कायच्या काय विडंबने

Submitted by केदार१२३ on 24 April, 2009 - 04:20

(सध्या गुलमोहोरवर चालणार्‍या कायच्या काय कविता किंवा कायच्या कायतरीच कविता वाचून 'कायच्या काय विडंबने' सुरू करावे अशी उर्मी मनात दाटून आली. त्यासाठीच हा प्रपंच)

१) कोंबू बाजारला जाते

कुणाची क्षमा मागायची ?
उत्तर : गदीमांची क्षमा मागून 'रंगू बाजारला जाते' च स्वैर विडंबन

कोंबडी भुंकाया लागली भूंकू द्या
अंडी इकाया नेते इकू द्या

कोंबू डुलत डुलत चालते
गोऱ्या हातात लेखनी हालते
लेखन चोरावी एकदा वाटते, वाटते, वाटते, नको बा

जरा थांबून बोल ग कोंबू
(माझ्या डोस्क्यातल) तुझ्या डोक्यात कसं ग कोंबू ?
माजी कलेजी तुटते, तुटली तर , इकूया

कोंबू ओळख आहे मी कोण ?
माझ्या हातातला लेखण !
मी मनातल मनात ठेवते, ठेवते, ठेवते, ठेवु द्या

तुझा पाठलाग कोंबू करीन
अशी मुरडून कान मी धरीन
तुझं खानपट थोडं फोडते, फोडते, फोडु द्या

केली थट्टा अंगाशी आली
लाज कोंबूची माझ्या गेली
कोंबू थाटात कवन पाडते, चालते ? चालते तर , चालू द्या

२) बाई मी पळाली

कुणाची क्षमा मागायची ?
उत्तर : प्रोफेसर आणि तमाम मायबोलीकर

(शहरातल्या स्त्रीची व्यथा मांडण्याचा अयशस्वी प्रयत्न )

बाई मी गेली मॉलला
कार्ड घेऊन खरेदीला
मॉलच्या बाजुला ऑफर दिसली
भुंगा डसल्यासारखी पळत सुटली….

बाई मी गेली ड्रायव्हींग्गला
घेऊन पीयुसी हातात
कमीन्या गाडीची काचच फुटली
सोडली गाडी नी पळत सुटली….

बाई मी गेली डीस्कोला
पास नाय मिळाला पबचा
रस्त्यात श्रीरामसेनेची गर्दी दिसली
डीस्कोला न जाता पळत सुटली…..

बाई मी गेली मल्टीप्लेक्स्ला
तिकिट काढून थिएटरला
रामूच्या सिनेमानी नजर विटली
सोडला सिनेमा नी पळत सुटली…..

बाई मी गेली पार्टीला
सोबत घेऊन नवर्‍याला
वाटेत त्याला खबर भेटली
इन्कम टॅक्स ची रेड पडली……
डोकं धरलं नी पळत सुटली……

३) नवाबाच लग्न

कुणाची क्षमा मागायची ?
उत्तर : प्रोफेसर आणि तमाम मायबोलीकर

अडतीस वर्षाचा नवाब जुना
अहो पोरगी बघा ना
ह्याचं लगिन करीना
किती टशन हो ह्याच्या मना
कुठे जीव देइना
ह्याचं लगिन करीना

आमावश्येच्या चांदण्यात
हा झाडाखाली उभा ना
म्हणे 'अमृताहूनी गोड
नाव तुझे बेबो
अशा शहाण्या सैफाला
अहो पोरगी बघा ना

एवढ मोठं कुरण पाहुनी
चिंता होई त्याच्या मना
किती उंडरायच आहे अजूनी
म्हणून चरत राहेना
अशा उचापती नवाबाच
तोंड काळे करा ना

चमत्कार दोन्ही पायांनी
कसा करतो बघा ना
उभे राहेना जवळ कुणी
झाडे दुगाण्या बघा ना
अशा स्टाइलीश नवाबाला
अहो नवरी बघा ना

किती सहले हो ह्याला अमॄता
कोणीतरी समजावा हो आता
बिचाऱ्या गाढवाची वेदना
द्या हो प्रेमाची लाथ कुणी
त्याला आराम करु द्याना
ह्याचं लगिन करीना

अश्या ह्या गाढवाची
रींग टोन सेट करून द्या ना

समाप्त
आता कुणाची क्षमा मागायची ?
उत्तर :
(हे वाचायला लागणार्‍या तमाम मायबोलीकरांची) Proud

गुलमोहर: 

हरेक प्लेटीमधे जरासा चकणा ठेवा!
पीवा, पिवू द्या, पिण्यात थोडी 'शिवा'स ठेवा!! (शिवा हा पिण्यातला पार्टनर त्यामूळे शिवा वर श्लेष)

करू नये ग्लास लीक कोणी कधी कुणाचे!
कोकाकोला, लिमका, यांत माफक बॅलंस ठेवा!! (जाहीरात्बाजी)

गमावलेली असोत स्वप्ने, हॅप्पी अवरी.....
खुबीखुबीने अखंड चालू पिण्यास ठेवा! (इच्छा तेथे मार्ग)

खुशाल सामना हा वासाचा कुणी करावा!
बरोबरीने बडीशेप पानाचा मुखवास ठेवा!! (जनाची काळजी मनाची लाज)

हसो कितीही विकट वाट जरी नागमोडी;
जरा लुडकून, रोज जारी प्रवास ठेवा! (डर के आगे जीत है)

अनेक घेणेकरू पुढे जायचे घ्यायला......
पुढे जरी पोचलात, मागे गिलास ठेवा! (परोपकार)

भले किती हँगोवर आहे उतरावयाची;
अवश्य दिवसा करा, निशेस उतारा ठेवा! (कंसीस्टन्सी)

पडो कितीही घरे जरी काळजास तुमच्या; (रोजची घेऊन)
तोन्डी लावावयास तुकडा झकास ठेवा! (स्वस्त खाओ तनमन जगाओ)

जगात कोणी कधी न राहो कुठे उपाशी!
ड्रायडेखातीर हशीखुशीने देशीच ठेवा! (त्यागाची भावना)

रस्ता तुम्हा बाराचा पुनश्च याद आला!
पुन्हा घेण्यास, गहाणही घरास ठेवा!! (फायनांशील मॅनेजमेंट)

चु भू द्या घ्या Happy

(ह्या विडंबनावर कुणी प्रतिसाद देणार नसल्याने प्रत्येक कडव्याच्या पुढे स्वतःच प्रतिसाद दिलेले आहेत कंसात)

कुणाची क्षमा : (विचार करून सांगतो)

हाच माझा दोष मी होमसीक होतो

हाच माझा दोष, मी होमसीक होतो!
घेउनी ताजा चहा, मी ठीक होतो!!

सोडली नाही चहाबाजीच माझी....
ते म्हणाले मी गिर्‍हाईक होतो!

केवढी किरकोळ अन् फाजील पत्ती....
उकळला गेला की किती आन्हिक होतो!

झोपलो च्या न घेता उशाशीच माझ्या.....
वाटलो शेजार्‍या.न्स मी आगळीक करतो!

काननदेवे, भरलीस माझी तूच खोकी....
दिव्य शब्दांनी तुझ्या मी वीक होतो!

मी न खुडली चहापाती, नव्हती मळली पत्ती....
मी चहाचा लाडका 'चहा'टळ होतो!

(मागे माशी वरुन विड.न्बन लिहील होत. माशी उडून गेली. डास मारले गेली काव्य झुरळे दगावली आता उरलाय फक्त ढेकुण म्हणजे मग कोरम पूर्ण होईल. नाकतोडा , भवरा, चतुर हे जातीबाह्य कीटक असल्याने आणिक त्या.न्चा प्रा.न्त वेगळा असल्याने त्याना आत्ता छेडत नाही)

खाटकीय ढेकूण (१)

खाटकीय कॉजवे वरुन
(ढेकूण) सहज काढतात वाटा
ज्याला त्याला आपल्या
स्वतंत्र असतात खाटा

धोती-कुर्तीवरती का होईना
दोघांनाही ते (२) नक्कीच (फाटले असले) पाहिजे
चावणारा चावत नसला तरी
घेणारानेही (चावून) घेतले पाहिजे (स्वतःला)

पुरवणी
(कविता मला पुरली नाही म्हणून ही अधिकचे कडवे (३)

चावून चावून चोथा झाला तरी
कविता पडत असतात सदा सदा (४)
ढेकुण येउन चावून गेला जरी
झोपा आता हसून खदा खदा (५)

ढेकुण राव घाणेकर
मो. न. ऑट ऑफ कव्हरेज एरीया

तळ टीपा:
(१) खाटकीय म्हणजे खाटकाशी काही देणे घेणे नाही. खाटीत रहाणारे ते खाटकीय
(२) ते म्हणजे धोती कुर्ती बाकी काही अर्थ अभिप्रेत नाही
(३) कडवे म्हनजे कडू असाही अर्थ काढू शकता माझ काय जातय
(४) हे यमक जुळवण्या साठी
(५) यमक चुकुन जुळलय

फोडणी : भाजी पुरी

कॉलस्ट्रॉल फ्री तेल
जबर तळतात
सुक्या नारळाचच
खोबर भाजतात

घडल्या पुर्‍याही
मागतात सेल्फी
भाजी मागूनही
वाढतात पुरी

(पुरीला भाजी नाही, चुकीला माफी नाही )

मो न : टेम्पररीली स्वीच्ड ऑफ

फोडणी: गुत्ता अनैतिकतेचा

रस्ता मोकळा असतानाही
ऊगीच जातात गटारात
खड्ड्यामधून ऊठून कधी
स्वत: पडतात कोनाड्यात

कित्तेक घशात ढोसलेली
अशी साहेबी(१) गुट्टी असते
टेबल-खुर्चीतून पडलेली
अनैतिकतेची व्य्क्ती असते

१) साहेबी गुत्ती : हापीसर्स चॉईस

मो न : सदा के लिये व्यस्त हय Proud

Pages