कलाकाराचा ब्रॅण्ड म्हणजे काय ? एका माणसाच्या नावावर चित्रपट चालतो का ?

Submitted by ढंपस टंपू on 1 February, 2023 - 05:46

कोणत्याही एका कलाकाराचा ब्रॅण्ड बनवतात हे खरं आहे का ? चित्रपट व्यवसायाची असे काही शास्त्र असते का ?
तसे असेल तर ग्रॅव्हिटी, ज्युरासिक पार्क, इंडीयाना जोन्स, इंटरस्टेलार, अवतार, दा विन्ची कोड, पाकिजा, जंजीर इत्यादी अनेक चित्रपट कसे काय चालले असतील ?
ज्यांचा ब्रॅण्ड आहे त्यांचे झिरो, फॅन, लालसिंग चढ्ढा, रनवे ३४ , शमशेरा , रा वन , गुड्डू, जमाना दिवाना, ओ डार्लिंग ये है इंडीआस, स्वदेश असे चित्रपट डिझास्टर का झाले असतील ?

कलाकाराच्या ब्रॅण्ड पेक्षा चित्रपट चांगला असल्याने चालला हे महत्वाचे नाही का ? एखादा चित्रपट यायच्या आधीच वर्षभर तो चांगला किंवा वाईट आहे हे कसे कळते ? पहिल्या चार पाच दिवसातच चित्रपट कसा आहे याची माऊथ पब्लिसिटी झालेली नसताना गल्ला जमवणारे चित्रपट चांगले असल्यानेच चालले असे म्हणता येते का ?

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पहिल्या चार पाच दिवसातच चित्रपट कसा आहे याची माऊथ पब्लिसिटी झालेली नसताना गल्ला जमवणारे चित्रपट चांगले असल्यानेच चालले असे म्हणता येते का ?
,>>>>>

यालाच तर कलाकाराची ब्रॅंड वॅल्यू बोलतात. Happy

तसे असते तर बॉयकॉट कॉन्ट्रोव्हर्सी, भगवी बिकिनीचा तडका द्यावा लागला असता का ?

तडका कसला डोंबलाचा. ती चर्चा देखील कलाकाराची ब्रॅडवॅल्यू बघूनच झाली. ते तुषार कपूर आणि आफताब शिवदासानी ग्रांडमस्तीसारखे अक्षरशा वल्गर चित्रपट काढतात. कोण करते त्यावर तावातावाने चर्चा. सनी लिओनीला चित्रपट मिळतात ते काय अभिनय करायला मिळतात का? ते पिक्चर अंगप्रदर्शनाचा हेतू ठेऊनच बनवले जातात. कोण करते त्यावर चर्चा. यात दिपिका आणि जोडीला शाहरूख असल्याने चर्चा झाली ईतकीच. ब्रॅंड वॅल्यू जबरदस्त असल्याने घमासान चर्चा झाली. निगेटीव्ह पब्लिसिटीही तोच खेचू शकतो ज्याची मुळात ब्रॅंडवॅल्यू असते. अन्यथा पठाण म्हणूनही घेतला नसता का उदय चोप्राला..

तडका कसला डोंबलाचा. ती चर्चा देखील कलाकाराची ब्रॅडवॅल्यू बघूनच झाली. ते तुषार कपूर आणि आफताब शिवदासानी ग्रांडमस्तीसारखे अक्षरशा वल्गर चित्रपट काढतात. कोण करते त्यावर तावातावाने चर्चा. सनी लिओनीला चित्रपट मिळतात ते काय अभिनय करायला मिळतात का? ते पिक्चर अंगप्रदर्शनाचा हेतू ठेऊनच बनवले जातात. कोण करते त्यावर चर्चा. यात दिपिका आणि जोडीला शाहरूख असल्याने चर्चा झाली ईतकीच. ब्रॅंड वॅल्यू जबरदस्त असल्याने घमासान चर्चा झाली. निगेटीव्ह पब्लिसिटीही तोच खेचू शकतो ज्याची मुळात ब्रॅंडवॅल्यू असते. अन्यथा पठाण म्हणूनही घेतला नसता का उदय चोप्राला..

ऋन्मेषजी आपले लाख लाख धन्यवाद. माझ्या सर्व धाग्यांवर प्रतिसाद देऊन माझे मुद्दे सिद्ध केलेत.

ग्रांडमस्ती व्हल्गर असल्याने चर्चा न होताच चालला असे सांगितल्याने तुम्ही माझा मुद्दा सिद्ध केला आहे. लोकांना जे आवडते ते दिले की कलाकार कोणताही असू द्या, ब्रॅण्ड व्हॅल्यू काही पण असू द्या, तो चालतोच. पठाण हिट व्हायची ग्यारंटी असती तर चर्चा घडवायची, दीपिकाची व्हल्गर बिकिनी दाखवायची गरजच पडली नसती. तिच्या मांड्यांमुळे आणि बिकिनीमुळेच पिक्चर चालला हे तुम्ही मान्य केले याबद्दल धन्यवाद.

>>>>तिच्या मांड्यांमुळे आणि बिकिनीमुळेच>>> अ‍ॅडमिन.... मायबोलीवरील चर्चा या थराला आजवर गेली नव्हती

ग्रांडमस्ती व्हल्गर असल्याने चर्चा न होताच चालला
>>>>
अहो कुठे चालला? आंबटशौकीन गेले असतील फक्त.
पठाणला फॅमिली क्राऊड आहे. शाहरूखच्या पिक्चरचा टारगेट ऑडीयन्स तोच असतो. तो काही वल्गर दाखवणे शक्य नाही ही खात्री आहे.

मी पण तेच म्हणतोय.
ग्रांडमस्तीला आंबटशौकीन
पठाणचा थिल्लर
आणि
वाळवीला क्लासिक प्रेक्षक.
मुद्दा मान्य केल्याबद्दल तुमचे अभिनंदन.

फॅमिली क्राऊड लिहिलेय तरी थिल्लर म्हणत आहात .. ओके Happy
शाहरूख बॉलीवूडचा देव आहे. थिल्लरपणाला जागा नाही.. असो..
हे मा शे श पो

>>>>तिच्या मांड्यांमुळे आणि बिकिनीमुळेच>>> अ‍ॅडमिन.... मायबोलीवरील चर्चा या थराला आजवर गेली नव्हती>>> ह्या चर्चेचा रूट काय आहे त्या वर प्रतिसाद दिला अस्ता तर बरे वाट्ले असते

मायबोलीवर अनेक महत्वाचे विषय पुढ्यात आल्याने सर्व मायबोलीकर त्यात गुंग झाले.
त्यामुळे या जिव्हाळ्याच्या पण कमी महत्वाच्या विषयाकडे दुर्लक्ष झाले. आता या सगळे.

वर जंजीरचे उदाहरण दिले आहे. या पिक्चरपर्यंत अमिताभ बच्चन ब्रँड झालेला नव्हता. प्राण व्हिलनगिरी सोडून चांगला माणूस झाले होते.
पण ते पण ब्रँड नव्हते. सलीम जावेद हे सुद्धा ब्रँड बनलेले नव्हते.
मग पिक्चर कसा काय चालला ? असा चालला कि एक सुपरस्टार जन्माला आला.

जय संतोषी मां मधे तर एकही ब्रॅण्ड व्हॅल्यू नव्हता. पण हा पिक्चर शोलेच्या तोडीचा सुपर डुपर हिट होता. शोलेचं बजेट आणि केलेला धंदा आणि जय संतोषी मां आणि त्याने केलेला धंदा बघितला तर आज परदेशात पण जय संतोषी माचं उदाहरण देतात.

कालिचरण च्या वेळी शत्रुघ्न सिन्हाही ब्रॅण्ड नव्हता आणि सुभाष घई पण.
सुभाष घईचे गौतम गोविंदा आणि क्रोधी हे पिक्चर आपटले. गौतम गोविंदाच्या वेळी शत्रुघ्न सिन्हा हा अमिताभच्या तोडीचा ब्रॅण्ड झाला होता. शशी कपूर सुद्धा सेकंड लीड म्हणून पण आणि मेन लीड म्हणून पण ब्रॅण्ड होता. पण पिक्चर आपटला.
क्रोधी मधे तर धर्मेंद्र मेन लीड असताना आपटला. सुभाष घईला काम मिळणं बंद झालं.
मग त्याने हिरो बनवला.
त्यात जॅकी श्रॉफ, मीनाक्षी आणि स्वतः सुभाष घई हे तिघे पण ब्रॅण्ड नव्हते. सुभाष घईचा हा जुगार होता.
पण पिक्चर ब्लॉकबस्टर हिट झाला.

या कोणत्याही पिक्चरवर ब्रॅण्ड मुळे चालला असा आरोप करता येत नाही.
अशी कित्येक उदाहरणं आहेत जे माऊथ पब्लिसिटी च्या जोरावर चालले ( जी आत्ता दोन आठवड्यात गल्ल्यावर डल्ला मारून पळून जाणार्या पिक्चर मधे दिसत नाही).

म्हणजे सगळे पिक्चर हिरोच्या जोरावर चालतात असं म्हणणं अर्धवटांचं लक्षण आहे असं म्हटलं तर चूक आहे का ?

सारुक मोठ्ठा ब्रँड असताना देखील बरेच मूव्ही तोंडावर आपटले आहेत .
मग पठाण चे यश हे ब्रँड चे यश मानता येईल का ?

पठाण ला रिलीज करताना हेतुपुरस्सर सोमीवर हिंदू विरुद्ध मुसलमान वाद छेडला गेला , त्यात राईट विंगवाल्यांनी भगव्या रंगाच्या बिकनी वरून आगीत तेल ओतले !
पण काठावर बसणाऱ्या बऱ्याचशा हिंदूंनी संगीत कला मध्ये जात धर्म नसतो हा उदात्त सहिष्णू दृष्टिकोन ठेवला आणि सिनेमा बघण्यास पसंती दिली !
त्याच प्रमाणे प्रत्येक मुस्लिम व्यक्तीने धर्मयुद्ध असल्यासारखे थेट्रात गर्दी केली .
तसे पाहता सिनेमाच्या श्टोरी चा प्लॉट इतका पण भारी नव्हता की ९०० कोटी कमवावे .

पूर्वी असं असेल
आता पब्लिक इतका विचार करत नसावं.आपल्या सोयीच्या वेळी, चांगली ऑफर वाली तिकिटं आणि थोडंफार मनोरंजन मूल्य असलेला कोणताही बघत असावे.
पठाण बघताना 'बहिष्कार म्हणून बघायचाच' किंवा 'शाहरुख म्हणून बघायचा' यातला कोणताही विचार डोक्यात आला नाही.
खूप डिप्रेसिंग विषय (काश्मीर फाईल,पिहु किंवा इतर शोकांत इत्यादी) बघत नाही थिएटरमध्ये कारण डोक्याची तितकी एनर्जी राहत नाही.
साध्या पिक्चर केव्हा येतो तेही महत्वाचं. मुलांच्या परीक्षा, ऑफिसात ताजे ताजे सुट्टीवरून आलेले काम देणारे लोक असल्यास मिस होतो.(म्हणून ख्रिसमस लॉंग वीकेंड ला पिक्चर आणायची घाई असते मोठ्या ब्रँड्स ची.)

पठाण बघताना 'बहिष्कार म्हणून बघायचाच' किंवा 'शाहरुख म्हणून बघायचा' यातला कोणताही विचार डोक्यात आला नाही. >>> पण त्याची हवा शाहरूख मुळे झाली होती कि वादामुळे ? त्या वेळी इतर पिक्चर्स पण होते की. ज्या वेळी एखाद्या पिक्चर बद्दल वाद निर्माण होतो त्या वेळी आपण त्या वादात नसलो तरी हा पिक्चर बघायला पाहीजे असं वाटतं. त्यासाठीच कॉण्ट्रोव्हर्सी चा वापर मार्केटिंग साठी करतात. हवा होते हा एकमेव उद्देश असतो. पुढं पिक्चर आणि त्याचं नशीब.

जर ही हवा न करता पिक्चर रिलीज झाला असता तर लोकांनी एव्हढी गर्दी नसती केली.
पठाणची स्ट्रॅटर्जी सिंपल होती. जास्तीत जास्त पब्लिकला कमी वेळेत थेटरात आणायचं. पहिल्या दोन आठवड्यातच कमवून घ्यायचे.
ती यशस्वी झाली. नऊ हजार स्क्रीन्स वर रिलीज हे रेकॉर्डच होतं. जुगार यशस्वी झाला.
नंतर तो जास्त चालला.

पब्लिक पण आता येडं नसतं.प्रत्येक पिक्चर ला वाद किंवा काँट्रॅव्हर्सि झाल्यास धंदा किंवा प्रसिद्धी व्हावी म्हणून मुद्दाम केलंय हे कळतं.
निव्वळ वाद झाला म्हणून पिक्चर ची प्रसिद्धी वाढली असं नसेल.मीडिया, थिएटर ट्रेलर, थिएटरमध्ये खूप जास्त शोज ठेवणे(माझ्या सोयीच्या वेळेला, अचानक लहर आली वेळ न बघता तर बाकी पिक्चर नाहीयेत जवळपास, पण यशराज किंवा लीला भनसाली किंवा रोहित शेट्टी चा तो अमका दर पाऊण तासाने असल्याने पाहता आला इत्यादी.
निव्वळ वाद निर्माण करून पिक्चर हिट करता येत नाही.शोज मध्ये प्रमोशन, एक एक गाणी युट्युब ला हिट करून ''या' हॉट अंदाजातल्या गाण्याने वेडे झाले नेटिझन्स' इत्यादी क्लिकबेट बातम्या अश्या सर्व प्रकारे डोक्यावर मारत राहिल्यावर हिट होतो Happy म्हणजे एखाद्या सुंदर मुलीचा अनेक वर्षे पाठपुरावा, फ्रेंडझोन, ब्रेकअप आधार इत्यादी काही वर्षं चिकाटीने केल्यावर तिला अचानक प्रेमभाव वाटू लागणे तसं काही.

शोज मध्ये प्रमोशन, एक एक गाणी युट्युब ला हिट करून ''या' हॉट अंदाजातल्या गाण्याने वेडे झाले नेटिझन्स' इत्यादी क्लिकबेट बातम्या अश्या सर्व प्रकारे डोक्यावर मारत राहिल्यावर हिट होतो >>> त्यालाच मार्केटिंग म्हणतात ना ? मग ब्रॅण्ड असताना याची काय गरज ?
कॉण्ट्रोवर्सी मुळं हवा होते असं म्हटलंय. त्याचा फायदा होतो. तुम्हाला ती ओळखू आली तरी पिक्चरच नाव हॅमर होतंच की. वादावर पैसे वाया घालवायला निर्माते पण येडे नसतात. आणि सगळंच पब्लीक कॉण्ट्रोवर्सी च्या मागची स्ट्रेटर्जी ओळखू शकत नाही.

तुम्ही चित्रपटाचे घेऊन बसला आहात...
मायबोलीवरचे धागेही शाहरूख या ब्रॅंड नावामुळे चालतात Happy

अरे ब्रॅंड वगैरे काही नसतेच तर जाहीरातीत करोडो रुपये खर्च करून सुपर्रस्टार का घेतले असते.. साधा विचार करा.

माझ्या बायकोने बिग बास्केट पहिल्यांदा ट्राय केले ते त्याची जाहिरात शाहरूख करत होता तर त्याचा काहीतरी दर्जा असेल या विश्वासावर... Happy

अरे ब्रॅंड वगैरे काही नसतेच तर जाहीरातीत करोडो रुपये खर्च करून सुपर्रस्टार का घेतले असते.. >>> जाहीराती थेटर मधे मेन पिक्चर म्हणून लावतात का ? तुमचे ब्रँड पिक्चरमुळे ओळखीचे होतात. जाहीरातीत ओळखीचा चेहरा, सेलेब्रिटी घेण्यामागचं मानसशास्त्र वेगळं आणि जाहीरात थेटरला पंचवीस आठवडे चालवणं वेगळं. हे जर मान्य नसेल तर काहीच प्रॉब्लेम नाही,

Group content visibility:
Private - accessible only to group members
>

मजा गेली आता ईथे लिहायची.
पुन्हा कधीतरी दुसऱ्या धाग्यावर चर्चा नेऊ पुढे
धन्यवाद Happy

Group content visibility:
Private - accessible only to group members >>> हे मला माहिती नव्हतं. आता केलंय पब्लीक. धन्यवाद लक्षात आणून दिल्याबद्दल.

अरे ब्रॅंड वगैरे काही नसतेच तर जाहीरातीत करोडो रुपये खर्च करून सुपर्रस्टार का घेतले असते.. साधा विचार करा. >>>>>>>>>>>>
अमीर खान सुद्धा lai मोठ्ठा ब्रँड होता तरी पण त्याची बऱ्याच जाहिरातीतून हकालपट्टी केली गेली होती !
शेवटी काय ?
त्या ब्रँड चे सार्वजनिक जीवन देखील धुतल्या तांदळासारखे असावे लागते .

Group content visibility:
Public - accessible to all site users
>>

अरे पुन्हा चेंज
हे तुम्ही बदलत आहात की ॲडमिन.
असो. चर्चा नेऊया पुढे Happy

अवांतर - एक था गब्बर चित्रपटात अक्षय कुमार गब्बर म्हणून कसा व्हिलनपेक्षा मोठा ब्रांड बनतो ते मस्त दाखवले आहे Happy

तरी पण त्याची बऱ्याच जाहिरातीतून हकालपट्टी केली गेली होती !
शेवटी काय ?
>>>>

एक्झॅक्टली!
यानेच तर मुद्दा स्पष्ट होतो. की ब्रांड वॅल्यू मॅटर करते.
जसे प्रीडक्ट भारी असले तरी ते लोकांपर्यंत पोहोचवायला ब्रांडनेमचा सहारा घ्यावा लागतो. त्याच प्रमाणे काही कारणाने ते ब्रांड नेम बदनाम झाले तर त्याला बदलावेही लागते. आमचे प्रॉडक्ट चांगले आहे तर सोबत बदनाम ब्रांडनेम जोडले असले तरी लोकं घेतीलच असा हिशोब चालत नाही.

अरे पुन्हा चेंज
हे तुम्ही बदलत आहात की ॲडमिन. >>> म्हणजे ? मी बदलायच्या आधी अ‍ॅडमिन यांनी बदलले होते का ? तसे का नाही सांगितले.
मला वाटलं धागा काढतानाच माझ्याकडून चूक झाली.

जसे प्रीडक्ट भारी असले तरी ते लोकांपर्यंत पोहोचवायला ब्रांडनेमचा सहारा घ्यावा लागतो. >>> जाहीरात थेटरला बघण्यासाठी जातात का लोक ? तर त्या सुपरस्टारची करामत. इथं त्या सुपरस्टारला पिक्चरमधे घेऊन पण चालेल याची ग्यारण्टी नाही. जाहीरात पिक्चरला किंवा लोकप्रिय कार्यक्रमात ठिगळासारखी येते.
तुम्हाला मागच्या पोस्टमधला फरक मान्य नाही कि अडचणीचा वाटतो ? फाट्यावरच मारली कि मागची पोस्ट.

ढंपस टंपू
जाहीरात आणि चित्रपट.. ब्रांडच्या मुद्द्याबाबत काही फरक नाही

चित्रपट निर्मिती हा सुद्धा एक व्यवसाय आहे. चित्रपट हे सुद्धा एक प्रॉडक्ट आहे.

एखादा नवीन पिक्चरचा ट्रेलर येतोय असे कानावर पडले तर आपण सर्वात पहिले हिरो हिरोईन कलाकार झाल्यास दिग्दर्शक कोण आहेत हे विचारतो. तिथेच चित्रपटाबद्दल आणखी जाणून घ्यायचे की नाही हे नकळत मनात ठरवले जाते.

उदाहरणार्थ,
वरून धवन हिरो आहे असे समजले तर नाव ऐकाल आणि सोडून द्याल.
तेच रणवीर सिंग हिरो असेल तर काय स्टोरी आहे, कश्यावर आहे हे विचाराल.
पण शाहरूख खान नाव ऐकले तर हातातले काम टाकून आधी जाऊन ट्रेलर बघून याल.

ईथे हिरोहिरोईनच नाही तर दिग्दर्शकही त्यांच्या आधीच्या कामाने ब्रांड बनू शकतात. पण तुलनेत पडद्यामागच्या कलाकारांपेक्षा पडद्यावर दिसणारे चेहरे जास्त ओळखीचे होतात.

जाहीरात आणि चित्रपट.. ब्रांडच्या मुद्द्याबाबत काही फरक नाही >>> कुठली जाहिरात येणार आहे, तिच्यात कोण आहे हे बघून तुम्ही जाहिरातीची वाट बघता का (कामसूत्र सोडून). कि जाहिरातीसाठी तिकीटं काढता ?
तुम्हाला बरोब्बर समजलेलं आहे.

Tampu needs to go to MBA Marketing course. You have really good questions. They're not just dependent on film industry but they are important for whole marketing industry including politics