सौभाग्य

Submitted by Chakrapani on 4 June, 2009 - 19:42

खोड्या करून इतके दुर्दैव हासलेले
पण गप्प राहण्याचे मी वचन पाळलेले

हातांस काय ठावे मेंदीत रंगलेल्या
गजऱ्यास काय ठाउक केसांत माळलेल्या
कोठेतरी कुणावर खंजीर चाललेले...

सनई नि चौघड्यांनी आहेत कान किटले
दिसतेस तू तरी मी डोळे कधीच मिटले
हृदयात आसवांचे मग सूर लागलेले...

जपलेत घाव इतके - जणु मूल्यवान रत्ने
या अक्षता म्हणू की फुटकी बिलोर स्वप्ने?
होते कधी तुला मी सर्वस्व वाहिलेले...

मेलो हजार मरणे, तरिही जगून होतो
समिधा म्हणून काही स्मरणे रचून होतो
होमात आज माझे आयुष्य पेटलेले...

चिमटीत मावणारे सौभाग्य घे तुला तू
विसरून जा मला अन् कर मोकळे मला तू
झोळीत घाल माझ्या अस्तित्त्व फाटलेले...

गुलमोहर: 

कविता आवडली.
जपलेत घाव इतके - जणु मूल्यवान रत्ने
या अक्षता म्हणू की फुटकी बिलोर स्वप्ने?

खूप खास!

क्रान्ति
मुक्त तरीही बंधनात मी
फुलाफुलाच्या स्पंदनात मी
http://www.agnisakha.blogspot.com/

सुरेखच, आवडली !

गजऱ्यास हे गजर्‍यास : gajaRyaas असे लिहावे. पुलेशु Happy
***********************************
मज पिसे लागलेले सुखांचे
गे हलकेच धुके ओसरते आहे...

मस्तच. 'यार नेही लुट लिया घर यारका'....
हातांस काय ठावे मेंदीत रंगलेल्या >>>>चक्रपाणी, लहान तोंडी मोठा घास... पण हे असे जास्त योग्य वाटेल...
मेंदीस काय ठावे हातात रंगलेल्या
पटलं तर हो म्हणा, नाहीतर सोडून दया.
.........................................................................................................................
आयुष्याच्या पाऊलवाटी, सुख दु:खांचे कवडसे
कधी काहीली तनमन झेली, कधी धारांचे व़ळसे

समिधा म्हणून काही स्मरणे रचून होतो

संपुर्ण कविताच सुरेख आहे!!!

नितीन

सॉलिड! मांडणी सुंदरच.
..सुसंगती सदा घडो, सुजनवाक्य कानी पडो..

व्वा!! मस्तच!

*******************
सुमेधा पुनकर Happy
*******************

>> जपलेत घाव इतके - जणु मूल्यवान रत्ने
या अक्षता म्हणू की फुटकी बिलोर स्वप्ने?
होते कधी तुला मी सर्वस्व वाहिलेले...

मेलो हजार मरणे, तरिही जगून होतो
समिधा म्हणून काही स्मरणे रचून होतो
होमात आज माझे आयुष्य पेटलेले...
>>>
खूप छान , आर्त रचना

दाहक रचना... सुरेख मांडणी !

आवडली !

कविता क्लास आवडली.

शरद
.............................
"तुजसारखे कवी जे येतात रोज 'खावर'
बसतात गप्प सारे कोलाहलात इथल्या!"
............................

कविता आवडली .

चक्रपाणी,
>>मेलो हजार मरणे, तरिही जगून होतो
समिधा म्हणून काही स्मरणे रचून होतो
होमात आज माझे आयुष्य पेटलेले...

चिमटीत मावणारे सौभाग्य घे तुला तू
विसरून जा मला अन् कर मोकळे मला तू
झोळीत घाल माझ्या अस्तित्त्व फाटलेले...
>>>>
मी एवढच म्हणेन जबरदस्त!
जे.डी. भुसारे

चिमटीत मावणारे सौभाग्य घे तुला तू
>> धारदार एकदम!

चक्रपाणि,
चिमटीत मावणारे सौभाग्य घे तुला तू
.. वा!अशा काही ओळी छान!पण एकंदरीत जरा 'लाउड' वाटली.
जयन्ता५२

मेलो हजार मरणे, तरिही जगून होतो
समिधा म्हणून काही स्मरणे रचून होतो
होमात आज माझे आयुष्य पेटलेले...

कविता आवडली

अप्रतिम कविता............................!

सनई नि चौघड्यांनी आहेत कान किटले
दिसतेस तू तरी मी डोळे कधीच मिटले
हृदयात आसवांचे मग सूर लागलेले...

जपलेत घाव इतके - जणु मूल्यवान रत्ने
या अक्षता म्हणू की फुटकी बिलोर स्वप्ने?
होते कधी तुला मी सर्वस्व वाहिलेले...

जबरद्स्त ......

प्रचंड आवडली. आधी चुकून वाचली नव्हती. निवड समितीमुळे आज योग आला. अभिनंदन !! Happy

My website : www.layakari.com
तुम्ही तुमच्या सुचना आणि प्रतिसाद, तिथेही, मायबोली प्रमाणे; मराठी किंवा इंग्रजीत; नोंदवू शकता. कलावंताला तुमची पाठराखण हवीय. या, मी तुमची वाट पहातोय. Happy

चिमटीत मावणारे सौभाग्य घे तुला तू
विसरून जा मला अन् कर मोकळे मला तू
झोळीत घाल माझ्या अस्तित्त्व फाटलेले..>>> टू गुड Happy

अप्रतीम दोस्त.... सलाम !!!
मला आता तुमच्या सगळ्या कविता वाचाव्या लागतील इतकी कंपल्सीव्ह .............!!!!

मेलो हजार मरणे, तरिही जगून होतो
समिधा म्हणून काही स्मरणे रचून होतो....

मस्त रे मित्रा ! लिहीत राहा... Happy