बॉटनी इन बॉलीवुड (चित्रपटसंगीतात आलेले झाडाझुडुपांचे/फुलापानांचे उल्लेख)

Submitted by स्वाती_आंबोळे on 10 December, 2021 - 16:32

न्यूयॉर्कच्या बोटॅनिकल गार्डनमध्ये शेक्सपिअर विंग आहे. त्याच्या लेखनात उल्लेख आलेली झाडंझुडपं तिथे जोपासली आहेत. प्रत्येक झाडापाशी त्याच्याशी संबंधित असलेल्या उतार्‍याचा बोर्ड लावला आहे. काही वर्षांमागे तिथे गेले असताना 'असं एखादं उदा. गुलजार गार्डन' मुंबईत केलं तर किती मजा येईल' असं मनात आलं होतं. कालांतराने त्याचा विसर पडला.

काल एका मायबोली-मैत्रिणीने सहज गप्पा मारताना "'कदंबा'चा उल्लेख असलेलं हिंदी गाणं" म्हणून 'चुपके चुपके' चित्रपटाच्या शीर्षकगीताचा उल्लेख केला. 'ऐसे जैसे के कोई राधा की सहेली मैं भी ढूंढूँ कदम्ब की छैया' अशी ओळ आहे त्यात.
त्यावरून मला पुन्हा एकदा त्या शेक्सपिअर गार्डनची आठवण झाली.

गार्डन होईल, न होईल, पण निदान गाणी आठवायला काय हरकत आहे.

ही सहज सुचलेली यादी सुरुवात म्हणून देत आहे, तुम्हाला आठवतील तशी यात भर घाला.

हिंदी:

1. मिला है किसी का झुमका ठंडे ठंडे हरे हरे नीम तले
2. चुपके चुपके चल री पुरवैया (मैं भी ढुंढूँ कदम्ब की छैया)
3. तेरे बिना (तेरे संग कीकर पीपल)
4. थोडी सी जमीं, थोडा आसमाँ (बाजरे के सिट्टों से कौए उडाएंगे)
5. म्हारो गाँव काठावाडे (जहाँ बड पीपल की छैया)
6. चने के खेत में
7. इक चमेली के मंडवे तले
8. आप की आँखों में कुछ (लब हिले तो मोगरे के फूल खिलते हैं कहीं)
9. केतकी गुलाब जूही चंपक बन फूले
10. चंदन सा बदन
11. चली पी के नगर (झूले, पीपल, अंबुवा छाँओ)
12. अंबुवा की डाली पे बोले रे कोयलिया
13. छुप गये सारे नज़ारे (अंबुवा की डाली पे गाये मतवाली)
14. मेरी बेरी के बेर मत तोडो
15. बंगले के पीछे तेरी बेरी के नीचे
16. नजर लागी राजा तोरे बंगले पर (जो मैं होती राजा बेला चमेलिया)
१७. दूर कहीं इक आम की बगिया
१८. गुलमोहर गर तुम्हारा नाम होता
१९. मैं तुलसी तेरे आंगन की
२०. लवंगी मिरची मैं कोल्हापुरची, लगी तो मुश्किल होगी

मराठी:
१. गोरा गोरा पान जसं केवड्याचं रान, खुलविते मेंदी माझा रंग गोरापान
२. मेंदीच्या पानावर
३. लटपट लटपट तुझं चालणं (जाईची वेल कवळी)
४. नाच रे मोरा आंब्याच्या बनात
५. चिंचा आल्यात पाडाला, हात नका लावू माझ्या झाडाला
६. केळीचे सुकले बाग
७. लिंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला गं बाई
८. चंपा, चमेली की जाई, अबोली
९. चाफा बोले ना
१०. बिबं घ्या बिबं, शिकंकाई
११. माळ्याच्या मळ्यामंदी कोन गं उबी - वांगी तोडते मी रावजी
१२. केतकीच्या बनी तिथे नाचला गं मोर

मराठी यादीतली काही गाणी चित्रपटगीतं नाही म्हणून लिहावीत की नाही असा विचार करत होते, पण असू दे. Happy

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

टेक्स्ट पांढरा करण्याचा प्रयत्न केला पण होत नाहीये. फॉन्टही बारीक होत नाहीये. आता परत टाकत नाही. पण आहे ते अवांतर राहू देत.

विनासायास चांगल्या कविता वाचायला मिळाल्या. त्याबद्दल खरे तर आभारच.
धागाकर्ती किंवा प्रशासनाचे वेगळे म्हणणे असेल तर त्यांचा मान राखायलाच हवा.

नक्कीच उत्तम संग्रह होउ शकतो. मी काही वेगळा कवितांचा धागा मात्र काढत नाही. प्रचंड कॉन्शस व्हायला होतं. आणि मग प्रत्येक प्रतिसदावरती 'धन्यवाद-आभार' करत बसते मी Happy

नाच रे मोरा मी वर लिहिलं आहे भरत. पण तशी अजून पण काही गाणी रिपीट झाली आहेतच.

सामो, वाटल्यास पहिली ओळ आणि विषयाशी संबंधित ओळ एवढंच ठेवा.

फास्टेस्ट सेंचुरी मारल्या बद्दल बाफाचे अभिनंदन.

पत्ता पत्ता बूटा बूटा प्यार हमारा जाने रे. हे बूटा म्हणजे झाड माहीत नव्हते तेव्हा तेव्हा अरे बुटाला पण माहीत पड्लं ह्यांचं प्रेम अशी शंका आली होती.

निव डुं ग नावा चा एक फुल अल्ब मच आहे.

https://www.youtube.com/watch?v=GVgUbrYDJIc

न मारो फूल गेंदवा
न मारो डर जाऊंगी
हाय हाय राम मर जाउंगी
फूल गेंदवा न मारो डर जाऊंगी
हाय हाय राम डर जाऊंगी

कविता?
निवडुंगाच्या शीर्ण फुलांचे
झुबे लालसर ल्यावे कानी
जरा शिरावे पदर खोवूनी
करवंदीच्या जाळई मधुनी

https://www.youtube.com/watch?v=Z7uezmrhdwg

साँसों की सरगम धड़कन की वीना
सपनों की गीताँजली तू
मन की गली में महके जो हरदम
ऐसी जुही की कली तू
छोटा सफ़र हो लम्बा सफ़र हो
सूनी डगर हो या मेला
याद तू आए मन हो जाए भीड़ के बीच अकेला
हाँ बादल बिजली चंदन पानी
जैसा अपना प्यार लेना होगा जनम हमें
कई कई बार

https://www.youtube.com/watch?v=TeNYSpnys8M
हो मोरा नादाँ बालमा न जाने दिल की बात
चुपके रहे जैसे चंपा की डाली फिर भी न समझे बगिया का माली
फिर भी न समझे बगिया का माली होगी बर्बादी ये सोची थी जान
तौबा तौबा ये बुरी है मर्दों की चाल

नॉनफिल्मी असावे बहुतेक पण बॉलीवुडचेच म्हणता येइल नाही का!

https://www.youtube.com/watch?v=HLJenco0Dt4
एक लड़की मेरे ख़्वाबों में आती है - वो तुम हो
वो तुम हो
मेरी प्रिया तुम ही तो हो
छुई मुई सी तुम लगती हो फूलों जैसी हसती हो
जिस दिन से देखा है तुम मेरे साँसों में, दिल में रहती ही

कुणितरी घोसावळ्याचा उल्लेख केला आहे वर.

आरे खोप्यामधी खोपा मध्ये “गिलक्याचा कोसा” येतो.

आरती प्रभुंच्या कवितेत (आणि त्याच्या झालेल्या गाण्यात) फुले, कळ्या, निर्माल्य,पाचोळाअ, पाने, पाते हे शब्द बरेचदा येतात. प्रत्यक्ष नावेही येतात अनेकदा. तू तेव्ह तशी मअधली चाफेकळी म्हणजे चफ्याची कळी ना? कुणाच्या खान्द्यावर मध्ये गुलाब येतो. समईच्या शुभ्र कळ्या - जाई, विश्रब्ध मनाच्या कातरवेळी - प्राजक्त, नाही कशी म्हणू तुला - सुपारी,

ने मजसी ने मध्येही गुलाब.

मज आवडले हे गाव गाण्यात एकाच ओळीत “निंब, बाभळी, अंबा, उंबर“ येतात.

https://www.youtube.com/watch?v=UVRJnh70ulo

नर्गिस-ए-मस्ताना बस इतनी शिकायत है
बस इतनी शिकायत है समझा हमें बेगाना
बस इतनी शिकायत है
हर राह पर कतराए
हर मोड़ पर घबराए मुँह फ़ेर लिया है तुमने
हम जब भी नज़र आए

नर्गिसच्या फूलावरती हा शेर आहे-

हज़ारों साल नर्गिस अपनी बे-नूरी पे रोती है
बड़ी मुश्किल से होता है चमन में दीदा-वर पैदा

गवतफूल किंवा रानटी फूल.

https://www.youtube.com/watch?time_continue=1&v=HgHjUMQzVaU&feature=emb_...
मैं जहाँ चला जाऊं बहार चली आए ए
हो महक जाए राहों की धूल - मैं बनफूल बन का फूल
बैरी बड़ा ज़माना हाँ हो कदर मेरी ना जाना
किसी की भी आँखों ने मुझे नहीं पहचाना
दुनियां गई मुझको भुल - मैं बनफूल बन का फूल

ने मजसी ने मध्येही गुलाब >> तो बालगुलाब. आपल्याकडे बटण गुलाब म्हणतात तो हाच का?

>>>

त्यांच्या लहान मुलासाठी वापरलेली उपमा आहे ना? बाल (लहान) + गुलाब? की बालगुलाब असे फूल आहे?

https://www.youtube.com/watch?v=fQub3Iqfvg8
सूरजमुखी मुखड़ा तेरा चमका दे तू जीवन मेरा
पायल तेरी चमके अगर मधुबन बने आंगन मेरा
वेदो के जैसे तेरे वचन
देदी है तूने इतनी खुशी कम पड़ गया है दामन मेरा
तेरा बदन ये तेरा बदन रजनीगन्धा जैसा तेरा बदन
तू है जहां वह चमन महके पवन महके गगन
पारस है तू छू ले अगर कंचन सा निखरे जीवन मेरा

हपा बटन गुलाब असू शकते असे माझे मत आहे. अजुन एक - आम्रवृक्षाचाही उल्लेख आहे या गाण्यात. तेव्हा क्वालिफाय तर १००% होते आहे.

एक विलक्षण सुंदर गाणे. आधीच झाले असल्यास माफ करा. -

https://www.youtube.com/watch?v=bWqEOGiOlO8
बगळ्यांची माळ फुले अजुनी अंबरात
.
त्या गाठी, त्या गोष्टी, नारळीच्या खाली
पौर्णिमाच तव नयनी भर दिवसा झाली

चिंचेच्या पानावर देऊळ रचियले |
आधी कळस मग पाया रे ||

देवपूजू गेलो तव देऊळ बुडाले |
खेळिया सद्गुरुराया रे ||

पाषाणाची सांगण मृगजळ डोही |
वांझेचा पुत्र पोहला रे ||

दुतोंडी हरीणी पाणियासी आली |
मुखाविण पाणी प्याली रे ||

आंधळ्याने देखिले बहिऱ्याने ऐकिले |
पांगळ्याने पाठलाग केला रे ||

एकाजनार्दनी एकपणे विनवी |
हरीच्या नामे तरले रे ||

>>>>>>>न्यूयॉर्कच्या बोटॅनिकल गार्डनमध्ये शेक्सपिअर विंग आहे. त्याच्या लेखनात उल्लेख आलेली झाडंझुडपं तिथे जोपासली आहेत. प्रत्येक झाडापाशी त्याच्याशी संबंधित असलेल्या उतार्‍याचा बोर्ड लावला आहे. काही वर्षांमागे तिथे गेले असताना 'असं एखादं उदा. गुलजार गार्डन' मुंबईत केलं तर किती मजा येईल' असं मनात आलं होतं.

नक्की जाइन ती बाग पहायला. काय कल्पक संकल्पना आहे. खूप सुंदर.

Pages