Submitted by योडी on 3 June, 2009 - 06:28
'लहानपणीचे खेळ' ह्या बीबीवरुन खुप नॉस्टॅल्जिक व्हायला झालं. त्यामुळे हा बीबी ओपन केला. खुप गोष्टी अश्या असतात त्या लहानपणातच केल्या जातात. अश्याच काही गोष्टी, गमती इथे शेअर करु.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मी लहान पणी एकदा दोनदा काही
मी लहान पणी एकदा दोनदा काही तरी उद्योग करुन पियाच्या नावावर खपवला आहे [पिया माझी जुळी बहीण

सीता और गीता
सीता और गीता
एकदा टायरची हवा सोडून देताना
एकदा टायरची हवा सोडून देताना मी पकडला गेलो होतो. तेव्हापासून कुणाचीही हवा गेली कि माझीच धुलाई व्हायची. सोडायचे सगळेच
४थीत असताना मी आणलेली वायर
४थीत असताना मी आणलेली वायर चेक करण्यासाठी एका टोकाला प्लग लावुन दुसरे दोन्ही वायर चे टोके सुरी वर टेकवले होते....... विद्युतप्रवाह पास होतो की नाही बघायला............ घराची संपुर्ण वायर जळली आनि त्यांनंतर घरातल्यांनी मला जळवला.......
उदयवन मी पण एकदा
उदयवन
मी पण एकदा विद्युतप्रवाहा भोवती कॉईल धरल्यावर त्यात चुंबकत्व कसं येतं हे पाहण्यासाठी एका खिळ्याभोवती स्प्रिंग धरली आणि खिळा ५ अॅम्प्सच्या सॉकेटमधे घातला आणि बटन ऑन केलं... खिळा हातातच धरलेला होता
इतक्या झिणझिण्या आल्या आणि नंतर मार खाल्ला ते वेगळच
किरण्या
किरण्या

किरण्या, तू अजुनही फारसा
किरण्या, तू अजुनही फारसा बदलला आहेस असे वाटत नाही
मस्त धागा
मस्त धागा
आमच्या शेजारच्या इमारतीला
आमच्या शेजारच्या इमारतीला मेहेंदीच्या झाडांचे कुंपण होते. एकदा सुट्टीत माझी चुलत बहीण रहायला आली होती. आम्ही दोघींन्नी दिवसा मेहेंदीची पाने तोडली. पाट्यावर वाटली आणि हाता पायाला लावुन बसुन गप्पा मारत होतो. तेवढ्यात बेल वाजली. दार कोण आणि कसं उघडणार? दोघींच्या हाता पायाला मेहेंदी ना!! मग शेवटी दोघी घसटत दारा पर्यंत गेलो. बसुनच दार उघडु लागलो. कसेबसे दार उघडले. बाहेर आई ऑफिस मधुन आली होती. आत आल्या वर तिने आमचे उद्योग पाहिले. सगळ घर आणि स्वयंपाकघर मेहेंदीच्या डागांन्नी बरबटलेले होते. पुढे काय झालं सांगायची गरज आहे!!!!!!
भारी किस्से एकेकाचे. मी लहान
भारी किस्से एकेकाचे.
मी लहान असताना एकदा मम्मीबरोबर मामाला मुलगी बघायला गेलो होतो. त्यानी खायला पोहे आणि सरबत दिले. बैठक संपली आणि सगळे निघाले, तेव्हढ्यात मी पचकलो " मम्मे अजुन चहा कुठे दिलाय?", सगळे नको नको म्हणत असताना मुलीकडच्याना चहा करायला लागला
आणि एव्हढ्यावरच नाही थांबलं, एव्हढं होऊनही मम्मी पुढच्या वेळी त्याच मामाला मुलगी बघायला जाताना मला घेऊन गेली. तसं मी घरी काही खाल्लं असेल तर बाहेर दुसर्या लोकांच्यात जाऊन काही खात नाही हे मम्माला माहित होतं, आणि मी बाहेर बोलायला लाजायचो, त्यामुळे तिने घरीच मला भात खाऊ घातला होता. मग तिकडे गेल्यावर, पाहुण्यानी मला विचारलं "खाऊ पाहिजे का?", लगेच मम्मा म्हणाली "अहो कशाला तुम्हाला त्रास, तो घरुन खाऊन आलाय" तेव्हढ्यात मी केकाटलो, " मला आमटी भात पाहिजे" मम्माला कुठुन बोललो असं झालं.
त्यावेळी पासुन आजतागायत, एव्हढा मोठा झालो तरी, जिथे जिथे मी मम्मी बरोबर बाहेर फिरायला जातो, मम्मी दही भात माझ्या साठी वेगळा बांधुन घेते
हा धागा ऑफीसला असताना वाचला
हा धागा ऑफीसला असताना वाचला आणि फ्लोरवरचे सगळे माझ्या जवळ जमा झाले मला काय झाले हे बघायला... हसून हसून डोळ्यात पाणी आले.. शेवटी तोंडात रुमाल कोंबून हसत होते... पेज लहान (minimize) करून ठेवले पण लक्षच लागत नव्हते मग पुन्हा हसणे सुरु... बरं तर हा माझा किस्सा... आम्ही दोघी बहिणी आई बरोबर एका समारंभाला गेलो होतो तेव्हा शिवाजी महाराजांना हार घालून समारंभ सुरु होत होता... सगळीकडे पिन ड्रोप सायलंस..... तेवढ्यात माझी बहिण जोरात ओरडली... "आई शिवाजी महाराज मेले... त्यांना हार घालतायत..." आधी दीप प्रज्वलन झालेले आणि मग हे फुल-हार प्रकरण... झाले सगळे सभागृह जोरदार हसण्यात बुडून गेले...
एकदा लहानपणी मी राज्गीरयाचा
एकदा लहानपणी मी राज्गीरयाचा लाडू खात होते आणि तो कुठेतरी पडला..ते माझ्या लक्षात आलं नाही. नंतर पाणी प्यायला माठात फुलपात्र बुडवलं तर त्यामध्ये वाळा घातलेला होता..मी जोरजोरात ओरडायला लागले कि " आई, दादानी माझा लाडू माठात टाकला.." आणि घर डोक्यावर घेतलं ! आई नि पहिले दादा ला २-४ रट्टे घातले..त्यानंतर माठात डोकावून पाहिलं...आणि मग मलाच चांगला प्रसाद मिळाला.. !
मज्जा आली वाचुन.... एकदा
मज्जा आली वाचुन....
एकदा आईने नुकतेच रॉकेल आणून मागच्या खोलीत ठेवलं होत आणि आई stove आणायला घरामध्ये गेली.
मला ते काय होत ते नव्हत पण तो निळा रंग फार आवडला.. म्हणून मी ते प्यायला सुरुवात केली.. पण काही चांगल नाही लागल ते म्हणून ठेवून दिलं..
आई तिथे येईपर्यंत मी चांगलीच घुमायला लागली होती... त्यामुळे रवानगी डॉक्टरकडे...(मार खायचा वाचला)
तसेच आमच्या जुन्या घरी लाकडी देव्हारा स्वयंपाकघराच्या ओट्याखाली होता. एकदा संध्याकाळी आई ने दिवा लावला होता आणि आई आंगणात गेली होती मी गम्मंत म्हणून दिव्यावर कागद जाळत बसली होती,आणि आई अचानक घरात आली म्हणून तो कागद तसाच सोडून पळाली ...आणि ती आग तशीच पसरत जाऊन,आमच्या देव्हार्याने पेट घेतला...आई ची चांगलीच गडबड उडाली, आई ने पाणी ओतून विजवली आग..नाहीतर cynlinder जास्त सूर नव्हता
देवांची रवानगी दुसर्या रूममध्येवरती फळीवर झाली...
आई पप्पानी माझी कुंडली बघितली ... गुरुजी बोलले आगीपासून हिला दूर ठेवा... नाहीतर बाकीच्या लोकांना खूप त्रास आहे. पण ते शक्य नव्हत कारण मीच आग होती ... AAG ... अर्चना अशोक गवस.
तसं असेल तर आगीपासून दूर रहा
तसं असेल तर आगीपासून दूर रहा आणि राम गोपाल वर्मापासूनही.
अरे, हा धागा वर काढल्याबद्दल
अरे, हा धागा वर काढल्याबद्दल धन्यवाद. आजच एका जवळच्या मैत्रिणीने तिच्या लहानपणीचा किस्सा सांगितला तेव्हा ह्या धाग्याची आठवण आली होती.
ह्या माझ्या मैत्रिणीला ती लहान (चौथीत असेल) कुणीतरी सांगितले होते की गोम कानातून मेंदूत जाते आणि मेंदू आतून पोखरते. इतकेच नव्हे तर एका स्त्रीच्या कानातून अश्या प्रकारे गोम आत जाऊन तिचा मेंदू आतून पोकळ झाल्याची आणि त्या स्त्रीच्या सासूने भांडणा दरम्यान तिच्या डोक्यावर लाथ मारली असता, डोके चपटे झाल्याची व पर्यायाने त्या स्त्रीचा करूण (की हास्यास्पद?) अंत झाल्याची सुरस कथाही सांगितली होती. मैत्रिणीच्या मनात ह्या प्रकाराने इतकी भीती बसली होती की पुढे कित्येक दिवस रात्री झोपताना ती स्वतः तर कानात कापसाचे बोळे घालत होतीच पण घरातले सर्व (बहिण, भाऊ आणि आई-वडील) गाढ झोपले की त्यांच्याही कानात गुपचूप कापसाचे बोळे घालत राहिली. त्यासाठी रात्री झोपण्यापूर्वी सर्वांच्या नावाचे का. चे बो. बनवून स्वतःच्या उशाशी लपवून ठेवत होती म्हणे!
एके दिवशी वडील सकाळी उठून तिला ओरडले तर "पप्पा, प्लीज मला तुम्ही सर्व जण हवे आहात. प्लीज आपण सर्व जण असे बोळे कानात घालूनच झोपत जाऊया" म्हणून गयावया करत रडली. तर तिच्या वडीलांच्या ओळखीतल्या एका सद्गृहस्थांनी तिला सांगितले की 'अशी कानात गोम वै. गेली तरी घाबरण्याचे कारण नसते. कधी जर का कानात गोम गेलीच तर पुरणपोळी किंवा गूळ इ. गोड पदार्थ कानाशी धरायचा की गोम गोड खाण्यासाठी म्हणून लगेच बाहेर येते.' तर ह्या मुलीने आईने एकदा त्यानंतर पुपो केली असता कानाशी लावून ठेवली होती. का तर म्हणे आधी कधी गोम कानात गेली असेल तर बाहेर येईल म्हणून!
आता हे सर्व सांगताना तिला हसू आवरत नव्हते.
निंबे गोम पुपो (हा किस्सा
निंबे

गोम
पुपो
(हा किस्सा मैत्रिणीचा ना ?
बरं बरं. आम्हाला क्काय, !! )
हा किस्सा मैत्रिणीचा ना ?
हा किस्सा मैत्रिणीचा ना ? बरं बरं. आम्हाला क्काय, !! >>>> हीहीहीहीही!!!
निंबे भलतीच आहे की तुझी
निंबे भलतीच आहे की तुझी मैत्रिण.

(No subject)
गोम ची वरची गोष्ट मलापण
गोम ची वरची गोष्ट मलापण लहानपणी सांगितली होती ते पोखरणे वगैरे..

आत्याकडे राहायला गेल्यावर कानात शेणातला किडा गेला होता कठीण पाठीचे टरफल असणारा.. ती अख्खी रात्र जो काय थयथयाट केला होता तो अजुनही सगळे आठवुन हसतात आता पण त्यावेळी सगळ्यांच्या तोंडचे पाणी पळालेलें.. नंतर दुसरया दि वशी माझी रवानगी माझ्या घरी.. डॉ . ने औषध दिले त्यामुळे त्या किड्याचे एकेक अवयव कित्येक महिने माझ्या कानातुन बाहेर यायचे वन बाय वन .. मी एका पुडीत बांधुन ठेवले होते आत्याला दाखवायला.. त्यानंतर मी जेव्हा त्यांनी घरात फरशी बसवली तेव्हाच गेलो राहायला पण आधीचा अनुभव गाठीशी असल्याने आत्याने तेव्हा पण स्कार्फ दिला होता रात्री..
काय भन्नाट किस्से आहेत एका
काय भन्नाट किस्से आहेत एका एकाचे!!
आमच्याशेजारी एक नवे कुटुंब शिफ्ट झाले होते. त्यांच्या मुलांचे आणि आमचे कधीच पटायचे नाही. त्या काकू पण सारखी आमची तक्रार करायच्या.
एकदा आम्ही नाक्यावरच्या हॉटेलात फोन करुन मस्त २००-३०० ची ऑर्डर दिली. होम डिलीवरी घेऊन माणूस घरी आला. काकू आणि वेटरची वादावादी आम्ही दाराआडून ऐकत होतो.
असे अजुन एकदा केले पण त्यानंतर तिसर्यावेळी आईनेच आम्हाला पकडले आणि जबरदस्त चोप दिला.
अजुनही अनेक उद्योग केले होते, सवडीने टाकीन.
माझ्या आईच्या मैत्रिणीच्या
माझ्या आईच्या मैत्रिणीच्या नातवाने दुपारी आज्जी झोपली असताना देवघरातले सगळे देव (सकाळी सोवळ्यात पूजा केलेले) तिच्या उशाशी ठेवले. आज्जीची झोप झाल्यावर ती या धक्क्यातून सावरायच्या आधीच वर तिला झापले त्यांना (देवांना) ही उभं राहून दमायला होते.
आमच्याकडे उन्हाळ्यात १/२
आमच्याकडे उन्हाळ्यात १/२ कलिंगड कोणीतरि आणल होत.आईने ते पातेल्याखालि झाकुन ठेवल , दुस्र्यदिव्शी उपवास होता त्या दिवशी खाऊ म्हणुन. मग दुसर्या दिवशी मस्त पैकी सगले बसलो कलिंगड खायला. आईने ते काढ्ल.. पहातो तो काय कलिंगडाची वाटीच होती शिल्ल़क ...गाभा गायब .. भावाने मस्तपैकी फस्त केल होत कोनाला कळु न देता..:)
(No subject)
हा किस्सा माझ्या
हा किस्सा माझ्या बालपणीचा.......माझी बालमैत्रीण आणि मी दुपारी घरी खेळत होतो. माझा भाऊ सुद्धा आमच्या बरोबर होता. मला कधी न्हावे ती आईची शिवणाची कातर हातात मिळाली होती. मी माझ्या भावाचे पुढचे हातात येतील तेवढे केस कापले पण तो काही बोलला नाही. मग आम्ही आमचा मोर्चा माझ्या मोठ्या ताई कडे वळवला. ती नेहमी आम्हाला ताईगिरी करावयाची. त्या दुपारी पण आमचं तिच्या बरोबर भांडण झाले होते. ती झोपली असताना तिची एक वेणी बेड वरून खाली आली होती मी ती कापली आणि कापलेली वेणी तशीच बेड खाली सोडून आम्ही पळून गेलो.
ती जेव्हा झोपून उठली आणि तोंड धुवत असताना तिच्या लक्षात आले एक वेणी कमरेपर्यंत लांब आहे आणि एक वेणी गायब आहे. तिने जे रडावयास सुरवात केली आणि मग तिला समजावता समजावता भावाचे पुढचे कापलेल केस पण लक्षात आले आणि आईची कातर पण गायब होती मग काय आई ला पण आजीची बोलणी आणि मला आई, आजी, ताई सगळ्यांनी खूप ओरडले एकटे माझे बाबा तेवढे हसत होते.
बांगडीचा पडदा बनवण्याचा
बांगडीचा पडदा बनवण्याचा उद्योग आम्ही पण केला होता . आमचे पपा दुपारी शाळा संपवून घरी यायचे (पपा) .आमची आई दुपारी कामाला जायची घरात पपा असायचे.
पपा झोपले होते आणि मी आणि माझी बहिण हा उद्योग करत होतो . ती ४ वर्षांची आणि मी ७ .पपा उठले म्हणून घाईघाईने मेणबत्ती विझवली आणि उचलताना ते गरम मेण माझ्या बहिणीच्या अंगावर पडलं. तिने भोकाड पसरलं आणि आम्हाला मार बसला .
एकदा असेच पपा त्यांच्या शर्ट ला इस्त्री करत होते . काहीतरी झाला म्हणून ते आत गेले. इकडे अस्मादिकांनी संधी साधून पायमोज्याला इत्री केली .तो वितळला . पपा आले म्हणून पटकन लपवून ठेवला . पपा पुन्हा शर्टला इस्त्री करायला लागले. त्या वितळलेल्या चीक्त्यामुळे शर्ट खराब झाला आणि आमच्या कानाखाली बसली .
१ आवडता उद्योग म्हणजे गादीवरच बेद्शीत थोडसं फाटलं असेल तर त्यात बोटं घालून अजून फाडणे.
मला लहानपणी जेवायला अजिबात आवडायचा नाही . भाजी चपाती दिली कि आई आत गेल्यावर मी पटकन गादीखाली लपवून ठेवायची . नंतर ती बाहेर नेवून टाकायला विसरायची . आणि मग कधीतरी
स्वच्छता करताना गाडी काढली कि बर्याच चपात्या मिळायच्या .
आमची लहानपणीची फेमस वाक्य म्हणजे "अंबाबाई चीम्बाबाई नमस्कार . खालून दिसतोय चमत्कार " आणि "आदा पदा कोण पादा दामाजीचा घोडा पादा ".
माझ्या मैत्रिणीच्या मुलीचा
माझ्या मैत्रिणीच्या मुलीचा किस्सा माझी मैत्रीण तिचा नवरा मी आणि माझा नवरा आणि त्याची मुलगी ( माझ्या मुलीला खाऊन पिउन सासू बाईकडे सुपूर्त करून आम्ही निघालो ) हिदी सिनेमा बघायला गेलो होता सिनेमा मध्ये रोमेंटिक सिने चालू होता ( हॉट) सगळीकडे शांतता होती एवढ्यात मैत्रिणीची मुलगी ओरडली " ये झोप आत्ता , मस्ती करतायत ते " अस बोलल्यावर माझा नवरा जोराने हसला आणि त्या मागे आखा सिनेमा हाल हसू लागला . रोमान्तिक सेंन चा कचरा केला होता तिने
मुला फार इंनोसिंत असतात
आत्ता माझा किस्सा, मी
आत्ता माझा किस्सा, मी कोकणातील कणकवलीla मामाच्या घरी गेलो होती म्हणजे आमची फमिली. छान चिकन मच्छी च बेत होता. गावी वशाद स्वयपाक घरात बनत नेसे ते पटल्या दरी बनत असे माझी मामी आजी सगळ्या पातल्या दरी होत्या त्यांनी स्वयपाक घरात चुलीवर भात मुरायला टाकला होता मी मस्त काजी ( काजू) निखार्यावर भाजायला टाकल्या आणि छान मोठा जाल झाला
निदान १५ ते २० काजी टाकल्या होत्या आणि त्याजालाने भात पुरे पूर करपला. आणि माझी चं अशी बिन पाण्याची चाम्प्पी झाली आणि एवडा मी त्यावेळी बसेन एवढा भात करपला .
आणि माझा मामा बोलला लि आत्ता आपण अमुचा मतान करू या टोपात राहील मग मामा कधी कोयता घेऊन आला कि मी लपून बसे आत्ता नाही घाबरत कोयत्याला आणि काजूला
माझी मैत्रीण तिचा नवरा मी आणि
माझी मैत्रीण तिचा नवरा मी आणि माझा नवरा आणि त्याची मुलगी ( माझ्या मुलीला खाऊन पिउन सासू बाईकडे सुपूर्त करून आम्ही निघालो )
ह्या वाक्यात स्वल्पविरामाचं बघा राव जरा.
मी 'माझा नवरा आणि त्याची मुलगी' ह्या वर बराच वेळ विचार करतं बसलो, नवर्याची मुलगी आहे तर ते 'त्याची मुलगी' का लिहिलय , सरळ "मी, नवरा आणि मुलगी" असं का नाही लिहिलं.
थोड्या वेळाने लक्षात आलं की ते मैत्रिणीच्या मुलीसाठी लिहिलय.
अहो अम्या, जरा सुद्दलेकन
अहो अम्या, जरा सुद्दलेकन बडोबड लिआ.
पातल्या, पटल्या, मतान >>>>
रोमान्तिक सेंन चा >>> कोणतरी बंगाली बाबु वाटतोय.
Pages