कविता: आज्जी माझी…

Submitted by भागवत on 29 July, 2019 - 07:27

आभाळभर माया, आठवणींच्या सुरकुत्या
प्रखर बुद्धीची प्रभा, अंगी विशिष्ट कला
आज्जी माझी...

मायेची पाखर, उडून गेली दूरवर
परी आठवण नाही पुसली कदापि
आज्जी माझी...

संवादातून प्रेमाचे ऋणानुबंध जोडले
भेटीत स्नेहच जपले, हेच संचित साधले
आज्जी माझी...

कधी प्रसंगातून शब्दाविनाच सुटले,
डोळ्यातून अश्रु अर्धवट ओघळले,
प्रयत्नांत कधी धडपडले, घडले
परी मी किंचित नाही घाबरले
आज्जी माझी...

आप्तांना भेटण्यास जीव कासावीस
दिसताच पाणावले डोळे आठवणीने
आज्जी माझी...

आत्ता शरीर थकले, आणि कृश झाले
इच्छा संपल्या, उरल्या फक्त स्मृती
आज्जी माझी...

पानगळ सुरू झाली आणि फक्त खोडच उरले
वसंताची चाहुल लागेल, पुन्हा पालवी फुटेल
आज्जी माझी...

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

छान

आवडली तुमची आज्जी! Happy

(आगाऊपणा केला. माफ करा.) Happy
ह्रद्यात अलगद
जपुन ठेवलेली
एक आठवण
म्हणजे माझी आज्जी
माझ्या मनावर
झालेले संस्कार
म्हणजे माझी आज्जी
या मातीच्या गोळ्याला
आकार देणारी
मला घडवणारी
माझी सखी
म्हणजे माझी आज्जी

मन्या ऽ आणि डॉ.विक्रांत प्र... प्रतिसादा साठी खुप खुप धन्यवाद ...
' मन्या ऽ' तुमची अतिशय सुंदर रचना आहे.... Happy Happy

या मातीच्या गोळ्याला
आकार देणारी
मला घडवणारी
माझी सखी
म्हणजे माझी आज्जी >>> अतिसुंदर.... कडक....