बॉटनी इन बॉलीवुड (चित्रपटसंगीतात आलेले झाडाझुडुपांचे/फुलापानांचे उल्लेख)

Submitted by स्वाती_आंबोळे on 10 December, 2021 - 16:32

न्यूयॉर्कच्या बोटॅनिकल गार्डनमध्ये शेक्सपिअर विंग आहे. त्याच्या लेखनात उल्लेख आलेली झाडंझुडपं तिथे जोपासली आहेत. प्रत्येक झाडापाशी त्याच्याशी संबंधित असलेल्या उतार्‍याचा बोर्ड लावला आहे. काही वर्षांमागे तिथे गेले असताना 'असं एखादं उदा. गुलजार गार्डन' मुंबईत केलं तर किती मजा येईल' असं मनात आलं होतं. कालांतराने त्याचा विसर पडला.

काल एका मायबोली-मैत्रिणीने सहज गप्पा मारताना "'कदंबा'चा उल्लेख असलेलं हिंदी गाणं" म्हणून 'चुपके चुपके' चित्रपटाच्या शीर्षकगीताचा उल्लेख केला. 'ऐसे जैसे के कोई राधा की सहेली मैं भी ढूंढूँ कदम्ब की छैया' अशी ओळ आहे त्यात.
त्यावरून मला पुन्हा एकदा त्या शेक्सपिअर गार्डनची आठवण झाली.

गार्डन होईल, न होईल, पण निदान गाणी आठवायला काय हरकत आहे.

ही सहज सुचलेली यादी सुरुवात म्हणून देत आहे, तुम्हाला आठवतील तशी यात भर घाला.

हिंदी:

1. मिला है किसी का झुमका ठंडे ठंडे हरे हरे नीम तले
2. चुपके चुपके चल री पुरवैया (मैं भी ढुंढूँ कदम्ब की छैया)
3. तेरे बिना (तेरे संग कीकर पीपल)
4. थोडी सी जमीं, थोडा आसमाँ (बाजरे के सिट्टों से कौए उडाएंगे)
5. म्हारो गाँव काठावाडे (जहाँ बड पीपल की छैया)
6. चने के खेत में
7. इक चमेली के मंडवे तले
8. आप की आँखों में कुछ (लब हिले तो मोगरे के फूल खिलते हैं कहीं)
9. केतकी गुलाब जूही चंपक बन फूले
10. चंदन सा बदन
11. चली पी के नगर (झूले, पीपल, अंबुवा छाँओ)
12. अंबुवा की डाली पे बोले रे कोयलिया
13. छुप गये सारे नज़ारे (अंबुवा की डाली पे गाये मतवाली)
14. मेरी बेरी के बेर मत तोडो
15. बंगले के पीछे तेरी बेरी के नीचे
16. नजर लागी राजा तोरे बंगले पर (जो मैं होती राजा बेला चमेलिया)
१७. दूर कहीं इक आम की बगिया
१८. गुलमोहर गर तुम्हारा नाम होता
१९. मैं तुलसी तेरे आंगन की
२०. लवंगी मिरची मैं कोल्हापुरची, लगी तो मुश्किल होगी

मराठी:
१. गोरा गोरा पान जसं केवड्याचं रान, खुलविते मेंदी माझा रंग गोरापान
२. मेंदीच्या पानावर
३. लटपट लटपट तुझं चालणं (जाईची वेल कवळी)
४. नाच रे मोरा आंब्याच्या बनात
५. चिंचा आल्यात पाडाला, हात नका लावू माझ्या झाडाला
६. केळीचे सुकले बाग
७. लिंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला गं बाई
८. चंपा, चमेली की जाई, अबोली
९. चाफा बोले ना
१०. बिबं घ्या बिबं, शिकंकाई
११. माळ्याच्या मळ्यामंदी कोन गं उबी - वांगी तोडते मी रावजी
१२. केतकीच्या बनी तिथे नाचला गं मोर

मराठी यादीतली काही गाणी चित्रपटगीतं नाही म्हणून लिहावीत की नाही असा विचार करत होते, पण असू दे. Happy

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

* हे श्यामसुंदर, राजसा, मनमोहना विनवुनी सांगते तुज
जाऊ दे मला परतुनी.......

..........पानजाळी सळसळे का भिवविती रे लाख शंका थरथरे, बावरे मन, संगती सखी नच कुणी

* त्या तरुतळी विसरले गीत
त्या तरुतळी विसरले गीत.....

....... विशाल तरू तरी फांदी लवली
थंडगार, घनगर्द सावली

.......मदालसा तरुवरी रेलुनी
वाट बघे सखी अधिर लोचनी
मदालसा तरुवरी रेलुनी
वाट बघे सखी अधिर लोचनी
पानजाळी सळसळे, वळे ती मथित हृदय कवळीत

अहो ऐका चतुरा अध्यात्माची कहाणी
किस्नाने भुलविल्या यमुनेवर गौळणी
ऐन दुपारी गौळण नारी आल्या यमुनेवरी
खुशाल सोडून दिल्या जळावर नक्षीच्या घागरी
वसने सुटली अलगद पडली ओल्या काठावरी
ठुमकत गोपी जळात शिरल्या उठली का शिर्शिरी
गोपी न्हाण्यात होत्या दंग
तोच आला सखा श्रीरंग
गोळा करुन वस्त्रं सारी
बसला चढून कळंबावरी (कदंबावरी)

नको न्याहाळू नितळ काया ओलेती उघडी
दे रे कान्हा, चोळी अन् लुगडी

हा महाल कसला
रान झाडी हि दाट
अंधार रातीचा
कुठ दिसणा वाट
कुण्या द्वाडान घातला घावं
केली कशी करणी
सख्या रे सख्या रे
सख्या रे घायाळ मी हरिणी

बहरला पारिजात दारी
फुले का पडती शेजारी ?
माझ्यावरती त्यांची प्रीती
पट्टराणी जन तिजसी म्हणती
दुःख हे भरल्या संसारी !
असेल का हे नाटक यांचे
मज वेडीला फसवायाचे ?
कपट का करिति चक्रधारी ?
का वारा ही जगासारखा
तिचाच झाला पाठीराखा
वाहतो दौलत तिज सारी !

ये ज़िन्दगी उसीकी है, जो किसीका हो गया
ये ज़िन्दगी उसीकी है, जो किसीका हो गया
प्यार ही में खो गया (दु:खी गाणं)

जो दिल यहाँ न मिल सके, मिलेंगे उस जहान में
खिलेंगे हसरतों के फूल जा के आसमान में
यह ज़िंदगी चली गई जो प्यार में, तो क्या हुआ

सुनाएगी ये दास्तां, शमा मेरे मज़ार की
फिजा में भी खिली रही, यह कली अनार की
इसे मज़ार मत कहो, यह महल है प्यार का

लपविलास तू हिरवा चाफा सुगंध त्याचा लपेल का
चिचा आल्यात पाडाला हात नका लावू माझ्या साडीला
पान जागे फुल जागे भाव नयनी दाटला
मी आज फुल झाले जणू कालच्या कळीला लावण्य रूप आले
केतकीच्या बनी तिथे नाचतो ग मोर
मोगरा फुलला मोगरा फुलला

छान धागा!
गेले ते दिन गेले (कदंबतरूला बांधून दोला, उंचखालती झोले)

>>>>चंदनावर अनेक गाणी असावीत असं वाटतंय, पण आता आठवतं नाहीत.>>>

चंदनाच्या देव्हाऱ्यात उभा पांडुरंग
मुकेपणा आज माझा आळवी अभंग

चंदनाचे परिमळ आम्हा काय त्याचे
तुझे नाम गोड किती घेऊ आम्ही वाचे

चंदनाच्या पाटावर सोन्याच्या ताटामधी मोत्याचा घास तुला भरविते

वाह! नुसत्या पोस्ट्स वाचून मन प्रसन्न झालं! छान धागा! एक चटकन सुचलेलं गाणं
सहज सख्या एकटाच येई सांजवेळी, वाट तुझी पाहीन त्या आम्रतरू खाली

अजून एक - तू बिन बताए (रंग दे बसंती) मिसरी की डली जिंदगी हो चली.

इथे अंताक्षरी सारखं झालं आहे, सगळ्यांना ऐनवेळी जुनी गाणी आठवताहेत. म्हणुन मी पटकन आठवलेली नविन गाणी सांगते.

बाजरे दा सिट्टा,
वे अस्सा टल्ली ते मरोड़ेयाँ
रुठडा जांदा माँहियाँ

मनाली ट्रान्स -
बदला मिजाज मेरा फुंकते ही ग्रास
ग्रास लगे है मोहे सबका इलाज Proud (हे गवत कोणा कोणालाही आठवलं नाही ना? )

साधना - धन्यवाद. मला शेतीमधली इतकी माहिती नाही. पण प्रत्येक वेळेस ते गाणे ऐकताना हा प्रश्न पडतो. बाय द वे, ते गाणे खूप आवडते आहे.

अजून एक - तू बिन बताए (रंग दे बसंती) मिसरी की डली जिंदगी हो चली. >>> मिसरी की डली म्हणजे काय? मिसरी म्हणजे खडीसाखर ना? (प्राचीन काळी मिसरी म्हणजे तंबाखू भाजून काळी मिश्री बनवतात तीच फक्त माहीत होती)

"अंगणी गुलमोहर फुलला" येउन गेले का? नसेल तर ते घ्या. पुलंचे संगीत असल्याने विशेष आवडीचे.

अरूण दात्यांची काही गाणी क्वालिफाय होत नसावीत. कारण जेनेरिक उल्लेख आहेत. "या जन्मावर या जगण्यावर" मधे "वेलीवरती प्रेम प्रियेचे जन्म फुलांनी घेते" यात कोणती वेल व कोणते फूल माहीत नाही. तसेच "रंगा माझा तुला, गंध माझा तुला, बोल काहीतरी बोल माझ्या फुला" मधेही Happy

या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे

चंचल वारा, या जलधारा, भिजली काळी माती
हिरवे हिरवे प्राण तशी ही रुजून आली पाती
फुले लाजरी बघुन कुणाचे हळवे ओठ स्मरावे

रंगांचा उघडुनिया पंखा सांज कुणी ही केली ?
काळोखाच्या दारावरती नक्षत्रांच्या वेली
सहा ऋतूंचे सहा सोहळे, येथे भान हरावे

बाळाच्या चिमण्या ओठांतुन हाक बोबडी येते
वेलीवरती प्रेम प्रियेचे जन्म फुलांनी घेते
नदिच्या काठी सजणासाठी गाणे गात झुरावे

या ओठांनी चुंबुनि घेइन हजारदा ही माती
अनंत मरणे झेलुन घ्यावी इथल्या जगण्यासाठी
इथल्या पिंपळपानावरती अवघे विश्व तरावे

धुंदित, गंधित, होवुनि सजणा
प्रीतित रंगुनि जावु या
छेडित ये प्रीत-संगीत सजणा
प्रीतित रंगुनि जावु या
ये सजणा!
कुंजात या गंधलेली फुले माळुनि जाई झुले
गंधात ही धुंद झाली चमेली गुलमोहराला भुले
तुझी सखी तुझ्या सवे ही!

मामी, TIL! मला खरंच डली म्हणजे फांदी अशा अर्थाने वाटत होतं इतके दिवस!

-लब हिले तो मोगरे के फूल खिलते हैं कहीं
(आप की आँखों में कुछ महके हुए से राज़ है)
- फूल गुलाब का
लाखों में हज़ारों में एक चेहरा जनाब का
- ओ बिछुआ, हाय रे, पीपल छैंया, बैठी पल भर
हो धर के गगरिया, हाय रे
(ओ दैया रे दैया रे चढ़ गयो पापी बिछुआ)
-बूझ मेरा क्या नाम रे, नदी किनारे गाँव रे
पीपल झूमे मोरे आँगना ठण्डी ठण्डी छाँव रे
- गेंहू के खेतों में कंघी जो करे हवाएं
(धरती सुनहरी अंबर नीला हर मौसम रंगीला
ऐसा देस है मेरा)

छान धागा. ललितलेखनाऐवजी चित्रपट विभागात हवा का?

गंगा आली रे अंगणी
यंत्र चालवा गाळा ऊस
अमाप पिकला घ्या कापूस

माझा होशिल का? या गीता चं विडंबन रूप असं एक भाजी घेशिल का? असं गाणं आहे. गायक जयवंत कुलकर्णी
चित्रपट धाकटी बहीण इथे १ तास ४६ मिनिटांपासून

चांदण्यात फिरताना माझा धरलास हात ...
..... स्पर्श तुझा पारिजात

याला काय लेवू लेणं मोतीपवळ्याचं रान
राती चांदण्या रानात शिनगार
सारी दौलत जरीच्या पदरात

श्वास तुझा मालकंस स्पर्श तुझा पारिजात

हे सजलं ऊनवारं नभतारं सजलं
रंगलं मन हळदीनं रानी रंगलं
सरलं हे जगण्याचं झुरणं सरलं
भिनलं नजरनं इश जहरी भिनलं

बीज अंकुरे अंकुरे ओल्या मातीचा कुशीत
कसे रुजावे बियाणे माळरानी खडकात

अवकळा समदी जाईल निघूनी
तरारलं बीज तुज माझ्या कुशीतूनी
मिळंल का त्याला, उन वारा पानी
राहिल का सुकंल ते तुझ्या माझ्या वानी
रोप आपुलच पर होईल येगळं
दैवासंग झुंजायाचं देऊ त्याला बळं

त्या गाठी, त्या गोष्टी, नारळीच्या खाली
पौर्णिमाच तव नयनी
पौर्णिमाच तव नयनी भर दिवसा

पत्ता पत्ता बुटा बुटा हाल हमारा जाने है
जाने न जाने गुल ही न जाने, बाग तो सारा जाने है

फुलों के रंग से दिल की कलम से तुजको लिखी रोज पाती ...
बादल बिजली चंदन पानी जैसा अपना प्यार....

बेला चमेली का सेज सजाया

"फुल" हा उल्लेख असणारी ढीगभर गाणी आहेत

भंवरे ने खिलाया फुल, फुल को ले गया राजकुंवर

गोरी गोरी पान फुलासारखी छान

तेरा फुलों जैसा रंग तेरा शीशेजैसा अंग, पडी जैसे ही नजर मैं तो रेह गया दंग

किरणों का सोना ओस के मोती
मोतियों सा मोगरा
तेरा बिछौना भर
भर के दारू
गुलमोहर का टोकरा
और जो भी चाहो
माँगो जी माँगो
बोलो जी मेरी मैना

पीली पीली सरसों फूले
पीले पीले पत्ते झूमें
पीहू पीहू पपीहा बोले
चल बाग में

Pages