"रुचकर मेजवानी - {हॅव अ सिप्प} - {कोकणी मॉकटेल} - {आरती.}"

Submitted by आरती. on 15 September, 2019 - 06:54

बाप्पाच मॉकटेल कोकणातील आमच्या बागेतील फळांच्या रसांपासून सहज बनवता येईल हे संयोजकानी स्पर्धा जाहीर केली आणि विचार केल्यावर लक्षात आले. घरात सगळ उपलब्ध ही होत, मग झाली तयारी सुरु बाप्पाच्या मॉकटेल नैवेद्याची.

साहीत्य:

हापुस आंब्याचा पल्प, रतांबा सरबत आणि लिंबू सरबत हे सगळ आमच्या बागेतील फळांपासुन बनवल आहे. ह्यात कोणतेही प्रीर्सव्हेटिव्ह आणि फूड कलर वापरले नाही आहेत.

घरी आंबा, रतांबाच्या सिझनमध्ये आंबा पल्प आणि सरबत बनवुन ठेवली जातात.

हापूस आंबा पल्प - 2 टेबल स्पून
रतांबा किंवा कोकम सरबत - 1 ग्लास
लिंबू सरबत - अर्धा ग्लास ( ह्याचे बर्फाच्या ट्रे मध्ये क्युब बनवुन घेतले)
तसेच 1 टेबल स्पून हापूस आंब्याचे ही बर्फाच्या ट्रे मध्ये क्युब बनवुन घेतले.
पीठी साखरेत 1/4 टी स्पून दालचिनी आणि लवंग पावडर मिक्र्स करून घेतली.

कृती:

१. मॉकटेल ग्लासची कडा साध्या पाण्यात बुडवून घेतली.. एका पसरट डिशमध्ये पिठीसाखर पसरवून ठेवली. त्यात ग्लास ची कडा बुडवून घेऊन साखरेची रींग तयार करून घेतली.

2. रींग तयार केलेल्या ग्लासमध्ये 2 टेबलस्पून आंब्याचा पल्प फनेल च्या सहाय्याने ओता किंवा चमच्याने अलगद ओता. पेपर किचन टॉवेलने आतील बाजूस पल्प सांडला असेल तर स्वच्छ करून घ्या.

IMG_20190915_230304.jpg

3. ह्यात लिंबू सरबत आणि आंबा पल्प चे बनवलेले बर्फाचे तुकडे घाला.

IMG_20190915_155533.jpg

४. आता लगेच ह्यावर रतांबा/कोकम सरबत ओता.

IMG_20190915_155747.jpg

५. कोकणी मॉकटेल बाप्पाच्या नैवेद्यासाठी तयार आहे.

IMG_20190915_155910.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users