हिरवा पाउस.

Submitted by स्मिता द on 14 April, 2009 - 00:59

पावसाची रूपे अनेकविध .अगदी भुरळ घालणारी...खुप रुपात भेटतो आपल्याला पाउस..मला असच भावलेला हा हिरवा पाऊस..

हिरवा पाउस....

हिरव्या हिरव्या पावसाचा
हिरवा चाफा घमघमत जाई
माळभर हिरवी चाहुल
बावरी पावरी गाई

पाचुच्या झुंबरात लख्ख
सोनहळवे हळदुले पिवळे
दिप कोवळ्या उन्हाचे
उजळत लांबवर जाई

ईन्द्रधनुची खळी
अंबराच्या गाली येई
धरणी लाजुन लाजुन
चूर होउन जाई

धसमुसळ्या मिलनातुर
आषाढाचे भोई
अनावर आवेगाने त्यांची
कोसळण्याची घाई

मिलनानंतरचा श्रावण
शांत,हळुवार रिमझिमत
उबदार मायेची झालर
अलगद पांघरून जाई

श्रांत धरित्री पोटी
हिरवी पात जन्म घेई
माळभर हिरवी शाई
पसरत दूरवर जाई

गुलमोहर: 

छान आहे............

खुप छान!
मानसी

हिरवा पाउस - सुरेख, खुप सुंदर...

पाचुच्या झुंबरात लख्ख
सोनहळवे हळदुले पिवळे

ईन्द्रधनुची खळी
अंबराच्या गाली येई

माळभर हिरवी चाहुल
बावरी पावरी गाई

ह्या ओळींमधल्या कल्पना, भावना अप्रतिम.....खुप आवडल्या

सुरेख, आवडली.

क्या बात है !! मस्त रिमझीम !

छान छान!!!

**********************************
लोग कहते थे की ओ मेरे जनाजे पे रोये नही !
मुझे तो खुशी इस बात की,की हमने उन्हे आख्रीर तक रुलाया नही|
गणेश कुलकर्णी (समीप) ९७६४७७३२५७, पुणे-२७
**********************************

बहोत बढिया. मस्त.

काय सुंदर कविता आहे!!
खरंच!! शब्दांची सुंदर निवड! खूप गोड शब्द.
चिंब भिजले पावसात...
प्राजु
http://praaju.blogpot.com

सुंदर आहे कविता, जमलीय एकदम!

बावरी पावरी गाई, हे वाक्य कळले नाही. आधी वाटले गायीबद्दल आहे :), पावरी म्हणजे पावा का?

मीलनातुर, दीप असे असायला हवेत ते शब्द बहुधा.

ईन्द्रधनुची खळी
अंबराच्या गाली येई

कसली गोड कल्पना आहे!
ग्रेट!

मस्त आहे. खूप छान उपमा दिल्या आहेत Happy
************
ॐ श्रीरामदूताय हनुमंताय महाप्राणाय महाबलाय नमो नमः |

मनापासुन धन्यवाद.. Happy
विशाल, सक्य, शुमा, स्वर, जयावी, मानसी, गणेश भुते, वर्षा, प्रकाश, गणेश ,उमेश ,प्राजु , फ्रेन्ड्,स्वरूप, अश्विनी..:)
खरच या प्रतिक्रिया अजुन लिहावे असे वाटायला भाग पाडतात..:)

व्वा बासुरी....काय शब्द...काय रचना...मस्तच!

सुमेधा पुनकर Happy
**************************************
पतंग्यानेच का जावं आगीजवळ ?
ज्योतीला सांग, नमन कर ना एकदा
**************************************