प्रश्‍न

Submitted by kanchankarai on 5 May, 2009 - 08:32

एक प्रश्‍न असा की,
बदलून जाते विश्‍व
एक प्रश्‍न असा की,
भंगते सुंदर स्वप्न

एक प्रश्‍न असा की,
उमलते नवी अपेक्षा
एक प्रश्‍न असा की,
अनंत काळची प्रतीक्षा

एक प्रश्‍न असा की,
जणू फुलावा प्राजक्त
एक प्रश्‍न असा की,
अश्रूही बनावे रक्त

एक प्रश्‍न असा की,
तो प्रश्‍नच न राहावा
एक प्रश्‍न असा की,
उत्तरच प्रश्‍न व्हावा

कवितेचा मूळ दुवा येथे पाहता येईल.

गुलमोहर: 

छान आहेत प्रश्नोत्तरे. माझीही एक अशीच चारोळी आहे, केव्हातरी सादर करेन नक्की.
..सुसंगती सदा घडो, सुजनवाक्य कानी पडो..

वार्‍याची बात !
वार्‍यावरची नाही !! ---
" आवडली. "

प्रश्‍न - छान

*****
गणेश भुते
*********************
इंद्रधनुच्या रंगांमध्ये दंगणारी निरिक्षा दे
आभाळही भाळेल अशी नक्षत्रांची कक्षा दे
*********************