अंमली - (पुनर्लेखन) भाग ७!

Submitted by अज्ञातवासी on 21 June, 2023 - 10:39

(अंमली या कादंबरीच्या पुनर्लेखनाचा हा प्रयत्न, यात मुख्य कथानक तेच असेल, पण बाकी सगळी नावे आणि प्रसंग बदलतील.
या कादंबरीचा भाग आठवड्यातून दोनदा, म्हणजे शनिवारी आणि बुधवारी रात्री ७.३० वाजता प्रसिद्ध होईल.)

याआधीचा भाग - https://www.maayboli.com/node/83591

आयुष्यात काही घटना अशा घडतात, की त्या माणसाचं आयुष्य बदलतात.
...त्याचा हळूहळू नाशिकच्या क्षितिजावर उदय होत होता.
हळूहळू त्याचीही क्षितिजे विस्तारत चालली होती. फक्त पैसा कमावून तो थांबणार नव्हता.
त्याला सत्ता हवी होती, त्याला प्रसिद्धी हवी होती...
...त्याला एक नशा चढली होती...
...त्याचं शरीर बदलत होतं. त्याचे विचार बदलत होते.
मात्र त्याच्या डोक्यात वेगळेच विचार चालले होते.
"सर. काय डेंजर माणूस आहे हा? हे काय आहे. इतकी वजने?"
"वेड आहे मॅडम. वेड."
"नाही सर, मी स्वतः एम ए सायकॉलॉजी आहे. हे नुसतं वेड नाही."
"मग?"
"तो पेटलेला आहे. ही भावना आहे काहीतरी गमवल्याची..."
"...आजारी होत तो. त्यात संपूर्ण हेल्थ, पैसा, जॉब सगळं गमावलं."
"नाही राहुल सर, नाही... ही केस वेगळी आहे. काहीतरी खूप वेगळी. जी तुम्हाला माहिती नाही, किंवा कुणालाही माहिती नाही."
"मॅडम, तुम्ही तुमच्या वर्कआऊट वर लक्ष द्या, नाहीतर तुमची हेल्थ खराब होईल."
तिने सायकलिंग सुरू केली
राहुल त्याच्याकडे गेला.
"आता पंधरा मिनिटं ट्रेडमिल करा सर."
वेळ आहे बराच. तीस मिनिटे करतो.
तिची सायकल एक्झॅक्ट त्याच्या ट्रेडमिलच्या समोर होती.
तो पळू लागला. कानात हेडफोन होते.
ती त्याचं ऑब्जरवेशन करत होती.
अचानक तो दुःखी दिसू लागला, आणि त्याचा तोल गेला.
धाडकन तो ट्रेडमिलवरून खाली पडला...
राहुल त्याच्याकडे धावला...
"...काही नाही झालं... तो तसाच उठला. काहीही नाही झालेलं, आय एम परफेक्टली फाईन. आय एम परफेक्टली फाईन..."
तो तसाच पुटपुटत राहिला...
ती हसली.
...कारण तिचा अंदाज बरोबर ठरला. होता.
त्याने बॅग उचलली, व तो जिमच्या बाहेर निघाला.
"एक्स्क्युज मी." तिने त्याला हाक मारली.
"येस." तो म्हणाला.
"तुमच्यात खूप चांगली इम्प्रूवमेंट दिसतेय. म्हणजे इतक्या कमी वेळात इतके चांगले रिझल्ट्स... मार्वलस..."
"थॅन्क्स." तो हसला.
"मे आय नो युवर नेम?"
"कित्येक दिवसांनी त्याला कुणीतरी त्याचं नाव विचारलं होतं."
"यू कॅन कॉल मी सर." त्याचं उत्तर...
"ओके, सर... बी इन टच."
तोही हसला, आणि निघून गेला.
'या माणसाला खोटं खोटं हसणं किती व्यवस्थित जमतं.' तिने मनाशीच विचार केला.
*****
"बेटा," आईचा फोन.
"बोल ना आई."
"मंदिरात गेला होतास?"
"दररोज सकाळी साडेचारला उठतो. मग अंघोळ करून मंदिरात जातो. मग पूजा करतो. तिकडून आल्यावर वॉक ला जातो. मग जिम करतो. जिमहून आल्यावर ऑफिसला जातो. संध्याकाळी घरी येतो. पुन्हा रात्री वॉक ला जातो. डाएट चालू आहे, गोळ्या औषधे व्यवस्थित सुरू आहेत. आजारपण अक्षरशः पळून गेलं आहे..."
"...तुझे मूर्खपणाचे विचार गेले?..." तिकडून आवाज आला.
"...बाय..." त्याने फोन कट केला.
******
विलास शिंदे आणि तो बसलेला होता.
"अरे घे रे, एक पेगने काही नाही होत." विलास त्याला म्हणाला.
"एक्झॅक्टली, एक पेगने जर काही होत नाही, तर तो एक पेग का घ्यायचा?"
"बरं बाबा. अजून किती माल निघेल पुढच्या आठवड्यात?"
"जेवढा तुम्ही गेल्या महिन्यात विकला नसेल. साहेब, तुम्ही खूप मागे राहत आहात."
"हो, कारण मला माझी कातडी प्यारी आहे. दादासाहेब शेलारला कुणकुण जरी लागली ना, तरीही तो तुला, मला, सगळ्यांना जिवंत जाळेन."
"मग करा बंदोबस्त. शेलारांचा..."
"ये, विनोद करतोय मी? हे बघ, तू माल बनव बाबा. या गोष्टींच्या फंदात पडू नकोस."
"ओके नाही पडत, पण उद्या उद्घाटनाला येणार आहात ना."
"मग, आफ्टर ऑल आपल्या पार्टनरची कंपनी आहे. अजून रजिस्ट्रेशन नाही, काही नाही, तरी उद्घाटन... नाव काय ठेवणार कंपनीचं?"
"उद्या या, कळेल." तो हसला.
"पण हा डाव बरोबर खेळलास तू. केमिकल कंपनी, ब्लॅक चं व्हाईट करण्यासाठी सगळ्यात बेस्ट."
"नाही."
"मग."
"आयटी कंपनी. त्यात कितीही नफा कमवा. कितीही दाखवा."
"नेमकं करणार काय आहेस तू?" विलास शिंदे उद्गारला.
"मी साम्राज्य उभं करणार आहे. उद्या सकाळी ठीक दहा वाजता. वेळेवर पोहोचा." तो उठला, आणि निघूनही गेला.
*****
सकाळी.
"ब्लेझर, की वेस्टकोट?"
"धिस लव हॅण्डलस सिस्टर, कान्ट वेयर वेस्टकोट."
"गेट रीड ऑफ इट माय ब्रदर."
"ट्रायिंग हार्ड..."
"यू विल डेफिनेटली कील इट."
"थॅन्क्स सिस्टर."
त्याच्या नवीन फ्लॅटमध्ये भल्यामोठ्या आरशासमोर तो उभा होता. स्वतःला निरखत.
"हळूहळू तू पूर्वीसारखा होतो आहेस." त्याची आई म्हणाली...
"...व्हावं लागेल आई, व्हावं लागेल. वेळ कमी आहे खूप. खूप काही अचीव करायचं आहे."
"मला एक कळत नाहीये, का इतकं वेड. का इतका अट्टाहास? आणि इतकं सगळं वेगाने सगळं घडतय, मला भीती वाटतेय. जस्ट मला एक सांग. सगळं ठीक आहे ना?"
"असं समज, की सगळं नीट होतंय. हळूहळू सगळं पूर्वपदावर येतंय. आई मी लढतोय, स्वतःशी, जगाशी, सगळ्यांशी..."
"जगात सगळ्यात मोठी लढाई स्वतःशी असते. जर ती जिंकलास ना, सगळ्या लढाया काहीही वाटणार नाहीत."
तो हसला.
"चल जाऊयात." तो म्हणाला आणि निघाला.
******
गंगापूर रोडवर एक अतिशय आलिशान टॉवर उभारलं गेलं होतं. टॉवरचं अजूनही अनावरण बाकी होतं.
टॉवरवर प्रचंड मोठी अक्षरे लावली गेलेली होती. त्या अक्षरांवर कपडा आच्छादला गेला होता.
नाशिकमधील आजपर्यंत सगळ्यात उंच टॉवर उभारलं गेलं होतं. जैन बिल्डर्सने हे टॉवर उभारलं होतं, मात्र त्याची अजिबात जाहिरात केली गेली नव्हती...
...विलास शिंदे, त्याचे काही राजकारणी मित्र, वेगवेगळ्या स्तरातील अतिमहत्वाचे लोक झाडून या समारंभाला हजर होते.
"आपण खूप वेगाने पुढे जात आहोत, सर..." विलास शिंदे म्हणाला.
"अजून तर वेग पकडायचा आहे. तो म्हणाला," आणि पोडियमकडे गेला.
सगळे लोक आपापल्या जागी बसले.
"नमस्कार. सर्व निमंत्रित लोकांचे विशेष आभार, आपण आपला मौलिक वेळ मला दिलात.
स्टार्टप ही संकल्पना आपल्या सर्वांसाठी नवीन आहे. माझ्यासाठीही नवीन होती. काही महिन्यांपूर्वी, पण मी अभ्यास केला, खूप अभ्यास केला, आणि आज एक स्टार्टअप उभारलं. एक अशी कंपनी, जी केमिकल, मायनिंग आणि आयटी, या तीनही क्षेत्रात आपला दबदबा निर्माण करेन. आज त्या स्वप्नाची मुहूर्तमेढ रोवली गेली आहे.
माझं हे स्वप्न पूर्ण होईलच. कारण त्याला वास्तवाचं भान आहे. पण त्याला अजून दृढतेचं अधिष्ठान लाभण्यासाठी मी आजच्या मुख्य पाहुण्यांना आमंत्रित केलं आहे...
दादासाहेब शेलार..."
"आईशपथ..." विलास शिंदे उठून उभाच राहिला.
दहा बारा सशस्त्र बंदूकधारी पुढे आले.
...आणि त्यांच्याबरोबर दादासाहेब शेलारांची भव्य आकृती पुढे आली... बाजूलाच खानसाहेब होते...
तो त्या दोघांकडे बघतच राहिला..
दादासाहेब त्याच्या समोर आले. तो बाजूला झाला.
"तुम्ही सगळे इथे?" त्यांनी बोलायला सुरुवात केली. "जरूर काहीतरी महत्वाचं आहे." ते हसले...
"...या मुलाने स्वतः मला आमंत्रण दिलं. नेहमी मी अशा समारंभांना जायचं टाळतो, पण तरुण रक्त आहे. त्यांना वाव दिला पाहिजे. म्हणून मी आज इथे हजर आहे. जास्त वेळ घालवायला नको. चलायचं?"
"धन्यवाद दादासाहेब." तो म्हणाला. "आता सर्वांनी खाली चलावं."
सगळेजण उठले, आणि खाली निघाले.
रस्ता ब्लॉक झालेला होता... सगळेजण मोठ्या उत्सुकतेने वर बघत होते.
ती अवाढव्य अक्षरे प्रचंड मोठ्या काळ्या कपड्याने झाकली गेली होती...
"दादासाहेब, हे बटण दाबा. त्याने दादासाहेबांच्या हातात रिमोट दिलं..."
...दादासाहेबांनी रिमोटचं बटन दाबलं...
...क्षणार्धात तो काळा कपडा खाली पडला....
...आणि ती अवाढव्य अक्षरे क्षितिजावर उमटली...
"PRAJAKTA"

क्रमशः

Group content visibility: 
Public - accessible to all site users

पुलेशु