अत्यवस्थ रुग्णांसाठी मदत

Submitted by आईची_लेक on 1 October, 2022 - 12:47

माझ्या नणंदेच्या मिस्टरांची डायलिसिसची ट्रीटमेंट चालू आहे
डायलिसिसचा खर्च आवाक्याबाहेर चालला आहे
कालपासून प्रकृती जास्त खालावल्यामुळे ते व्हेंटीलेटरवर आहेत
घरातली कमावती व्यक्ती आजारी असल्यामुळे आर्थिक स्थिती खालावली आहे
मुंबई किंवा ठाणे परिसरात अशा काही समाजसेवी संस्था आहेत का ज्या डायलिसिस रुग्णांना आर्थिक मदत करू शकतात ?
आम्ही मदत करतच आहोत आमच्या परीने पण ती मदत पुरेशी पडत नाहीये

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Crowdsourcing fundraiser sites वापरा. Impactguru सारख्या. सर्वसामान्य माणसंही तिथं contribute करतात. शुभेच्छा.

इम्पॅक्ट गुरू आणि मिलाप.
कोणी सकाळ किंवा लोकसत्ता मध्ये ओळखीचे असल्यास बातमी देऊन त्यात पण ट्रान्स्फर डिटेल्स देता येतील.

(लोकांना 'इथे क्लिक करून किंवा हे डिटेल टाकून डोनेशन करा' असे सोपे पर्याय दिल्यास जास्त डोनेशन येतात.हेच जर 'अमक्याला फोन करून विचारा आणि मग ते डिटेल्स घेवून डोनेट करा' असे असेल तर संख्या कमी होत जाते.हे एरवी संकटात असलेल्याच्या लक्षात येत नाही, की नुसते फोन नंबर देऊन चौकशी करा लिहू नये, लोकांना इतका वेळ किंवा बरेचदा अनोळखी व्यक्तीशी फोनवर बोलण्याचा कम्फर्ट नसतो.)

सिध्दीविनायक ट्रस्टचे डायलिसिस सेंटर आहे. फी 250 for one cycle. सरकारी इस्पितळातही कमी खर्च येतो.

एक व्हॉट्सॲप फॉरवर्ड आताच आले ते खाली कॉपी पेस्ट करत आहे. ते कसे आहे, कुणाचे अनुनभव वगैरेची काहीही खातरजमा केलेली नाहीये.

जर त्यांना काही दिवस डायलिसिस साठी ठेवायचे असेल तर याचा उपयोग होईल का बघा.

या व्यतिरिक्त आर्थिक मदत लागेल असे तुम्ही लिहिले त्यावरून वाटते, तिथे फक्त दर वाजवी आहेत,.मोफत असे लिहिले नाहीय.

*We have Hospital only for the Senior Citizen*
आमचे हॉस्पिटल वृद्ध ,बुजुर्ग,सिनिअर सिटीझनसाठी आहे .

*हल्ली हॉस्पिटलचे खर्च खूप वाढले आहेत*
हल्ली वृद्धांचे आजारपणा वरील खर्च वाढले आहेत ( Medical Expenses) अशावेळी वृद्ध ( Elders ), बुजुर्ग ( Old Aged ) सिनिअर सिटिझन्स ( Senior Citizen ) ची आरोग्याची काळजी घेणे ( Difficult to take care of their health ) कठीण झाले आहे . त्यांना मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये ठेवावे तर लाखो रुपयांचे बिल होते ( Getting admitted to multispeciality hospital will be very expensive ) आणि घरच्या घरी काही करायचे म्हटलं तर ते अशक्यप्राय ! घरी वैद्यकीय सुविधा नसल्या मुळे त्यांचे प्रचंड हाल होतात . ( And at home we don't have adequate medical facilities ) अशा वेळी दोन्ही गोष्टी एकत्रित मिळाव्यात यासाठी . ( In such situations we make them avail both things at our hospital ) कमी खर्चात आम्ही हे हॉस्पिटल कम वृद्धाश्रम - बेड रिडन पेशंट ( Bed-ridden ) केअर सेंटर सुरू केले आहे . ( Started Hospital cum Old Age Home - Bed ridden Patient Care Center ) जे *महाराष्ट्रात एकमेव समर्पित ओल्ड एज हॉस्पिटल म्हणून प्रसिद्ध आहे* . महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून बुजुर्ग रुग्ण येथे उपचार देखभालीसाठी अड्मिट होतात . ( This is the only dedicated hospital in Maharashtra for caring and treating senior citizen )

2010 साली डॉ. मित्र एकत्र येऊन *डॉ. मित्र चेरिटेबल ट्रस्ट हॉस्पिटल* ( DMCT hospital ) उभे केले . सुरुवातीला ते पाच बेडचे होते . आता ते पन्नास बेडचे ( Now it's 50 Bedded Multifacility Hospital ) झाले आहे . सर्व सेवा, सुविधा ( Services and Facilities ) येथे उपलब्ध आहेत .जसे तीन बेड आय. सी. यु. ( ICU ) युनिट आहे . छोटे ऑपेरेशन थिएटर देखिल सुरू झालंय .

खालील अवस्थेतील सिनिअर सिटीझन ( Patients get admitted for following Symptoms ) आमच्या हॉस्पिटल कम वृद्धाश्रम ( Hospital cum Old Age Home ) मध्ये अड्मिट करू शकता .

01) *लकवाग्रस्त* ( Paralysis )
02) *बोन फ्रकचर* ( Bone Fracture - Operated )
03) *विसरभोळ्या अवस्था* ( Dementia )
04) *नाकातील नळीतून अन्न देणे* ( Feeding By Feeding tubes )
05) *काही दिवस , काही महिने इन्शुलिन इंजेक्शन किंवा इतर इंजेक्शन देण्यासाठी* ( For insulin Injection and Other intravenous Antibiotics injections ).
06) *पाठीवर कुल्यांवर जखमा , बेडसोर* ( Bedsores at back and on buttocks )
07) *आजारावरील उपचार* ( For treatment )
08) *फिजिओथेरपी साठी* (For Physiotheraphy)
09) *पार्किनसंस आजारी* ( Parkinsons Diseases )
10) *दीर्घकाळ देखभाल आणि मेडिकल देखरेखीखाली उपचार करण्यासाठी* ( For Caring Longtime and Treatment patient get admitted )
11) *जे बुजुर्ग एकटे असतात* ते येऊन कायमस्वरूपी येथे राहतात , शेवट पर्यंत ( Those who have no one to lookafter them get admitted here especially towards the end of his/ her Life )
12) *ज्यांची मुले परदेशी असतात ; दूर राहतात* . त्यांची सर्व प्रकारची देखभाल , उपचार व्यवस्था काही महिन्यासाठी किंवा काही दिवसांसाठी येथे करतात ( Those whose Children live away from them get admitted here till they come back )
13) *कमी खर्चात तज्ञांचे उपचार* मिळतात . हे आता जगजाहीर झाले आहे . सिरियस झालेले उदा . ब्रेन स्ट्रोक ( Brain Stroke ) इ. पेशंट बुजुर्ग आमच्या कडे विश्वासाने अड्मिट होतात आणि अगदी कमी दरात ठीक होऊन घरी जातात . विश्वास बसत नसेल तर आमचे यु ट्यूब वरील विडिओ जरूर पहा . आम्ही हे सेंटर पैसे कमावण्यासाठी सुरू केलेले नाही तर लोकांना सेवा मिळावी यासाठी सुरू केलेले आहे .. ( Now a days, in any serious condition like Brain stroke People do not go to Big Hospital instead they Come to our Hospital . Here they get treated under supervision of Expert team of our hospital and get recovery fast. We did not start this Hospital to get profit but to serve better to our *maay-bap* ( Seniors ) at *no loss ; no profit* Concept )
14) *मजबूरी असते* कीं घरी करणे शक्यच नसते .( Its a huge concern to have no option left in hand to be cared at home .)
अधिक माहिती साठी सेंटरला भेट द्या
*डॉ . रविंद्र जाधव* मो . 7977211807
*डॉ . सुरेखा जाधव* मो . 7021651887
*रायते* *मॅनेजर* मो. 8097275526
*पत्ता * : DMCT *हॉस्पिटल कम वृद्धाश्रम*
न्यु रचना पार्क , सेंट मेरी शाळे जवळ ,
चक्कीनाका ,कल्याण पुर्व ,जिल्हा - ठाणे ,
*Email* : drravindrajadhav2@gmail.com
https://m.facebook.com/100002386968327
*Youtube* :www.youtube.com/drmitrachannel
*Website* drmitraoldagehospital.in
*कृपया शेअर करा . कोणाला तरी नक्कीच फायदा होईल* *Thanks*