Submitted by प्रकाश काळेल on 26 May, 2009 - 10:41
शिथील झालेल्या सर्व संवेदना
वैधव्य ग्रासले श्वेतवस्त्राने मना
अस्फुट आवेग,गोठलेली स्वप्ने
बंदिस्त पेवांमध्ये दडलेली रत्ने
विसरल्या पानगळीच्या सुन्न वेदना
उदरातल्या अंकुरांचे प्रश्न झाडांना
चराचर वाट पाहती ऋतुराजाची
अलवार,उबदार, चैतन्यस्पर्शाची
रंग उधळित येतो ऋतू तो वसंत
सृष्टीस उरते ना वात्सल्या उसंत
वितळू लागती ते शीत बर्फाचे थर
धरेला भिडता त्या आदिचा ज्वर
पालवती तिच्या मृतवत शलाका
फुटती धुमारे होता तो अमृतस्पर्श
हरितवस्त्र लेवून, नवकांता सजते
अंगांगावर अमुल्य पुष्परत्ने मिरविते
......................................
प्रकाश
गुलमोहर:
शेअर करा
व्वा!
व्वा! प्रकाश, एकदम सजवून पेश केलेस तुझ्यातल्या अफाट प्रतिभेला!
...........................................................................
येता कणकण कवितेची
करा तपासणी डोक्याची!
अरे जर
अरे जर कुणाला कवितेत रस नसेल तर उगा कशाला रोष ओढवून घ्या... म्हणुन बिचारीला इकडे आणुन सोडले (प्रकाशचित्र विभागातुन !)
अगदी,
अगदी, गारवा जाणवायला लागलाय, खरच !!!!!!!!

---------
रुसुन रुसुन रहायच नसतं, हसुन हसुन हसायच असतं !
सुरेख
सुरेख कविता.

वसंत दर्शन झाले.
प्राजु
http://praaju.blogspot.com/
मस्त... आला
मस्त...
आला आला वसंत!
ठरत नाहिये
ठरत नाहिये काय अधिक सुंदर - फुले, फोटो की कविता? तिन्ही अत्युत्कृष्ठ !!
मुकुंद कर्णिक
मुकुंदगान:- http://mukundgaan.blogspot.com
भगवद्गीता:- http://marathi-bhagavadgita.blogspot.com
वसंताचे
वसंताचे स्वागत! पुष्परत्ने आवडली.
पक्या,
पक्या, बहरलाहेस जर्मनीला जावुन....
***********************************
मज पिसे लागलेले सुखांचे
गे हलकेच धुके ओसरते आहे...
छान आहे
छान आहे कविता !
जुने नाट्य / भावगीत आहे - ऋतुराज आज वनी आला, नवसुमनांचा, नवकलिकांचा, बहर घेऊनी आला
त्याची आठवण झाली.
क्या बात
क्या बात है प्रकाश! उत्फुल्ल कविता, अप्रतिम शिर्षक,
प्रकाशचित्र अधीक सुंदर की कविता ठरवण कठिण आहे.
सुंदरच रे
सुंदरच रे बाबा. मनापासून आवडली.
स्मिताने
स्मिताने सुचवले होते कि यावेळी फोटो टाकताना त्यावर कविताही टाक.
)
त्या फोटोंवरून आणि जर्मनीतल्या एकंदर निसर्गसौंदर्यावरून जे सुचले ,ते मांडायचा प्रयत्न केलाय.
तसा इथला हिवाळा अनुभवला नाही कधी.पण डेट्रॉइटला ३-४ महिने होतो....जानेवारी ते एप्रिल.
त्यामुळे त्या कडक हिवाळ्याचीही अनुभुती घेतली आहे(चांगलीच!
तुमच्या प्रतिसादांबद्दल खूप आभारी आहे.
प्रकाश...सु
प्रकाश...सुरेख..:) अगदि छान
जर्मनीला
जर्मनीला एखादं वर्कशॉप घेतलं का कुणी ? तसलं काही तिथे असेल अशी दाट शंका आता मनात यायला लागली आहे. ओवराथ पेटलय की तू पेटलायसं मित्रा !!!
.........................................................................................................................
आयुष्याच्या पाऊलवाटी, सुख दु:खांचे कवडसे
कधी काहीली तनमन झेली, कधी धारांचे व़ळसे
जर्मनीला
जर्मनीला एखादं वर्कशॉप घेतलं का कुणी ?>>>>> आमचे वर्कशॉप मायबोली आणि तुमच्यासारखे प्रतिभावंत गुरूजन ! अजुन काय पाहीजे ? फक्त जरा अभ्यासूपणा ...आणि झाले !
मस्त!!!!!!खुप
मस्त!!!!!!खुप आवडली!!
*******************
सुमेधा पुनकर
*******************
वा..........
वा.......... सुरेख !!
~~~~~~
इथे डोकवा. http://jayavi.wordpress.com/
आणि कविता.... इथे http://maajhime.blogspot.com/
व्वा ...........
व्वा ........... अप्रतिमच प्रकाश !!