अव्यक्त भावना

Submitted by kanchankarai on 28 April, 2009 - 06:59

अव्यक्त भावनांचे,
काहूर मनी दाटले
समीप तू असूनही,
शब्द आज गोठले

किनारा शोधीत जशी,
येई दुरून लाट
पाहण्या तुला तसे,
नयन हे आसावले

खट्याळ कुंतलांचा,
स्पर्श मोरपंखी
गुंतण्या अधीर त्यात,
मन हे वेडावले

उठती वाळूत ओल्या,
सुकुमार चरणांचे ठसे
ना कळे, का भास होतो,
सप्तपदीची पाऊले

पाहूनी चंद्रास गगनी
रजनी धुंदावली
मिलना तयांच्या बघ
झाली चांदण्याची फुले

मोगरा फुलला

गुलमोहर: 

छान Happy

पाहूनी चंद्रास गगनी
रजनी धुंदावली
मिलना तयांच्या बघ
झाली चांदण्याची फुले>>>>सह्ही!

वाह छान... तरल भावना उतरल्या आहेत... तुमची साईट सुद्धा आवडली..!!!

अहाहा. अप्रतिम.

वार्‍याची बात !
वार्‍यावरची नाही !! ---
" सुंदर रे! "

आपल्या सर्वांच्या अभिप्रायाबद्दल खूप खूप आभारी आहे.

@Satyajit_m,
माझ्या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल आभार.

मोगरा फुलला