कोरोनाकाळात मनस्वास्थ कसे राखावे?

Submitted by VB on 7 October, 2020 - 01:11

कोरोनामुळे सर्वांचाच शारिरीक स्वास्थ जपण्यावर भार आहे. पण अचानक बदललेल्या परिस्थितीमुळे बहुतेकांचे मनस्वास्थ देखिल बिघडले आहे. नकळत आलेले मानसिक दडपण अस्वस्थता बरेचदा पटकन कळतही नाही, परिणामी चिडचिडपणा, भांडणे, किंवा स्वत:ला कोंडुन घेणे देखिल होते. बर्याच जणांच्या नोकर्या गेल्या, पगार अर्धा झाला या ऊलट घरखर्च, ईतर खर्च जे पुर्वी होते त्यात जास्त फरक पडला नाही पण दुसरे खर्च वाढले जसे सॅनीटायझर, मास्क, काढे, मुलांच्या ऑनलाईन शाळा अन बरेच. त्यात पुर्वी सारखे बाहेर जाता येत नाही, मोकळे राहता येत नाही हे दडपण. थोडक्यात काय बरीच नविन कारणे निर्माण झालीयेत ज्यांनी मनाचा आजार होऊ लागलाय किंवा ज्यांना आधी आहे तो बळावतोय.

तर आपले मनस्वास्थ्य टिकवायला तुम्ही काय करताय हे जाणुन घ्यायला आवडेल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

The more you sweat in peace, the less you bleed in war. असे संस्कार मनावर असल्याने आधीपासूनच्याच सवयी चालू आहेत. जरा अधिक नियमित. मन, अंगण, नि हिशेब नेहमी स्वच्छ ठेवावं हा विचार आजीकडून मिळाला होता. ती नाही आता तरी तिचे विचार, संस्कार आजही मार्गदर्शक वाटतात. कधी कधी दडपण येते पण जाते ही...

गेल्या ६ महिन्यांपासून मी कोविड धागे चालवतोय. त्याबद्दलच्या शास्त्रीय वाचनात मी भरपूर गुंतलेला राहतो. पण त्याने शीण देखील येतो.
त्यावर उतारा म्हणून मी इथल्याच शब्दखेळ धाग्यांत मला गुंतवून ठेवले आहे. तिथे जमणारे सभासद मिळून आम्ही शब्दकोड्यांचे अनेक प्रकार विकसित केले आहेत. त्यातून मनात मराठीची सुंदर घुसळण होते. तो बौद्धिक व्यायाम मला आनंद देतो.

मानसिक स्वास्थ टिकवायला सोशल डिस्टंन्सिंगचे पालन करुन बाहेर फिरायला जातो. अगदी दोन तीन वेळा बाहेर गावी जाऊन आलो. आमचे गाव छोटे असल्याने गावाबाहेर बाईकवर रपेट मारुन येतो.
आवडीचे पदार्थ खातो ,बनवतो. व्हॅक्सीनच्या,कोरोनाच्या उपचार्याच्या पॉझिटीव्ह न्युज वाचत असतो जेणेकरुन भविष्यात हे संकट जाणार आहे याची खात्री पटते.

फार विचार न करणे हा एक उपाय आहे. विचार करकरुन परिस्थिती बदलणार नाही, उगीच नको ते आजार मागे लागतील.
नवीन काम काय सुरु करता येईल याचा मागोवा घेणे. निगेटिव्ह विचारांपासून लांब राहणे, बातम्या न पाहणे हे करावे. बाकी योगा वगैरे तर आहेच Happy

VB,
छान !!!

संस्कार आजही मार्गदर्शक वाटतात. कधी कधी दडपण येते पण जाते ही ==. सीमंतिनी ++११

शब्दखेळ तर भारी....

फार विचार न करणे हा एक उपाय आहे. विचार करकरुन परिस्थिती बदलणार नाही, उगीच नको ते आजार मागे लागतील. ==>

विनिता.झक्कास, अनेकदा अनुभवलेले आहे...

मी activa वर जमेल तेथे मुक्त हवेत जातो, आमच्या डोंबिवलीला नदी किनारा लाभला आहे Happy , --not in great shape Sad But still Happy

मुली सोबत खेळने तर पर्वणी.

मी संगीत ऐकतो. श्लोक,स्तोत्र,गाणी,अभंग. तसेच भुभु लोकांशी खेळतो. चिडचिड झाली की स्वतःला समजावत राहतो. सकाळी फिरतो.

मी मायबोलीवर येते आणि इकडेच रमते, कोरोना विसरून जाते. Happy

तसंही कामवाली नसल्याने घरचे काम, शाळा नसल्याने मुलाला शिकवणे,मुलांसोबत खेळणे, नवर्यासोबत तेलुगु/तामिळ पिक्चर बघणे (एकटीने पाहिल्यावर काही कळत नाही Proud ) यातच जातो सगळा वेळ..
कोरोनाबद्दल विचार यायचे बंद झालेत आता.

1.अगदी surrvatila वस्तू मिळत नव्हत्या .
2.आई एकटीच मुंबईबाहेर होती.
3.जर झालाच कारोना तर नेमके काय करायचे.
4.आता सर्व घरकाम कसे करायचे

या 4 गोष्टींनी 2-३ दिवस त्रास दिला.मग फारसे लावून घेतले नाही.आजचा दिवस पर पडला ना,उद्याचे उद्या पाहू हा स्टँड गेली कित्येक वर्षे ठेवल्याने/ ठेवायला लागल्याने फारसे जड गेलेच नाही. उलट कामात दिवस जात असूनही फ्रेश वाटायचे.2 जिन्नस अधिक बनायचे.घरही विंचरल्यासारखे टापटीप असायचे.अर्थात आम्ही दोघे घरकाम करायचो आणि दोघेही घरी आहोत. ऑफिस असते तर येऊन काम करण्यावरून चिडचिड झाली असती.एवढ्या काळात करोना आठवलाही नाही.त्यात आणि माबोवर वेळ झकास जायचा.
शब्दकोडे आणि नंतर च गणेशोत्सवातील लेख,स्पर्धा मजा येत गेली.

आईच्या बाबतीत नंतर विचार केला तर ती जिथे होती तिथे जास्त सुरक्षित होती.कारण वयपरत्वे तिला डॉक्टरांची गरज लागली तर आमच्याकडचे डॉक्टर दवाखान्यात येत नव्हते.तिथे उलट आमच्या नातलग डॉक्टरांनी आईला सांगितले होते की काहीही गरज लागली तर मला सांगा. मी आहे.त्यांच्या जीवावर आईही मला येऊ नको असेच म्हणत राहिली.गेली 2-३ वर्षे तिला मुंबईला घेऊन आल्यावर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी hospitalised karayala लागत होते.B.P एकदम वाढायचे.यावेळी तिच्या पेईंग गेस्ट जोडीला होत्या.म्हटल्यावर मीही निर्धास्त होते.

ऑगस्ट पासून बाई आल्यावर एक शैथिल्य आले.निरुत्साही वाटायला लागले.

आम्ही यू ट्युब विडिओ बघून व्यायाम करतो. हा एक सगळ्यांनी करून पहावा असा प्रकार आहे. मजा येते. आपल्याला झेपतील्/आवडतील असे सगळे प्रकार आहेत. Cardio, stength, low impact, Tabata, warm up , stretching, cool down, dumb bells. Whatever. आम्ही आठवड्याचे ६ दिवस वेगवेगळे प्रकार करतो.
दर शनिवारी अनेक LosT cousins आता झूमवर भेटायला येतात. जगभरातून. व्हॉटस अप मधून भरपूर ज्ञान्/विनोद्/नमुने मिळतात.
शिवाय WFH आहेच.
तरी कधीतरी असे वाटते, अरे हे काय चाललय, किती दिवस घरात बसायच. मग कोविदच्या फिगर्स वाचतो. मग नाही घरी बसायचा कंटाळा येत वा मनःस्वास्थ्य बिघडत. उलट घरात सुखी व सेफ आहेत असच वाटत. Happy

1) बागकाम
२) ई बुक्स
३) मुव्ही
४) घरकाम आणि घरुन काम
५) श्लोक मेडीटेशन व्यायाम ब्रिदिंग एक्झरसाईझ
६) मित्र मैत्रिणींसोबत गप्पा व्हिडीओ कॉल
७) नवीन भाषा शिकणे
८) कामात बदल म्हणत त्या त्या वेळी आवडेल झेपेल जमेल ते काम
९) शब्दखेळ आणि बाकी मायबोली वाचन
१०) अधूनमधून भिती वाटणे अस्वाभाविक नाही पण त्यात अडकून स्वतःला घुसमटवून घेणे अस्वाभाविक आहे त्यामुळे तसे भिती वाटली जरी तरी त्यातून बाहेर पडायचे आहे हे पक्क असल्याने थोडे पेप टॉक्स स्वतःला देऊन इतर छोट्या पण चांगल्या सकारात्मक घटना शोधून आनंदी रहायचे

& Last but not least नवऱ्यासोबत टॉम & जेरी टाईप वाद घालणे Lol शप्पथ सांगते कोविड काळात पुढे काय होतय असा विचार असताना उगाच what if its our last conversation सारखे विचार येऊन वादच घालत नव्हतो. हे म्हणजे फारच सपक पथ्यकारक जेवणासारखे झाले होते. आता परत जरा एकमेकांना मुद्दाम उकसवून वाद घालतो, नॉर्मल वाटते Lol आमचे वाद मजेमजेचेच असतात त्यामुळे दोन मिनिटात सीन पालटून परत हसायलाही लागलेलो असतो पण ती दोन मिनिटे सगळं काही पुर्वीसारखे नॉर्मल आहे असा विश्वास देतात. Lol

सात महिने झाले. तुम्हाला जर वाटत असेल अजून आपल्याला कोरोना झाला नाही तर तो तुमचा गैरसमज आहे. कोरोना जवळपास सगळ्यांना होऊन गेलाय आणि आपल्या शरीरात अँटीबॉडीज तयार झाल्या आहेत. त्यामुळे पहिल्यासारखा धोका आता नाही. त्यामुळे घरी बसायचे दिवस लवकरच संपून जीवन पूर्ववत होणार आहे.

जिज्ञासाची शाश्वत विकास मालिका खूप उपयोगी पडली. आपल्या गरजा खरं तर तशा थोड्या असतात. सामाजिक प्राणी सामाजिक प्राणी करत गरजा वाढतात. कितीही फाट्यावर मारून जगायचे म्हणले तरी चार लोकात बरं दिसतं/लागतं म्हणून गरजा वाढतात. समाजात मिसळायचे नाही म्हणल्यावर गरजांचे आत्मपरिक्षण करायची संधी मिळाली. यानंतर माझे जीवन तरी 'पूर्ववत' होणार नाही.

ऑफीसला जाईन, पगार पुन्हा मिळेल; पण कशी जाईन, पगार कुठे खर्च करेन इ इ सगळं आतून बदललं आहे. जि चे धन्यवाद.

बाळ
भगवंतांची कृपा
Bundle of joy नुकतंच पदरात आलं आणि lockdowm झालं, करोना मुले negativity पसरली
पण आम्हाला तिकडे लक्ष द्यायला वेळ आणि energy नव्हती आताही नाहीये
आवश्यक ती सर्व काळजी घेतो आहोत बास
बाकी पूर्ण वेळ कामे आणि रमाबाईंसोबत खेळणे ,सांभाळणे असा जातो..
कविन म्हणाल्या तसं नवऱ्याजवळ मन हलकं करणे होत असते मधून मधून (लोक त्याला वाद म्हणतात किंवा किरकिरही म्हणत असतील).

ज्ञानेश्वरी
A life management book
नक्की वाचा
कुठलेही पान काढून
माऊली नि सगळ्या चिंता आणि किंतु परंतु मिटवण्याची तजवीज करून ठेवलीये

हा लॉकडाऊन काळ खूप मजेत गेला खरे तर. जसं मला आयुष्यभर जगायला आवडेल तसे या काळात जगलो. स्पेशली वर्क फ्रॉम होम तर एक पर्वणी होती. झोपायला आणि मुलांसोबत खेळायला जास्त आणि हवे तेव्हा मिळाले. तसेही माझ्या आयुष्यात आधीही यापलीकडे काही सुख नव्हते. त्यामुळे हा लॉकडाऊन अजून वाढावा असेच आतून वाटत राहिले. त्यामुळे लॉकडाऊनचे कारण ठरलेल्या कोरोनाचाही कधी राग आला नाही वा भिती वाटली नाही. पण त्याचसोबत ईतर माझ्या आजूबाजूच्या लोकांची परीस्थिती अशीच नव्हती. आपले सुखही तेव्हाच मनापासून उपभोगता येते जेव्हा आपल्या आजूबाजूचेही आनंदीत असतील. त्यामुळे कोणाला फारसा त्रास होऊ नये, प्रत्येकाला त्याचा आनंद त्याचे सुख लवकरात लवकर या न्यू नॉर्मल लाईफमध्ये गवसावे असेच वाटत होते.

मायबोलीवरूनही मधला काळ गायब होतो ते पुन्हा उगवलो. हा सुद्धा माझा एक छंद आहे. या काळात तो देखील पुन्हा थोड्याफार प्रमाणात जोपासला. आता हळूहळू आमचे ऑफिस सुरू होतेय. पण त्याने वाढलेला फॅमिली टाईम कमी होऊ नये हाच प्रयत्न राहील.

बाकी नुकतेच ऑफिससाठी आठवड्यातून दोन दिवस बाहेर पडू लागल्याने बाहेरचे बरेपैकी सुरळीत झालेले जनजीवन बघतोय. जे लोकं दिसताहेत ते तरी चिंतामुक्त दिसत आहेत. त्यामुळे आपसूकच छान वाटत आहे. कोरोनाचा बाऊ करणे आणि अतिरीक्त काळजी घेणे मी सुद्धा कमी केलेय. पण ते असो, हा वेगळ्या धाग्याचा विषय झाला..... पण मनस्थिती अशी कधी बिघडलीच नाही जे काही वेगळे शोधावे लागले. आपले सुख कधी भौतिक बाबींवर वा बाह्य घटकांवर अवलंबून नसावे ज्या शाश्वत नसतात... हे आधीही माहीत होते.. पुन्हा नव्याने उमजले.

भगवदगीता वाचत आहे(जशी आहे तशी- इस्कॉन वाली).
शरदजी उपाध्येंच्या भक्तीसागर पुस्तकातील निरूपण वाचणे व त्यातील श्लोक पठण करणे हे नियमित सुरू आहे. सणवार जमेल तसे ritual करते. सेलिब्रेट वगैरे करण्याचा फार उत्साह नसतो पण कुलाचार सुरू ठेवते, यथाशक्ती. आता नवरात्र जवळ येत आहे तेव्हाही ritual करणार. अधिक महिन्यात श्रीकृष्ण महत्वाचे म्हणून गीता अभ्यासायला सुरुवात केली. श्री गजानन विजय पोथी पण वाचायला आवडते.
बाकी इतर कितीही टाईमपास केला तरी आस्तिक माणसास अध्यात्माशिवाय पर्याय नाही.

बाकी इतर कितीही टाईमपास केला तरी आस्तिक माणसास अध्यात्माशिवाय पर्याय नाही. +१११
रामरक्षा आणि भीमरुपी चे आवर्तन(११, २१, ५१, १०८ जमेल तेवढे) करून पाहा ज्यांना जमेल आणि श्रद्धा आहे त्यांनी

सी, तुझा प्रतिसाद वाचून फार छान वाटलं!
मला देखील मी करत असलेल्या इकॉलॉजीच्या कोर्सचा मन चांगल्या विचारांत गुंतवायला मदत झाली/होते आहे. पर्यावरण विषयात रस आधीपासूनच होता पण त्याचा साकल्याने विचार करण्याची दृष्टी इकॉलॉजीच्या क्लासमुळे मिळाली. स्वतःच्या दैनंदिन आयुष्यात कसे बदल करता येतील या विचारात आणि ते विचार कृतीत आणण्यात बराच वेळ गेला/जातो!

मला हरवलेला छंद सापडला.... खूप स्केचेस/पोर्ट्रेट्स काढली.... जवळजवळ 35 वर्षांनी पेन्सिल हातात धरली पण तिने आताही तितकाच आनःद दिला. आठ वर्ष मायबोलीवरही फारशी येऊ शकले नव्हते.... पण आता "लॉकडाऊन इफेक्ट्स' नावाचा धागा सुरू केला त्यावर अवश्य पहा.

व्यवसाय बंद पडलेले खूप जण आहेत पाहण्यात. कोविडने पोटावरच पाय दिलाय. वाटतं तितकं सोपं नाही मनःस्वास्थ्य टिकवणं.

आम्ही सरकारी दवाखान्यात डॉकटरच असल्याने कोविडने नुकसान झाले नाही
पगार मिळाला, वर 300 रु भत्ता मिळणार आहे
शिवाय कोविड होऊन , त्याच हॉस्पिटलात फुकट उपचारही झाले, फुकट अँटीबॉडी मिळाल्या