विचाब्र

Submitted by aschig on 21 April, 2009 - 02:24

विचाब्र

(आशिष महाबळ ८-सप्टे.-२००८ लमाल विषय: संस्कृती)

विश्वामित्र लहानाचा मोठा एका सुसंस्कृत घरात संस्कारांचा धुर आस्वादत झाला. हळुहळु जसा तो विज्ञानकथा वाचु लागला, इतर धर्मियांमध्ये मिसळु लागला तशी त्याला शिंगं फुटु लागली. तशात तो कंपॅरेटीव्ह सायकॉलॉजी/सायकिऍट्री मध्ये शिरला आणि त्याला हजारो भिन्न लोकांचे फॉर्मेटिव्ह कन्सेप्ट्स जवळुन न्याहाळता आले. त्याचे लिखाण आणि काम हे पारंपारिकते पासुन दुर जाऊ लागले. लहानपणी टक्कल आणि शेंडी असलेला आता जटा आणि दाढी मिशा राखु लागला.

जगातील नेत्यांची नैतिक अधोगति सुरुच होती. धर्माला वेठिस धरुन, मटेरीयलीझम वर आरुढ होऊन वसुंधरेला अण्व्युद्धिक प्रलयाकडे दामटणे सुरुच होते. अधर्माच्या नावाखालि जेनेटीक्स आणि अधनाच्या नावाखाली खगोलशास्त्राची कुचंबणा सुरु होती.

एक दिवस हे सर्व असह्य होवुन विश्वमित्राने स्वतःचे जग वेगळे करायचे ठरविले. सायकीऍट्री मध्ये कमावलेल्या पैश्यांच्या आणि योग्य ठिकाणी टाकलेल्या शब्दांच्या आधारावर सगळ्या भूखंडांपासुन दुर असे एक बेट त्याने मिळवले. तिथे पोचल्यावर त्याला देज़ा विझीटे आणि देज़ा वेकुचे अनेक विचित्र अनुभव येऊ लागले, जणु काही त्याला त्या निर्मनुष्य बेटावरील सर्व काही माहित असावे. खुप आधी वाचलेल्या विज्ञानकथा त्याला आठवु लागल्या. त्यापैकी एका कथेतील काही भाग त्याने थोड्या फरकाने प्रत्यक्षात आणायचे ठरविले. काही विशिष्ट जैवीक कल्चर्स गोळा करुन त्याने त्यांच्यावर प्रयोग सुरु केले. जेनेटीक्स मधिल बाल्ड्विन ईफेक्ट प्रमाणे अनुवांशिक नसलेले गुण सुद्धा पुरेश्या शिकवणुकीनि पुढच्या पिढ्यांपर्यंत पोचवता येतात. ते तत्व वापरुन त्याने त्या कल्चर्सचे कामगार फौजेत रुपांतर केले. त्यांचा प्रजोत्पादनाचा काळ छोटा बनविला, व आऊटपुट ट्युरींग मशिन सारखा बनवुन तो संगणकाला जोडला. त्याच्या एका दिवसात त्यांच्या अनेक पिढ्या उलटुन जायच्या व त्याने त्यांना दिलेल्या प्रश्नांची उत्तरे तयार असायची.

आधी त्याने विज्ञानाला भेडसावत असणाऱ्या अनेक प्रश्नांची उत्तरे शोधुन काढली. इतरत्र पृथ्विवरील स्थिती आणखीनच बिघडली असल्यामुळे इतर कुणाला या प्रयोगांबद्दल सांगण्याच्या भानगडीत तो पडला नाही. त्याच्या बेटावर मात्र अनेक ठिकाणी अनेक नाविन्यपुर्णरित्या त्याने सर्व तपशीलांसहीत सगळी माहिती साठवुन ठेवली. त्याच्या या राज्याच्या सुरक्षीततेबद्दल विचार सुरुच असल्यामुळे त्याने अवकाशप्रवासाचे प्रयोग करायचे ठरविले. त्याची फौज या नविन प्रश्नांकडे वळली. सिम्युलेशन्सच्या आणि अनेक प्रयोगांच्या आधारे केवळ अवकाशप्रवासाचीच नाही तर कालप्रवासाची गुपिते देखिल त्याने हस्तगत केली. पुर्ण बेटाचे काही बरेवाईट झाल्यास सर्व परिश्रम वाया जातील म्हणुन त्याने सर्व माहिती अवकाशात देखिल पाठवली.

कालप्रवासा मध्ये मात्र त्याला अनपेक्षीत अशा काही अडचणी आल्या. भविष्यात जाणे त्याला काही करुन जमेना. मग तो भुतकाळातील विश्वाच्या विविध भागातील वेगवेगळ्या कालखंडांना भेटी देऊ लागला. त्या अवाढव्य पसाऱ्यात त्याला जीवसृष्टी मात्र आढळली नाही. किंवा असलीच तर त्याच्या यंत्रांच्या क्षमतेच्या पलिकडे असावी. त्याच बाबतीत त्याला दुसरा अनाकलनीय अनुभव आला.

बहुदा भुतकाळात ढवळाढवळ करता येवु नये म्हणुन त्याने यानाबाहेर काही टाकले की ते गायब होऊन जायचे. पण यामुळे तो ते जग हवे तसे संचारू शकत नसे. अधिक प्रयोगांनंतर त्याच्या लक्षात आले की यानाला लागुनच जर काही बाहेर काढले (उदा. दोरी) तर त्या वस्तुवर काही फरक पडायचा नाही. यावर बराच विचार केल्यावर त्याला दुसऱ्या एका विज्ञानकथेवर आधारीत उपाय सुचला. त्या कथेत एक खेकडा आणि कासव मित्र असतात. कासवाची गंमत करावी म्हणुन खेकडा त्याला अशा गाण्यांच्या तबकड्या भेट देतो की त्या लावल्यावर फोनोग्राफ कंपन-वारंवारितेमुळे (रेझोनंट फ्रिक्वेंसी) तुटेल. त्यावर उपाय म्हणुन कासव असा फोनोग्राफ बनवतो जो स्वतःची रचना त्या तबकडी मध्ये नसलेल्या कंपनांकांच्या आधाराने बदलवेल. याच्या समांतर कल्पनेवर आधारित विश्वामित्र असे यान बनवतो जे टोपोलॉजीकली स्ट्रेच होवुन एक मोठा भाग त्यात सामावल्या जाईल. जसे बशिला स्ट्रेच करुन चेंडु बनवावा. असे केल्यावर आत समावलेला नविन भाग यानाचेच एक अंग असल्याप्रमाणे बनायचा व त्या प्रांताशी बिनबोभाटपणे व्यवहार करता यायचे.

पृथ्वीचा अंत जवळ आलेला असल्याने या प्रयत्नांना यश मिळताच विश्वामित्राने आपले बस्तान दुसरीकडे न्यायचे ठरविले. दुरवर पृथ्वीसारखा एक ग्रह त्याला सापडला. तिथे जीवसृष्टि नव्हती पण खनिजे भरपुर होती. त्या ग्रहाभोवती विश्वामित्राने यानाचे कुंपण बनविले. त्याची कल्चररूपी फौज बरोबर होतीच. इतके सगळे हिरिरिने केल्यावर विश्वामित्राला आपला काळ जवळ येत चालल्याची जाणीव झाली. त्याने आपल्या फौजेच्या पिढ्यांचा वेग थोडा मंदावला होता. तोपर्यंत त्यांच्यात विविधता पण निर्माण होणे सुरु झाले होते. त्याने सांगितलेल्या कामांव्यतिरिक्त इतर जाणीवा निर्माण होणे सुरु झाले होते. जणुकाहि पहिल्यांदाच ते आसपासच्या जगात स्वारस्य घेऊ लागले असावेत. आपण केवळ सांगकामे क्षुद्र नसुन आपणहि काही बनु शकतो हे त्यांना कळु लागले होते. मधमाशांसारख्या समुहवैचारीकते ऐवजी वैयक्तिकता येऊ लागली होती. त्यांचे आकार वाढत होते. आता तर काय त्यांना संपुर्ण आणि नवीन असा ग्रह उपलब्ध होता.

फोफावत चाललेल्या आपल्या सृष्टिकरता जमेल तशी तजवीज करुन आणि थोड्या उताविळपणे आणि थोड्या खट्याळपणे शेवटच्या शोधांची आणि आपल्या प्रयाणाची अर्धवट माहिती छंदबद्ध स्वरुपात लिहुन ठेऊन आपल्या कालयंत्राचे सेटींग विश्वाच्या सुरुवातीच्या क्षणाकडे करुन विश्वामित्राने आपल्या सृष्टिचा कायमचा निरोप घेतला.

गुलमोहर: 

??? Sad

नका मनाला लावून घेवू........ इथलं गूढ उकलणारे नेहेमीचे येतीलच Happy

अधर्माच्या नावाखालि जेनेटीक्स आणि अधनाच्या नावाखाली खगोलशास्त्राची कुचंबणा सुरु होती. >>> Lol अचूक.
असे केल्यावर आत समावलेला नविन भाग यानाचेच एक अंग असल्याप्रमाणे बनायचा व त्या प्रांताशी बिनबोभाटपणे व्यवहार करता यायचे. >>> ह्म्म्म... यानाचा एक भाग बनल्यावर तो भाग त्याचवेळी बाहेरील जगाचाही भाग म्हणून राहू शकेल ? आणि तसे असेल तर मूळचे यान बाहेरील जगाच्या संपर्कात का नाही येऊ शकत ? यान भूतकाळात जाताना यानाच्या आसपासचा भागसुद्धा (चौमितीमधला) यानाबरोबर जात असेल...spacetime cocoon सारखे काहीतरी ?
शीर्षक आणि शेवटचा परिच्छेद खास आवडले Happy बाकी नेहमीप्रमाणेच संदर्भप्रचुर गोष्ट Happy

    ***
    दिसेल दुसरे ते डोळ्यांविण. सरेल मणक्यामधला ताठा.
    पिशी मावशी वदेल सारे... जपून जा, पण जरूर गाठा ! (विंदा)

    म्हन्जे काय रे भाऊ

    ही गोष्ट कळली बरं मला. ह्याला विश्वामित्राने प्रतिसृष्टी निर्माण केली होती असा पुराणातला संदर्भ आहे.

    कळल्यामुळे आवडली. पौराणिक संकल्पनेचं वैज्ञानिक स्पष्टीकरण!

    पूहची गोष्ट मात्र नीट कळली नाहिये अजून!

    स्लार्टि, इतक्या अ.लघुकथेत ईंटर्नली-कन्सीस्टंट कॉस्मॉलॉजी बनवणे तसे कठीण आहे.
    यानाचा आजुबाजुच्या स्थळाशी संपर्क असायचा, काळाशी पुर्णपणे नसायचा. एखादी गोष्ट आत्मसात झाल्यावर त्याचा काळ तुमचाच बनतो व स्थळ एकसंध होते.

    इतक्यात .The Zen Gun नामक दिर्घकथा वाचली. त्यात एक वेगळी कॉस्मॉलॉजी रचली आहे. काही कल्पना ईंटरेस्टींग आहेत.

    जाईजुई, डोकेफोड करण्याइतकी ती पुहची गोष्ट महत्वाची नाही. शेवटच्या वाक्यातील कोटीकरता बाकी गोष्ट आली.
    --------------------------------------------------------------
    ... वेद यदि वा न वेद

    वाचताना सारखे ओळखीचे का वाटते ते शेवटाची ओळ वाचल्यावर कळले. bravo रे ! Happy