खरच माझे चुकले काय?

Submitted by मोकाट on 18 May, 2009 - 09:22

जाग जाग जागलो
वाच वाच वाचलो
तरीही पास नाही झालो
मग..कॉपी करताना सापडलो!
खरच माझे चुकले काय?

कोणाच्या तुकड्यावर नाही जगलो
कोणाच्या लफड्यात नाही पडलो
कॉलेजमधल्या भांडणात
मग..मित्रांना सोडुन पळालो!
खरच माझे चुकले काय?

राब राब राबलो
प्रामाणिकपणे जगलो
तरीही..मी फाटकाच राहीलो
मग..लाच घेताना सापडलो!
खरच माझे चुकले काय?

ट्रॅफिक जाममध्ये अडकलो
अंगभर घामाने भिजलो
मग..सिग्नल तोडताना सापडलो!
खरच माझे चुकले काय?

कविता ऐकून पकलो
गझल ऐकून झोपलो
मग..भर संमेलनातून निघून गेलो!
खरच माझे चुकले काय?

थोरांच्या पुस्तकांनी भरलेले खोके
कोणा कोणाला देऊ केले
पण कोणीच नाही घेतले
मग..शेवटी रद्दीत नेऊन विकले!
खरच माझे चुकले काय?

नेत्यांचे भाषण मन लाऊन ऐकले
खोट्या आश्वासनांना मन बळी पडले
उशीरा का होईना मला ते समजले
मग्..सरळ मी त्यांना चप्पल फेकून मारले!
खरच माझे चुकले काय?

माझ्या प्रेमाचे दाखले तिच्या बापाने वाचले
काही त्याने फाडले बाकी शेकोटीला जाळले
कितीही समजावले तरी त्याने नाही ऐकले
मग..देवळात जाऊन आम्ही शुभमंगल उरकले!
खरच माझे चुकले काय?

-mokaat...
http://www.mokaat.blogspot.com/

गुलमोहर: 

पहिलीच कविता आहे..सांभाळुन घ्या..:-)

----------------------------------------------------
If you follow all the rules, you miss all the fun!
http://www.mokaat.blogspot.com/

कॉपी करून पास होणे- देवळात लग्न करणे- सिग्नल तोडून पळून जाणे- स्वातंत्र्यसंग्रामात शहीद होणे-
भरपूर फरक आहे हो. कोणता तरी एकच आयाम पकडा की. एक तर घोड्यावर तरी बसा, नाहीतर गाढवावर तरी!

कवितेला शेवटी उदात्तता वगैरे यावी म्हणून शेवटचे कडवे टाकले असेल, तर उडवा ते.
बाकी पहिला प्रयत्न चांगला आहे. Happy

धन्यवाद..

मला पण ते शेवटचे कडवे फार खटकत होते..टाकु का नको ते विचार करत होतो...
आत्ताच उडवतो...:-)

----------------------------------------------------
If you follow all the rules, you miss all the fun!
http://www.mokaat.blogspot.com/

Happy
************
धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरुरायाची | झाली त्वरा सुरवरा विमान उतरायाची ||