बाजारातुन चाललेल्या त्या मुलाच्या चेहरयावर आनंद होता. एवढ भंगार !

मिळालेले प्लॅस्टिक जास्तित जास्त घेवुन जाण्यासाठी त्याने ते अंगाभोवति लपेट्ले होते आणि दुसर्या पिशवीतही ठासुन प्लॅस्टिक भरलेले ......
बाजारातली गर्दी चुकविताना त्याची त्रेधातिर्पीट उड्त होति...

कधी कधी अंगावरचे भंगार पड्त होते..पण पुन्हा ते जमा करुन तो चालला होत..एकदा का हे ओजे विकले कि मिळ्नार पेसा..एकच विचार...
पण हा बाळबोध विचार दुनीयेला कसा पटेल ?
बाजारात चाल्लेली ही धडपड एकाच्या लक्षात आलीच..पण रुचली मात्र अजिबात नाही.
एक चिमुर्ड एवढ भंगार गोळा करतो हे पाहुन जणु त्याचा ईगो दुखावला. त्या मोठ्याने वाटेतच त्या मुलाला अडवले आणि दमदाटी सुरु केली..

पण मी त्या मुलाच्या मागोमागच होतो. थोडा हस्तक्षेप केल्यावर मोठा तिथुन गेला....
मुलाची जगण्याचि धड्पड ....काम करण्यार्याला ओढ्ण्याची समाज वुत्ती...बाल मजुरी...अनेक विचार ......
नक्कि काय हरवतंय....
बालपण्.......कि माणुसकी ?
अनेक
अनेक दुष्टचक्रांचे उगम हे माणुसकी हरवण्याने सुरु होतात. हे वास्तवचित्र, एखाद्या " डंख" [ STING OPERATION] चित्रीकरणा एव्हढेच महत्वाचे ठरावे, हा निव्वळ योगायोग! बरोबर?
God can not always come himself. Sometimes he sends " his men".
ही उक्ती पटते का बघा विचार करून.
धन्यवाद !
गिरीष, फार
गिरीष, फार विचित्र तिढा आहे हा!
___________________________________________
मावळत्या दिनकरा http://www.maayboli.com/node/7534
हे असच
हे असच चाललय.
श्रीमंत अधिक श्रीमंत होतायत आणि गरिब जगण्यासाठी धडपडतात.
ह्या अभागी
ह्या अभागी मुलांना जीवन किती लहान वयात समजते ना?
आपली मुले ज्या वयात उगिचच हट्ट करतात, आपण प्रत्येक गोष्ट आपल्या मुलांना सहज उपलब्ध करुन देतो आणि अजुन लहान आहे, त्यांना समजत नाही असे म्हणुन आपण आपल्या मुलांना गोंजारतो, आणि त्याच निरागस वयात जिवन जगण्यासाठी, basic गरजा भागवण्यासाठी हि रस्त्यावरची मुले किती कष्ट करत असतात. जीवनातील चटके अनुभवत असतात. त्या बिचार्यांना बालपण मिळतच नाही. किती दुर्भाग्य आहे नाही.
फोटो तर
फोटो तर यथार्थ आहेतच पण .........
मध्ये मध्ये दिलेली माहिती सुन्न करुन जाते रे! सलाम मित्रा !!
____________________________________________
मी मायबोलीकर !!
http://maagevalunpahataana.blogspot.com/
गिरिश, पोटा
गिरिश,
पोटात कालवलं माझ्या हे फोटो पाहून..
भावस्पर्शी टिपण.
सरसरुन कटा
सरसरुन कटा आला ..... यवढच म्हणेन !
विकि
आणखी एक
आणखी एक कटु सत्य
*******************
सुमेधा पुनकर
*******************
अशी बालपण
अशी बालपण हरवलेली लहान वयातच मोठी झालेली मुले पाहीली की मन खुप अस्वस्थ होत.
मी याच
मी याच विशयावर कविता केली होती.ती इथे देतो;
नाही शोधत माणिक मोती नाही सोनेचान्दी
उचलुन घेतो दिसतिल तिथले कागद तुकडे रद्दी
हवे कशाला कुणास ठाउक कागद नवीन कोरे ?
लेखन वाचन काय ढापले कुणास ठाउक सारे ?
कागदामध्ये बान्धुन घेती कोणी मालमिठाई
काढुन घेउन माल फेकती कागद ठाई ठाई
तसेच कागदतुकडे कोणी घाण पुसाया घेती
ते तुकडे मग कचरापेटित अमुच्यासाठी येती
त्या रद्दी कपट्यान्चेही मग करती काही कोणी
म्हणुनच उचलुन नेउन देतो भरून गोणी गोणी
रद्दी कागदतुकडे देउन मिळती रुपडे चार
तोच आमुचा पोटासाठी कसा बसा आधार
ठाउक नाही आजचेच मग कोण उद्याचे जाणे
असेच चाले नित्य आमुचे रद्दी जीवनगाणे
आमुच्याचसम आणिक कोणी शोधित येता रद्दी
दिसेल त्याला तिथे कदाचित या देहाची रद्दी
उचलुन नच ती घेतिल कोणी ठाउक त्यान्ना पुरते
प्राणपुडीच्या ह्या रद्दीतुन पुन्हा न काही मिळते.
.....................................
माधव पान्ढरीकर
शिक्षणाच्
शिक्षणाच्या मदतीने हा उद्याचा उद्योजक होऊ शकतो. आधार आणि गायडन्स हवा त्यांना, ही सद्यस्थिति बदलायची तर. छान टिपली आहेत दृष्य.
माधव, किती खरं