शींदें मुख्यमंत्रीपदी रहाणार की जाणार?

Submitted by ashokkabade67@g... on 12 July, 2023 - 08:37

संघाला पराजयाचा गंध खुप आधीच येतो व संघ कामाला लागतो भाजपला अपेक्षित यश मिळेलच पुर्वी सारखा मोदींचा करिश्मा मते मिळवून देईलच याची शाश्वती आता संघाच्या थिंकटँकला वाटत नसल्याने संघ कार्यरत झाला आहे एकुण देशातील जनतेत असलेला असंतोष पहाता भाजपला शंभर जागांवर फटका बसु शकतो मग ही हानी भरुन काढण्यासाठी विरोधी पक्षांची लचके तोडुन कमळ फुलवण्याचा प्रयत्न सुरु झाला पण कमळ फुलण्याआधीच महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखलच झाला पण तो ईतका झाला की त्याची दलदल झाली आणि भाजप त्या गाळात आता गळ्या पावेतोबुडायला लागली आहे.
खरतर शिवसेना फोडून शिंदेमुख्यमंत्री झाल्यानंतर आलेल सरकार बहुमतात असल्याने पडण्याची भिती नसतांनाही भाजपने अजित पवारांना सोबतघेण्याची काही गरज होती असेही नाही पण शिंदे मत मिळवून देऊ शकत नाही हे भाजपच्या लक्षात आल्याने ईतरत्र झालेल्या पराभवाची भर महाराष्ट्रात काढण्यासाठी महाराष्ट्रातील तेवढाच मोठा नेता सोबत असणे भाजपला गरजेचे वाटल्याने आजित दिदांची सरकारमधे एंन्ट्री झाली पण गोची मात्र शींदे गटाची झाली आहे व नाराजी वाढली आहे त्यातच अपात्रतेची टांगती तलवार शिंदे गटावर आहेच बरे आजितदादाही फक्त उपमुख्यमंत्री पदावर खुष रहातील असेही नाही ते मुख्यमंत्री पदासाठी च सोबत आले आहेत आताच खाते वाटपावरुन सरकारमधे वादावादी सुरु आहे अर्थखाते अजित पवारांना देण्यास शींदे सेनेतील एका गटाचा प्रबळ विरोध आहे अजित पवारही मुख्यमंत्री पदाचा शब्द घेतल्यानंतर च भाजप सोबत गेले हेहु सत्य आहे अस असतांना शिंदेचे मुख्यमंत्री पद रहाणार की जाणार हाच आता प्रश्न आहे .

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

जाणार. कधी हाच प्रश्न आहे. मी हपिसातोन बाहेर आल्यावर मला जोन्सन साइड ला जायचे असते. व सर्व ठाण्याचे रिक्षे वाले उगीच स्पीड कमी करुन चेक करतात कुठे जाय चे ते व सांगितल्यावर लगेच निघून जातात. त्यामुळे मला सात्विक संताप आहे. ५० खोके मिळालेत ना आता बसा गप्प.

राजेहो तुमी खर असा की खोट पर पुनेकर हायना तवा तुमाले सांगायले हरकत नाय आमी त खेड्यातल येड पर घ्या ग्वाड मानून नायत तसभी पुनेकर म्हनल की त्यायले समदच उन दिसतय.

आता राहिले किती महिने .
संपत आली की मुदत.

आता फक्त एकच बघायचा सत्तेत आता आणि पुढे हिस्सा मिळवण्यासाठी ह्यांच्या मध्ये कुरबुरी कधी चालू होतात ते.

त्यांच्या मालकांचे होते न चीत्ते.
मेले बिचारे उपास मारी नी.

इथे मालकाचे पोट भरतं नाहीत तिथे चीत्याना जेवण कसे मिळणार

रागाच्या एका श्र्वानाचे नाव पिद्दी होते , आणि रागा पक्षाच्या नेत्यांशी ध्येयधोरण बाबत
चर्चा करण्या ऐवजी पिद्दि ला बिस्किटे चारण्यात धन्यता मानत असे .
असं गुलाम आझाद आणि आसाम च्या सरमा ने interview मध्ये सांगितले होते , आता ते दोघेही खांग्रेस बाहेर आहेत .
बाकीचे मात्र अजूनही बिस्किटे खाण्यात मग्न आहेत.

2024 निवडणुकांच्या आधी वर्चुअल मायबोली सुरू होणार आहे तिथे तुम्ही तुमचा एक अवतार बनवायचा. निकालाच्या आधी सगळ्यांनी दोन गटांपैकी एका गटात सामील व्हायचं आणि गणपती स्पर्धा होतात तशा निकाल स्पर्धा खालीलप्रमाणे
1. एकमेकांवर तुफान दगडफेक - यामध्ये एकमेकांवर दगडफेक करणे अपेक्षित आहे. पुढे जाऊन दगडफेक करायची आणि दगड फेकल्या फेकल्या समोरच्याने मारलेली दगड आपल्याला लागू नये म्हणून पळत पळत पाठीमागे यायचं.
2. ट्युब काठ्या हाणामारी- यामध्ये काठ्या ट्युबा एकमेकांना मारणे अपेक्षित आहे. जो गट ट्यूबा आणि काठ्यांचा मार खात, पाठीला हाताने वाचवत पळत सुटला तो हारला
3. शाब्दिक चकमक
4. गुलाल उडवून नागीण डान्स
अजून तुम्हाला काय add करायचं असेल तर करा

<<<चित्ते मेले हे वाईट झालं पण. अक्षय कुमार पिक्चर काढणार होता म्हणे.>>>
याचाच अर्थ शींदे जाणार असा होतो असे मला वाटते. पण या सांकेतिक भाषेबद्दल मला जास्त माहिती नाही. तज्ञांनी खुलासा कारावा!

शिंद्यांची छत्री दिल्लीला बांधण्याचे घाटत आहे. त्या साठी जागेची पाहणी करण्यासाठी पवार आणि पटेल दिल्लीला गेले आहेत.

एक मात्र नक्की अख्ख्या देशात राजकारणातील इतकी चिखल फेक झाली नसेल जी महाराष्ट्रात झाली आहे .
फक्त शिंदे गटच भाजप बरोबर सत्तेत सहभागी करून घ्यायचा होता आणि अजित गट चा सरकारला बाहेरून पाठिंबा घ्यायचा होता .
अजित गट ला देखील सत्तेत घेवून मंत्रिपदे देण्यामुळे शिंदे गट आणि भाजप चे आमदार देखील नाराज होणार .
या गोंधळामुळे पुढील विधानसभा निवडणुकीत जनता भाजपच्या विरोधात जाण्याची शक्यता वाटते .
म्हणून तमाम मायबोलीकरांनी या कठीण समयी भाजपच्या मागे खंबीर उभे राहायला हवे

माय बोली कर bjp चे चाहते च आहेत रोज त्यांचे गुणगान गात असतो.
पुरोगामी काळजी नसावी.
जेवण सोडू नका नाहीतर टेंशन मध्ये जेवण गोड लागत नसेल च

त्या साठी जागेची पाहणी करण्यासाठी पवार आणि पटेल दिल्लीला गेले आहेत.

सूक्ष्म उद्योग खाते खाली करणार असतील त्यांची छत्री उपटून टाकतील असे वाटत

भाजप वर टीका करून करून गेली सात आठ वर्ष बऱ्याच लोकांची पोट भरल्यात , म्हणून म्हणतोय आता भाजपला समर्थन द्या .

या गोंधळामुळे पुढील विधानसभा निवडणुकीत जनता भाजपच्या विरोधात जाण्याची शक्यता वाटते .
म्हणून तमाम मायबोलीकरांनी या कठीण समयी भाजपच्या मागे खंबीर उभे राहायला हवे
>>>> Lol Lol

राज्याच्या भल्या साठी,हिंदुत्व साठी.तत्व साठी bjp मध्ये आपले महान नेते जातात
खूप देशप्रेमी लोक आहेत ती नेते मंडळी
आणि bjp च एकमेव राष्ट्रवादी,देशप्रेमी पक्ष आहे.

.पण बंगाली लोकांना देशप्रेम च नाही.तिथे स्थानिक स्वराज्य संस्था न च्या निवडणुकीत पण देशप्रेमी पक्षाचा सुपडा पार साफ केला त्यांनी.

महाराष्ट्र मधील पण देशद्रोही जनता स्वयं घोषित देशप्रेमी पक्षाला आसमान दाखवणार अशी चिन्हं आहेत.

देशाविषयी कोणाला प्रेम च नाही

आप आपल्या पक्षाचा कसा प्रचार करणार.
शरद पवार आणि उद्धव ठाकरे ना शिव्या देवून.

महाराष्ट्रात तर नेते फक्त एकमेकांना शिव्या देण्यात च व्यस्त आहेत.
शरद पवार सोडले तर.
राज्यांच्या समस्या विषयी कोणी बोलत नाही

आजचा ऐरणीवरचा प्रश्न मंत्रीमंडल विस्तार हा आहे कारण सोमवार पासून पाव साळी अधिवेशन सुरू होत आहे.? सर्व आमदारांना मंत्रीच व्हायचे आहे.( ऑबविअसली) परमार्थात जनतेच्या कल्याणात वगैरे वेळ वाया घालवायचा नाही. तर कोणाला काय मिळेल .... मंत्रीपद? खाते? काही अंदाज?!

Ed ला सर्व घाबरतात त्याला हेच कारण आहे.
कोणत्याही पक्षाच् कोणताही लोकप्रतिनिधी.
ग्रामपंचायत सदस्य पासून सर्व.
भ्रष्टाचारात लुप्त आहे..केस दाखल केली की अनंत पुरावे मिळणार च.
कोर्टात गुन्हा सिद्ध होणारच.
म्हणून सर्व ed ला भितात.
आणि मग माकड उड्या मारायला सुरुवात करतात.

Ed, CBI ज्याच्या ताब्यात तोच किंग हे bjp sarkar नी सिद्ध करून दाखवले आहे.
काँग्रेस इतक्या वर्ष सत्तेत होती पण तिला हा साधा शोध लागला नाही

<< Ed, CBI ज्याच्या ताब्यात तोच किंग हे bjp sarkar नी सिद्ध करून दाखवले आहे.
काँग्रेस इतक्या वर्ष सत्तेत होती पण तिला हा साधा शोध लागला नाही >>

------ भाजपाच्या तुलनेने काँग्रेस पक्ष जास्त लोकशाहीवादी होती आणि आहे. समस्त भारतीय समाजाचा विचार करणारा पक्ष आहे. ब्रिटिशांपासून देशाला मुक्त करण्यात काँग्रेस अग्रेसर होती. त्यामुळे स्वातंत्र्याचे महत्व जाणणारा पक्ष आहे. नेते मंडळी शिकलेली होती, आणि विज्ञानवादी नेतृत्व होते.

संघ/ जनसंघ / भाजपा यांचे स्वातंत्र्य लढ्यात कुठलेही योगदान नाही. त्यांच्या " स्वातंत्र्या" बद्दलच्या कल्पना वेगळ्या आहेत. कंगना राणावत / मनोहर कुलकर्णी सारखे लोक तर १९४७ मधे देशाला स्वातंत्र्य मिळाले हेच मान्य करत नाही.
भाजपाचे नेतृत्व अशिक्षित आहे, आणि धार्मिक द्वेष , विज्ञानाला विरोध हा विचासरणीचा पाया आहे. मग कोरोना काळात टाळ्या, थाळ्या, दिवे असे निरुपयोगी उपक्रम सुचतात.

Pages