बनवलं होतं ते कडबोळ नसावं. आता भाजप गुल दाखवून मुंगळे गोळा करत आहे ते पण गम्मत म्हणून असेल.

बहुमत असताना सबका साथ सबका विकास करायचाय म्हणून बाकीच्यांना बरोबर घेतलंय , पण १०० वर्ष जुनी काँग्रेस मजबुरी मूळे बाकीच्यांना बरोबर घेतेय !
बर राज्यांतील निवडणुकात ते सगळे पक्ष एकमेकांविरोधात लढतात आणि लोकसभेसाठी मात्र गळ्यात गळे घालून , हे जनतेला कळत नसेल का ?

भाजपचा घराणेशाहीला तीव्र विरोध आहे ना?
चिराग पासवान , अजित पवार, ज्यांना जाळ्यात ओढायचे प्रयत्न चाललेत ते जयंत चौधरी हे तळागाळातून आलेले नेते आहेत ना?

वरच्या लेखातलं एकट्या भाजप बोल्ड केलंय ते काढा. footinmouth.png
तुमचं नेहमीच असं होतं बघा.
आणि भाजपने तीन पक्षांची मोट बांधली तर तो त्रिशूल आणि इतरांनी केलं तर ती रिक्षा यातला दुटप्पीपणा जनतेला कळत नसेल का?

गांधी घराण्याने स्वतःचे अस्तित्व टिकवण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात घराणी निर्माण केली होती ,आणि प्रत्येक निवडणुकीत त्यांनाच उमेदवारी देवून ती घरणी कित्तेक दशके पोसली हे चालत होते का ?
सुपर ३० मूव्ही मधील डायलॉग प्रमाणे राजा का बेटा ही राजा बनेगा !

आजोबा, घराणेशाहीला आक्षेप तुमचा आहे. तुमचे नेते रात्रंदिवस घराणेशाहीच्या नावे बोंबलतात. त्यामुळे चालतं का हा प्रश्न तुम्हांला आहे.
भाजपच्या घराणेशाहीची करायला घेऊया का?

आजी बाई , गांधी घराण्याला तुमचे समर्थन आहे तर पासवान ,पवार , चौधरी ला विरोध का ?
घेतला ना स्वतःचाच पाय तोंडात Happy

धागा लेखक उत्तर द्यायला बांधील नसतो आणि त्याला प्रश्न विचारायचे नसतात
आणी भरपूर विषय आहेत हो !
आता मी पण हेमंत सारखी धाग्यांची टांकसाळ उघडणार आहे Happy

Tmc चे सगळ्यात जास्त लोक मेले आहेत. तरी tmc व्यतिरिक्त इतर पक्षांचे लोक बळी पडले असे लिहिले.

अगदी बेसिक माहिती नाही तरी धागे काढायचे.

<धागा लेखक उत्तर द्यायला बांधील नसतो आणि त्याला प्रश्न विचारायचे नसतात> Rofl तुम्ही तर मायबोलीवरचा मोदी निघालात!
आँ? अशाने धागाकर्त्याबद्दल वाचकांचं काय मत बनेल बरं?

<आता मी पण हेमंत सारखी धाग्यांची टांकसाळ उघडणार आहे> ते करायलाच लागेल. कारण जो धागा उघडाल त्यावर तुम्ही अडचणीत येणार आणि तुम्हांला पळ काढावा लागेल. Lol

अहो विकृत, मी कुठे पासवान, चौधरी यांना विरोध केला? तुम्ही कळून न कळत असल्यासारखे दाखवले तरी जनतेला कळते.
आपण पायरीपायरीने जाऊ.

१ घराणेशाहीला विरोध भाजपचा आहे
२. तरीसुद्धा भाजप घराणेशाही गाभा असलेल्या पक्षांशी युती का करतो?

आता सांगा. तुमचे नेते घराणेशाही वाईट असं म्हणायचं थांबवणार आहेत का?

अहो विकृत, मी कुठे पासवान, चौधरी यांना विरोध केला? तुम्ही कळून न कळत असल्यासारखे दाखवले तरी जनतेला कळते.
आपण पायरीपायरीने जाऊ.>>>>>
पायरी ने पायरी
स्वतःची लायकी दाखवताय का भुरटे साहेब ?

Bjp ला विरोध करणारे नालायक आहेत.
Bjp मला तरी खूप आवडते
त्यांचे सरळ साधे सोप असते .त्यांची निती पण सरळ , साधी,सोपी,.
त्यांची विचारधारा पण साधी सरळ सोपी.
त्यांचे कार्यकर्ते पण ढोंगी बुध्दीमान नाहीत.
त्यांना दीन च गोष्टी कळतात.
11),देशात दोन च पक्ष आहेत एक bjp जो राष्ट्रवादी p, देशप्रेमी पक्ष आहे.
आणि दुसरे विरोधी ते देशद्रोही ,जातीय वादी, आहेत.
२)bjp इतकी देशप्रेमी आहे की त्यांच्यावर प्रस्थापित मीडिया पण फिदा आहे.
प्रेमाने bjp नी त्यांना आपलेसे केले आहे.
देशाची प्रतिमा जगात उंचावली पाहिजे हेच त्यांचे पहिले आणि अंतिम ध्येय आहे.
देशातील महागाई,गरिबी,लुटमार,रस्त्यांची अवस्था, भुकमरी, शिक्षणाचा बाजार,बेरोजगारी, शेतकऱ्यांची बिकट स्थिती .
ह्या मधील काही म्हणजे काहीच ते जगा समोर आणत नाहीत.
नाही तर काँग्रेस च्या राज्यात मीडिया मनमानी पना करत होती
गरिबी,महागाई ,बेरोजगारी सर्व रोज दाखवून देशाची प्रतिमा मलिन करत होते.
देशाची अवस्था कशी ही असू सर्व कसं टॉप चालेल आहे हेच प्रसिद्ध झले पाहिजे.
हे bjp च धोरण मला लय आवडते.
३) त्यांचे कार्यकर्ते पण बिचारे साधे आणि सरळ आहेत मुस्लिम आणि बाकी सर्व धर्मीय देशद्रोही,सर्व विरोधी राजकीय पक्ष देश द्रोही बस इतकेच त्यांना कळत .
त्यांचे
लॉजिक खतम
.अजून २०० पट देशातील समस्या वाढू ध्या त्या देश हिताच्याच आहेत.
ह्या वर त्यांचा पक्का विश्वास आहे.
नाहीतर काँग्रेस चे कार्यकर्ते.
बघा व तेव्हा रडत असतात.
४) ज्या राज्यात bjp आहे ती राज्य म्हणजे दुसरे रामराज्य च .
आणि ज्या राज्यात bjp नाहीं..ती सर्व राज्य म्हणजे पाकिस्तान च हिस्सा .
पहिले काश्मीर वर च पाकिस्तान दावा ठोकत होता .
आता च bjp चे विचार ऐकले तर तो खूप खुश होईल

Tmc चे सगळ्यात जास्त लोक मेले आहेत. तरी tmc व्यतिरिक्त इतर पक्षांचे लोक बळी पडले असे लिहिले >>>>
फरक काय पडतो ?
शासन पुरस्कृत हिंसाचार करायची सवय फ्रस्ट्रेटेड ममता असल्याचे यापूर्वीही सिद्ध झाले आहे .
आणि टी एम सी चे कार्यकर्ते जास्त बळी पडलेत तर तुमचा अधीररंजन चौधरी टी एम सी कार्यकर्त्यांचा दुखवटा साजरा करायला गेला होता का ?

https://www.thelallantop.com/lallankhas/post/west-bengal-panchayat-elect...
लल्लन टॉप ने निष्पक्षता राखून frustrated ममता ची व्यवस्थित पोलखोल केली आहे .

Our 38 partners have confirmed attending the NDA meeting to be held tomorrow, says BJP National President JP Nadda.

नड्डाजी फुरोगामीजींना ट्रोल करताहेत

Rofl

माना की मुश्किल है सफर पर सून o मुसाफिर
कही अगर तू रुका तो मंजिल आयेगी ना फिर
बंदरा के बंदरा बंदरा के बंदरा राहो पे चल बंद्रा

What's ॲप वर हेच सांगितले आहे जे पुरोगामी सांगत आहेत.
एकट्या bjp ला हरवण्यासाठी सर्व देशद्रोही पक्ष एक झाले आहेत.
Wahasapp वरचे ज्ञान हेच सर्वोत्तम ज्ञान .
आकाशवाणी च म्हणा ना.

कडबोळे एकवेळ सत्ता आणू शकेल पण ती टिकवायला त्यांना कधीच जमत नाही कारण सत्तेत आल्यावर प्रत्येकाची महत्वाकांक्षा जागी होते
आणि मग सरकारची सगळी उर्जा कडबोळ्याचे लाड पुरवण्यात जाते.

हे वरचे उदाहरण म्हणजे कडबोळे नक्कीच नाहीये..... ते बाकीचे पक्ष म्हणजे भाजपाच्या चकलीवर आलेले काटे आहेत जे चकलीची लज्जत वाढवतात..... ते नसले तरी चवीत फारसा बदल होणार नाही किंवा चकली मोडून पडणार नाही Happy

विरोधी पक्षात सध्या इतका विरोधाभास आहे की "मोदीविरोध" याच्याशिवाय त्यांच्यात बाकी काहीच समान नाही म्हणून हे कडबोळे जमून यायची शक्यता कमीच दिसतेय Happy

मोदी खेळणे आहेत है सर्वांस माहीत आहे.
विरोध मोदी ना नाही bjp च्या नीती ला आहे.
मोदी ना टारगेट करण्यासारखे त्यांच्या कडे काही नाही.
एक निर्णय rass virudh किंवा एक वाक्य मोदी नी आरएसएस विरुद्ध बोलून दाखवावे.
एका तासात हकालपट्टी करतील.
दहा वर्षापूर्वी bjp ची अवस्था काय होती ते लोक विसरली नाहीत.
अटल बिहारी सरकार एका मता ने पडले होते.
अटल बिहारी सरकार मध्ये जे आता विरोधी आहेत ते पक्ष पण होते आणि त्यांचे लाड अटल बिहारी ना पूर्ण करावेच लागत होते..
मातोश्री वर डोक टेकवयला bjp चे मोठमोठे नेते येत होते.
दिवस फिरले की घराचे वासे पण फिरतात.
BJP virudh आघाडी ला चांगल्या जागा मिळाल्या तर bjp मधलेच आघडी ला येवून मिळतील.
काँग्रेस ल आघाडी सरकार चालवण्याचा चांगला अनुभव आहे.

बाबरी मशीद मुळे bjp ला सत्ता मिळाली आहे.
अडवाणी ह्यांची कृपा आहे.
पण त्यांना पंतप्रधान पद मिळाले नाही.
कारण ते आरएसएस चे सर्व च ऐकणार नाहीत..हुशार,माणूस आहे .
म्हणून त्यांना बाजूला केले .
आणि मोदी आणले .

<त्यातील ७ पक्षांचे प्रत्येकी एकच खासदार आहेत , तर चार पक्षांचा यापूर्वी एकही खासदार निवडून आलेला नाही>
फुरोगामीजी , भाजपच्या सहयोगी ३८ पक्षांपैकी कोणाचे किती खासदार आहेत ते लिहा ना!

मनावर दगड ठेवून शिंदेंना मुख्यमंत्री केलं. आता अजित पवारांसारखा काटा गपचूप गिळावा लागतोय. पुढे जाऊन कुठे तरी टोचेलच तो.

बाबरी मशीद मुळे bjp ला सत्ता मिळाली आहे.
अडवाणी ह्यांची कृपा आहे.
पण त्यांना पंतप्रधान पद मिळाले नाही.
कारण ते आरएसएस चे सर्व च ऐकणार नाहीत..हुशार,माणूस आहे .
म्हणून त्यांना बाजूला केले .
आणि मोदी आणले .>>>>>>>>>>>
भाजप आणि आर एस एस ला मोठे करण्यात भारतातील शांती समुदाय बाबत बोटचेपे धोरण स्वीकारणाऱ्या काँग्रेसचा देखील हात आहे, त्यांनी बाबरी स्वतःहून हिंदूंना सोपवून मोगलांनी केलेल्या चुका दुरुस्त केल्या असत्या तर दोन्ही धर्मांतील आदर नक्कीच वाढला असता .
हे पुरातत्व विभागातील माजी अधिकारी के के मोहम्मद यांचे मत आहे . आणि हे थोडेफार शिकलेल्या व्यक्तीला देखील कळते .
उलट बाबरी पाडली गेली म्हणून देशभरात दंगे घडवून आणले गेले आणि त्याला काँग्रेस चे मुक समर्थन होते .
म्हणूनच मोठ्या प्रमाणात हिंदू भाजपकडे ओढला गेला .
काँग्रेस ने नेहमी लिब्रांडू प्रमाणे ढोंगी धर्मनिरपेक्षतेची झालर पांघरून शंतिवाद्याना गोंजरल्याचा काळाकुट्ट इतिहास आहे

Pages