न लाजता

Submitted by जयन्ता५२ on 3 June, 2009 - 16:59

तना-मनांत प्रश्नांची वादळे माजली होती
तेंव्हा तूच शांत केलं होतस,कवेत घेऊन
न मागता!

पुरुषार्थाचे पराभव घेऊन तोंड लपवत आलो होतो
तेंव्हा तूच उभी होतीस, नजरेत आरती घेऊन
न बोलता!

काळाचे शिपाई मला शोधत आले होते
तेंव्हा तूच लपविलं होतस, माझ्या रक्तानी माखलेल्या हातांकडे
न पाहता!

पण..
आज तुझ्या नजरेतच प्रश्नचिन्हे उभी राहिली आहेत..!
तेंव्हा तुझ्यापासून पळतांना दुनियेची बंद कवाडं पाहून
येऊन तुझ्याच कुशीतच शिरलो
न विचारता!

तुझ्या नजरेला नजर देण्याइतपत हिंमत आली की
मग पाहीनच वर..
न लाजता!

जयन्ता५२

*आधी इतरत्र प्रकाशित

गुलमोहर: 

सुंदर मांडली आहे. न चा उपयोग छान केलाय.
..सुसंगती सदा घडो, सुजनवाक्य कानी पडो..

जयंतराव, सुरेख लिहिलय. फारच आवडलं.
.........................................................................................................................
आयुष्याच्या पाऊलवाटी, सुख दु:खांचे कवडसे
कधी काहीली तनमन झेली, कधी धारांचे व़ळसे

क्या बात है. खुप छान.वर पाहण्याची हिंमत तीच देईल हळूच थोपटत..
..............................................................................
येता कणकण कवितेची
करा तपासणी डोक्याची!

मस्त! आवडली कविता Happy

छान.

आहा !!!

परागकण

एकदम सही!!! झकास Happy

*******************
सुमेधा पुनकर Happy
*******************

मस्त

नेहमी प्रमाणणेच मस्त!!!

उत्तमच मात्र आधी वाचली नव्हती. अभिनंदन Happy

My website : www.layakari.com
तुम्ही तुमच्या सुचना आणि प्रतिसाद, तिथेही, मायबोली प्रमाणे; मराठी किंवा इंग्रजीत; नोंदवू शकता. कलावंताला तुमची पाठराखण हवीय. या, मी तुमची वाट पहातोय. Happy