तुम्ही कोणतं गाणं रिपीट मोडवर ऐकता आहात?

Submitted by अज्ञातवासी on 8 January, 2019 - 11:42

दरवर्षी एक ना एक गाणं असं असतं, जे आपल्या रिपीट मोडवर असतं!
यावर्षी सुरुवातीला बिंते दिल माझ्या रिपीट मोडला होतं!
त्यांनतर शेप ऑफ यु!
त्यांनतर मेरे नाम तू!
तेलगू मध्ये bachikusto आणि आता तमिळ मध्ये adchithooku!
तर सांगा, तुमचं कोणतं गाणं रिपीट मोडवर आहे?
आता माझा हेतू सांगतो, सध्या माझ्या फोनमध्ये ही चारच गाणी आहेत.
तुमचं रिपीट मोडवरच गाणं मी स्वतः ऐकेन, आणि आवडलं तर तुम्हाला लाख लाख धन्यवाद!
येउद्या!

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

परवा एक रील समोर आले, अगदी लहान आहे मुलगी adriti navek असे नाव आहेती एका बंगाली गाण्यावर अप्रतिम नाचली आहे, चेहऱ्यावरचे एक्स्प्रेशन अफलातून आहेत . इतक्या लहान वयात तिची expressions द्यायची समज फार आवडली किंवा तिला तसे शिकवलेअसेल किंवा भाषा तिला येत व समजत असेल ते गाणे search केले jodi dekhar iccha hoy असे youtube केल्यास मिळेल. प्रत्यक्ष गाणे बघायला अजिबात भारी वगैरे नाहीये मात्र हे जे कडवं आहे, jodi dekhar iccha hoy त्यावर बऱ्याच जणांनी reels केलेत, ढोबळ अर्थ असा असावा की ,"जर तुझ्या निष्ठुर मनाला मला भेटायची (बघायची ) इच्छा असेल तर कालिंदीच्या घाटावर दुपारच्या वेळी ये, मी पाणी भरण्याचे नाटक करत तुला डोळे भरून बघून घेईन (की तू मला बघून घे कुणास ठाऊक )" यात अमोर बंधो चिकोन कालिया असा उल्लेख आहे तो नक्की कोण हे मला कळलं नाहीय म्हणजे कृष्ण ? कि असेच काही नाव आहे Lol

https://www.youtube.com/watch?v=PiFeGLc18_A

हे गाणं अमाप वेळा ऐकलं

फूलों की लाशों में ताजगी चाहता है
आदमी भूतिया है, कुछ भी चाहता है

ज़िंदा है तो आसमान में उड़ने की ज़िद है
मर जाए तो सड़ने को ज़मीं चाहता है
आदमी भूतिया है

काट के सारे झाड़-वाड़, मकाँ बना लिया खेत में
सिमेंट बिछा कर ज़मीं सजा दी, मार के कीड़े रेत में
लगा के परदे चारों ओर क़ैद है चार दीवारी में
मिट्टी को छूने नहीं देता, मस्त है किसी खुमारी में
मस्त है किसी खुमारी में
और वो ही बंदा
अपने घर के आगे नदी चाहता है
आदमी भूतिया है

टाँग के बस्ता, उठा के तंबू जाए दूर पहाड़ों में
वहाँ भी DJ, दारू, मस्ती, चाहे शहर उजाड़ों में
फ़िर शहर बुलाए उसको तो जाता है छोड़ तबाही पीछे
कुदरत को कर दाग़दार सा, छोड़ के अपनी स्याही पीछे
और वो ही बंदा वापस जा कर
फ़िर से वही हरियाली चाहता है
आदमी भूतिया है

फूलों की लाशों में ताजगी चाहता है
आदमी भूतिया है, कुछ भी चाहता है

गाण्याची YouTube लिंक
https://youtu.be/6Zx9UU4JJ6k?si=GiKCVUkwMfwnu0yZ

परवा सहज गाणे ऐकत असताना नवरा म्हणाला ग्रहणे मी 'हा खेळ सावल्यांचा' गाण्यावरून शिकलो. तेव्हा वाटले खरेच सुधीर मोघे यांच्या सिद्धहस्त लेखणीने खगोल, फिलॉसॉफी आणि रोमान्सचा कसला अफलातून मेळ घातला आहे या गाण्यात.

आभास सावली हा, असतो खरा प्रकाश
जे सत्य भासती ते, असती नितांत भास
हसतात सावलीला, हा दोष आंधळ्यांच्या

हृदयनाथ मंगेशकरांच्या अनेक अप्रतिम अल्बम्सपैकी हा एक. सुरुवातीच्या म्युझिक पिसपासून गूढरम्य वातावरणाची निर्मिती झालीय. वाद्यमेळही अप्रतिम.

महेंद्र कपूर पहाडी, खुल्या आवाजासाठी प्रसिद्ध आहेत. पण या गाण्यात त्यांचा आवाज एक वेगळीच मृदूता घेऊन येतो. त्यांच्या हिंदी गाण्यापेक्षा त्यांचा आवाज मला इथे आवडला ('शहीद'चा अपवाद) . उच्चारही योग्य आणि सुस्पष्ट आहेत.

माझेमन छान post.
माझे आजचे गाणे
.
पल पल है भारी वो बिपदा है आई
मोहे बचाने अब आओ रघुराई

जाने वाले हमारी महफ़िल से
चाँद तारों को साथ लेता जा
हम ख़िज़ाँ से निबाह कर लेंगे
तू बहारों को साथ लेता जा
--पंडित नुसरत फतेह आली खान.
https://www.youtube.com/watch?v=GPXKut_m5KM

साधारण महिन्याभरापूर्वी या मुलांचे गाणे लेकीला रिपीट मोडवऱ ऐकताना पाहिले..
पाहिले यासाठी कारण ती तिचा हेडफोन घालून ऐकत होती.
कुठले गाणे ऐकतेय म्हणून चेक केले. साधारण मिनिटभर ऐकून तिला हेडफोन परत केला. आय मीन तिनेच खेचून परत घेतला. तिच्या रिपीट मोड गाण्यात जे घुसलो होतो.
पण दुसऱ्या दिवशी पासून आम्ही दोघे हे गाणे रिपीट मोडवर ऐकू लागलो.
काही दिवसांनी मुलगा सुद्धा आम्हाला जॉईन झाला.
त्या दोघांचे हे गाणे पूर्ण पाठ झाले आहे. इतके शब्द पाठ करणे मला सोपे नाही. पण लहान असले की हा एक फायदा असतो. मेंदू रिकामा असतो.

और - तू है कहा..
https://youtu.be/AX6OrbgS8lI?si=yAmvKzf_kbsjCQ5g

बापरे Ru अरे मी ही हे गाणे घुसून ऐकतेय repeat वर. Addict zaley.
दुसरे अजून याचेच part 2/remake ahe ते सुद्धा छान आहे

https://youtu.be/ay9G79tWYZI?si=C6ooViyDK4aJT7aJ
Totally obsessed.

One direction चा zayn Malik पण एका व्हर्जन मध्ये आलाय.

'मत आना' - गुलजार + भारद्वाज दांपत्य + पं. निलाद्री कुमार (.. और क्या चाहिए)
https://www.youtube.com/watch?v=h5vF728lg44

गाण्यात एक मस्त ठेहराव आहे, जो रेखा भारद्वाज यांच्या आवाजामुळे आणि पं. निलाद्री कुमार यांच्या सतारीमुळे अजूनच गहिरा होतो. गुलजार साहेबांच्या शब्दरचनेबद्द्ल काय बोलावं ! Happy
'खुफिया' (नेफ्ली) पाहून २-३ महिने तरी झाले असतील, पण त्यातलं हे गाणं अजूनही रिपीट मोड वर.

मी सध्या आहारी गेलेलं गाणं म्हणजे -
Top Gun Maverick चं
I ain't worried about it right now
But keeping dreams alive
Nineteen ninty nine Heroes

https://youtu.be/mNEUkkoUoIA?si=Y_JXwBQvV42lVZcJ

जबरदस्त एनर्जी आहे. टॉम क्रूज आणि जेनिफर कॉनली काय दिसले आहेत. ते एकमेकांकडे जसे बघतात ते फारच रोमॅन्टिक वाटतं. I think being physically and emotionally powerful is sexy.... very sexy. जे सिनेमात तर जमलं आहेच पण या गाण्यात त्याचा 'इसेन्स' उतरला आहे.‌ बघायला आणि ऐकायला आवडतंच. ही पूर्णपणे अमेरिकन एनर्जी आहे. त्यातली शिट्टी पर्फेक्ट जमलीय, ड्रायव्हिंग करताना हेच ऐकतेय. Happy

ऊन भाजून काढतंय. केव्हा पाउस येणार?
ऐसे बादल फिर कब आयेंगे?
ऐसी बारीश फिर नाही होगी.
पाउस येई पर्यंत ह्या गाण्यात जीन केली बरोबर लहान बनून पावसात हुंदडा.
https://www.youtube.com/watch?v=w40ushYAaYA

हे गाणं बच्चू वाटतंय का? मग हे घ्या फिलॉसॉफिकल
बी जे थोॉमसन बुच कॅसिडी... मधले
रेनद्रॉप्स कीप फालिंग ओंन माय हेंड...
https://www.youtube.com/watch?v=_VyA2f6hGW4
नाहितर स्पायडरमॅन -२ चे वर्शन ऐका.
https://www.youtube.com/watch?v=nL8hVXSDmNM

'सिंगिंग इन द रेन' आणि कलंकचा टायटल ट्रक ऑटाफे....

I think being physically and emotionally powerful is sexy. >>> १०१%

आजचं गाणं - राहुल देशपांडे आणि विशाल भारद्वाजचं 'नैना ठग लेंगे'. गाण्यातले टेन्शन बेस व हवाईयन गिटारवर छान घेतले आहे. कर्नाटक स्टाईलने घेतलेले व्हायोलिनही अप्रतिम. मधलं बॅण्ड इंट्रो आणि शेवटची राहुलची सरगम चुकवू नका.
हे ओरिजिनल गाणे..

इथे कुणाला पेटी आवडत असेल तर इथे मेंडोलीन आणि पेटी यांची जुगलबंदी ऐका. पण एक लक्षात घ्या कि ही पेटी काव्वालीची आहे.
"शास्त्रीय" असाल तर नका ऐकू. सगळी कव्वाली पंजाबी आहे.
https://www.youtube.com/watch?v=ax-Q3lvg3SM.
आणि जो समोर लहान पोरगा बसला आहे तो कोण आहे माहित आहे?

बापरे Ru अरे मी ही हे गाणे घुसून ऐकतेय repeat वर. Addict zaley.
>>>
Happy

आणि हो,
मी सुद्धा त्याचे विविध वर्जन शोधून ऐकतो. अध्ये मध्ये एकेकदा चेंज म्हणून. पण वर जी लिंक दिली आहे ते रिपीट मोड वर..

बाय द वे आता तू दिलेली लिंक मधील चेक करायला लावले तर ज्यु. Ru ते ऐकून याचे नाव काय विचारून बाहेर टीव्हीवर लावायला गेला Happy

असे सगळ्यांचे रिपीट मोडवर ऐकायचे एकच गाणे असणे यात आणखी एक्स्ट्रा मजा असते. म्हणजे आणखी चौथी व्यक्ती (अर्थात बायको) म्हणाली की काय ते किती वेळा एकच गाणे ऐकता तर एकत्र टीम बनवून तिच्याशी भांडता येते Wink

रिपीट मोडवर डोक्यात साधारण महीनाभरापुर्वी तीन गाणी यायची, मी गुणगुणायचेही, ऐकत नव्हते.

एक मोगरा फुलला, दुसरं तुका म्हणे होय मनाशी संवाद, आपुलाची वाद आपुणासी. हे अनुक्रमे ज्ञानेश्वर आणि तुकाराम यांचं आणि तिसरं एकदम वेगळं गुलाबी साडी अन लाली लाल लाल (हे गाणं आवडतं मला पण वरच्या गाण्याबरोबर ते का डोक्यात येतंय असं वाटे) .

इतका केमिकल लोच्या डोक्यात की समजेनाच मला. बरेच दिवस हे सुरु होतं.

जबरदस्त एनर्जी आहे. टॉम क्रूज आणि जेनिफर कॉनली काय दिसले आहेत. ते एकमेकांकडे जसे बघतात ते फारच रोमॅन्टिक वाटतं. I think being physically and emotionally powerful is sexy.... very sexy. जे सिनेमात तर जमलं आहेच पण या गाण्यात त्याचा 'इसेन्स' उतरला आहे.‌ बघायला आणि ऐकायला आवडतंच. ही पूर्णपणे अमेरिकन एनर्जी आहे.>>> मस्तं गाणं, तुझ्यामुळे परत लूप मधे आलं आता :))

ते एकमेकांकडे जसे बघतात ते फारच रोमॅन्टिक वाटतं.>>> अच्छा? हे घ्या आमचे आपले देसी. असिन आणि आमीर ह्या जोडीचा लाजवाब अभिनय. पण हे गाणे रिपीट मोड वर नाही जाऊ शकत. such a sad song.
https://www.youtube.com/watch?v=ndtno2tBGbo
कैसे मुझे तूम मिल गयी
असिन के ऑखोमे झाकके देखो.

कैसे मुझे ऑटाफे….
अर्थात आमिर खान उत्तम अभिनय करतो (पीके मोडमध्ये नसतो तेव्हा) हे म्हणजे पिवळा पितांबर झाले. त्याच्यामुळे हा पिक्चर बिलीवेबल वाटतो.

MazeMan
आभार. पण मी असिनच्या अभिनया बद्दल बोलत होतो.
तुम्ही ॠषि सिंगचे ऐकले आहे का? इंडिअन आयडल.

मेंडोलीन आणि पेटी यांची जुगलबंदी >>> केकू, भारीच आहे. नुसरत अलींचा खूप हाय पीचचा आवाज जास्त आवडत नाही पण ते वाद्यसंगीत आणि त्या कव्वालीच्या टाळ्या - मस्त माहौल आहे.

२३:४३ ला जी स्वरावली आहे ती सेम राहत साहेबांनी रश्के कमर मध्ये वापरली आहे.

Pages