लॉर्ड ऑफ द फ्लाईज

Submitted by केदार on 7 May, 2009 - 22:36

लॉर्ड ऑफ द फ्लाईज
- लेखक विल्यम गोल्डींग

मॉर्डन लायब्ररीने प्रसिद्ध केलेल्या १०० चांगल्या पुस्तकांच्या यादीचे वाचन होईल तसे चालू आहे. काही दिवसांपुर्वी लॉर्ड ऑफ द फ्लाईज आणले आणि वाचायला घेतले. सुरुवातीलाच दोन्-चार पानांनंतर उर्वरीत पुस्तकात काय आहे ह्याची उत्कंठा वाटायला लागते आणि पुस्तक हातातून सोडवत नाही. मध्ये दोन तीन वेळेस दोन तीन पानं सोडुन पुढे जावे वाटले तितकेच, पण बाकी वेग खूपच मस्त. बेटावरील वातावरण, माणसाच्या आतिल माणूस व लपुन बसलेला जनावर ह्यातील लढा, शाळेतल्या मुलांची माणसीक स्तिथी हे सर्व मोठ्या खूबीने मांडले आहे.

न्युयॉर्क टाईम्स ने पुस्तकाचे वर्णन करताना, " Golding's aim to "trace the defect of society back to the defect of human nature" is elegantly pursued in this gripping adventure tale about a group of British schoolboys marooned on a tropical island. असे लिहीले आहे.

साधारण प्लॉट असा आहे की, " काही मुले एका निर्जन बेटावर अडकतात, सोबत कोणी मोठे माणूस नाही, मुलांची वय पण सहा पासून पुढे टिनएजर पर्यंत. राल्फ पासून ष्टोरी सुरु होते आणि त्यावर संपते, तो कथानायक. सोबत पिगी, जॅक ,सॅम न एरिक हे जुळे बंधू. मॉरीस, रॉजर अशी बाकीची मुलं. राल्फमधील नेत्याला पिगीच्या विचांराची जोड लाभते. निर्जन बेटावरुन जर परत इंग्लडला जायचे असेल तर त्या बेटावर जाळ करुन त्याचा धुरा मार्फत येणार्‍या जाणार्‍या बोटींचे लक्ष वेधुन घेउन सुटता येईल असे राल्फच्या लक्षात येते. तो मग एका टेकडीवर जाऊन जाळ तयार करायाला सर्वांना प्रवॄत्त करतो. जाळ तयार कसा करावा येथुन सुरुवात. पिगीकडे असणार्‍या चश्म्याच्या सहाय्याने जाळ तयार केला जातो. मुले लहान असल्यामुळे साहजीकच जंगलात राहणार्‍या बिस्टची त्यांना रोज रात्री भिती वाटते, त्याने काही मुलांचे माणसीक संतुलन बिघडते. अशा अनेक अडचणी येत असतात. त्यांचा मध्ये असणारा जॅक हा माणसांमधील वाईट प्रवृत्तींना दाखवणारा आहे. त्याला शिकार करायला आवडते व शक्य तितके कमी नियम पाळायला आवडतात. राल्फला सुसंस्कृत माणूस म्हणून राहावे वाटत असते, त्याला शक्य तितक्या लवकर त्या बेटावरुन त्या सर्वांची सुटका करायची असते, तर जॅकला सुटका, सुसंस्कॄतपणाचा विचार वगैरे शिवत नसतो. अदिवासी लोकांसारखी शिकार, चेहर्‍यावर रंग लावने, मनाला वाट्टेल तसे वागने हे सर्व तो करत असतो. तो रॉजरला हाती घेउन पुढे जाऊन स्वतःची टोळी तयार करतो, ह्या टोळी युद्धात एक दोन मुलांचा त्यात मृत्यू होतो.

त्या बिस्टशी ते मुलं कसा लढा देतात, जॅक चे पुढे काय होते, राल्फ सुटतो का? पिगी त्याला कशी मदत करतो? हे मी लिहीत नाही कारण ...

तुम्ही वाचावे अशी अपेक्षा आहे. Happy

हे ह्या शतकातील क्लासीक पुस्तक म्हणून गणले गेले आहे व गोल्डींगला एकुनच त्याचा साहित्यातील योगदानासाठी नोबेल पारितोषकाने गौरविले गेले आहे.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ज्जे बात.. हे खरेच एक अप्रतिम पुस्तक आहे (जी एं सारख्या माणसाने आवर्जुन अनुवाद करावा ह्यातच सारे आले).. पण केदारा, तुझ्या रसग्रहणाबाबत मतभेद आहेत.. वीकांतात जमल्यास सविस्तर लिहितो.

उदाहरणासाठी: >>>>>"राल्फला सुसंस्कृत माणूस म्हणून राहावे वाटत असते, त्याला शक्य तितक्या लवकर त्या बेटावरुन त्या सर्वांची सुटका करायची असते, तर जॅकला सुटका, सुसंस्कॄतपणाचा विचार वगैरे शिवत नसतो. अदिवासी लोकांसारखी शिकार, चेहर्‍यावर रंग लावने, मनाला वाट्टेल तसे वागने हे सर्व तो करत असतो">>>>
मुळात हे पुस्तक सुसंस्कृतपणा म्हणजे नेमके काय, मानवाची आदीम प्रवृत्ती की संस्कृतीने ठोकुन-ठाकुन बनवलेली वृत्ती ह्यातली वरचढ कोण ह्याच विषयावर झगडते.

खरे तर हे रसग्रहण असे नाहीच. पुस्तक ओळख आहे. मी आधी बरेच लिहून खोडले कारण मी माझेच मत मांडले असते तर ज्यांनी वाचलेच नाही त्यांची भूमीका ते वाचताना पुर्वग्रहदुषीत झाली असती. Happy

मला फक्त हे पुस्तकं आवर्जुन वाचा(च) एवढेच सांगायचे आहे.

हो ते पुस्तकं त्याच विषयावर झगडते, म्हणून न्युयॉर्क टाईम्सचे ते वाक्य टाकले, जे अगदी योग्य वर्णन आहे.

लॉर्ड ऑफ द फ्लाईज ची आठवण सकाळी सकाळी. वा ! वा !
निरागस या शब्दाचा अर्थच पुसून जातो हे पुस्तक वाचून होईपर्यंत.

Thinking as a hobby. अत्यंत आवडतं.
http://www.smartercarter.com/Essays/Thinking%20as%20a%20Hobby%20-%20Gold...

हा रोदाँ (उच्चारी चु.भू.द्या.घ्या) थिंकर- एकदा प्रत्य़क्ष पहायची इच्छा आहे.
http://en.wikipedia.org/wiki/The_Thinker

मला ह माणसाच्या primal instincts बद्दल वाटलेले पुस्तक. लहान मुले नि बेट हे प्रतिकात्मक आहे, असे काहिसे.

हे विशलिस्ट मधे आहे. म्हणजे जीएंनी केलेला अनुवाद. आधी कुठलं वाचू? Happy

आधी वरिजनल. गोल्डिंग जशाच्या तसा वाचायचा. मग डोकं धरुन बसायच. Proud मग अनुवाद ( मी वाचला नाय) टण्यानी लिहीलेय म्हणून कळलं.

Happy

सद्ध्या तू लिंक दिलेला लेख वाचत्ये. Happy

जीए अनुवादीत पुस्तकाचं नाव काय?

खरंच अप्रतिम आहे हे पुस्तक....
छानच ओळख करून दिलीस केदार... Happy
अमेरिकेत कुठल्याही स्टोअरमधल्या पुस्तकांच्या सेक्शनमध्ये 'दा विंची कोड' च्या बाजूला 'लॉर्ड ऑफ द फ्लाईज' ठेवलेले असतेच असते.
जीएंचं अजून वाचलेलं नाहीये पण त्यांनी त्याचे मराठी नामकरण केले नाहीये बहूतेक.

थॅन्क्यु बो-विश. आता बघेन नक्की.
जीएंनी नामकरण केलं नसेल तर काय सांगून मागायचं दुकानात?

माझ्या माहितीनुसार जीए अनुवादीत पुस्तकाचे नाव 'लॉर्ड ऑफ द फ्लाईज' असेच आहे.
टण्याने जीएंचेपण वाचलेले असावे....तो नक्की सांगू शकेल.
टण्याचं विवेचन वाचायला खूप आवडेल...आसामी, रैना तुम्हीही लिहा(च).

धन्यवाद केदार. वाचायला हवं.
इथल्या एवढ्या दिग्गज लोकांनी वाचलय म्हणजे नक्कीच वाचनीय असणार पुस्तक.

पुस्तक वाचायला घेतलं वीकेंडमधे. ज्या एका ठाय लयीत ते सुरू झालंय आणि गुंतवत चाललंय त्याला तोड नाही. रैना म्हणाल्ये तसं 'निरागस'पणाबद्दलच्या कल्पनांना धक्के बसायला सुरुवात झाली आहे..

केदार, (आणि रैनापण,) धन्यवाद. Happy

बापरे, वाचायलाच हवंय आता.

केदार या पुस्तकाचे नाव ऐकलेले आहे, पण काहीही माहिती नव्हती. आता जरा कुतूहल वाटत आहे, बघतो वाचून. धन्यवाद रिव्यू बद्दल.

मॉर्डन लायब्ररीने प्रसिद्ध केलेल्या १०० चांगल्या पुस्तकांच्या यादीचे >>
केदार, तुम्ही म्हणता ती लिस्ट हीच आहे का ?
http://www.randomhouse.com/modernlibrary/100bestnovels.html

एवढे चांगले प्रतिसाद पाहिल्यावर वाचायलाच हवे हे पुस्तक

हे माझे फार आवडते पुस्तक आहे,निदान तीनदा तरी वाचले असेन मी.इंग्रजीतही आणि अनुवादही.
एका निर्जन बेटावर लहान मुले अडकल्यावर ती एक गोडगोड आदर्श समाजव्यवस्था तयार करतात असे स्वप्नरंजन असलेल्या अनेक कादंबर्‍यांना सणसणीत उत्तर म्हणुन ह्या कादंबरीकडे पाहिले जाते.
मुले ही देवाघरची फुले नसतात,जेंव्हा प्रस्थापित समाजाच्या चौकटी ढासळुन पडतात तेंव्हा ती देखील क्रूर,स्वार्थी आणि भयानक वागू शकतात हा अस्वस्थ करणारा आशय गोल्डींगने अत्यंत ताकदीने मांडला आहे.
माणसाच्या मनात दडून बसलेल्या श्वापदाचे, 'लॉर्ड ऑफ द फ्लाईज'चे रुपक तर जबरदस्त आहे.