Submitted by satish_choudhari on 26 March, 2009 - 04:02
एक एक हात होऊ दे
पहलवानकिच्या दादा..
मिशा तुझ्या पिरगळून घे
रानटी दाखव अदा..
बांधून घे लंघोटी तु
नाहीतर सुटुन जाइल रे
बाया बघतील माणसं हसतील
नजारा पाहून रे….
पछाडून दे लाथाडुन दे
चिलटांची ती सभा
पकडून घे लकडून घे
हाडांचा तो मुरब्बा…..
लंघोटीचा काय भरोसा
परखून घे तु जरा
आवरासावरा करुन घे
तुझा सगळा पसारा….
अन् कुस्तीच्या मैदानात
मर्दानकिची तऱ्हा
अंगावरच्या मैदानावरती
वाहूदे घामाच्या त्या धारा…
पण लंघोटिचा नाळा
पाहून घे तु जरा
इज्जत नको घालवशील
माझ्या लंघोटी यारा…
होऊदे आभाळात
आता मोठ्याने गर्जना
मराठाकेसरी बनून तु
कर सर्वांना तुझा फिदा…..
एक एक हात होऊ दे
पहलवानकिच्या दादा..
मिशा तुझ्या पिरगळून घे
रानटी दाखव अदा..
कवि- सतिश चौधरी
गुलमोहर:
शेअर करा
प्रो. एक
प्रो. एक नंबर हाये !
एकदम भन्नाट!!
प्रकाश
-------------------------------------------------------
Learn Guitar Online @ www.justinguitar.com
दिल्लीची
दिल्लीची स्टाईल आठवली..
)
'लंघोट ही लंघोट' (आता काय जे लोक लंघोट घालतात त्या सगळ्यांवर कविता येणार की काय..
बांधून घे
बांधून घे लंघोटी तु
नाहीतर सुटुन जाइल रे
बाया बघतील माणसं हसतील
नजारा पाहून रे…. >>>>
अरे देवा
------------------------
देवा तुझे किती सुंदर आकाश
सुंदर प्रकाश सूर्य देतो
अरे ह्याला
अरे ह्याला आवरा रे....
लंगोट्यांवर दोन दोन कविता? वाह!! प्रो. अजुन कुठली आंतवस्त्र माहीत नाहीत का तुम्हाला?... नसतिल तर बरं आहे नाही अजुन काय काय दाखवाल... अॅडमिन जाणे
गंजीफ्रॉक वर एक कविता लिहा ना...
खरच
खरच ह्यांना आता आवरायची गरज आहे
अहो प्रोफेसर , जागे व्हा ! आपण काय लिहितोय , कुठे लिहितोय ह्याचे जरा भान ठेवा !
**********************************************
सर्व मायबोलीकरांना गुढीपाडव्याच्या अनेकानेक शुभेच्छा
अहो ही
अहो ही प्रकाशदांची ऑन डिमांड कविता आहे....! बर असु द्या... तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या अनेक हार्दीक शुभेच्छा...!
**********************************
प्रा.सतिश चौधरी
काव्यातुन ...हे जिवन फुले....
----------------------------------->>
एक
एक प्रॉब्लेम झाला हे कवितेत!
म्हण्जे मेजर लोचाच झालाय
कवी ज्या लन्घोटी लन्घोटी चा जप करतोय, ती लंगोटी, म्हण्जे साने गुरुजिन्च्या "श्यामच्या आई" पुस्तकात वर्णन केल्याप्रमाणे श्याम कापडाच्या लाम्ब पट्टीची लंगोटी नेसतो ती! ती करगोट्यात अडकवली जाते!
मात्र कवी अशी ही लंगोटी चक्क पैलवानाला नेसवतोय! नुस्ता नेसवत् नाही तर त्याला कुस्ती खेळावयास लावतोय! लोचा इथेच आहे!
पैलवान नेसतात ते लंगोट, लंगोटी नव्हे! लंगोट अन लंगोटीमधे फार म्हणजे फारच फरक आहे!
लंगोटाला, (करगोटा नसतानासुद्धा) बान्धायला नाडी असते! किम्बहुना लंगोट बान्धताना करगोट्याची आवश्यकताच नसते!
लंगोटी मात्र करगोट्यातून दुहेरी पट्टी पुढील बाजुने ओवुन घेवुन, आतिल पदर मागिल बाजुस खोचून, पुढिल पदर तसाच लटकवत ठेवतात! (अधिकची माहिती: त्याकाळी पुढील पदर किती खालपर्यन्त सोडला हे यावर त्याची समाजमान्यता/शिरिमन्ती इत्यादी समजले जात असे! सुरवातीस किमान गुढग्यापर्यन्त पदर सोडणे आवश्यक समजले जायचे, नन्तर नन्तर गरीबी वा तेव्हान्च्या फॅशनच्या कारणाने, पुढील पदराची उन्ची कमी होऊ लागली! देवदयेने त्याच काळी इन्ग्रजी अमदानीच्या प्रभावाने पाटलोणी आल्या नि पदर कमी कमी होत जाउन होऊ शकणारा अनवस्था प्रसन्ग टळला, असो विषय तो नाही!)
तर, अशी ही मुळातच ढिसाळ लन्गोटी, पैलवानाला नेसवून कुस्ती खेळावयास लावल्यावर काय होईल हे सान्गायला वरील कवीच व त्यान्ची कविता हवेच हवेत का????
तर माझी प्रस्तुत कविन्ना विनन्ती राहील की त्यान्नी एकदा काय ते ठरवुन घ्यावे, लंगोट की लंगोटी!
अन जर यातिल फरक कळत नसेल तर पुण्यातील, कुमठेकर रोडवरील, सदाशिवपेठ हौद चौकातील कोपर्यावरील दुकानात जाऊन तिथे टान्गुन ठेवलेले लंगोट असतात ते पाहुन घ्यावेत, (हवे तर विकतही घ्यावेत, स्वस्त आहेत, पन्चवीस रुपये फक्त, मी नेहेमी तिथुनच घेतो) व स्वतःचे शन्का निरसन करुन मगच (हवे तर लंगोट वा लंगोटी नेसून) पुन्हा एकदा कविता नव्याने लिहायला बसावे!
आता मला कळले, की पूर्वीचे पन्तोजीच नव्हे, तर आमच्या शाखेतील एक बासरी वादन शिकवणारे शिक्षक देखिल शिकवायला सुरुवात करायच्या आधि विचारायचे, "काय रे शिन्च्यान्नो, लंगोट कसलाहे का? नसेल तर घरी जा अन कसुन परत या"
...;
*** कबुतरे हवेत सोडून शान्ती पसरते यावर माझा विश्वास नाही! ***
लंगोट
लंगोट कसलाहे का? नसेल तर घरी जा अन कसुन परत या>>>>

प्रकाश
-------------------------------------------------------
Learn Guitar Online @ www.justinguitar.com
वा $$$ जी वा...
वा $$$ जी वा... लिंबुटिंबू जी.... तुमचं विश्लेषण अगदी आवडलं...!
****************************************
प्रा.सतिश चौधरी
काव्यातुन ...हे जिवन फुले....
----------------------------------->>
मला वाटलं
मला वाटलं तू लिंबूटींबू असशिल पण तू तर फारच टेक्नीकल लिंबू आहेस.. पण एक सांगायला विसरलास .. "प्रकाशचित्र मध्ये फोटोपण टाकावेत"...
*** कबुतरे हवेत सोडून शान्ती पसरते यावर माझा विश्वास नाही! *** >> खरं की काय? अरे देवा..
तुमचं विश्लेषण अगदी आवडलं...! >> वाह मग दोनाच्या चार कधी करताय?
हे पक्याच
हे पक्याच कारस्थान हाय व्हय... ओ प्रो. माझी गंजीफ्राकची कविता कधी लिहणार, बराच वेळ झाला विनंती करुन बर कां
सत्या,
सत्या, ऐनवेळेस फोटो कुठुन आणायचे? मी तर झट्टदिशी माझ्या फेमस स्टाईलने रेखाचित्रे काढून दाखवणार होतो!
(या कल्पनेने) माऊसच बिघडला म्हणून नाही काढता आली चित्रे!
...;
*** कबुतरे हवेत सोडून शान्ती पसरते यावर माझा विश्वास नाही! ***
जयदीप
जयदीप ओक
**********
मी दुसर्यांन सारखा होऊ शकत नाही कारण मी माझत्वं घालवु शकत नाही.
च्यायला
च्यायला कारस्थान काय त्यात ! प्रेमळ इनंती केली आम्ही !
प्रो. गंजीफराकवर पण लिवा...त्याशिवाय काय मिटायचं नाही हे आता
(या कल्पनेने) माऊसच बिघडला म्हणून नाही काढता आली चित्रे! >>>लिंबुभौ, नशीब आमचं :P!
प्रकाश
-------------------------------------------------------
Learn Guitar Online @ www.justinguitar.com
>>>> (या
>>>> (या कल्पनेने) माऊसच बिघडला म्हणून नाही काढता आली चित्रे! >>>लिंबुभौ, नशीब आमचं
हो ना, आमच नशिबच फुटक, आमचच सगळ काही वेळेला नेमक बिघडत
यान्चाच कीबोर्ड कसा काय बिघडत नाही देव जाणे!
...;
*** कबुतरे हवेत सोडून शान्ती पसरते यावर माझा विश्वास नाही! ***
वाईट!
वाईट!
*********************
प्रतिकार आणि प्रतिहल्ला यात फरक असतो!
स्वसंरक्षणार्थ असतो तो प्रतिकार अन् दुसर्याला स्वरक्षणाची संधी देतो तो प्रतिहल्ला! 
एक तरी धाव
एक तरी धाव होऊ दे
कोलकोत्याच्या दादा..
मिशा तुझ्या वाढवून घे
आणि मग दाखव अदा..
बांधून घे गार्ड तु
नाहीतर सुटुन जाइल रे
बाया बापे हसतील न बघताच
'नगमा' मात्र बघून रे….
पछाडून दे लाथाडुन दे
चेंडू सगळे सोडून दे
शर्ट काढ सांभाळून
नायतर हाडांचा मुरब्बा दिसेल रे…..
फलंदाजीचा काय भरोसा
परखून घे तु जरा
आवरासावरा करुन घे
संघातून काढल तर रणजी खेळयला जायच ना रे….
पण चॅपेलच्या बाळा
इकडे काहीच सुचल नाही म्हणून
विषे कंठ काळा त्रीनेत्री ज्वाळा
होऊदे आभाळात
आता मोठ्याने गर्जना
बॅडलाईट मागून तु
कर सर्वांना तुझा मिंधा…..
एक तरी धाव होऊ दे
'दोना' च्या दादा..
मिशा जरा वाढवून घे
आणि मग दाखव अदा ..
(काळाच्या मागून येणारी कविता)
------------------------
देवा तुझे किती सुंदर आकाश
सुंदर प्रकाश सूर्य देतो
केदारदा
केदारदा जबरी रिमीक्स !!
प्रकाश
-------------------------------------------------------
Learn Guitar Online @ www.justinguitar.com
हा हा ..
हा हा .. लोळलो पार लोळालो...
काळाच्या मागून येणारी कविता) >> मग वरची काय काळाच्या मागून नेणारी कविता आहे का?
उद्या गुडीपाडवा आहे उद्या एक दिवस आराम करा.. नाही तर वर्षभर काळाच्या मागून नेणार्या कविता वाचाव्या लागतिल..
लिंबुने
लिंबुने लंगोटी आणि लंगोट यामधला फरक समजौन सांगितल्यामूळे आता कवीवर्यानी दोन वेगवेगळ्या कविता कराव्यात , त्यात शक्य असेल तर लंगोटाच्या रंगा प्रमाणे येक अशा कविता करता आल्या तर उत्तम. लंगोट किती रंगात उपलब्ध आहेत ते लिंबु ने सांगितलेल्या दुकानात जाउन पहावे
प्रा.सतिश
प्रा.सतिश चौधरी
काव्यातुन ...हे जिवन फुले....>>>>>>>>
हे फुले कोण ?? ज्योतिबांचे नातू ??? का खापरपणतू ???
अनिरुद्ध
अनिरुद्ध अरे अरे तू डायरेक्ट येउन लंगोटीवरच पडलास का? अरे प्रो दुखलं असेल...
इतरत्र जाउन ये मोकळा होशील..
ते चौधरी आहेत फुल्यांना का उगाच त्रास.. ?
अँडी आता
अँडी आता बहुतेक तुझ्या वर कविता

केदार,
पण चॅपेलच्या बाळा
इकडे काहीच सुचल नाही म्हणून
विषे कंठ काळा त्रीनेत्री ज्वाळा
तालमीत
तालमीत शेंबडी पोरं यायची लंगोट हातात धरुन (म्हणजे घरातून चड्डी घालूनच पाठवलेलं असायचं त्यांना). ती मल्लखांबासाठी रांगेत उभं राहुन म्हणायची, "दादा, लंगोट बांधून दे ना".. आता ह्या प्रसंगावर 'बांधून दे लंगोट दादा' कविता करायला हरकत नाही. म्हणजे माबोवरच्या सध्याच्या प्रथेप्रमाणे लंगोट ही आला आणि दादा पण आला.
काय भंकस
काय भंकस आहे !
चला इथे
चला इथे ज्यांच्या लंगोट्या सुटलेल्या त्या बांधायला जागा झाली !!
प्रकाश
-------------------------------------------------------
Learn Guitar Online @ www.justinguitar.com
प्रकाश, दुस
प्रकाश,
दुसरं करण्याजोगं काहीच उरलं नाहीए का?
धन्यवाद..!
धन्यवाद..! आपल्या सर्वांचे..!
********************
प्रा.सतिश चौधरी
काव्यातुन ...हे जिवन फुले....
----------------------------------->>