बकुळीची फुले..!!

Submitted by मोकाट on 19 May, 2009 - 09:44

त्याला बकुळीची फुले आवडतात
तिलाही आवडतात

त्या दिवशी वर्गामध्ये ती त्याच्याकडे आली
ती आली..सोबत बकुळीचा गंध घेऊन आली
येता येता तिने मस्त स्माईल दिले
त्या क्षणी..त्याला काही सुचलेच नाही..
एकदम त्याच्या हातातील पेपरचा गठ्ठा खाली पडला
बकुळीचा गंध त्याला धुंद करुन गेला
तिला कसलीशी वही पाहिजे होती
पेपर उचलता उचलता तो म्हणला "बॅगमधुन घे"
थँक्स म्हणुन ती निघुनही गेली
पण बकुळीचा गंध अजुनही त्याला वेड लावत होता..

तिला बकुळी आवडते तर्...बर झाले कळाले
उद्या तिच्यासाठी थोडी फुले आणायची..
आणि तिला मस्तपैकी सर्प्राईज द्यायचे..त्याने मनाशी ठरवले
त्या संध्याकाळी..तिच्या आठवणींनी तो वेडापिसा झाला..
तिचे भास तर त्याला नेहमीच व्हायचे..
पण आता तिच्यासोबत तो बकुळीचा गंधपण असायचा!
रात्री ती त्याच्या स्वप्नात आली होती..आणि तिच्यासोबत तो बकुळीचा गंध!!
त्यालाच नक्की कळेना..त्याला होतय तरी काय?

दुसर्‍याच दिवशी त्याने ओंजळभर बकुळी वेचली
सगळीच तिला द्यावी का थोडी आपल्याकडे पण ठेवावीत..?
त्याने हळुच सगळी फुले तिच्या बेंचवर नेऊन ठेवली
पण तरीही तिला ते कळालेच..
ती त्याच्याकडे बघुन हसली..म्हणाली
"तुला कसे कळाले मला बकुळी आवडते ते?"
"असेच.." तो हसुन म्हणाला
"थँक्स"
वॉव..बकुळीचा बेत सफल झाला होता तर..
उद्याही फुले आणायची..त्याने मनाशी ठरवले
बकुळीचा तो गंध अजुनही त्याला वेड लावत होता..
सकाळी..संध्याकाळी तिचे भास..बकुळीचा गंध!
तिची स्वप्ने...त्यातही तो ब़कुळीचा गंध!!

तिसर्‍या दिवशी मात्र त्याला कॉलेजला जायला उशीर झाला
आज त्याने बकुळी नेली नाही..
त्याची वही घेऊन ती त्याच्याकडे आली
येता येता तिने मस्त स्माईल दिले
तो तिच्याकडे पहातच राहीला..
बकुळीच्या गंधाने अजुनही त्याचा पिछा सोडला नव्हता!
ती म्हणाली "काय..आज फुले आणली नाहीस वाटतेय?"
तो म्हणाला "नाही, आज उशीर झाला यायला"
"खोटे बोलतोयस तु, मला माहीत आहे..तु आणली आहेस फुले"
"नाही, अगं खरच नाही आणलीत"
"आण बघु तुझी बॅग इकडे, मीच बघते"
तिने त्याची बॅग उघडली..
पुढच्या कप्प्यातुन ओंजळभर बकुळी बाहेर काढली
"अरेच्चा! मी नाहीत ठेवलीत ती फुले!" तो आश्चर्याने म्हणाला
"मीच ठेवली होती ती परवा..तुझी वही नेताना!" ती हसुन बोलली..
"काय..??" आश्चर्याने तो तिच्याकडे पहातच राहीला!
आता त्याला उलघडले त्या गंघाचे कोडे!
तिच्या आठवणीतला आणि तिच्या स्वप्नातला तो गंध!
त्याच्यासोबत सावली सारखा दिवस-रात्र छळणारा तो गंध!
"पण तुला कसे कळाले मला बकुळी आवडते ते?" तो गोंधळुन म्हणाला
"असेच"
"असेच?"
"तुला जसे कळाले तसेच.." ती हसुन बोलली...
"पण मला तर परवाच कळाले..तु आल्यावर..." तो अजुनही त्या धक्क्यातुन सावरला नव्हता..
"पण मला माहीत आहे....आधीपासुनच" ती गोड हसुन बोलली..
"काय.....??" तो फक्त एवढेच बोलला..
ती मात्र त्याच्याकडे बघुन अजुनही हसत होती!!

-mokaat...
http://www.mokaat.blogspot.com/

गुलमोहर: 

लोकांनो....हे लिखाण ईथेच असु दे का कथा/ललित मध्ये हलवु? तुमचा प्रतिसादही कळवा..:-)

----------------------------------------------------
If you follow all the rules, you miss all the fun!
http://www.mokaat.blogspot.com/

मस्त लिहीलं आहेस रे ! आवडली बकुळीची फुले ! Happy

छान आहेत ही बकुळ फुल........

मुक्त छंद आणि बकुळीचा गंध इथेच राहू शकतो.
छान.
..सुसंगती सदा घडो, सुजनवाक्य कानी पडो..

मस्त मोकाट...

मस्त!

क्रान्ति
मुक्त तरीही बंधनात मी
फुलाफुलाच्या स्पंदनात मी
http://www.agnisakha.blogspot.com/

आयला, मोकाट.. सही, दिल खुश कर डाला यार तुने....
----------------------------------------------------------------------
कोणाचे देने कोणास पुरते, कितीही द्यावे सदा अपुरते !
माजे सरकार जे देवू करते, न सरते ते कल्पान्ती !!

सुंदर.
बकुळीची फुलच तींं..बॅगेत, ह्र्दयात, कथेत, कवितेत... कुठही ठेवली, सुगंध लपणार आहे का !

मोकाट, मस्त कविता. धुंद धुंद केलत.
..............................................................................
गावोगावी बापू झाले, बापूंचेही टापू झाले
भक्त आंधळे न्हाले न्हाले, देव बनूनी बापू आले!

राहुदे असेच सुगंध देत राहतील इथे .