अमेरिकेतील अध्यक्षीय निवडणूक २०२०

Submitted by shendenaxatra on 15 February, 2020 - 21:47

घटिका जवळ येऊ लागली. डेमो लोकांची प्रायमरी रणधुमाळी सुरू झाली आहे. काही मोठे मोहरे युद्धात धारातीर्थी पडले आहेत. कमलाबाई, बुकर, अँड्र्यू यांग वगैरे. (त्यातले काही उपराष्ट्रपती बनायला उत्सुक असतीलच!) हिलरी आणि मिशेल ओबामा अशी नावेही ऐकू येत आहेत. तुलसी, कमला ह्या नावाच्या बायका राष्ट्रपती पदाच्या शर्यतीत असतील हे ५-१० वर्षापूर्वी खरेही वाटले नसते!
ट्रंपवर सगळी अस्त्रे फेकून झाली. ट्रम्प साहेब सगळ्यांना पुरून उरलेत. आता नोव्हेंबर मधे कोण प्रतिस्पर्धी असेल? ट्रम्प पुन्हा येईल का?
तुमचे काय मत?

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

ट्रंपला तर 1.2 लाख भारतीय लोकांचा पाठिंबा आहे Happy अब की बार ट्रंप सरकार. बर्नीला दिल्लीतील दंगल anti muslim वाटते. त्या पेक्षा ट्रंप बरा तुमच तुम्ही बघुन घ्या म्हणाला दिल्ली दंगलीबाबत.

एलिझाबेथ ताईही बाहेर पडल्या! त्यांना म्हणावे तितका प्रतिसाद मिळाला नाही. आता त्या कुणाला पाठिंबा देतात बघू या. उपाध्यक्षपद मिळेल म्हणून अनेक आशावादी उमेदवारांनी बायडनला पाठिंबा जाहीर केलेला आहे त्यामुळे वॉरनबाईनी तो दिला तर त्यांचा नंबर बराच मागे असेल.
बायडन ह्या माणसाच्या मानसिक आरोग्याबद्दल मला शंका आहे. वारंवार विस्मरण होणे, अत्यंत चुकीचे काहीतरी बोलणे ही चिन्हे फार चांगली नाहीत. उठसूट ट्रंपच्या मानसिक आरोग्यावर ताशेरे ओढणारे डेमो इथे काणाडोळा का करत आहेत?

उठसूट ट्रंपच्या मानसिक आरोग्यावर ताशेरे ओढणारे डेमो इथे काणाडोळा का करत आहेत? >> अहो काणाडोळा नाही केलाय, उलट त्यांनी रिपब्लिकन्स चा आदर्श समोरे ठेवलाय, "वारंवार विस्मरण होणे, अत्यंत चुकीचे काहीतरी बोलणे' हि उगाचच प्रेसिडंटची मक्तेदारी नको म्हणून.
तरी बघा त्यांना अत्यंत आत्मकेंद्रित , जगातल्या सगळ्याच विषयांमधे पारंगत असणारा (असा स्वतःच क्लेम करणारा) नि अत्यंत बेस्ट सपोरटींग कास्ट (परत हेही स्वतःचेच क्लेम) हायर करून त्यांना काही महिन्यांमधे हाकलून देणारा उमेदवार मिळालाच नाही. (ब्लुम बर्ग कडून हे सगळे पूर्ण होण्याच्या अपेक्षा होत्या पण त्याही धुळीस मिळाल्या)

>>उलट त्यांनी रिपब्लिकन्स चा आदर्श समोरे ठेवलाय,
हो का? मला वाटले की ती एक रिपब्लिकन लोकांनी केलेला घोळ निस्तरायला सज्ज अशी पार्टी आहे.
जर डेमो रिपब्लिकन पक्षाला आदर्श मानत असतील तर उमेदवारही रिपब्लिकनच निवडा की तिथे बायडन, बर्नीची बयाद कशाला?

असो. राजकारणी म्हणून खोटे बोलणे, बढाया मारणे वेगळे आणि स्वतःचे नाव विसरणे, स्वतःला आजही ओबामाचा उपाध्यक्षपदाचा जोडीदार समजणे वेगळे. वैद्यकीय भाषेत डिमेन्शिया, अल्सहायमर वगैरे जे रोग आहेत त्यापैकी कुठल्यातरी रोगाची सुरवात आहे का अशी जो बायडनच्या वक्तव्यावरून शंका येते.

मला वाटले की ती एक रिपब्लिकन लोकांनी केलेला घोळ निस्तरायला सज्ज अशी पार्टी आहे. >> म्हणजे रिपब्लिकन हि घोळ घालणारी पार्टी आहे असे म्हणताय होय.. बरे झाल तुम्हीच म्हणालात.

बायडनची चिंता सोडा, एक जण टॅक्स रिट्रन लपवतो, दुसरा हेल्थ सर्टिफिकेट लपवेल.

>>
मला वाटले की ती एक रिपब्लिकन लोकांनी केलेला घोळ निस्तरायला सज्ज अशी पार्टी आहे. >> म्हणजे रिपब्लिकन हि घोळ घालणारी पार्टी आहे असे म्हणताय होय.. बरे झाल तुम्हीच म्हणालात.
>>
असे डेमो समजतात असे मी समजतो. गैरसमज नसावा!
टॅक्स रिटर्न आणि हेल्थ सर्टिफिकेट एकाच मापाने मोजत असाल तर धन्य आहे!
उपाध्यक्षपदाचा उमेदवार तरी धडधाकट असेल अशी आशा!

टॅक्स रिटर्न आणि हेल्थ सर्टिफिकेट एकाच मापाने मोजत असाल तर धन्य आहे! >> बरं नाहीत एकाच मापाने मोजण्यासारखे तर मग लपवाछपवी का सुरू आहे चार वर्षे टॅक्स रिटर्न देण्याबाबत? तुम्हाला काय वाटते ? 'इवांका ची फिगर चांगली असून, ती माझी मुलगी नसती तर कदाचित तिला डेट केले असते' किंवा 'ईवांका पीस ऑफ अ‍ॅस आहे' किंवा गेला बाजार स्वतः ला स्वतःच स्टेबल जिनियस म्हणवणारी व्यक्ती मेंटली किती धडधाकट आहे किंवा , वाईस प्रेसीडंट एकटा परस्त्री बरोबर एका रुम मधे बायको शिवाय राहू शकत नाही त्याच्या मेंटल हेल्थ च्या प्रकृतीबद्दल तुमच्या मनात किंतू नाही पण दुसर्‍या पार्टीच्या अजून तरी संभाव्य उमेदवाराच्या तब्येतीची काळजी लागून राहिली आहे हि भलतीच cov fe fe गोष्ट आहे. (तरी बर बायडन ईलेक्शन जिंकणार की नाही हे तर माहीतच नाहीये - ह्याउलट हे दोघे तर प्रत्यक्ष पदावार आहेत)

लैंगिक स्वातंत्र्याच्या चरमसीमा गाठणार्‍यां अती पुरोगामी पक्षाला दोन प्रगल्भ व्यक्तींनी आपापसात काय प्रेम करावे ह्याविषयी का उठाठेव करावी? त्यात विकृती का शोधता?
ट्रंपने केलेली विधाने तुम्हाला नापसंत असू शकतात पण त्यात कुठला शारिरिक रोगाचे लक्षण आहे असे वाटत मला तरी वाटत नाही.
फुशारक्या मारणे हा ट्रंपचा गुणधर्म आहे पण म्हणून लगेच तो वेड्यांच्या इस्पितळात दाखल करावा असे काही नाही. तुम्हाला ते आवडत नसेल तर नसू द्या.
बायडनचे तसे नाही.

बादवे : हॉबर्ड स्टर्न हा अत्यंत अश्लील कार्यक्रम करतो. त्याच्या कार्यक्रमात त्याने ट्रंपकडून येस असे वदवून घेतले (कॅन आय से इवन्का इज अ पिस ओफ...., ट्रंप येस) व त्यावरून ट्रंपचा इव्हान्काकडे बघण्याचा दृष्टीकोन विकृत असल्याचे समजणे ही विकृत मनोवृत्ती आहे. स्टर्न हा अत्यंत नालायक मनुष्य आहे. ट्रंपने काही चूक केली असेल तर ती त्या कार्यक्रमात जाण्याची. पण तेव्हा तो राजकारणी नव्हता त्यामुळे ह्या घटनेला किती किंमत द्यायची ते आपणच ठरवा.

बिल क्लिंटन सारख्या बलात्कारी, अत्याचारी पुरुषाला सभांत मिरवणारे, डोक्यावर बसवणारे डेमोक्रॅट कुठल्या तोंडाने ट्रंपला शिव्या देतात देव जाणे!

राज आणि स्वाती२ दोघांशी सहमत . बायडन हाच बरी फाइट देउ शकतो. त्याची मेडिकल हिस्टरी बघता, म्हणजे मरणाच्या दारातुन परत येणे इत्यादी,नशीब पण त्याच्या बाजुने साथ देइल कदाचित Happy
आम्ही स्टेक होल्डर्स नसल्यामुळे , तटस्थ म्हणुन ही निवडणुक बघायला जास्त मज्जा येतीये.

त्याच्या कार्यक्रमात त्याने ट्रंपकडून येस असे वदवून घेतले (कॅन आय से इवन्का इज अ पिस ओफ...., ट्रंप येस) व त्यावरून ट्रंपचा इव्हान्काकडे बघण्याचा दृष्टीकोन विकृत असल्याचे समजणे ही विकृत मनोवृत्ती आहे. .> हे एकच विधान नाही ह्याची आपल्याला कल्पना नाही हे उघड आहे त्यामूळेच आपण शाब्दिक कोलांट्या मारत असे जस्टिफाय करण्याचा प्रयत्न करताय जे विकृत आहे. (ट्रंप स्वतः सुद्धा हे करत नाही ह्यातच सगळे आले) आपला तो बाब्या नि दुसर्‍याचे कार्टे हे उघड आहे

तुम्ही हॉवर्ड स्टर्नचे उदाहरण दिलेत आणि ते मी खोडून काढले आहे. ह्यात कुठले विधान शाब्दिक कोलांट्या आहे? हॉवर्ड स्टर्न हा एक विकृत, खळबळजनक काहीतरी विधाने करून आपल्या रेडियो कार्यक्रमाचे रेटिंग वाढवतो ह्यात काहीही अतिशयोक्ती नाही. ट्रंपकडून त्याने "हो" इतकेच वदवून घेतले. उरलेले साग्रसंगीत वर्णन हे स्टर्नच्या तोंडचे आहे.
माझी मुलगी सुंदर आहे आणि जर ती माझी मुलगी नसती तर मी तिला डेट केले असते हे म्हणणे तुम्हाला विकृत वाटत असेल तर ठीक आहे. मला वाटत नाही. मी असे विधान केले नसते. पण ट्रंपने केले म्हणून आकाश कोसळले आणि ट्रंप लगेच आपल्या मुलीकडे वाईट नजरेने बघतो असा निष्कर्ष मी काढणार नाही. उलट ज्यांच्या मनात कमालीचा ट्रंप द्वेष आहे त्यांना कुठलीही सबब चालते.

पुन्हा एकदा, लैंगिकतेच्या बाबतीत रोज नव्यानव्या सीमा ओलांडणारे, लैंगिक स्वातंत्र्याचा टोकाचा पुरस्कार करणारे दोन प्रगल्भ व्यक्ती एकमेकांवर कसे प्रेम करावे हे कसे ठरवू शकतात? त्याला योग्य वा अयोग्य म्हणण्याइतके जजमेंटल कसे बनू शकतात?
ट्रांन्स, बाय सेक्सुअल, सेम सेक्स, क्वीअर वगैरे सगळे काही बिनबोभाट स्वीकारले जाते मग हे का नाही?

डॉनल्ड आणि इव्हान्का ट्रम्प या प्रगल्भ व्यक्ती का? Proud

ट्रम्पला मेन्टली चॅलेन्ज्ड म्हणणं अनफेअर आहे कारण दॅट इज अलाविंग हिम टु प्लीड इन्सॅनिटी! हा एक लोकांना गंडे घालण्यापलीकडे काहीही कर्तृत्व नसलेला एमोरल आणि व्हिन्डिक्टिव माणूस आहे.
इव्हान्काचा विषय एक मिनिट बाजूला ठेवू, पण तुम्ही इन्सेस्ट आणि समलिंगी संबंध एकाच तराजूने तोलता का?

@स्वाती - नक्की इन्सेस्ट मध्ये आणि होमोसेक्श्युअ‍ॅलिटीत काय फरक आहे? अपार्ट फ्रॉम, एक समाजमान्य आहे दुसरी विकृत समजली जाते.
जर वडील व मुलीला (जेव्हा की दोघे अ‍ॅडल्ट आहेत) जर एकमेकांशी संबंध ठेवायचा असेल, तर त्यात नक्की काय इश्यु आहेत?
हां त्यातून निर्माण होणारी संतती दोषपूर्ण असू शकते परंतु जर गर्भनिरोधाची साधने वापरली तर आक्षेप घेण्यासारखे काय मुद्दे आहेत?
_____
वरील प्रश्नाचा अर्थ मला असे संबंध कम्फर्टेबल वाटतात असा नाही. मला फक्त एक तात्विकदॄष्ट्या फरक जाणुन घ्यायला आवडेल.

कॅम्ला हॅरिस, कोरी बुकर, पीट बुडाजज, एलिझाबेथ वॉरन ... यातलं कुणीही चाललं असतं. स्टेटस क्वो जो शिवाय त्याच्यात काहीच दिसत नाही. बर्नी चालेल मग. पण तो पंडित्सना इलेक्टेबल वाटत नाही आणि डेमॉक्रेटिक एस्टॅब्लिशमेंट म्हणजे जे काय असतं ते त्याला झाकोळुन टाकायला बसलेत.
जो बायडन एकदम थकेला आणि शून्य चार्म असलेला माणुस आहे. तो तरुणांना व्होट करायला कसा बाहेर काढणारे? आणि तात्याच्या रेकलेस बडबडीला कसा तोंड देणारे?
२०१६ ला उभा राहिला नाही, आता कशाला वराती मागुन थकेलं घोडं?
आता सेनेटने सपिना काढून त्याला बोलावण धाडलं की सुपर डेलिगेट्सचा घोळ घालुन खिशातुन आणिच कोणाला बाहेर काढणार डेम्स. मज्जा!

पण तुम्ही इन्सेस्ट आणि समलिंगी संबंध एकाच तराजूने तोलता का? >> त्यांन हेल्थ रिपोर्ट नि टॅक्स रिटर्न एकाच मापाने तोललेले चालत नाहित पण Happy

मी असे विधान केले नसते. पण ट्रंपने केले म्हणून आकाश कोसळले आणि ट्रंप लगेच आपल्या मुलीकडे वाईट नजरेने बघतो असा निष्कर्ष मी काढणार नाही. >> तुम्ही प्रत्येक विधान वेगवेगळे silo मधे बघता का ? त्याचे एकंदर बायकांविषयीचे बोलणे, वागणे वगैरे बघता तुम्हाला काय वाटते त्या विधानाचा अर्थ वेगळा काय घ्यावा असे ? एक (किंवा अनेक) डेट करणे ह्या कृती मधे/नंतर गाडी अजून कुठे पुढे जाणार अशी तुमची समजूत आहे ? (प्रत्येक डेट एकाच गोष्टी कडे जात नाही हे मान्य पण त्या संभाषणाचा आधीच संदर्भ बघितल्यावर हे फादर डॉटर डान्स सारखे काहीही नव्हते ते कोणीही प्रामाणीक मनुष्य मान्य करेल).

स्टेन हलकट मनुष्य आहे नि त्याने हे वदवून घेतले ह्यासारखा दुबळा डीफेन्स नाही. स्टेन ने ट्रंपचे तोंड उघडून ट्रंपच्या तोंडातून बळजबरीने हे वदवून घेतलेले नाहीये तर एका १८+ व्यक्तीने पब्लिक फोरमवर केलेले हे विधान आहे. (जे एकदाच केलेले नाही.) व्यक्ती तेंव्हा कोण होती हे ही मह्त्वाचे नाही. ह्या छोट्या छोट्ट्या वक्त्व्यातून, कृती मधून माणसाचे कॅरॅक्टर दिसते.

जर स्टेन सारख्या कवडीमोलाच्या मनुष्याच्या साध्या कृतींना एखादा मनुष्य सहजच फसत असेल तर मग 'पुतीन ने जे ट्रंपबद्द्ल केले आहे' असे ऐकिवात आहे ते तर खरच असेल ना ? Happy

सुपर डेलिगेट्सचा घोळ घालुन खिशातुन आणिच कोणाला बाहेर काढणार डेम्स. मज्जा! >> नेवाडाचे डिबेट ऐकलेलेस कत्ट्ड्क टॉड ने ५१% नि प्ल्ज्ड डेलीगेट्स बद्दल प्रश्न विचारला होता त्यावर सँडर्स वगळता इतर सर्वांनी एकच उत्तर दिले होते. त्यावरून तरी सुपर डेलिगेट्स सँडर्स विरुद्ध जातील असे वाटते.

मला फक्त एक तात्विकदॄष्ट्या फरक जाणुन घ्यायला आवडेल. >>
माझ्य मते propagation of genes is basic drive for any living being. जेंव्हा तसे होण्याची पद्धत कुठल्याही नियमांमधे फारशी बांधील नव्हती तेंव्हा 'बळि तो कान पिळी' होते. अशा प्रकारांमधे अर्थातच संघर्ष अधिक होता. तो कमी होण्याच्या प्रवासामधे कुठे तरी स्थैर्य प्राप्तीसाठी मानव वंशाचा प्रवास ओपन एंडेड व्यवस्थेमधून कुटूंबव्यवस्थेकडे झुकला. कुटूंबव्यवस्थेमूळे जगण्याच्या इतर अंगांचाही मनःसोक्त आनंद लुटता येतो हे उघड झाल्यावर ती अधिकच बळकट होत गेली. इतर सामाजिक नि नैतिक मापदंड नि त्याचे निकष त्यावर ठरले. प्रत्येक नात्याला काही विशिष्ट भूमिका नि बंधने आली. इन्सेस्ट ह्या च्या विरुद्ध होतो म्हणून विकृत धरला गेला असावा. ( ग्रीक कथांमधे इन्सेस्ट ची नि त्यानंतर आलेल्या शिक्षांची उदाहरणे आहेत - इन्सेस्ट बद्दल सामाजिक मत बदलण्याचे खटाटोप ह्या अर्थाने बघू शकता ) संतती दोषपूर्ण होण्याचा धोका हा त्यातला अंडरलायिंग करंट आहे. त्यामूळे त्याला वगळून सध्याच्या फ्रेमवर्क मधे इन्सेस्ट कडे बघणे संदर्भहीन ठरेल असे मला वाटते.

धन्यवाद, असामी. आजच्या गर्भनिरोधन सोपं आणि समाजमान्य असण्याच्या काळातही आईवडील आणि (सज्ञानसुद्धा) मुलांच्या बाबतीत लेव्हल्ड प्लेग्राउंड नसल्यामुळे कन्सेन्ट निश्चित करणं अत्यंत अवघड आणि हरॅसमेन्टचा धोका अधिक म्हणून ते त्याज्य आहेत असं मला वाटतं.

धन्यवाद असामी.
इन्सेस्ट हा धाग्याचा विषय नसल्याने मी हा शेवटचा प्रतिसाद देते आहे. हे जरी मान्य असले की ' प्रत्येक नात्याला काही विशिष्ट भूमिका व बंधने आली. ' तरी नाती इव्हॉल्व्ह होउ शकतत त्या दृष्टीने मला अजुनही इन्सेस्टमध्ये खोड काढता येत नाही.
___________________
हे असे खूप प्रश्न मी एका साईटवरती वाचले होते . असे प्रश्न जे अनुत्तरीत असतात उदाहरणार्थ - काल्पनिक प्रसंग - एक ट्रेन भरधाव येते आहे. व ती ट्रेन ३ लोकांना चिरडणार आहे पण तुमच्या हातात एक क्लच आहे जिच्यायोगे तुम्ही त्या ट्रेनची दिशा किंचित बदलू शकता. जर दिशा बदललीत तर एकच त्रयस्थ चवथा माणूस मरणार आहे. पण आधीचे तीघे वाचणार आह्त.
तुम्ही काय करा?
____
अशा बर्‍याच सिच्युएशन्स होत्या त्या साईटवरती.
_________
अगदी खरच सांगायचं तर अ‍ॅबॉर्शन कारावे का? हादेखील तसाच प्रश्न!
__________________
@स्वाती - स्वाती एकदा मुले सज्ञान झाली की दे आर ऑन ईक्वल ग्राउंड. इन फॅक्ट आईवडीलच म्हातारे व दुबळे होत जातात.
असो. काल्पनिक अनुत्तरीत प्रश्नांची हा धागा जागा नसल्याने, चर्चा थांबवते.

>>स्वाती एकदा मुले सज्ञान झाली की दे आर ऑन ईक्वल ग्राउंड. इन फॅक्ट आईवडीलच म्हातारे व दुबळे होत जातात.>>
जर का इन्सेस्ट ला मान्यता असेल तर मुळातच संततीला त्या दृष्टीने ग्रुम केले जावू शकते अशा वेळी इक्वल ग्राउंड कसे काय? सज्ञान मुलीला घराण्याची अब्रू म्हणून आणि मुलाला म्हातारपणची काठी म्हणून जिथे मॅनिप्युलेट केले जाते तिथे काहीही शक्य आहे. एखाद्या अपत्याचे पालनकर्ते म्हणून विचार करताना त्यात भविष्यात सज्ञान झाल्यावर त्या अपत्याकडून लैगिक सुख मिळवण्याची मुभा देणे हे मला तरी गैर वाटते.

गैर तर मलाही वाटतेच १००%. फक्त मला 'ब्रेनवॉश' या उत्तराखेरीज, कोणतेही कारण देता आले नाही.

इन्सेस्टचे समर्थन मी करत नाही. पण जेव्हा पुरोगामी लोक लग्न, लैंगिकता ह्याविषयी मुक्तपणाचा प्रचार करतात तेव्हा दोन सज्ञान लोक एकमेकांशी संबंध ठेवतात ह्यात अन्य कुणी आक्षेप घेता कामा नये अशी भूमिका असते. मग माझा धर्म काय सांगतो, माझे संस्कार काय सांगतात हे गैरलागू आहे.
मग इन्सेस्टच्या बाबतीतच हा दुजा भाव का? तोच प्रकार बहुपत्नीत्व वा बहुपतित्व. जर २, ३, ४ वा अशा कितीही सज्ञान व्यक्तींचा समूह एकमेकांशी विवाह करत आहे तर पुरोगामी लोकांचा आक्षेप काय असू शकतो? लग्न ही फक्त एक पुरुष आणि एक स्त्री ह्यात होते ह्या हजारो वर्षांच्या कल्पनेला सुरुंग लावला गेला तर इन्सेस्ट, पोलिगमी ह्याला विरोध कुठल्या नैतिकतेच्या मुद्द्यावर?
असो. ट्रंपचे वागणे हे त्याच्या जवळपासही जाते असे मी मानत नाही. पण इथे तसे आक्षेप घेतले जात आहेत म्हणून पुरोगामी विचारांन समजून घेण्याचा प्रयत्न.

निव्वळ एक हॉवर्ड स्टर्न चे उदाहरण आणि बाकी कपोलकल्पित गोष्टी ह्यावर मी ट्रंपचा इव्हांकाकडे बघण्याचा दृष्टीकोन चुकीचा आहे असे मानत नाही. ज्यांना तसे मानायचे आहे त्यांनी जरुर माना.

स्टर्नसारख्या साध्या व्यक्तीकडून फसवला गेला. अहो तेव्हा तो राजकारणी नव्हता. एक चूक झाली म्हणजे पूर्ण फसवला नाही. थोडीफार पब्लिसिटीही झाली असेल की त्याची. राष्ट्राध्यक्ष बनल्यावर आणि राजकारणी नसताना लोक वेगळ्या प्रकारे वागतात असे मला वाटते.

लग्न ही फक्त एक पुरुष आणि एक स्त्री ह्यात होते ह्या हजारो वर्षांच्या कल्पनेला सुरुंग लावला गेला तर इन्सेस्ट, पोलिगमी ह्याला विरोध कुठल्या नैतिकतेच्या मुद्द्यावर?>>
भारतात पॉलीगॅमी सर्रास होती. कायद्याने बंदी आली ती १९५५ नंतर? त्यात पुन्हा मुस्लीम लोकांना अपवाद मिळाला. पॉलीगॅमी ही इतरही संस्कृतीत होतीच. यात कितीही नाकारायचे म्हटले तरी स्त्रीचे शोषण होते. इंन्सेस्टला आक्षेप का ते मी वर लिहिलेच आहे. आता ज्या लोकांचा कल सम लिंगी आहे अशा सज्ञान लोकांना परस्पर संमतीने जर का कायदेशीर लग्न करुन कुटुंब म्हणून रहायचे आहे तर त्यांना तसे रहाता यायला हवे, विवाह बंधनात असलेल्या भिन्न लिंगी जोडप्यांना मिळते तसे कायदेशीर संरक्षणही मिळायला हवे.

स्टर्नसारख्या साध्या व्यक्तीकडून फसवला गेला. >> परत तेच. ओपन रेडीयो शो वर स्वयंघोषीत स्टेबल जिनीयस ज्याला जगातल्या एव्हढ्या बहुआयामी विषयांवर expert level चे ज्ञान आहे (his words not mine. नाहीतर परत म्हणाला की मी शब्द त्याच्या तोंडात दिले) तो कसा फसवला गेला हे विधान तुम्हाला तरी कसे पटते हे फक्त तुम्हालाच माहीत. परत हे एकमेव उदाहरण नाही. त्याच्या संपर्कात आलेल्या बहुतांश स्त्रीयांनी ह्याबद्दल बरेच लिहिले ही. अशी बरीच उदाहरणे आहेत ज्याने पॅटर्न सिद्ध होतो. तुम्हाला पटले नाही तरीही नि कितीही सारवासारवी केली तरी.

>>ओपन रेडीयो शो वर स्वयंघोषीत स्टेबल जिनीयस ज्याला जगातल्या एव्हढ्या बहुआयामी विषयांवर expert level चे ज्ञान आहे..
काही लोकांना अतिशयोक्तीची सवय असते. उदा. एखाद्या नाटकाची तारीफ करताना आचार्य अत्रे म्हणत की असे नाटक गेल्या दहा हजार वर्षात बनले नसेल! आता कुणी जर गेल्या १००-२०० वर्षातील नाटकांची यादी घेऊन अत्र्यांकडे जाऊन त्याबद्दल भांडला असता तर त्याला लोकांनी मूर्खात काढले असते!

कुणी फुशारक्या मारतो आहे का खरोखर जे बोलतो त्याचा शब्दशः अर्थ लावायचा ते आपापल्या परीने ठरवावे.
धंदा करणारा माणूस फुशारक्या, अर्धसत्य बोलतो हे जगजाहीर आहे. कार विकणारे, फ्लॅट विकणारे हे सगळे असे सगळे करतातच. ट्रंपही अशाच व्यवसायात होता. त्यामुळे तो असे अतीरंजित बोलतो. तुम्हाला ते पटावेच असा आग्रह नाही. पण तो तसा आहे हेही खरे.
लगेच त्याचा शब्द न शब्द त्याच्या विरुद्ध वापरायचा असेल तर जरूर करा. पण असा उद्योग अनाठायी आहे.

आता एवढी चर्चा झालीच आहे तर माझे मत-

गर्भपात, इन्सेस्ट, समलैंगिकता, पोलिग्मी/अँड्री, ग्रुप लग्न यापैकी काहीही कॉग्निझेबल ऑफेन्स असू नये.

गर्भपात, इन्सेस्ट, समलैंगिकता, पोलिग्मी/अँड्री, ग्रुप लग्न यापैकी काहीही कॉग्निझेबल ऑफेन्स असू नये.>> असे तुम्हाला का वाटते ते देखील लिहाल का?

Pages