वाट ईथे स्वप्नातील....!

Submitted by उमेश कोठीकर on 25 March, 2009 - 16:06

वाट हिरवी शेतांची
धुंद प्रवास प्रेमाचा
घट्ट बिलगले पाठी
वेग सुखद मनाचा

वारा कापीत जाई
वेग गाडीचा भन्नाट
सळसळते पौरूष
होई दर्शन विराट

हिंदकळते शरीर
गोड शिरशिरी येई
डोके ठेऊन खांद्याशी
गोड चावा कानी घेई

वाट चित्र जणू छान
सूर्यफुलांची सलामी
तुझे प्रेम जणू वेग
कसे थांबवू तुला मी?

थोडे पुंजके ढगांचे
बाकी निळाईच फार
वाट हिरवा गालिचा
स्कंधी हातांचे हार

काळ थांबावा येथे
चित्र स्तब्ध हे व्हावे
तुझा घामेजला स्पर्श
मी मोहरून यावे

हा स्वर्गीय प्रवास
वाटे संपूच नये
सख्या जन्मोजन्मी मला
घेण्या कवेत तू ये

मंद मृदगंध आला
गाली ओघळे तुषार
वेगे पावसाची मजा
ओले मन झाले मोर

वाट थांबली एकांती
हात हातात धरिला
मोरपिसारा मनात
आता चंद्र हाती आला!

गुलमोहर: 

छान आहे कविता !
Happy

---------
रुसुन रुसुन रहायच नसतं, हसुन हसुन हसायच असतं !

मस्त

____________________________________________

आता मी बोलणार नाही. (पण बोलल्याशिवाय मला राहवणार नाही Happy )

उमेशराव,
सही गुंफली आहे स्वप्नमय वाट ! अप्रतिम !!
आवडली.

प्रकाश
-------------------------------------------------------
Learn Guitar Online @ www.justinguitar.com

व्वा व्वा!!! मस्त..."मिलन" चा पुढचा भाग का Happy

*****************
सुमेधा पुनकर Happy
*****************

रोमँटीक टच कमी पडला असं मला वाटल बा़की लय छान आहे... बा़की कवितां सारखिच..

अरेच्या, ही मी वाचलीच नव्हती