Submitted by जयवी -जयश्री अंबासकर on 21 May, 2009 - 02:47
सुटे बेभान हा वारा
फुले उरात शहारा
यावा अशात साजण
देत गुलाबी इशारा
हृदयाच्या सागरात
लाटा उठाव्या खट्याळ
प्रीतीशरांनी सख्याच्या
व्हावे पुरते घायाळ
सारी बंधने तोडून
उधळावा कैफ सारा
वेड्या मनाने मनाचा
द्यावा सोडून किनारा
निळाईने पसरावे
आकाशाच्या कुरणात
गाणी गावी अवखळ
द्वाड वा-याने कानात
खळे पडावे चंद्राला
यावे चांदणे वयात
बहरावी रातराणी
गंधाळावी सारी रात
नभदीप तारकांचे
हलकेच व्हावे मंद
प्रीतीफुलांच्या श्वासांनी
पांघरावा मधुगंध
जयश्री अंबासकर
गुलमोहर:
शेअर करा
मस्त!
मस्त!
अहाहा
अहाहा .......बेहद्द आवडली. अगदी लयबध्द आहे...मस्त गाणे होईल!
जयश्री, खुप
जयश्री,
खुपच सुरेख कविता...
हातात गिटार...हे गाणे...आणि सगळी मैफिल दिवानी...
**********************************
लोग कहते थे की ओ मेरे जनाजे पे रोये नही !
मुझे तो खुशी इस बात की,की हमने उन्हे आख्रीर तक रुलाया नही|
गणेश कुलकर्णी (समीप) ९७६४७७३२५७, पुणे-२७
**********************************
खासच जया!!
खासच जया!! (विकपॉईंट? :))
काय
काय अभिप्राय देवु...
फिदा
***********************************
मनामधली कविता घेऊन, कागद माझा उडतो आहे,
उतरेल त्याच प्रदेशात, चंद्र जेथे बुडतो आहे !!
सर्वार्था
सर्वार्थाने सुरेख कविता !!
मुकुंद कर्णिक
मुकुंदगान:- http://mukundgaan.blogspot.com
भगवद्गीता:- http://marathi-bhagavadgita.blogspot.com
मस्त!
मस्त!
'आय हाय !
'आय हाय ! क्या बात है !'...
कुछ तो हुआ है...
कुछ हो गया है... हे गाणं आठवलं एकदम !
जियो.... ! ! !
मस्त!
मस्त!
सहिच!!!
सहिच!!!
मनासोबत
मनासोबत तनानेही डोलावे असे सुंदर गाणे. जयूताई म्हणजेच एक गाणे आहे.
.............................................................................
येता कणकण कवितेची
करा तपासणी डोक्याची!
एकदम मस्त !!
एकदम मस्त !! आवडली!
----------------------------------------------------
If you follow all the rules, you miss all the fun!
http://www.mokaat.blogspot.com/
जयु, मस्त
जयु,

मस्त मनमोहक तरल कविता..!
खरच यावे अशातच साजणाने !!!!!!!!!!!!!!

सुंदर
---------
रुसुन रुसुन रहायच नसतं, हसुन हसुन हसायच असतं !
मला तर ही
मला तर ही कविता वाचता वाचता आशाच्या आवाजात ऐकु यायला लागली:)
टेलरमेड फॉर आशा!
फारच सुंदर..अप्रतिम..
सुचना: जमल्यास कोणा संगीतकाराला पाठवा..एक उत्तम गाणे होईल.
छानच ग.
छानच ग. तुझ्या आवाजात ऐकायला आवडेल.
सुंदर
सुंदर कविता
सुधीर
सुंदर .............
सुंदर
................................................................................................................
ज्याला आपण आपल मन म्हणतो..ते कधीतरी आपल्या ताब्यात असत का?
खळे पडावे
खळे पडावे चंद्राला
यावे चांदणे वयात
बहरावी रातराणी
गंधाळावी सारी रात
मस्त !!
you may meet me in details at ....... www.layakari.com
सुंदर लय!
सुंदर लय! सुंदर आशय!
--
कसा चंद्र! कसं वय! कशी तुझी चांदणसय..!
कसा निघेल इथून पाय! वेड लागेल, नाहीतर काय!
क्या बात
क्या बात है जया!
वेड्या मनाने मनाचा
द्यावा सोडून किनारा
आणि
खळे पडावे चंद्राला
यावे चांदणे वयात
फारच सही
खळे पडावे
खळे पडावे चंद्राला
यावे चांदणे वयात
बहरावी रातराणी
गंधाळावी सारी रात>>>>
--------------
नंदिनी
--------------
खळे पडावे
खळे पडावे चंद्राला

यावे चांदणे वयात
बहरावी रातराणी
गंधाळावी सारी रात>>>जयावी.. मि घरच्यांपासुन दुर असताना अशी कविता वाचावी लागली त्याबद्दल तुमचा तीव्र निषेध..
फारच सुंदर शब्दरचना.. आपुन इस कविता का एकदम फॅन हो गयेला है..
हाय हाय !
हाय हाय ! काय सुंदर कविता आहे, घायाळ झाले.
मस्तच,
मस्तच, सुंदर कविता
खळे पडावे
खळे पडावे चंद्राला
यावे चांदणे वयात
बहरावी रातराणी
गंधाळावी सारी रात
नभदीप तारकांचे
हलकेच व्हावे मंद
प्रीतीफुलांच्या श्वासांनी
पांघरावा मधुगंध
>> सुंदर!!
मायबोलीवर
मायबोलीवर पाऊस आणि प्रेमाला उधाण आलय. काय काय सुचतयं एकेकाला ?
अस्सं वाचलं की मग घरी पळावसं वाटतं
तिच्यासोबत भरलं आभाळ न्याहाळावसं वाटतं
.........................................................................................................................
http://kautukaachebol.blogspot.com/
क्या बात
क्या बात है!!!! मस्तच!!
*******************
सुमेधा पुनकर
*******************
खळे पडावे
खळे पडावे चंद्राला
यावे चांदणे वयात
बहरावी रातराणी
गंधाळावी सारी रात
मस्त,
तहे दिल से
तहे दिल से शुक्रिया यारो
इतक्या मनापासून आलेल्या प्रतिक्रियांनी खूप खूप सुखावलेय ........ असंच प्रेम असू द्या
~~~~~~
इथे डोकवा. http://jayavi.wordpress.com/
आणि कविता.... इथे http://maajhime.blogspot.com/
जया, मस्त!
जया, मस्त!
--------------------------
धन्य भाग सेवा का अवसर पाया
Pages