आता मतदारांनीच प्रत्येक उमेदवाराकडुन प्रतिज्ञापत्र लिहुन घ्यावे

Submitted by ashokkabade67@g... on 17 July, 2023 - 07:21

आता महाराष्ट्राच्या राजकीय दलदलीत नैतिकतेचा बळी गेला असुन आमदार खासदारांची स्वस्वार्थासाठी पक्षाचा व मतदारांचा विश्वासघात करण्याची प्रव्रुत्ती वाढत आहे आणि यात अनेक पक्षच पळवण्याची व संपवण्याची सत्ताधारी पक्षाची मनिषा उघडपणे दिसून येत आहे लोकशाहीत विरोधी पक्षाचे महत्व अन्यन्य साधारण असते पक्ष फुटतात आमदार खासदार पक्षांतर करतात पण मतदारांचे काय?तो तर कधीच फुटत नसतो प्रत्येक पक्षाच्या विचारसरणीचा मतदारांचा एक गट असतो पक्षांतर करणारे आमदार ,खासदार फक्त त्या पक्षालाच नाही तर त्या पक्षाच्या मतदारांनाही धोका देत विश्वासघात करत असतो आणि आज तेच घडत आहे पक्षांतर विरोधी कायद्यात असलेल्या पळवाटांमुळे हे सहज शक्य झाल आहे.
पण आता याला कायद्यानेच जनतेन पायबंध घालणे आवश्यक झाले आहे कुठल्याही निवडणुकीत कुठल्याही पक्षातर्फे उमेदवारी करणाऱ्या उमेदवारांकडून महाराष्ट्रातील प्रत्येक मतदारासंघातील कमितकमी शंभर मतदारांनी शंभर रुपयांच्या स्टँम्प पेपरवरमी निवडून आल्यानंतर पक्षांतर करणार नाही व केल्यास आधि पदाचा राजीनामा देईन तसे न केल्यास मजवर विश्वासघात व फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल करावा व मला न्यायालयाने च अपात्र घोषित करावे असा वचननामा लिहुन घ्यावा याकामी अनेक सामाजिक संघटनांनी पुढच्या येण्याची गरज आहे तरच महाराष्ट्रातील ही राजकीय दलदल संपेल .

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

आणि मतदारांनी निवडून आल्या नंतर भाजप मध्येच जाईन असे प्रतिज्ञापत्र उमेदवार कडून लिहून घ्यावे , म्हणजे लोकशाही टिकून राहील Happy

पक्षात नवीन आलेल्या माणसाला पुढची पाच वर्षे कुठलेही पद, कुठलीही उमेदवारी मिळणार नाही असा एक सर्वपक्षीय ठराव करावा आणि निवडून आल्यावर पक्ष बदलला तर पदाचा राजिनामा घेऊन पुढची दहा वर्षे कुठलीही निवडणूक लढवण्यावर बंदी घालावी Happy