अंधार (शतशब्दकथा)

Submitted by सेन्साय on 12 October, 2018 - 11:48

"एक शब्द नाही हां बोलायचास तू ह्यापुढे .... तुझी नं लायकीच नाही माझ्यावर प्रेम करायची Sad तुला काय कळणार रे खऱ्या प्रेमाची किंमत Angry कायम पैशात प्रत्येक गोष्ट मोजणारा तू ! तुला कधी माझ्या भावना कळल्याच नाहीत कारे ! असा आपल्या साखरपुड्याच्या तारखेलाच अचानक नाहीसा का झालास. तुला तुझी ती बिझनेस डील जास्त महत्वाची वाटली असेल नं ... आपल्या नात्यापेक्षा Sad आणि आज अचानक सहा महिन्यानी उगवतोयस.. तेही फोनवर !

असो ... आता मी येथेच थांबायचा निर्णय घेतलाय ... मला माझ्या आयुष्याची अजून फरफट नकोय ! गुडबाय .. "

एवढे बोलून समीक्षाने रिसिव्हर जोरात आपटला. आणि पलीकडे ह्या अनपेक्षित फायरिंगमुळे कुंदन हताश होवून आपल्या व्हीलचेअरला धक्का देत आतल्या खोलीत निघुन गेला...अंधाराकड़े !

― अंबज्ञ

Group content visibility: 
Use group defaults

ओह Sad
एक अॅलबम होतं रूपकुमार राठोर चं ते आठवलं वाचून.
जमली कथा.

छान.
ही कथा नायिकेच्या आयुष्यात घडते असा हिंदी चित्रपट आहे एक. बहूतेक "मन" प्रकाश टाकावा.

दुर्दैवाने नमूद केलेल्या घटनेचे दुःख अनुभवणारा कथानायक म्हणजे हे अस्मादिक आहेत. अनेक वर्षापुर्वी मला ह्याच दिवशी एक मेजर अपघात झालेला अन् त्याचे पडसाद आयुष्यात अनेक वळणावर विचित्र पद्धतीने उमटत राहिले त्याचाच हां ओझरता उल्लेख होता. काल पुन्हा तो सर्जरीसाठी वापरलेला रॉड पाहुन त्या कटु आठवणी चाळवल्या म्हणून भावना उद्रेकाने खरेतर एक लघुकथा लिहून काढली. पण त्यातील उल्लेख अन् सर्व प्रसंग फारच पर्सनल होवू लागले त्यामुळे ह्या शशक मध्ये काही बदल करत इकडे पोस्ट केलीय.

प्रतिसादांसाठी धन्यवाद पाफा आणि DShraddha

अंबज्ञ, तुमच्या बाबतीत असं घडल्याचं वाचून वाईट वाटलं. Sad
कथा म्हणून पटली नाही, कारण साखरपुड्याच्या दिवशी एवढा मोठा अपघात झाला आणि वधूला सहा महिने होईपर्यंत कळलंच नाही असं कसं?

वावे, झाले ते भूतकाळ आहे. शारीरिक दृष्टया पुढील वर्षभरात एकदम नॉर्मल झालो तरी मनावरच्या काही जखमा मात्र कधीही न भरून येणाऱ्या असतात हे खरे !
फक्त इतकेच सांगू शकेन की it wasn't a vehicle/ road accident. आणि ज्या प्रकारे अपघात झालाय ते सांगायला शक्य नाही म्हणून ईथे शशकसाठी थोड़ा बदल करुन लिहिलय.

ओहह अंबज्ञ, सावरा आता स्वतःला
जसे तुम्ही म्हटलेय तुमच्या अपघाताला बरीच वर्षे उलटली, अन जाणारा काळ हा सर्वात मोठा उपचार आहे, होईल सगळे ठीक☺️

काळजी घ्या

तुमचं पुढील आयुष्य सुखकर होवो.>>>>+ १११११

शशक छान जमलीय. आवडली. शेवट अगदी हृदयद्रावक वाटला. लगेच माझ्या डोळ्यासमोर राजेंद्रकुमार आणि साधनाचा 'आरजू' सिनेमा उभा राहिला. त्यातही राजेंद्रकुमार अक्सिडेंटमध्ये एका पायाने अपंग झाल्यावर स्वतःहून साधनापासून लांब रहायला बघतो. पण शेवटी साधना त्याला आहे त्या परिस्थितीतही स्वीकारते.

तुमच्या साधनाचा प्रतिसाद कसा होता? सहज उत्सुकता म्हणून विचारतोय. हे सांगून जखम पुन्हा ओली होणार असेल तर राहू द्या.

@ विनिता.झक्कास, होय! मी कथा पुन्हा वाचली.

आता मी येथेच थांबायचा निर्णय घेतलाय ... मला माझ्या आयुष्याची अजून फरफट नकोय ! गुडबाय .. >>> ह्यावरून समजतोय साधनाचा प्रतिसाद!

एक स्वप्नरंजन म्हणून मला 'आरजू'तल्या साधनासारखा प्रतिसाद आवडला असता. Happy

सावरा स्वतःला. काळ हे औषध आहेच, पण तरीहि विशेष प्रयत्न करावे लागतात त्या करता.

पुढील आयुष्यास शुभेच्छा.

प्रेडीक्टेबल म्हणणार होते अंबज्ञ....पण प्रतिसाद वाचून सून्न झाले. >>+१
तुमचं पुढील आयुष्य सुखकर होवो.>>>>+ १

कथा म्हणून छानच लिहिले आहे अंबाज्ञ ...पण हा तुमचा स्वतः चा अनुभव आहे तर आवडले कसे म्हणू... वाईट वाटले ... काळ हाच औषध असतो सगळ्या दुःखावर Sad

काल सकाळी 5 वाजता लेखक भावुक झलता
त्यानंतर आलाच नाही
मला हा सगळा जुनी रटाळ कथा लिवून सिपंथी गेन करायचा गेम वाटतो

अरे हो आलता की
रोड अकॅसिडेंट झालाच नाही असाच रॉड टाकला सांगत Wink

'कथा' म्हणून आवडली. सत्य घटना असल्याने वाचून वाईट वाटलं.
कोणाच्या प्रतिसादाने वाईट वाटून घेऊ नका, कोणाच्या प्रतिसादाना explaination देऊ नका.
आता खूप दिवस झालेत तर सावरा स्वतःला, इतर कशात तरी मन रमवा Happy

इतर शशक सारखी एक म्हणून वाचून बाहेर पडणार इतक्यात लेखकाची प्रतिक्रिया वाचली ही सत्यकथा असल्याची, त्यामुळे काही प्रश्न पडलेत
लेखक जर खरे बोलत असेल तर आधीच त्याची माफी मागतो पण जर नसेल तर माबोकर सुज्ञ आहेतच

1 जर ही सत्यकथा आहे तर एकच बाजू का मांडलीये, शब्द वाढवून शशक च्या जागी लघुकथा करता आली असती की
2 यात मुलीला दोषी निष्ठुर दाखवून लेखक सिपंथी घेऊ इच्छितो असे वाटतेय
3 जरी हे मानले की रोड अपघात नव्हता झाला, इतर कुठलेही कारण असेल, तरी ते वधूला कळणार नाही ह्यावर कोण विश्वास ठेवेल
अजून बरेच आहेत, पण तूर्तास इतक्यांची तरी उत्तरे द्या

वरील कथा वाचून मला असे जाणविले की वधू किती वाईट, नायकाच्या दुःखाच्या क्षणी त्याला अंधारात लोटून स्वतःच्या उज्ज्वल भविष्याकडे वळली. यामुळे काय झाले ते वरचे प्रतिसाद वाचून लक्षात येतच आहे,
सिपंथी, सिपंथी मिळाली लेखकाला. जरा विचार करा की असे कुठे होते का की होऊ घातलेल्या बायकोला नवरा सहा महिने कुठे आहे कुठल्या अवस्थेत आहे हे माहीतच नाही, क्षणभर यावर विश्वास जरी ठेवला तरी त्यात तिची चूक काय? साखरपुड्याच्या दिवसापासून सहा महिने गायब झालेल्यावर तिने विश्वास का ठेवावा? अश्या माणसासोबत आयुष्य कसे , का घालवावे?
चला, तिला माहीत होते म्हटले तरी त्याला रॉड घातलाय मग तिने आपले आयुष्य अश्या माणसासोबत नाही घालवावे असे तिला वाटले तरी त्यात चूक ती काय?

सारांश असा की ही कथा म्हणजे सिपंथी गेन करण्यासाठी केलेला दुबळा प्रयत्न वाटतोय, ज्याला बरेच माबोकर फशी पडले.

जर समजा खरेच ही कथा खरी आहे, तर मी तर बाबा त्या मुलीच्या प्रेमात

ज्जे बात मान्ना पडेगा लडकीको सही डिसीजन

शशक हा प्रकार आवडत नाही म्हणून इतके दिवस दुर्लक्ष केले होते. प्रतिसाद वाचले आणि धक्का बसला.
कुठलाही सल्ला देणे अवघड आहे. तुम्हाला सावरण्याची शक्ती मिळो हीच प्रार्थना.

Pages