Intermittent Fasting सपोर्ट आणि मोटिवेशन

Submitted by दिव्या१७ on 24 January, 2021 - 22:15

मी Intermittent Fasting सुरु केले आहे १४:१० पासून हळू हळू वाढवत जाईल १६:८.

६ दिवस झाले पहिले २-३ दिवस वजन १ किलो कमी झाले पण त्यानंतर कॉन्स्टन्ट आहे वाढत हि नाही आणि कमी हि होत नाही. थोडा संयम ढळू लागला आहे. म्हणून सपोर्ट आणि मोटिवेशन हवे आहे. ज्यांनी इफ केले आहे प्लीज आपले अनुभव share करा. मला आणी सगळ्या वेट लॉस करणार्यांना मदत मिळेल.

माझे प्रश्न -
किती दिवसात वजन कमी होऊ लागते?
मधेच वजन कमी होणे का थांबते?
काही उपाय आहे का कि रोज वजन कमी होत राहील?
मी चुकत तर नाही आहे?

माझा routine -

सकाळी ९.३०-१० मध्ये नाश्ता - पराठा /इडली /उपमा /पोहा
मध्ये पाणी किंवा राजगिरा चिक्की
२ वाजता जेवण - १ पोळी, थोडी भाजी, डाळ, भात एक वाटी, १-२ फ्रुट (संत्री/पेरू/ मोसंबी)
४ वाजता चिक्की / फ्रुट / cinnamon टी साखर नाही
६-७ योगा
७.३० - डाळ खिचडा / डाळ भात पातळ सूप सारखे एक वाटी
७.३० - सकाळी ९.३० (१४ तास फास्ट)

जर मी चुकत असेल तर प्लीज सांगा

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझंही असच झालं होतं. कितीही कमी खा. शरीर मिळेल तेवढ्या आहारात जमवून घ्यायचा प्रयत्न करतं. मग मी 3 दिवस नेहमीप्रमाणे 2 वेळ जेवण, नाश्ता आणि चौथ्या दिवशी fasting म्हणजे फक्त दुपारी एकवेळ जेवण असं सुरू केलं. मग अगदी स्लोली पण हमखास वजन कमी व्हायला लागलं. आठवड्याला 1 किलो. आता 68 ची 53 पर्यंत आले आहे.

<<शरीर मिळेल तेवढ्या आहारात जमवून घ्यायचा प्रयत्न करतं. मग मी 3 दिवस नेहमीप्रमाणे 2 वेळ जेवण, नाश्ता आणि चौथ्या दिवशी fasting म्हणजे फक्त दुपारी एकवेळ जेवण असं सुरू केलं. मग अगदी स्लोली पण हमखास वजन कमी व्हायला लागलं.>> +1

येस.
मी 3 दिवस नोर्मल जेवण मग 2 दिवस fasting अश्याप्रकारे केले. बराच फरक जाणवला.

मी केले होते.सहन झाले नाही .सोडून दिले.रोजच्या आयुष्यात हे शक्य नाही.फास्टींग चालू असताना काम ,ऑफिस,प्रवास झेपत नाही.माझा एक वास्तववादी सल्ला आहे की फास्टिंगच्या फंदात पडू नका.

पेशन्स पेशन्स पेशन्स. फक्त सहा दिवस झालेत आणि तुम्ही सहा आठवडे झाल्याप्रमाणे अपेक्षा करत आहात. सहा दिवस म्हणजे वार्म अप सुद्धा नीट झाले नाही अजून तुमच्या IF चे.
IF सुरू केल्या केल्या दोन तीन दिवसात १ किलो वजन कमी, हे चरबी जळल्याने झालेले वाटत नाही. IF सोबत आहारात योग्य तो बदल होऊन अतिरीक्त सॉल्ट इंटेक कमी होऊन, शरीरात धरलेले अतिरिक्त पाणी कमी झाल्याची शक्यता आहे.

ते साखर बंद करता आली तर बघा (चिक्की. रोजच्या ऐवजी कधीतरी.)

IF ही लाईफ स्टाईल आहे. पहिले पंधरा दिवस तरी वजना कडे लक्ष न देता इतर बदल काय होतात तिकडे लक्ष द्या. (झोप चांगली येते का, उत्साह वाढला आहे का, आधीच्या तुलनेत अधिक फ्रेश वाटतं का, पोट हलकं वाटतं का) हे होत असेल तर तुम्ही योग्य मार्गावर आहात. होईल वजन कमी.

ऑल द बेस्ट!

@केशव तुलसी: तुमच्या सारखा अनुभव अजून थोड्या लोकांकडूनही ऐकला आहे.तो ही बरोबर आहे. प्रत्येकाचा अनुभव सारखाच असेल असे नाही. मला IF जमले फायदा झाला, सूट झाले म्हणजे प्रत्येकाला होईलच असे नाही आणि कुणाला नाही जमले/सूट नाही झाले म्हणजे इतरांनी करू नये असे ही नाही.
IF चा फायदा झालेली आणि आता बरेच वर्षे करणारी बरीच उदाहरणे आहेत माहितीतली.

धन्स नौटंकी, ShitalKrishna, मनिम्याऊ, केशव तुलसी, मानव पृथ्वीकर

मानवदा, साखर बंद आहे फक्त राजगिरा चिक्की याच्या हेल्थ बेनिफिट्स साठी, गुळाचा राजगिरा शिरा चालेल का चिक्की ऐवजी?. हो झोप खूप शांत येते, आणी आधी पेक्षा फ्रेश आणी हलके वाटते.

थँक्स म्हणजे मी ट्रॅकवर आहे, आता वजनावर कॉन्सन्ट्रेट न करता नियमितता राखण्याकडे जास्त लक्ष देईल, आधी ३-४ वेळा try करून ८-९ दिवसात सोडून दिले होते वजन कमी होत नाही म्हणून, YT वर ६ दिवसात ३ किलो कमी, ५ किलो कमी विडिओ बघून आपले काही तरी चुकते असे वाटून बंद करत होते.

माबोकरांचे ची खरंच खूप मदत होते, थँक्स ऑल

मी केले होते.सहन झाले नाही .सोडून दिले.रोजच्या आयुष्यात हे शक्य नाही.फास्टींग चालू असताना काम ,ऑफिस,प्रवास झेपत नाही.माझा एक वास्तववादी सल्ला आहे की फास्टिंगच्या फंदात पडू नका.

>>> म्हणूनच रोज fasting चुकीचं आहे. metabolism कमी होतो आणि मग रोज कितीही कमी खाल्लं तरी वजन कमी होत नाही. माझा अनेक वर्षांचा स्वानुभव आहे Happy . मग चिडचिड, अशक्तपणा, पित्त आणि सगळ्यात शेवटी नैराश्य असे साईड इफेक्टस् वाट्याला येतात. आठवड्यातून एकदा किंवा जास्तीत जास्त दोनदा रात्रीचं जेवण न करता सूप ई. सात च्या आधी घ्या. खात्रीने फरक पडेल.

( ज्यांची आधीच खूप कमी खाऊन वाट लागली आहे, त्यांनी महिनाभर व्यवस्थित खाऊन पिऊन (अगदी तडस लागेपर्यंत नाही. Happy ) Metabolism दुरुस्त करावा. मगच fasting ला सुरुवात करावी. )

YT वर ६ दिवसात ३ किलो कमी, ५ किलो कमी विडिओ बघून >>>
६ दिवसात ३ किलो / ५ किलो वजन वाढते का? ते हळूहळू चढते. तसेच हळूहळू उतरणार आणि तेच श्रेयस्कर आहे.

Intermittent Fasting केले = झाले वजन कमी
काही उपाय करून रोज वजन कमी
--- या अशास्त्रीय + अवाजवी कल्पना व अपेक्षा आहेत.

इथे Intermittent Fasting वर लेख आहेत. सई केसकरांचा आठवतो आहे. अजूनही १-२ आहेत.
वजन कमी करण्यावर केदार जाधव यांचा लेख आहे. अजूनही आहेत.
भरपूर चर्चा + शास्त्रीय माहिती मिळेल त्यात. ती समजून घ्या. तुमच्या प्रश्नांची उत्तरे त्यात मिळतील.

आणि हे लंघन प्रकार व्यक्तिगणिक वेगळे परिणाम दाखवतात.
तुम्हाला तुमच्या सवयी, शरीराचे पॅटर्न (भुकेचे, पचनाचे, काय सहन होते-नाही होत), आहाराचे घटक, शारीरिक श्रम किती होतात या सर्वांचा अभ्यास करून, प्रयोग करून, बदल करून, नोंदी ठेवून --- स्वतःचा कार्यक्रम बसवावा लागेल.

वय-उंची-वजन किती आहे ते लिहीलात तर त्यातले जाणकार / अनुभवी मुळात IF किंवा वजन कमी आवश्यक आहे का तेही सांगतील.

दिव्याजी, जास्त काळा साठी आय एफ चालू करण्या आधी संपूर्ण ब्लड टेस्ट एकदा करून घ्या. साखर, कोलेस्टेरॉल व क्रिएटिनाइन वगैरे घटकांचे प्रमाण बरोबर आहे का बाकी काही त्रास उद्भवू शकतात का ते बघून घ्या मग प्रोग्राम मनावर घ्या व करा. उपासमारीने रक्तातील साखरेचे प्रमाण कमी होउन त्रास होउ शकेल. रक्तदाब पण चेक करून घ्या. बी एम आय किती आहे ते एका वहीत नोंदून ठेवा व रोजची फूड डायरी लिहा त्याने पण फरक पडतो. गुळाचा शिरा चिक्की वगैरे कसे चालेल अशी शंका आली कारन साखर किती त्यात. मध पण घेउ नका.
हाय ग्लायसेमिक इंडेक्स असलेले अन्न पदार्थ घेउ नका.

आहार चौरस व प्रमाणात ठेवून व्यायामाचा कंपोनंट पण ठेवा. तुम्हाला गोल गाठण्यासाठी हार्दिक शुभेच्छा.

किती दिवसात वजन कमी होऊ लागते?

तुमचे ६ दिवसात १ किलो वजन कमी झाले आहे. हे खूप आहे. जेव्हा कमी करायला जास्त वजन असते तेव्हा साधारण १-१.५ किलो/आठवडा असे होताना माझे स्वतःचे बघितले आहे. आणि वजन एकदम कमी करणे हा गोल असू नये. आयएफ एक जीवनशैली म्हणूनही चांगले आहे.

मधेच वजन कमी होणे का थांबते?
आयएफ असले तरीही यात तुम्ही किती खाता यावर कंट्रोल ठेवावाच लागतो. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही जर आयएफ बरोबर लो कार्ब्स सुद्धा खात असाल तर पोट साफ न झाल्याने मध्ये मध्ये प्लॅटू येतो. त्याकरिता आठवड्यातून एक दिवस कार्ब्स खावेत. याला कार्ब्स सायकलिंग म्हणतात. तुम्ही लो कार्ब्स खात नसाल तर वजन कमी होत नसेल तर कार्ब्सचे प्रमाण थोडे कमी करून बघा. पण अगदीच काहीच कार्ब्स खायचे नाहीत असं करू नका (त्या बदली तुम्हाला भरपूर प्रोटीन रोज खाता येत नसतील तर) एकूणच भारतीय आहाराला लो कार्ब्स करणे खूप अवघड आहे. आणि प्रोटीन न खाता कार्बोहायड्रेट वगळणे शरीरासाठी चांगले नाही.

वजन कमी करताना प्लॅटू आला की खाणं कमी करायच्या आधी व्यायाम वाढवून बघा. पण व्यायामही दिवसातून २-३ तास वगैरे करणे अंसस्टेनेबल आहे. तुम्हाला कमी वजन टिकवून ठेवायचे असेल तर ते कमी करताना तुम्ही जेवढा व्यायाम करायचा तेवढाच ते टिकवताना केला पाहिजे. साधारण ४५ मिनिट ते १ तास एवढा व्यायाम खूप आहे.

काही उपाय आहे का कि रोज वजन कमी होत राहील?

यावर एक रामबाण उपाय असा आहे की आठवड्यातून एकदाच वजन चेक करा. रोज रोज वजन करून त्या वजनाच्या पाशात अडकू नका. रोजचं वजन अनेक कारणांनी वर खाली होत असतं. आणि रोज वजन करून चिंता करायची/डेमोटिवेट व्हायची सवय चांगली नाही. तुम्ही आहार आणि व्यायाम चांगले ठेवा आणि वजन कमी होणे हा त्याचा साईड इफेक्ट असू द्या. आपलं वजन कमी होतंय हे काट्याशिवाय अनेक गोष्टीतून जाणवतं. त्याला इंटरनेटवरील भाषेत नॉन स्केल व्हिक्ट्री (NSV) म्हणतात. कपडे सैल होणं, सकाळी उठल्यावर "हलकं हलकं" वाटणं, चेहऱ्यात फरक दिसणं इत्यादी इत्यादी. अशा दोन्ही प्रकारे तुम्ही प्रगती मोजू शकता.

मी चुकत तर नाही आहे?
अजिबात नाही. कीप गोइंग. तुम्हाला याबद्दल पुस्तकं हवी असतील तर जेसन फंग यांचे ओबीसीटी कोड वाचा.
अजूनही बरीच आहेत. आत्ता सगळी नावं आठवत नाहीत.
तुमच्या ३ जेवणांमधले एक जेवण कमी कार्ब्सचे करून बघा (शक्यतो भूक आवरता येईल अशा वेळेचे). तुमच्या आहारावरून मी तुम्ही शाकाहारी आहेत असं गृहीत धरते आहे. दुपारी जी फळं खाता आहात, ती सकाळी खाऊ शकता. किंवा ब्रेकफास्टला पोहे/उपमा वगैरे खाण्यापेक्षा स्मूदी घेऊ शकता एखादे. अंडी खात असाल तर उत्तम पण सध्या रिस्क आहे.

Thanks all Happy

वय-उंची-वजन किती आहे ते लिहीलात तर त्यातले जाणकार / अनुभवी मुळात IF किंवा वजन कमी आवश्यक आहे का तेही सांगतील>>
३७- ५.६ - ७२ (७३ होते)

मी ३महिने केले होते if, वजन कमी झाले नाही, पण वाढले सुद्धा नाही, stable राहिले
नंतर काही कारणाने c ontinue करता आले नाही
पण routine सेट होताच पुन्हा सुरु करणार आहे

उंची नुसार योग्य वजन असणे म्हणजे उत्तम आरोग्य आहे असा निष्कर्ष काढणे बरोबर आहे का?

वजन जास्त असणे म्हणजे आरोग्य बिघडलेले आहे असा अर्थ आहे का?

Submitted by दिव्या१७ on 25 January, 2021 - 12:28 >>>
सईंनी लिहीले बघा तुमच्या प्रश्नांवर.
मी जाणकार नाही. IF केलेले नाही. २ गोष्टी डोक्यात आल्या म्हणून सुचवते. तुमच्या केसला लागू पडतात तर घ्या नाहीतर अवांतर म्हणून सोडून द्या.
उंचीच्या प्रमाणात हाडांचे वजनही लक्षात घ्यावे लागेल. वजन आधी कमी होते, आताच वाढलेय काही कारणाने तर ठीक आहे.
लग्न / समारंभात सुडौल वगैरे दिसण्यासाठी घाईने जास्तीची उपासमार करून झटक्यात वजन खाली आणू नका. कदाचित वजन तितकेच राहील पण केस गळणे, चेहरा / त्वचा सुकणे, डोळ्याखाली काळे असले काही प्रकार सुरू होतील.
बाळंतपणात वाढले असेल वजन आणि बाळ दूधपिते असेल तर वजनाच्या मागे लागून सद्ध्या आहारातील पोषणमूल्ये घटवू नका. बाळाचे बाहेरचे दूध / पुरेसा घन आहार सुरू झाला की मग या गोष्टी करता येतील सुरू.
त्याही टप्प्याटप्प्याने व नियमित. ६ दिवसात ३ किलो कमी, ५ किलो कमी या प्रकारात नुकसान संभवते.

थँक्स कारवी, अमा, सई केसकर, किल्ली , च्रप्स, Hemant 33 , छान उपयोगी टिप्स आणी अनुभव सांगितल्याबद्दल.
सईजी माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे दिल्याबद्दल धन्यवाद, खूप छान माहिती मिळाली. तुम्ही सांगितल्याप्रमाणे लो कार्ब्स डाएट try करेल ,
व्यायाम सध्या एक तास योगा करते आहे, हळूहळू सोबत walk आणी stairs क्लाइंबिंग सुरु करणार आहे. मी फक्त एग्ग्स खाते, nonveg नाही खात. आधी नाष्टा एग्ग्स चा असायचा पण सध्या बंद केले आहेत birdflu मुळे. मानवदा ने सांगितल्याप्रमाणे चिक्की ऐवज्जी ड्राय फ्रुटस ऍड केले काल पासून. कोणी meal प्लान suggest करू शकेल का ?

First, my apologies for typing in English, but A) I needed to use many English words (and I did not see point in typing English words in Devnagari, just for the sake of it) and B) I am not very good at typing in Marathi (not proud of that).

If weight loss is the primary goal then Intermittent Fasting alone would not help.
To lose weight, creating calorie deficit is the ONLY way. In simple words, eating less calories than calories burnt (just being alive + physical activities).
IF is just a means to achieve that calorie deficit by restricting the time allowed for consuming any food. It may help people to have better control over food quantities (portion control) and cravings ("oh, cannot eat that chocolate/cake/samosa because it is not my eating window right now"!).
But it really is not a type of "diet" which will magically reduce weight.

To lose weight:
First keep log of EVERY single thing that you eat during the day, for few days.
Check your weight every day for all these days.
If your weight has increased at the end of this period, it means you are eating more calories than required -> definitely need to eat less.
If it is steady then you are eating roughly the same calories as required for your body's daily needs (these are your maintenance calories). -> Will need to reduce food intake if you desire weight loss.
If weight reduces, then you are on right track and should continue with that eating pattern.

It is a vast topic and cannot be explained in a short answer here, or maybe I do not have expertise to do so,
But what I said above is crux of the matter. Calorie Deficit <==> Weight Loss.
Eating too little to lose weight faster, is not good in the long run either. Simply because it will not be sustainable and person will go back to old habits some day and weight will rebounce.
So ideal way to lose weight is to eat balanced meals with reduced calories and adding exercise to daily routine and most importantly doing these both consistently for a long time. Timing of the meal does not matter, at all.
I know, easier said than done.

Intermittent Fasting, if it is convenient for you to follow because of any xyz reason, please go ahead and do so.
But if you are forcing yourself to do so (or if it is a hassle for you to follow IF), just because you believe it will help you in weight loss, then sorry to say, it will not.

If my comment comes across as dry/rude, it is absolutely not the intention. Trust me what I said, comes from personal experience.
I am not expert (or trained nutritionist) but acquired what little knowledge I have through my own struggles with weight.. losing/regaining/yo-yo-ing and also studies out of own interest.

Fasting आणि डाएट
हे दोन शब्द ऐकले की बरेच प्रश्न मनात निर्माण होतात.
Fasting आणि डाएट प्लॅन ह्या दोन्ही गोष्टी वजन कमी करण्यासाठी च बहुसंख्य लोक करतात
वजन कमी करणे हाच एकमेव उद्ध्येश डोळ्यासमोर असतो.
पण
1) शरीराची कार्यक्षमता ह्या मधून वाढते का?
2) शरीराची रोगाला प्रतिकार करण्याची शक्ती ह्या मुळे वाढते का?
3), शारीरिक क्षमता म्हणजे.
धावण्याची क्षमता,उंच जागी चालत किंवा पळत जाण्याची क्षमता,वजन उचलण्याची क्षमता.
ह्या वरील दोन्ही प्रकाराने वाढते का?
4) शरीरातील प्रत्येक अवयव ची क्षमता वाढते का
जसे पचन संस्थेची क्षमता,रक्त भिसणार ची क्षमता,चेता संस्थेची क्षमता वाढते का?
असे अनेक प्रश्न मनात येतात.
डाएट आणि fasting मुळे सर्व प्रकारच्या शारीरिक क्षमतेत नक्की काय फरक पडतो.
फक्त वजन कमी होत असेल आणि बाकी शारीरिक क्षमता वाढत नसेल तर तर हा नुकसानीचा व्यवहार आहे.

@एबी

तुम्ही म्हणताय ते काही अंशी खरे आहे.
पण कॅलरी डेफिसिट = वेटलॉस असं गणित मांडलं की फोकस फक्त प्रत्येक प्रदार्थाचे उष्मांक मोजण्यावर राहतो. आणि काही पदार्थांच्या बाबतीत तेवढे ठरलेले उष्मांक खाऊन थांबता येत नाही (पांढरा भात हे याचे उत्तम उदाहरण आहे). म्हणून थोडे जास्त खाल्ले जाते. कर्बोदकांच्या बाबतीत हे नेहमी होते (तसे का होते याबद्दल डिटेल अनेक ठिकाणी मिळतील). म्हणून कर्बोदके कमी केली की पोर्शन कंट्रोल जास्त करावा लागत नाही कारण उरलेलया तीन घटकांना कर्बोदकांची साथ नसेल तर ओव्हरइटिंग होत नाही (हा ही वैयक्तिक अनुभव).

आपल्या खाण्यात येणारा प्रत्येक मॅक्रोन्यूट्रिएंट शरीर कसं वापरतं ते पाहून आहार घ्यावा. तुम्ही एक चॉकोलेट बार खाऊन २५० कॅलरीज खाऊ शकता आणि त्याच २५० कॅलरीज तुम्ही संपूर्ण आहार घेऊन (२ फुलके, भाजी, आमटी, सॅलड) घेऊन खाऊ शकता. मग यातले काय खाणे जास्त योग्य राहील?
इंटरमिटंट फास्टिंग डाएट म्हणून काम करतं कारण त्यात तुम्ही फक्त तुमच्या शरीराची "फॅट बर्निंग" फेज प्रलंबित करत असता. त्यामुळे तुमच्या खाण्याच्या वेळात तुम्ही सामोसे, चॉकलेट वगैरे खाऊन उपयोग होणारच नाही. आणि हे पदार्थ एरवीही कधीतरीच खाल्ले पाहिजेत. साखर जितकी कमी खाता येईल तितकी कमी खाल्ली पाहिजे. हे आयएफच काय सगळ्या प्रकारच्या डाएटचे (आणि चांगल्या आहाराचे) मूळ आहे.

कॅलरी डेफिसिट= वेट लॉस याचे दुसरे कॉम्प्लिकेशन म्हणजे आपले वजन जसे कमी होत जाते तसे ते मेंटेन करायला लागणारी एनर्जी, (ज्याला टोटल डेली एनर्जी एक्सपेंडिचर TDDE) म्हणतात, सुद्धा कमी होत जाते. अर्थातच १०० किलोचा माणूस जिवंत ठेवायला ६० किलोच्या माणसापेक्षा जास्त ऊर्जा लागते. म्हणून आपले वजन कमी होत जाते तसे वजन कमी होण्याचा रेट सुद्धा कमी होतो. आणि काही काळाने प्लॅटू येतो. मग अशावेळी प्रत्येक जेवणातले उष्मांक कमी करण्यापेक्षा फास्टिंगचे तास वाढवणे सोपे जाते (असा माझा अनुभव आहे). मला १६ तासांचे १८ तास करून एका जेवणात जास्त पदार्थ खाल्ल्याने समाधानाची भावना मिळते जी मला, ब्रेकफास्ट/लंच/ स्नॅक/डिनर अशा चार वेगवेगळ्या जेवणात सतत कॅलरी मोजून कमी खायचे, अशा प्रकारात मिळत नाही. वेटलॉस शरीरामध्ये घडत असला तरी आपल्याला या सततच्या मोजमापाने मानसिक ताणही येतो. तसेच जास्त वेळ खाल्ले नाही की भूक कमी लागते (हा माझा वैयक्तिक अनुभव आहे).

पण कमी केलेले वजन विनासायास टिकवून ठेवणे हे वजन कमी कारण्यापेक्षाही जास्त अवघड आहे. मग तुम्ही कुठल्याही डाएटने ते कमी करा. मी यातून गेली २० वर्षं जाते आहे. पण वजनाच्या बाबतीत साधारण +/- टॉलरन्स ठरवून त्यात स्वतःचे वजन बसवावे असा मार्ग मी निवडला आहे. वाढते वय हा अजून एक मागे खेचणारा फॅक्टर आहे.

त्यामुळे काही विशिष्ट वयानंतर "वजन" हे मापक ठेवण्यापेक्षा शरीराचे इतर पॅरामीटर (ब्लड शुगर, ब्लडप्रेशर, एचबीए१सी, थायरॉईड, लिपिड प्रोफाइल इत्यादी) बघावे असं मला आता वाटायला लागलं आहे. तुमचे हे पॅरामीटर चांगले असतील, तुमची फास्टिंग आणि रँडम साखर १००च्या आत असेल, तुम्ही रोज व्यायाम करत असाल, साखर जंक फूड कमी खात असाल तर ७-८ किलो जास्त वजन असल्याने फारसा फरक पडत नाही. ते शेवटचे ७-८ किलो कमी करून टिकवायला जो आटापिटा लागतो तो काही आता माझ्याकडून होत नाही. आणि मी ते स्वतःपुरतं मान्य केलं आहे. त्यामुळे मला जाणवण्याइतके प्रचंड वजन वाढले असेल (जसे २०२० मध्ये वाढले होते) तरच मी रोज वजन (तेही सुरुवातीचे काही दिवस) करते. नाहीतर मी आठवडा पंधरा दिवसांनी करते आणि ते व्यवस्थित कमी झालेलं असतं.

@ हेमंत

एक साऊथ आफ्रिकन स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट आहेत. टीम नोक्स (तुम्ही गूगल करून पहा). त्यांनी मॅरेथॉन रनिंग कारण्याऱ्यांना किटो आणि फास्टिंग करायला लावले. आणि त्यामुळे त्यांचा परफॉर्मन्स सुधारला असे त्यांचे निष्कर्ष आहेत. तसेच peter attiya यांचे नावही गूगल करून बघा. जेसन फंग हे युरॉलॉजिस्ट आहेत. त्यांचाही फास्टिंग आणि डायबेटीस (टाईप २) वर अभ्यास आहे. अमेरिकेत सरकेडीएन रिदम प्रमाणे खाण्यावर एका इंडियन ओरिजिनच्या शाश्त्रज्ञाने काम केले आहे (नाव आठवत नाही). डेव्हिड पर्लमटर हे अजून एक नाव. तुम्ही यांचे काम वाचून अधिक माहिती घेऊ शकता. यात किटो आणि फास्टिंग दोन्हीचा समावेश आहे.

मला आता इथे सगळे रेफरन्स देता येणार नाहीत. पण फास्टिंगमुळे लिव्हरचे आरोग्य सुधारते हे तुम्ही शरीर कसे काम करते हे बघितले तरी लक्षात येईल.
फॅटी लिव्हर साठी फास्टिंग प्रभावी आहे हे अनेक डॉक्टर्सने सांगितले आहे.
https://www.ted.com/talks/sandrine_thuret_you_can_grow_new_brain_cells_h...
या टॉकमध्ये कॅलरी रिस्ट्रिक्शन/फास्टिंग आणि व्यायामाचा मेंदूवर कसा परिणाम होतो ते सांगितले आहे.

फास्टिंग आणि अल्झायमरवर पण रिसर्च सुरु आहे. NIA मध्ये Mark Mattson नावाचे शास्त्रज्ञ यावर काम करत आहेत.
https://lifeapps.io/fasting/5-human-fasting-studies-with-dr-mark-mattson/

अर्थात हे सगळे सायमल्टेनियसली गेली १० वर्षं सुरु आहे. त्यामुळे माहिती करून घेण्यासाठी या सगळ्यांनी नवीन काय लिहिले आहे हे सतत बघावे लागते.

सई, मस्त माहिती नेहमीप्रमाणे.
"टरमिटंट फास्टिंग डाएट म्हणून काम करतं कारण त्यात तुम्ही फक्त तुमच्या शरीराची "फॅट बर्निंग" फेज प्रलंबित करत असता. त्यामुळे तुमच्या खाण्याच्या वेळात तुम्ही सामोसे, चॉकलेट वगैरे खाऊन उपयोग होणारच नाही. आणि हे पदार्थ एरवीही कधीतरीच खाल्ले पाहिजेत. साखर जितकी कमी खाता येईल तितकी कमी खाल्ली पाहिजे. हे आयएफच काय सगळ्या प्रकारच्या डाएटचे (आणि चांगल्या आहाराचे) मूळ आहे."
हा परिच्छेद शिलालेख करुन ठेवण्याजोगा आहे.

मला तरी खूप चांगला फरक पडला. उत्साह आणि क्षमता चांगलीच वाढली. Cravings आपोआप कमी झाले. साधारण 3 महिने झाले, fasting बंद आहे, तरी तसूभर वजन वाढले नाही. हो, एक गोष्ट पाळते ती म्हणजे, पोटभर खाते पण तडस लागेपर्यंत कधीच नाही. मग कितीही आवडीची वस्तू असो वा कोणीही कितीही आग्रह करो. प्रोटीन साठी मला शेक घ्यावा लागला कारण आमच्याकडे मांसाहार अत्यल्प प्रमाणात असतो. मी सफोला चा शेक घेते, त्याची जाहिरात करण्याचा हेतू नाही.

टरमिटंट फास्टिंग डाएट म्हणून काम करतं कारण त्यात तुम्ही फक्त तुमच्या शरीराची "फॅट बर्निंग" फेज प्रलंबित करत असता. त्यामुळे तुमच्या खाण्याच्या वेळात तुम्ही सामोसे, चॉकलेट वगैरे खाऊन उपयोग होणारच नाही. आणि हे पदार्थ एरवीही कधीतरीच खाल्ले पाहिजेत. साखर जितकी कमी खाता येईल तितकी कमी खाल्ली पाहिजे. हे आयएफच काय सगळ्या प्रकारच्या डाएटचे (आणि चांगल्या आहाराचे) मूळ आहे. >>> ++१११

मी गेले काही वर्षं इंटरमिटंट फास्टिंग करत आहे. मी कायमसाठी जीवनशैली या हेतूने आयपी सुरु केले. सुरुवातीला 'ब्रेकफास्ट नाही ' या प्रकारात रुळण्यासाठी अवधी दिला. या काळात हळू हळू ब्रेकफास्टची वेळ अर्ध्या तासाने पुढे ढकलत गेले आणि खाणे हळू हळू कमी करत गेले - १/२ कप ओट्सचे ओटमिल कमी करुन १/३ कप- ओटमिल ऐवजी एक सफरचंद - अर्धे सफरचंद - १ अक्रोड आणि ४ बदाम- काहीच नाही. माझी रात्रीच्या जेवणाची वेळ पक्की नाही पण १४-१० ते १६-८ रेंजमधे जमेल तसे करते. एखादा दिवस १२-१२ झाले तर चालवून घेते.

आहारासाठी मार्गदर्शक म्हणून "मायप्लेट" वापरते. सुरुवातीला माझ्यासाठी जेवढ्या जास्तीतजास्त कॅलरीज योग्य आहेत त्यात १०० -१५० चा तुटवडा येइल असा आहार ठेवला. मी मांसाहार करते मात्र आठवड्यातून ४-५ वेळा दुपारचे जेवण शाकाहारी ठेवायचा प्रयत्न असतो- होल ग्रेन + मोड आलेल्या कडधान्याची उसळ, भाज्या घालून भाताचा प्रकार/ पास्ता. लंच मधे चिकन/ अंडे असे असले तर त्या सोबत भाज्या असतात. रात्रीचे जेवणही आठवड्यातून ३-४ वेळा शाकाहारी असते. रात्रीच्या जेवणात पालेभाजी / नॉन स्टार्ची भाजी + होल ग्रेन किंवा मासे/अंडे/चिकन + होल ग्रेन. रात्रीच्या जेवणात सुकी मासळी असल्यास त्यात दुधी/झुकीनी/ / वांगे असे काहीतरी घालते. बटाटा आणि स्वीट पोटॅटो हे भाजी म्हणून न धरता कार्ब्जचे सर्विंग म्हणून धरते. कडधान्यातले कार्ब्जही लक्षात घेते. होल ग्रेन मधे ब्राऊन राईस, कणिक, दलिया, ज्वारी-बाजरी- नाचणीचे पीठ, मासा, ओट्स, पर्ल बार्ली, किन्वा हे जसे सहज उपलब्ध असेल तसे वापरते. मिक्स डाळ , दही, दूध, पनीर याचा वापर असतो. स्वयंपाकात तीळ, खोबरे, शेंगदाणे, आळशी वापरते तसेच साजूक तूप, शेंगदाणा तेल, ऑलिव ऑईल आणि खोबरेल तेल वापरते. देशी-परदेशी मसाल्याचे पदार्थ, वेगवेगळी विनेगर - लो सोडीयम सोया सॉस वगैरे वापरते. रोजच्या देशी स्वयंपाकात साखर, गुळ असे काही सहसा नसते. आतिरिक्त साखर-मीठ टाळण्यासाठी लेबल वाचायला शिकले. सोईचे प्री पॅकेज्ड फूड आणि बाहेरचे खाणे शक्यतो नाही , बाहेरचे जेवण ही ट्रिट असे ठरवले आहे. स्वतः घरीच घाट घालायचा म्हटल्यावर आपोआप तळण ४-६ महिन्यातून एकदा आणि गोड पदार्थचेही तसेच झाले. त्या शिवाय इथे हॉटेलमधे खाल्या जाणार्‍या काही पदार्थांची लो कॅलरी आवृत्ती घरी करायला लागले. मैदा, साबुदाणा वगैरे पूर्णपणे बंद केलेले नाही मात्र त्याचा वापर मर्यादित आहे. कोविड काळात ब्राऊन राईस सहज उपलब्ध असतोच असे नाही त्यामुळे हल्ली काहीवेळा पांढरा तांदुळही वापरतेय.

स्नॅक उपलब्ध असतील ती फळे/ घरगुती हॉट चॉकलेट-मोका आणि बदाम, अक्रोड वगैरे. पाणी आठवण ठेवून पिते. सॉफ्ट ड्रिंक्स, ज्यूस , बाहेरचे लेमोनेड कधीतरी ट्रिट म्हणून.

व्यायामासाठी लेस्लीसोबत वॉक अ‍ॅट होम. अधू गुढघे आणि इथली कडाक्याची थंडी यात सातत्याने लो इंपॅक्ट व्यायाम करायला मला हे वर्क आउट रुटिन जमते. माझ्याकडे तिची सीडी आहे ती वापरते . याशिवाय तिचा वॉक अ‍ॅट होम यूट्युब चॅनेल आहे त्यावर बरेच अधिकृत विडीओ आहेत.

मी सुरुवातीला आठवड्याला एक पौंड कमी झाले तरी खूप, निदान वजन वाढू तरी नये असे माफक ध्येय ठेवले. हळू हळू वजन कमी होत आता माझ्या अंगकाठीला योग्य वजनाच्या आसपास (+२/+३पौंड) असे आहे.

नमस्कार..मी ६ किलो वजन कमी केला Herbalife चा डाएट प्लॅन follow करुन. Breakfast आणि साखर बंद आहे.It is really helpful for those who are not interested in exercise and all..

सई ह्यांनी उत्तम माहिती दिली.
फक्त आहार हे व्यक्ती चे आरोग्य कसे असेल हे ठरवू शकत नाही.
एकाच प्रकारचा, एकाच प्रमाणात आहार घेणाऱ्या आणि सारखाच व्यायाम करणाऱ्या दोन व्यक्ती ची प्रकृती समान असू शकत नाही
एक तंदुरुस्त असू शकतो तर दुसरा रोगट असू शकतो .
शेवटी आहार हा कच्चा माल आहे त्याचे रूपांतर शरीर कोणत्या पक्क्या मालात करते हे प्रत्येक व्यक्ती प्रमाणे बदलत जाणारे आहे.
डाएट आणि fasting ह्या विषयी जे सल्ला देतात त्यांना मानवी शरीराचा अत्यंत सखोल अभ्यास असण्याची गरज आहे.
Vitamins,protins,vitamins, मिनरल,अनेक रासायनिक संयुग शरीर उत्तम चालण्यासाठी गरजेची असतात.
ती सरळ अन्न मधून मिळत नाहीत तर शरीर अन्न घटकांचे विघटन करून त्याला हवे ते घटक निर्माण करते आणि योग्य प्रमाणात च त्याचा वापर करून बाकी बाहेर फेकले जाते.
खूप किचकट आहे हे .
आहारातून मिळणारी ऊर्जा आणि खर्च होणारी ऊर्जा असा सरळ हिशोब नक्कीच त्या मध्ये नसतो.
डाएट आणि fasting ह्याचा सल्ला देणाऱ्या व्यक्ती ला.
अगदी पेशी स्तरावर शरीर कसे कार्य करते ह्याचे सखोल ज्ञान असणे गरजेचे आहे.
श्री देवी चे अकस्मात निधन,सौरभ गांगुली ला heart अटॅक,body बिल्डर लोकांचा अकस्मात मृत्यू .
अनेक अभिनेत्री चे सर्व अवयव फैल होणे.
ही अशी ठळक उदाहरणे आहेत.
जी डाएट आणि fasting चे पालन करणारी मानस होती.
जे आहार विषयी ऊर्जा intake आणि ऊर्जेचा वापर ह्या सोप्या सूत्राचा वापर करून आहार घेत होते.
मुळात तुम्ही घेत असलेले अन्न घटक शरीर स्वीकारत आहे का?
किती प्रमाणात स्वीकारत आहे?
त्या अन्न घटकांचे विघटन योग्य रित्या करत आहे का?
हे आणि असे अनेक प्रश्न आहेत.
खूप प्रमाणात फॅट्स आहारात असून सुद्धा फिट असणारी माणसं आहेत आणि आणि बिलकुल तेल,तूप,बटर न वापरता सुद्धा आरोग्य बिघडलेली सुद्धा व्यक्ती आहेत.
खूप खाणारे पण वजन बिलकुल न वाढणाऱ्या व्यक्ती पण समाजात खुप आहेत आणि आणि मोजून खाणारे पण वजनदार असणाऱ्या व्यक्ती पण समाजात खुप आहेत.
वाटते तेव्हढे हे प्रकरण सहज सोपे नक्कीच नाही.

स्वाती ताई, छान सविस्तर प्रतिसाद!
मी गेली तीन वर्षं तरी अधूनमधून इंटरमिटंट फास्टींग करीत आहे. याची सुरुवात सईचे लेख वाचून झाली. जेव्हा खूप काटेकोरपणे फास्टींग करत नसते तेव्हा कटाक्षाने पोर्शन कंट्रोल आणि पोषणमूल्यं versus उष्मांक यांचे गणित बघतेच. इं. फा. सुरू केल्यानंतर किमान दोन महिन्यांनी मला फरक जाणवायला लागतो. आता मी आधी फास्टींग ची घडी बसवते. ती बसली की मग फास्टींग विंडो मध्ये व्यायाम सुरू करते. इं. फा. + कॅलरी डेफिसिट असलेला तरीही पौष्टिक आहार + फास्टींग विंडोमध्ये व्यायाम ही त्रिसूत्री माझ्यासाठी फार छान काम करते. IF is a lifestyle change आणि त्यासाठी स्लो अँड स्टेडी हा मंत्र आहे.

Bsc किंवा 12 वी करून 1 ते 3 वर्षाचा डाएट विषयी शिक्षण घेणाऱ्या व्यक्ती ला
शरीराचे गुंतागुंतीचे कार्य कसे चालते ह्याचे ज्ञान असणे शक्यच नाही.
शरीराची प्रतेक पेशी कशी कार्य करते ह्याचे सखोल ज्ञान त्यांना असूच शकतं नाही.
वजन कमी करणे हे खूप सोपे सूत्र आहे .
उपवास करा वजन कमी होईल.
पण शरीर कमजोर पण होईल.
चेहऱ्यावर वरील तेज निघून जाईल.
पटकन वजन कमी होणे हे चांगले लक्षण नक्कीच नाही